Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन लाल निळ्या गोल्डन टीम
दोन लाल निळ्या गोल्डन टीम फायनल खेळणार...
एक सुरुवातीचे पोस्ट
एक सुरुवातीचे पोस्ट
यावेळी पंजाब आयपीएल ट्रॉफी जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका..
अय्यर अश्या फॉर्ममध्ये आहे जिथे जातोय तिथे ट्रॉफी जिंकतोय
...
पण या गडयाने मुंबईलाच धक्का दिला
एक सुरुवातीचे पोस्ट
एक सुरुवातीचे पोस्ट
यावेळी पंजाब आयपीएल ट्रॉफी जिंकली तर आश्चर्य वाटून घेऊ नका..
अन् हे गेल्या आठवड्यातले
RCB जिंकेल आज
उद्या मुंबई जिंकेल
परवा मुंबई पंजाबचा बदला घेईन
तेरवा रोहीत विरुद्ध कोहली सामना रंगेल
दोन्ही बाजूनी बोलून ठेवलं की वेळ पडेल तेंव्हा ' हे मी आधीच म्हणालो होतो ' टाईप पोस्ट टाकता येते...
"दोन्ही बाजूनी बोलून ठेवलं की
"दोन्ही बाजूनी बोलून ठेवलं की वेळ पडेल तेंव्हा ' हे मी आधीच म्हणालो होतो ' टाईप पोस्ट टाकता येते" - आता सॉलिड कोलांटीउडी येतेय.
अहो दोन बाजू कसल्या...
अहो दोन बाजू कसल्या... कित्येक कॉम्बिनेशन बनतात...
इतके वर्षानानंतर पंजाब फायनल नुसती पोहोचली नाही तर अय्यरनेच तिला पोहोचवले
सपोर्ट मुंबईलाच होता.. त्यामुळे तेच फायनलला कसे येणार हेच बघणार म्हणून ते वरचे अंदाज होते.
आणि स्पर्धेच्या सुरुवातीला जे म्हटले होते ते अय्यर वरचा विश्वास होता.. त्यामागे एक क्रिकेटिंग सेन्स होता.. त्यामुळे ते तसेच घडले याचा आंनद आहे
बॅरिस्टरचा शिकाऊ वकील झाला..
बॅरिस्टरचा शिकाऊ वकील झाला..
आता सॉलिड कोलांटीउडी येतेय
आता सॉलिड कोलांटीउडी येतेय
>>
फेफ,
कोलांटी उडी आली, पण सॉलिड नव्हती
रादर लिक्विड पण नव्हती
गेशस म्हणता येईल फार तर
बहुतेक माझ्या पोस्ट मधे कुठे रोहित, पंत, धोनी, शाहरुख, स्वजो ई. ई. उल्लेख नसल्यानी सरांनी फार कष्ट घेतले नसावेत
पण शेवटचं वाक्य वाचून अय्यराला पण वरच्या लिष्टीत स्लॉट मिळतो की काय अशी भिती मात्र वाटत आहे...
अय्यरने इंग्लंड टूरच्या
अय्यरने इंग्लंड टूरच्या भारतीय संघासाठी विचार न हच्यानि मागच्या सामन्यातल्या पराभवामधे त्याच्या रॅश शॉटकडे बोट दाखवणे एकदम मनाला लावून घेतलेले दिसतेय. काय इनिंग होती ! वॉव !
“ गेशस म्हणता येईल फार तर” -
“ गेशस म्हणता येईल फार तर” -
सर, बात कुछ जमीं नहीं इस बार. पुन्हा एकदा प्रयत्न करून बघा एकदा.
“ काय इनिंग होती ! वॉव !” - शेवटचा क्रेसेन्डो तर निव्वळ कहर होता रे. सुपर्ब!! क्लीन हिटिंग आणि त्यापेक्षाही क्लिअर थिंकिंग! जबरदस्त!!
