आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांड्या नेहरामुळे जिंकायचा. अंबानीला वाटलं कॅप्टनशीप आहे त्यात. रोहितला कॅप्टन पदावरून काढलं त्यानंतर रोहितने आयसीसी स्पर्धेत एकही सामना न गमवता दोन आयसीसी ट्रॉफ्या जिंकल्या. नियती बोलली आयपीएल ट्रॉफी लहान आहे तुझ्यासमोर जा आयसीसी ट्रॉफी जिंक. काव्यात्मक न्याय केला.

बोकलत +७८६
त्या आधीचा वन डे वर्ल्ड कप सुद्धा कमाल कामगिरी होती.
एक अंतिम सामना वगळता सलग तीन आयसीसी ट्रॉफी अपराजित राहणाऱ्या भारतीय कर्णधारावर आपण तीन आयपीएल सीजन ट्रॉफी मिळवता आली नाही म्हणून प्रश्न चिन्ह उपस्थित करतो हे अदभुत आहे Happy

यावेळच्या आयपीएल मध्ये रोहित, धोनी आणि पंत तिघेही (आत्तापर्यंत तरी) फ्लॉप आहेत.... ते खेळले असतें तर काय कॉमेंट्स आल्या असत्या नुसते इमॅजिन करा!! Wink

अस असेल तर भारतीय बोर्डाने ही common or winning strategy करायला हरकत नाही.
सर्व भारतीय खेळाडूंनी पाट्याच टाकाव्यात.
परदेशी खेळाडू मारे घाम गाळू देत, शक्ती जाळू देत..
आपण आपली शक्ती, खुब्या अशा दडवाव्यात, वाचवाव्यात की ज्याचं नांव ते.
Probable भारतीय संघातील खेळाडूंनी तर सर्वस्व देऊन खेळूच नये पण त्याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूंनीही संघनिवडीच्या आशेने जीव तोडून खेळू नये.
कारण चांगले खेळले तर संघात निवड होईल असे वाटेल पण शक्ती खर्च करुन टाकली म्हणून निवडसमिती निवडच करणार नाही..
आणि मग IPL खेळून थकलेल्या परदेशी खेळाडूंच्या परदेशी संघांविरुद्ध विजयच विजय.
सरासरी सुधारणार, आकडेवारी सुधारणार, ब्रँड व्हॅल्यू वाढणार..
मौजा ही मौजा..
व्हाॅट ॲन आयडीया सरजी..

पंत फ्लॉप आहे.
त्याचा परिणाम होत कप्तानी करताना अगदीच क्लूलेस वाटत नाही हेच समाधान.
लखनऊ मालक गोयंका नालायक आहे हे आपण आधीही पाहिले आहे. त्यामुळे ते जिंकावे अशी इच्छा नाहीच आहे.
तरी रेड बॉल क्रिकेट सुरू होताच पंत फॉर्म मध्ये येईल हा विश्वास आहे.

रोहीत फलंदाजी कॅज्युअली करतो. मला त्याच्या आयपीएल फलंदाजीचे हल्ली काही घेणे देणे नसते. काही नेत्रसुखद फटके खेळला तर ते बोनस समजतो.

धोनी फलंदाज म्हणून वयानुसार केव्हाच संपला आहे. तो चेन्नई ब्रँड म्हणून खेळतो. पण आजही या वयात कीपिंग ज्या चपळाईने करतो ते कमाल आहे. यंदा सुद्धा ज्या दोनेक स्टॅम्पिंग केल्या आहेत आतापर्यंत त्या अदभुत आहेत

.
..

.

.

.

.

.
..

.

.

.

.

.
..

.

.

.

.

.
..

.

.

.

.

तो पुन्हा येतोय ...

