Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आर्चरला काही लागले होते की
आर्चरला काही लागले होते की त्याला दिली नाही सुपर ओवर?
सामनावीर Stark. सतत एकाच
सामनावीर Stark. सतत एकाच ठिकाणी बॉल टाकल्या बद्दल.
फलंदाज पूर्ण ओवर एकच पद्धतीने
फलंदाज पूर्ण ओवर एकच पद्धतीने रिस्पॉन्स देत असतील तर स्टार्क सारख्याला सतत एकाच जागी गोलंदाजी करणे काही अवघड नाही.
सत्कार फलंदाजांचा व्हायला हवा होता
Its very painful to see the
Its very painful to see the way RR playing. >> अगदी अगदी. टोटल ब्रेन फेड वाटत होते. संदीप शर्मा नेहमीचे हुकुमी यॉर्क करायचे सोडून स्लो बाउन्सरमधे का घुसला एव्हढा ? रियान पराग रन साठी का धावला नाही. जैस्वाल ने आधीच धाय्वायला सुरूवात का केली नसेल ?
सामनावीर Stark. सतत एकाच ठिकाणी बॉल टाकल्या बद्दल >> १४४ च्या स्पीडवर बॉल रीव्हर्स स्विंग होत असताना ते करणे कमेंडेबेल आहे ना.
“ कधीच आयपीएल जिंकू शकत नाही”
“ कधीच आयपीएल जिंकू शकत नाही” - #२००८
“ It’s very painful to see
“ It’s very painful to see the way RR playing.” - +१
“ कधीच आयपीएल जिंकू शकत नाही”
“ कधीच आयपीएल जिंकू शकत नाही” - #२००८
>>>
ओके हे नव्हते माहीत. हल्ली आकडेवारी बघणे सोडू. दिले आहे ना..
“ हल्ली आकडेवारी बघणे सोडू.
“ हल्ली आकडेवारी बघणे सोडू. दिले आहे ना..” - किती तासांपूर्वी? किती तासां/मिनिटांसाठी?
शेवटचे इथे दिले त्यानंतर..
शेवटचे इथे दिले त्यानंतर.. पुढचे देईन त्यापर्यंत..
जोक्स द अपार्ट,
राजस्थान २००८ साली जिंकली हे खरेच माहीत नव्हते. म्हणजे माहीत असेल पण लहानपणीचे सारेच कुठे आठवते आपल्याला..
या संघातील कोणी होते का तेव्हा? निदान कोच मेंटर सपोर्ट स्टाफ वगैरे..
अन्यथा अजून शंभर वर्षांनी सुद्धा मागच्या शतकात २००८ साली जिंकलो होतो एकदा हे आठवून राजस्थान स्वतःला चॅम्पियन संघाच्या पंक्तीत बसवत असतील तर माझी वैयक्तिक काही हरकत नाही.
तेव्हा द्रविड कोच होता.
तेव्हा द्रविड कोच होता. त्यात एक ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाज होता, त्याने एक क्रुशिअल ओव्हर अशी केली की द्रविडने भडकून कॅप काढून जमिनीवर हापटली. हे आठवतंय.
मुंबईने राजस्थानला १४ ओवर
मुंबईने राजस्थानला १४ ओवर मध्ये १९४ चेस करून बाहेर काढले होते तेव्हा कोच द्रविडने वैतागून टोपी मैदानावर आपटली होती.
हे २०१४ साली झाले होते.
तेव्हा मुंबईचा कप्तान रोहित शर्मा होता
आणखी दहा वर्षांनी याच कोच कप्तान जोडीने भारताला वर्ल्डकप जिंकून दिला.
असामी, पण काही अति हुशार
असामी, पण काही अति हुशार लोकांना ते कळत नाही ना.

त्यांना सगळेच सोपे वाटते. त्यात काय येवढे. एकाच ठिकाणी तर बॉल टाकायचा आहे. सोम्यागोम्या पण करेल.