मुंबई हरली म्हणून वाईट वाटलं
मुंबई हरली म्हणून वाईट वाटलं पण श्रेयस भारी खेळला. आता कोणीही जिंकलं तरी चालेल पण विराटला थोडासा जास्त पाठिंबा.
श्रेयस जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इथून पुढे उगीच कुठल्या वादात न अडकता खेळावर फोकस करून आपली कारकीर्द सर्वोच्च स्थानावर नेली पाहिजे आता.
अँकी आणि फेफ, वरच्या पोस्टी बघून करमणूक झाली
घाबरू नका
घाबरू नका
अय्यरच्या खेळीचे श्रेय मी घेत नाहीये.
फक्त गेले वर्षभर मी त्याला जिथे तिथे सपोर्ट करत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे.
१) भारतीय संघ निवड झाल्यावर माझी पोस्ट - अय्यर सोडून बाकी सगळे अपेक्षित हेच म्हटले होते मी. कारण तो मला संघात हवा होता.
२) भारतात आपण किवी सोबत व्हाईट वॉश खाल्ला तेव्हाच्या माझ्या पोस्ट काढा. तिथेही मी लिहिले होते की अय्यर असता तर भारतात आपल्यावर ही वेळ आली नसती. कारण जसे सचिन लक्ष्मण दादा काळात स्पिनरना डॉमिनेट करत चोपताना पाहिले होते तो जलवा अय्यर दाखवतो असे मला वाटायचे.
३) चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यावर मी म्हटले होते - मालिकावीर अय्यरच होता!
४) डोमेस्टिक मधील त्याचे गेले काही काळातील पराक्रम मी बरेच आधी नाचवून झाले आहेत. हल्ली हल्ली त्याचे मीम बनून फिरू लागले आहेत.
५) गंमत म्हणजे अय्यरचा शॉर्ट बॉल प्रॉब्लेम सुरू झाला होता आणि तो त्यातून बाहेर पडायला वेड्यासारखा आक्रमक खेळत होता तेव्हा त्यावर टिका सुद्धा केली होती. तेव्हा पंत आणि त्याचा दिल्लीमुळे सीन झाला असल्याने मी त्यामुळे त्याला नावे ठेवत आहे असे प्रतिसाद आलेले. पण पुढे याच कारणाने त्याला संघाबाहेर स्पेशली कसोटी संघाबाहेर पडावे लागले. कारण अश्या फलंदाजाला कसे बाहेर नेणार होते.
असो,
एखाद्या खेळाडूला तो चमकायच्या आधी सपोर्ट करणे आणि मग त्याचे गाजणे... यातला आनंद वेगळाच
"अय्यरच्या खेळीचे श्रेय मी
"अय्यरच्या खेळीचे श्रेय मी घेत नाहीये." - रुलायेगा क्या पगले... असं अय्यर म्हणेल हे वाचलं तर.
मनाचा हा मोठेपणा 'मी मी' म्हणणार्या संत-महंतात सुद्धा आढळत नाही. 
इथे उपरोध मेला
इथे उपरोध मेला
तेव्हा पंत आणि त्याचा
तेव्हा पंत आणि त्याचा दिल्लीमुळे सीन झाला असल्याने मी त्यामुळे त्याला नावे ठेवत आहे असे प्रतिसाद आलेले. पण पुढे याच कारणाने त्याला संघाबाहेर स्पेशली कसोटी संघाबाहेर पडावे लागले. >> माझ्या अल्प माहितीप्रमाणे त्याने रणजी खेळण्यास नकार दिला किंवा इंजरी कंसर्न दाखवून टाळले ह्यामूळे त्याला वगळण्यात आलेले होते. ह्यात पंत कसा कारणीभूत ह्याबद्दल असलेले स्कूप वाचायला आवडेल. परत पंत कारणीभूत असेल तर अशा स्पेशल फलंदाजाला बाहेर ठेवण्याचे कारस्थान करण्यार्याला कसा काय सपोर्ट करायचा ह्या विचाराने माझ्या पोटात खड्डा पडला आहे.