चेन्नईचा कप्तान महेंद्र सिंग धोनी

आता परदेशी खेळाडूंची उदाहरणे दिली कारण कुठल्या भारतीय खेळाडूकडे हा दुसरा पर्याय नसावा. मग त्याला कोणाला राष्ट्रीय कर्तव्य बजावायला स्वताला फिट ठेवायचे असेल तर तो काय करणार, तर आयपीएल फारसा जीव न जाळता खेळणार..

भारतीय क्रिकेट फॅन म्हणून शक्य झाल्यास सपोर्ट करा अश्या विचारांच्या भारतीय खेळाडूना.. मी तरी करतो!
Submitted by ऋन्मेऽऽष on 11 April, 2025 - 07:54

देशप्रेम एव्हढे ऊतू चालले असेल तर आनंदाने आयपीएल संन्यास घ्यावा ना, पण पैशाचा मोह पण सुटत नसेल अजूनही

देशप्रेम एव्हढे ऊतू चालले असेल तर आनंदाने आयपीएल संन्यास घ्यावा ना, पण पैशाचा मोह पण सुटत नसेल अजूनही
हे ऋन्मेऽऽष चे लॉजिक आहे, रोहित थोडीच असा चुकीचा विचार करत असेल? तो जीव तोडून प्रयत्न करतोय पण काही कारणांमुळे होत नाही रन्स.

देशप्रेम एव्हढे ऊतू चालले असेल तर आनंदाने आयपीएल संन्यास घ्यावा ना
>>
सर्व काही फॅन्स साठी. घेतलाच आयपीएल संन्यास अन् फॅन्स नी पाठ फिरवली तर??? (अन् बीसीसीआय नी ही, शेवटी आयापीएल कॅशिंग काऊ आहे)

फॅन्स चा भरोसा नाही, एकीकडे आयपीएल फिक्स्ड आहे म्हणातात, अन् दुसरीकडे विजयाचं क्रेडिट टॉप परफॉर्मर ना इग्नोर मारून फक्त आपल्या लाडक्याला देतात (फिक्स्ड असेल तर क्रेडिट मास्टर फिक्सर ला द्यायला हवं ना? का तुमचा लाडका च मास्टर फिक्सर आहे असं म्हणायचं आहे??)

रोहीतच कश्याला भारतीय संघात जागा फिक्स असणाऱ्या सर्वच टॉपच्या सात आठ खेळाडूंनी आम्ही आयपीएल खेळणार नाही असा निर्णय घेतला तर ते बोर्डाला चालेल का? कारण मग उरले काय त्या आयपीएलमध्ये.. केवढा मोठा आर्थिक फटका बसेल. परवानगी मिळेल का?
सोडा हो.. प्लेअरचे मनात आले तरी ते असे करू शकणार नाहीत.

माझ्या माहितीनुसार भारतीय खेळाडूना बाहेरच्या देशातील लीग खेळायची सुद्धा परवानगी नाहीये.
चुकत असेल तर करेक्ट करा..

फिक्स्ड आणि स्क्रिप्टेड मनोरंजन यात फरक आहे.
जसे की धोनीचे उदाहरण दिले आहे बघा वरच्या एका पोस्टमध्ये.. थाला मनोरंजनाची सरळ सरळ स्क्रिप्ट लिहिली जाते. जिथे मनोरंजनाचे मीटर डाऊन होते तिथे ते उचलले जाते.

एकदा IPL स्क्रिप्टेड आहे हे मान्य केलं की त्याच्यात काहीही बसवता येत. मुंबई हरणार हे माहितीच होत, धोनी ने सिक्सच मारला, राहुलची फिफ्टी. थोडीच पुरावे द्यायचे आहेत आपल्याला.