त्यांना वाटत किती बोअर गेम आहे हा, किंवा आधीच ठरले होते आणि म्हणून बॅट्समन आणि बॉलर संपूर्ण ओवर तेच तेच करत होते.
छे.. मागच्याच सामन्यात पंजाब
छे.. मागच्याच सामन्यात पंजाब गोलंदाजांनी खेळपट्टीकडून फारशी मदत नसताना जे कलकत्ता फलंदाजांना फालतू शॉट खेळायला मजबूर करत आयपीएल इतिहासातील लोएस्ट टारगेट डिफेंड केले ते पाहून मी कधीच कुठल्याच गोलंदाजांना हलके लेखण्याची चूक करणार नाही.
ज्या मॅचमध्ये DC चे फार फार
ज्या मॅचमध्ये DC चे फार फार तर १६०-१६५ बनू शकतील असे वाटत होते तेंव्हा त्यांना १८८ करू देणे.... त्यात अक्षर पटेल ने हसरंगाला आधीच्या ओव्हर मध्ये धू धू धुतले असताना त्याच्यासमोर पुढची ओव्हर तिक्षणाला देणे आणि आपलें हुकमी यॉर्कर आणि पेस व्हेरीएशन सोडून संदीप शर्माने स्लो बाउंसर्स च्या मागे लागणे आणि लाईन आणि लेन्थ हरवून बसणे हे प्रमुख जबाबदार होते!!
हें राईट लेफ्ट चे काय अतीवेड आहे आर आर ला काय कळत नाही.... फॉर्ममध्ये असलेल्या राणाला सोडून चाचपडणाऱ्या परागला पुढे पाठवून मोमेन्टम घालवतात सगळे!!
कुठल्या लॉजिकने राणा आणि जयस्वालला सोडून पराग आणि हेटमायर ला सुपर ओव्हरला पाठवले?
मुळात ही मॅच सुपरओव्हरला जायलाच नको होती.
स्वताचे शॉट बसत नसताना हेटमायरने १९ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल ला रन काढून लास्ट ओव्हर ला का स्वतःकडे स्ट्राईक घेतली?
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बिनडोक रनिंग बिटवीन विकेट..... जिथे पळायचे तिथे पळाले नाहीत आणि नको तिथे पळुन रनआउट झाले.
आता हा सिझन गंडलाय हें समजून बेंचवरच्या प्लेयर्सना तरी संधी द्या!!
“ आता हा सिझन गंडलाय हें
“ आता हा सिझन गंडलाय हें समजून बेंचवरच्या प्लेयर्सना तरी संधी द्या!!” - प्रॉब्लेम असा आहे कि बेंचस्ट्रेंथ अशी फारशी नाहीये राजस्थानकडे. इंपॅक्ट सब चा सुद्धा फारसा वापर करताना दिसत नाहीत ते.
तेव्हा द्रविड कोच होता. त्यात
तेव्हा द्रविड कोच होता. त्यात एक ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाज होता>>>फॉकनर!
हेड २५ बॉल २५ वर खेळत आहे.
हेड २५ बॉल २५ वर खेळत आहे.
नो बॉल वर आऊट झाला आता.
फ्री हिट वर सुद्धा कॅच काढून दिली.
हार्दिक पांड्या यंदा पार्पल cap मिळवतो वाटते.
सतरावी ओवर चालू आहे
सतरावी ओवर चालू आहे
वानखेडेवर हैदराबादचा एकही सिक्स नाही
आणि तो मारण्यात अजून एक गेला.
आणि तो मारण्यात अजून एक गेला...
ओके हे नव्हते माहीत. हल्ली
ओके हे नव्हते माहीत. हल्ली आकडेवारी बघणे सोडू. दिले आहे ना.. >> पहिली आयपील होती नि एकंदर आयपील चा गाजावाजा बघून, २००४ मधे टॉवेलमधल्या दादाला नुसते बघून द्रविडने कसे पाकिस्तानविरुद्ध इनिंग डिक्लेअर केली सांगणार्या तुला हे माहित नव्हते हे निव्वळ अशक्य वाटते. तुझे बेंजामिन बटनसारखे आहे कि काय अशी शंका येतेय आता मला
चहर नि पांड्याच्या शेवटच्या ओव्हर्स महागात पडणार आहेत.