श्रेयस जबरदस्त फॉर्ममध्ये आहे
श्रेयस जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इथून पुढे उगीच कुठल्या वादात न अडकता खेळावर फोकस करून आपली कारकीर्द सर्वोच्च स्थानावर नेली पाहिजे आता. >> अगदि अगदी ! मला अजूनही तो टेस्ट टीमचा भावी कप्तान म्हणून अतिशय योग्य निवड केलेली होती ह्याबद्दल मला शंका वाटत नाही.
ह्यात पंत कसा कारणीभूत >>>
ह्यात पंत कसा कारणीभूत >>> काय वाचता.. काय अर्थ काढता
आताची नाही. जुनी गोष्ट आहे
दिल्ली मधून अय्यरला काढले आणि पंत कप्तान केला.
अश्यात पंत माझ्या आवडीचा त्यामुळे जेव्हा मी अय्यरच्या शॉर्ट बॉल प्रॉब्लेम बद्दल टिप्पणी केली होती तेव्हा मी पंतचा चाहता म्हणून तसे करत आहे असे काही प्रतिसाद इथे आलेले. कारण लोकांना फॅन बॅटल मध्ये फार रस असतो. आताही नाही बघत. कोहली बद्दल टिप्पणी केली तर त्याचा संबंध रोहीत चाहता असण्याशी जोडला जातो.
फक्त गेले वर्षभर मी त्याला
फक्त गेले वर्षभर मी त्याला जिथे तिथे सपोर्ट करत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे
>>
डर तो इसी बात का है
की अय्यराला पण लिष्टीत स्लॉट मिळतोय
आता अय्यर सुपर ह्यूमन असल्याच्या पोष्टी अन् त्याचे भलते भलते आकडे अन् आरत्या झेलाण्याची मानसिक तयारी करावी लागणार
मला अजूनही तो टेस्ट टीमचा
मला अजूनही तो टेस्ट टीमचा भावी कप्तान म्हणून अतिशय योग्य निवड केलेली होती ह्याबद्दल मला शंका वाटत नाही.
>>
मला त्याला तिन्ही फॉरमॅट मधे कॅप्टन म्हणून बघायला आवडेल
ह्यात पंत कसा कारणीभूत >>>
ह्यात पंत कसा कारणीभूत >>> काय वाचता.. काय अर्थ काढता >> मग नीट स्पष्ट लिही ना. वर बोल्ड केलेले ते वाच नि ते आधीच्या वाक्याला न जोडता कसे वाचणार नि वेगळा अर्थ घेणार ? तू तीन वाक्ये लिहिलीस तर तिसर्या वाक्याचा संबंध दुसर्याशी नाही तर फक्त पहिल्याशी आहे हे समजून घ्यायला आम्ही काय ब्रह्मदेव आहोत का ? परत तू पडलास जुम्मा चुम्मा वाला त्यामूळॅ तुला असेल काही खास माहिती असे वाटले. तो सीन काय झाला होता ते पण सांगून टाक लगे हाथ आता. सगळ्यांचाच कसा गोंधळ होतो वरचेवर तू काय लिहितोस ते समजून घेताना असा ?
पण पुढे याच कारणाने >>> असामी
पण पुढे याच कारणाने >>> असामी ओके.. गैरसमज होऊ शकतो.
बाकी उद्या बोलूया
आता झोप आली.
उद्याच्या सामन्यासाठी फ्रेश राहायचे आहे.