दिग्वेश राठीच्या सेलिब्रेशन स्टाइलवर BCCI ची कारवाई, क्रिकेटविश्वात वाद

लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा युवा फिरकीपटू दिग्वेश राठी सध्या आयपीएल 2025 मध्ये आपल्या प्रभावी कामगिरीसोबतच अनोख्या सेलिब्रेशन स्टाइलमुळे चर्चेत आला आहे. मात्र, त्याचे हे सेलिब्रेशन त्याला चांगलेच महागात पडले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राठीवर दोन वेळा दंड ठोठावला असून, त्याची एकूण रक्कम तब्बल ₹5,62,500 इतकी झाली आहे. या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि JioHotstar आयपीएल तज्ज्ञ सायमन डूल यांनी बीसीसीआयच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सायमन डूल यांची नाराजी

सायमन डूल यांनी अंपायरिंगमधील पक्षपातावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, "हा दंड भरावा लागत आहे, पण मला हे आवडले नाही. मला राठीचे सेलिब्रेशन खूप आवडले. मला वाटत नाही की त्याने काही चुकीचे केले. मी भारतीय क्रिकेटपटूंना याहूनही आक्रमक सेलिब्रेशन करताना पाहिले आहे, पण त्यांच्यावर कधीही दंड ठोठावला गेला नाही. एक युवा खेळाडू उदाहरण म्हणून वापरला जातोय असे वाटते. तो फक्त आपल्या नोटबुकमध्ये काहीतरी लिहीत होता, एवढ्यावर दंड का?"

सायमन डूल गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत आणि त्यांनी या लीगमधून मोठ्या प्रमाणात अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात बीसीसीआयविरोधात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

राठीच्या सेलिब्रेशनची खरी गोष्ट

दिग्वेश राठीने प्रथम हे अनोखे सेलिब्रेशन पंजाब किंग्जच्या प्रियांश आर्याला बाद केल्यानंतर केले होते. नंतर समजले की राठी आणि आर्या चांगले मित्र आहेत, आणि हा फक्त मैत्रीपूर्ण गमतीचा भाग होता. मात्र, बीसीसीआयने याला आक्षेपार्ह ठरवत राठीवर सामना शुल्काच्या 25% इतका दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट लावला.

यानंतर, मुंबई इंडियन्सच्या नमन धीरला बाद केल्यानंतर राठीने पुन्हा तोच ‘नोटबुक सेलिब्रेशन’ केल्याने बीसीसीआयने त्याच्यावर 50% सामना शुल्क आणि 2 डिमेरिट पॉइंट्सचा दंड लावला. यामुळे त्याच्यावर दुसऱ्यांदा स्तर 1 उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला.

KKR विरुद्ध बदलली सेलिब्रेशन स्टाइल

एका पाठोपाठ दोन वेळा दंड बसल्यानंतर, राठीने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात आपला सेलिब्रेशन स्टाइल बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने कोणत्याही फलंदाजाकडे इशारा करण्याऐवजी, मैदानावरच आपले सिग्नेचर सेलिब्रेशन केले. यामुळे नियमांचे पालनही झाले आणि त्याच्या शैलीलाही धक्का बसला नाही.

BCCI ने नियमांचा पुनर्विचार करावा का?

दिग्वेश राठीच्या प्रकरणामुळे मोठा प्रश्न उपस्थित होतो, क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या भावना आणि त्यांची अनोखी शैली दडपली जात आहे का? विराट कोहली, हार्दिक पांड्या यांसारखे स्टार खेळाडू त्यांच्या आक्रमक सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात, पण त्यांच्यावर कधीही अशा प्रकारे कारवाई झालेली नाही. मग एका युवा खेळाडूवर इतक्या मोठ्या प्रमाणात दंड लावणे योग्य आहे का? या निर्णयावर अनेक तज्ज्ञ आणि क्रिकेटप्रेमींनी आक्षेप घेतला असून, बीसीसीआयने आपल्या नियमांचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणी केली जात आहे. तुम्हाला काय वाटतं ?