तुला हे माहित नव्हते हे
तुला हे माहित नव्हते हे निव्वळ अशक्य वाटते.
>>>>
अर्थात माहिती होते. ते गमतीने लिहिले होते. पुढची पोस्ट वाचली नाही का माझी?
२००८ मधील एखादा आयपीएल संघ आणि सध्याचा म्हणजे गेल्या काही वर्षातील तोच आयपीएल संघ यांचा आपसात फार काही संबंध नसतो. त्यामुळे मी आजच्या संघाबद्दल काही म्हटले की २००८ चा दाखला देण्यात काही पॉइंटच नाही.
मुंबईने राजस्थानला १४ ओवर
मुंबईने राजस्थानला १४ ओवर मध्ये १९४ चेस करून बाहेर काढले होते तेव्हा कोच द्रविडने वैतागून टोपी मैदानावर आपटली होती. >> हे वाचून गरिब बिचार्याला राहूलकडे एकच टोपी होती कि काय असा गैरसमज व्हायचा रे
चला शेवटच्या दोनतीन ओव्हरला
चला शेवटच्या दोनतीन ओव्हरला काहीतरी स्कोअर झाला.. अन्यथा १४० पर्यंतचा सामना कदाचित मुंबईने एकतर्फी जिंकला असता. आता हे टारगेट कदाचित ट्रीकी ठरू शकते.
असामी
असामी
ते २००८ नाही २०१४ ला झाले होते.
२००८ ला द्रविड कसा कोच असेल त्यांचा..
अर्थात माहिती होते. ते गमतीने
अर्थात माहिती होते. ते गमतीने लिहिले होते. पुढची पोस्ट वाचली नाही का माझी? >> पुढची पोस्ट
"जोक्स द अपार्ट,
राजस्थान २००८ साली जिंकली हे खरेच माहीत नव्हते.म्हणजे माहीत असेल पण लहानपणीचे सारेच कुठे आठवते आपल्याला..
या संघातील कोणी होते का तेव्हा? निदान कोच मेंटर सपोर्ट स्टाफ वगैरे.."
तुझे फील्ड चुकले रे. क्वांटम फिजिक्स मधे गेला असतास तर ह्या शतकातला हायजेनबर्ग म्हणून प्रसिद्ध झाला असतास.
२००८ ला द्रविड कसा कोच असेल
२००८ ला द्रविड कसा कोच असेल त्यांचा.. >> वॉर्न कप्तान असल्याने कोच - मेंटर वगैरे सगळे तोच.
शमी नि कमिन्स ला एकदम सूट
शमी नि कमिन्स ला एकदम सूट होणारा सरफेस आहे. रोहितची खरी कसोटी आहे.
>>प्रॉब्लेम असा आहे कि
>>प्रॉब्लेम असा आहे कि बेंचस्ट्रेंथ अशी फारशी नाहीये
अरे वैभव सूर्यवंशी, युधवीर, दुबे, मफाका, मधवाल आहेत की!!
आणि पराग वगैरे मंडळीना फक्त insta reel करायला भरपूर वेळ द्यावा.... RR चे insta page बघ.... सगळे एकसे एक हाणताना रिळे आहेत आणि मॅच मध्ये पार फ्लॉप शो!!
सतरावी ओवर चालू आहे
सतरावी ओवर चालू आहे
वानखेडेवर हैदराबादचा एकही सिक्स नाही
>>>>>
रोहीत पहिल्या चार ओव्हरमध्ये तीन सिक्स मारून गेला सुद्धा आराम करायला...
रोहीत शर्माचे वानखेडेवर १००
रोहीत शर्माचे वानखेडेवर १०० सिक्स झाले आज
कोहली, गेल, एबीडी या तिघांनी चिन्नास्वामी वर १००+ सिक्स मारले आहेत. रोहीत असा पराक्रम करणारा चौथा.
Pages