आणि हो, इतक्या त्याला कोणी तीन फॉरमॅट कप्तान करू नका.. कसोटीत त्याला आधी खेळाडू म्हणून सिद्ध करणे बाकी आहे. आणि लिमिटेडमध्ये गिल आणि पांड्या, सूर्या राहुल वगैरे मंडळी त्याच्या कप्तानीत कुरबुर न करता खेळायला तयार होतील का.. असे बरेच मुद्दे येतात. लिमिटेड मध्ये रोहित शर्मा बेटर कप्तान होता हे सगळ्यांना माहीत होते .. पण किती उशीरा संधी मिळाली
इतक्या त्याला कोणी तीन फॉरमॅट
इतक्या त्याला कोणी तीन फॉरमॅट कप्तान करू नका.. कसोटीत त्याला आधी खेळाडू म्हणून सिद्ध करणे बाकी आहे
>>
कुणीही करत नाहीये
रादर जस्ट ऍज अ तीन फॉरमॅट प्लेअर म्हणूनही कन्सिडर करत नाही आहेत
मला त्याला तिन्ही फॉरमॅट मधे
मला त्याला तिन्ही फॉरमॅट मधे कॅप्टन म्हणून बघायला आवडेल<<
इतक्या त्याला कोणी तीन फॉरमॅट कप्तान करू नका.. <<
कभी कभी लगता है, की अँकीजी ही BCCI है..

ते काही असो!
ते काही असो!
पण प्रिती झिंटाच्या गालावरील खळ्या अजून खुलून दिसाव्या म्हणून आज पंजाब जिंकायला हवा!
कोहली किंवा श्रेयस ह्या वादात किंचितही इन्टरेस्ट नाही.
कोहली किंवा श्रेयस ह्या वादात
कोहली किंवा श्रेयस ह्या वादात किंचितही इन्टरेस्ट नाही.
>>>>
असा वाद कुठे पाहण्यात आला नाही. मुंबई फायनल आली असती तर रोहित कोहली किंवा MI RCB फॅन war झाले असते.. आमच्या सोसायटीमध्ये फार चालते.
प्रिती झिंटाच्या गालावरील
प्रिती झिंटाच्या गालावरील खळ्या
>>>>>
गेल्या वर्षी आयरने शाहरुख चा गालावरच्या खळ्या खुलवल्या आता प्रीतीची बारी..
वीर झाला आता झारा असे मेसेज सुद्धा पाहिले आज
अय्यर जिंकायला पाहिजे.
अय्यर जिंकायला पाहिजे. आरसीबीच्या हातात ट्रॉफी देणे म्हणजे माकडाच्या हातात मशाल देणे. पण आरसीबीचे फॅन जोमात आहेत आज.
कभी कभी लगता है, की अँकीजी ही
कभी कभी लगता है, की अँकीजी ही BCCI है..>
>>
I wish
तसं असतं तर गिल कॅप्टन नसता
बुमरा (3 मॅच साठी का असेना) अन् जडेजा व्हाइस कॅप्टन असते
आरसीबीच्या हातात ट्रॉफी देणे
आरसीबीच्या हातात ट्रॉफी देणे म्हणजे माकडाच्या हातात मशाल देणे. पण आरसीबीचे फॅन जोमात आहेत आज.
हो
आर सी बी आणि सी एस के फॅन म्हणजे डोक्याला वैताग
सी एस के फॅन म्हणजे डोक्याला
सी एस के फॅन म्हणजे डोक्याला वैताग >> हे तू बोलावेस ?
अय्यर पण आज झपाटल्यासारखा खेळेल. तसे झाले तर प्रीतीच्या गालावरच्या खळ्या दिसतील. नाही झाले तर अनुष्काच्या दिसतील.
कोहली एकदम कंट्रोल्ड खेळतोय. हिस्टॉरिकल डेटाप्रमाणे शेवटी फुटला तर अय्यरला ढोरमेहनत करावी लागेल. लिव्हिंगस्टॉन कधी तरी खेळणार का आयपील मधे त्याच्या रुतब्याच्या लेव्हलचा ?
कोहली आज परत ट्रॉल होणार 43
कोहली आज परत ट्रॉल होणार 43(34)
Pages