#DigveshRathi #LSG #IPL2025 #BCCI #NotebookCelebration #SimonDoull #CricketNews #T20Cricket

चेन्नईच्या 72-7 विकेट गेल्या आहेत.
नवव्या नंबरवर धोनी फलंदाजीला येतोय.
आणि चेन्नईचे फॅन आरडा ओरडा करत आहेत.
122+ डेसिबल आवाज गेल्याचा शोर मीटर दाखवत आहेत..
हे फक्त आयपीएलमध्ये आणि धोनी बाबतच होऊ शकते Happy

एकदा IPL स्क्रिप्टेड आहे हे मान्य केलं की त्याच्यात काहीही बसवता येत. >> नुसता शब्द छळ !

देशप्रेम एव्हढे ऊतू चालले असेल तर आनंदाने आयपीएल संन्यास घ्यावा ना > प्रीसाईजली ! आपल्या बोलण्यात किती कंसिस्टंटली विसंगती आहे ह्याचा काहीतरी विचार करायला हवा.

धोनी कप्तान होताच चेन्नई चा दारुण पराभव होतो आहे, >> त्यापेक्षाही वाईट म्हणजे कुठेही धोनीचा कॅप्टन म्हणून स्पार्क जाणवला नाहि आजबॅट्समोरच्या संघात तीन स्पिनर्स आहेत नि एक त्यातला एक ऑफी आहे तर दोन्ही ओपनर लेफ्टी ? बाराव्या ओव्हर मधे ६७ ला चार असा स्कोअर असताना अ‍ॅश जाडेजा नि धोनीच्या आधी येतो ? बूस्ट द्यायची तर किमान जडेजाला तरी पाठवायचे ? स्वतः हूदा नंतर येणे तर अगदीच अक्षम्य ! एकून पिच बघता अ‍ॅश किंवा नूरला आधी सुरू करायला हवे होते ना बॉलिग करताना ? खलिल आजवर चांगली बॉलिंग करत होता तो आज ह्या पिचवर पेसवर भर देऊन बॉलिंग करतो ? कुंभोजचे पण तेच ! टोटल केऑस. सर म्हणतात ते स्क्रिप्टेड मनोरंजन हेच असावे. धोनीची व्हॅल्यू इतकि कमी करायची कि निवृत्त होईल तेंव्हा चेन्नईचे वेडे फॅन्स थालाच्या नावाने रडत न बसता नव्या टीमला पाठीम्बा देतील.

अवघड आहे..
धोनी आयपीएलचा देव आहे. त्याच्या भक्तांना तो आणखी आणखी खेळावे असे वाटते. तो बस दिसावे असे वाटते. एक काय अजून सात सामने असेच गेले आणि अखेरच्या सामन्यात त्याने एक षटकार मारताच पुन्हा स्टेडियममध्ये आगडोंब उसळेल.

निराशाजनक आहे सारे..

“ राष्ट्रीय कर्तव्य” - सर, मतदान, कर भरणे, कायदे पाळणं, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं ही राष्ट्रीय कर्तव्यं आहेत. प्रोफेशनल प्लेयर्स जो मोबदला घेऊन खेळ खेळतात ते राष्ट्रीय कर्तव्यात मोडत नाही. ह्याचा अर्थ ते खेळात कुचराई करतात असा होत नाही.

आणि हा फक्त मैत्रीपूर्ण गमतीचा भाग होता >>> मागच्या वर्षी इशांत शर्माने कोहलीला आउट केल्यावर खांद्याने धक्का मारला होता ते आठवले. पण दोघेही हसत होते त्यामुळे दंड वगैरे पडला नसेल.

https://www.youtube.com/shorts/b3nxe-02PTU

आज चेन्नई संघाचे चेहरे पाहून २००७ च्या वर्ल्ड कप मधले भारतीय संघाचे चेहरे आठवत होते.

प्रोफेशनल प्लेयर्स जो मोबदला घेऊन खेळ खेळतात ते राष्ट्रीय कर्तव्यात मोडत नाही.
>>>>

भावना समजून घ्या, नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील शब्द पकडू नका..

अन्यथा सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना सुद्धा तुम्ही पैसे घेऊन चौकीदारी करता, काही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत नाही की मेहेरबानी करत नाही म्हणाल...

काही परदेशी खेळाडू आपल्या देशासाठी इंटरनॅशनल सामने खेळायला फिट राहावे म्हणून आयपीएल मधून माघार घेतात किंवा खेळतच नाही. तर काही आयपीएल जीव तोडून खेळतात आणि नंतरच्या आपल्या राष्ट्रीय संघाच्या स्पर्धेला पाय धरून बसतात भले तो कितीही महत्वाचा का असेना.. या सगळ्यांना एकाच पंक्तीत बसवाल.

असो, पण एखादा खेळाडू जेव्हा देशासाठी खेळतो तेव्हा त्याचा जजबा काय असतो हे तुम्हाला कळत नाही तर आता यावर मी वाद घालून तो तुम्हाला समजाऊ इच्छित नाही.

मी कधी देशासाठी खेळलो नाही पण या खेळाचा एक चाहता म्हणून माझे मला प्रामाणिकपणे माहित आहे की एखादा आवडीचा खेळाडू आयपीएल मध्ये चांगला खेळला की जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त आनंद जेव्हा तो देशासाठी चांगला खेळतो तेव्हा होतो.
एखादा आवडीचा आयपीएल संघ जिंकला की जितके छान वाटते त्याच्या कैक पटीने जास्त आनंद भारत वर्ल्डकप जिंकला की होतो.
या दोन्ही भावनांची तुलनाच नाही.

लहानपणी सुद्धा भारतीय क्रिकेट संघाच्या हारजीत मध्ये आपली सुख दुःख शोधायचो तेव्हा असेच काही शेरे यायचे की त्यांना खेळायचे पैसे मिळतात, तुम्ही कुठे जिंकल्यावर वेड्यासारखे नाचतात किंवा हरल्यावर उदास होतात. ते मॅच संपल्यावर दारू पिऊन पार्टी करत असतील आणि तुम्ही इथे रडत आहात वगैरे वगैरे... मी अश्यांना कधी समजवायला गेलो नाही ज्यांना आपल्या भावना कळत नाहीत.
क्रिकेटप्रेम आणि देशप्रेम जेव्हा एकत्र येते ते वेगळेच रसायन असते.

रोहित शर्मा सध्याचा सर्वाधिक आवडीचा खेळाडू. मी स्वतः मुंबईकर असल्याने आणि आधी सचिन मग रोहीत यामुळे मुंबई इंडियन्स आवडीचा संघ होता. जो रोहितच्या नेतृत्वात पाच वेळा जिंकला. पण त्याच्या नेतृत्वात आलेल्या वर्ल्ड कप ट्रॉफीची सर या आयपीएल ट्रॉफीना नाही. हे त्यालाही माहीत आहे म्हणून जेव्हा तो पहिला ट्वेंटी वर्ल्ड कप हरला तेव्हापासून त्याने आपला आणि संघाचा खेळच बदलला, एका ध्यासाने पछाडल्यासारखा खेळू लागला. पुढच्या तीन आयसीसी ट्रॉफीमध्ये ते आपल्याला मैदानावर सुद्धा दिसले आणि निकालात सुद्धा आले.

आजही त्याच्या मनात 2023 वर्ल्डकप फायनल रुतून बसली आहे आणि 2027 वर्ल्ड कप त्याला खेळायचाच आहे. जिंकायचाच आहे. आणि तोपर्यंत त्याला फिटनेस लेव्हल वर टिकायचे आहे. मलाही निव्वळ रोहीत शर्मा फॅन म्हणून नाही तर भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून त्याचा फिटनेस तेवढा टिकलेला हवा आहे. कारण असा जजबा असलेला खेळाडू आणि कर्णधार दुर्मिळ असतो. तो आपल्याला वर्ल्ड कप जिंकवून द्यायची शक्यता आणखी वाढवेल. आणि म्हणून या आयपीएल स्पर्धा त्याने जीव जाळणे मला नकोच आहे.

आपल्याला काय हवंय, काय नकोय हे लक्षात न घेता नको असलेल्या वस्तू गळ्यात मारणारे काही इरिटेटिंग सेल्समन असतात. फार बोलतात आणि त्यांचा हा गैरसमज असतो की मी लई भारी सेल्समन आहे.
त्याची का कुणास ठाऊक आठवण झाली.

*आजही त्याच्या मनात 2023 वर्ल्डकप फायनल रुतून बसली आहे आणि 2027 वर्ल्ड कप त्याला खेळायचाच आहे. जिंकायचाच आहे. आणि तोपर्यंत त्याला फिटनेस लेव्हल वर टिकायचे आहे. * रोहितला स्वतःला हे सर्व असंच्या असं माहीत आहे, अशी आपण आशा करूया ! Wink

त्याने 2023 ची सल कित्येकदा बोलून दाखवली आहे.
आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचे निवृत्ती न घेणे हे सुद्धा बोलके आहे. किंबहुना हा क्लिअर सिग्नल आहेच.
तसेच त्याला 2027 संदर्भात विचारले असता तो आताच काही बोलू शकत नाही म्हणताना माझे त्या दृष्टीने फिटनेसवर काम चालू आहे म्हणाला आहे.

Reports: Rohit Sharma plans to play 2027 ODI World Cup, to train with Abhishek Nayar

The India skipper put in the extra work on his skills and fitness working with India batting coach Abhishek Nayar.

https://www-crictracker-com.cdn.ampproject.org/v/s/www.crictracker.com/c...

जेव्हा इतर जग दुनिया आयपीएल एन्जॉय करत आहे तेव्हा त्याच्या डोक्यात कुठेतरी 2027 वर्ल्ड कप चालू असेल.

*तसेच त्याला 2027 संदर्भात विचारले असता तो आताच काही बोलू शकत नाही म्हणताना माझे त्या दृष्टीने फिटनेसवर काम चालू आहे म्हणाला आहे.* - रोहित स्वतः स्वतःच्या योजनांबद्दल जे निश्चितपणे बोलत नाही, तेंच कुणी छातीठोकपणे त्याच्याबद्दल बोललं तर जरा आश्चर्य तर वाटणारच ना ! Wink

आणखी एक महत्त्वाचं - खरा खेळाडू प्रत्येक सामनाच गंभीरपणे खेळतो ( व तसाच त्याने खेळलाही पाहिजे ). जेंव्हा तो राष्ट्रीय संघातून खेळतो, तेंव्हा वेगळ्याच जबाबदारीच्या जाणीवेने अधिक गंभीरतेने खेळणं स्वाभाविक आहे. पण म्हणून तो इतर वेळी गंभीरपणे खेळत नाही म्हणणं चुकीचं आहे; आणि तसं कुणी खेळाडू करत असेल तर तें तर साफच चुकीचं . ( आयपीएल मध्ये खेळण्यासाठी भरपूर मोबदला घेऊन येत असाल तर असा अंगचोरपणा करणं हे निषिद्धच !!! ) मला रोहित हा फलंदाज म्हणूनच नाही तर सहजसुंदर खिलाडूवृत्तीचा खेळाडू म्हणूनही आवडतो. तो मैदानावर उतरताना असली गणितं मांडून येत असेल असं मला वाटत नाहीं.

भाऊ,
तो अनिश्चित आहे ते ठरवले तसे होईलच याबाबत. पण काय ठरवले आहे याबाबत ठाम आहे.

महाभारतात जेव्हा कृष्णाकडे मदत मागायला कौरव पांडव गेले तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले एकीकडे माझे सैन्य आणि एकीकडे मी एकटा, पण मी हातात शस्त्र घेणार नाही..

पुढे महाभारत सर्वांना ठाऊक आहेच Happy

Pages