आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या ४ यॉर्कर्सला त्याने लाईन बदलायचा प्रयत्न केला
>>>>
नुसती लाईन बदलली की सोबत फिल्डिंग सुद्धा बदलली? गेम प्लान बदलला का?
सामना ज्या सिच्युएशनला होता तिथे सलग दोन चौके येताच बदल अपेक्षित होता.
आणि बहुधा पुढच्या ओव्हरला फिरून पुन्हा यॉर्करवर आला.

2008- rr
9 dc
10 csk
11 csk
12 kkr
13 mi
14 kkr
15 mi
16 srh
17 mi
18 csk
19 20 mi
21 csk
22 gt
23 csk
24 kkr
25 mi
वरचे सगळे stats गूगल न करता टाकलेत

“गेम प्लान बदलला का?” - तू मॅच बघून मतं बनवत जा रे. आधी मतं बनवून त्यात तुझं सिलेक्टीव्ह मॅच बघणं घालू नकोस. पहिली बाऊंड्री कव्हर्स मधून, दुसरी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिसरी डीप थर्ड, चौथी लाँग ऑफ आणि पाचवी डीप स्क्वेअर लेगला - ह्यात काय चुकलं बॉलिंग टीमचं?? हा निव्वळ बटलरचा ब्रिलियन्स होता.

तुझ्या मते काय फिल्डिंग लावायला हवी होती? लावलेल्या फिल्डिंगमधे काय चुकीचं होतं ते पण लिही ना.

*२००८ भाऊ.. लक्षात ठेवा आता * - कां मेमरीवर बोजा लादायाचा, चुकलंच तर सुधारायला, टपली मारायला तुम्ही व गुगल टपलेले असताना !!! Wink

तू मॅच बघून मतं बनवत जा रे....
दुसरी बॅकवर्ड स्क्वेअर लेग....
>>>>>

छे.. चारही फोर ऑफ साईडला होते. तुम्हीच प्लीज एकदा पुन्हा बघून कन्फर्म करता का?

हा निव्वळ बटलरचा ब्रिलियन्स होता.
>>>>
तो मान्य आहेच.
त्याने पहिल्या यॉर्कर बॉलवर रूम बनवून जो शॉट मारला तोच किंवा तसेच काही मला त्या दिवशी राजस्थान फलंदाजांकडून अपेक्षित होते. पण बहुधा त्यांना जिंकायची इच्छाच नव्हती.

त्या पहिल्या फोर नंतर पुढचे दोन बॉल जे लाईन बदलून प्रयोग केले ते वाईड यॉर्कर लाईनला होते ज्याला तसेच ऑफ साईड प्रोटेक्शन नसल्यास त्या स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटीजच होत्या.
पण बहुधा आधीच्या सामन्यात राजस्थानी फलंदाजांनी इन्टेन्ट न दाखवल्याने स्टार्क कालच्या सामन्यात गाफील राहिला असावा. आणि त्याला वाटले असावे की पुन्हा सहा यॉर्कर टाकले की काम झाले आपले Happy

दुसरी पॉइंटमधून होती - बरोबर. पण गेमप्लॅन काय बदलायला हवा होता? अश्या लेंग्थला सहसा डीप थर्ड असतो आणि मिड-ऑफ ३० यार्ड सर्कलच्या आत असतो - तसेच ते होते. ह्यात स्टार्क/अक्षरचा गाफीलपणा कुठे आला?

जर लेंथ सातत्याने यॉर्करच ठेवून लाईन वाईड करायची होती तर ऑफ साईड बाउंडरी अजून एक फिल्डर देऊन प्रोटेक्ट करायची होती. जर ती लाईन व्हेरिशन म्हणून होती तर length आणि पेस सुद्धा व्हेरी करायचा होता. चारही यॉर्कर टाकायचे नव्हते.

गाफील राहिले ते राजस्थानी फलंदाजांनी हातपाय झाडले नाही म्हणून आजही यॉर्कर length पकडून गोलंदाजी टाकली की काम झाले असा विचार केल्याने. पुढच्या ओव्हरला सुद्धा बहुधा यॉर्करच मारले. आधीच्या सामन्याचा प्रभाव दिसत होता.

तसेही माझा मूळ मुद्दा स्टार्क अक्षर यांची चूक काढण्यापेक्षा मागच्या सामन्यात जे मी म्हणालो होतो की राजस्थान फलंदाजांनी काही वेगळे केले नाही म्हणून स्टार्क जास्त प्रभावी वाटला ते अधोरेखित करणे होते.

भाऊ सचिनने धनवडेच्या बाबतीत केलंय एकदा. त्याला बाहेर करून पोराला खेळवलं होतं.
>>
धनवडे नी 1000 रन करताना 3 - 4 वर्ष लहान पोरांना कुडपलं होतं
स्किल कमी अन् वीकनेस चां फायदा घेणं जास्त होतं...

सच्चू ४० व्या वर्षी रिटायर्ड झाला तेव्हा तो पण त्याच्यापेक्षा पंधरा वीस वर्षे लहान असलेल्यांना कुटायचा म्हणून एव्हडे रन्स केले असं म्हणायचं आहे का तुम्हाला.

4.3

Chahar to Ayush Mhatre, FOUR, shot! Stand and deliver stuff. Short of length outside off, Mhatre does not move his feet much, uses his power to flat-bat this straight back over Chahar,
6.1

Chahar to Ayush Mhatre, FOUR, smashed! This guy is all hands. Back of a length delivery, Mhatre's feet once again stay glued to the crease but he slaps this wide of cover, leaving the two fielders ball-watching

footwork?
Out!!

21:56 ओव्हर्टन खूप घाबरून बॉलिंग टाकत होता रोहितला... किती ते वाईड.. जसे लास्ट ओवर चालू आहेत

22:24 भारतीय कप्तान रोहित शर्माचे अर्धशतक
चार षटकार

22:38 आता वाईडचा फालतू रिव्ह्यू घेतला.. शर्माच्या भीतीने.. थाला रिव्ह्यू सिस्टीम सुद्धा प्रेशर मध्ये..

22:40 पाचवा सिक्स रोहीत शर्मा

22:49 रोहीत सहा वा सिक्स आणि चेन्नई विरुद्ध 1000 धावा पूर्ण

सच्चू ४० व्या वर्षी रिटायर्ड झाला तेव्हा तो पण त्याच्यापेक्षा पंधरा वीस वर्षे लहान असलेल्यांना कुटायचा म्हणून एव्हडे रन्स केले असं म्हणायचं आहे का तुम्हाला.
>>
14 वर्षाच्या पोराची शारीरिक डेव्हलपमेंट ही 10 वर्षाच्या पोराच्या तुलनेत खूप जास्ती असते. Adults मधे हे तितकं मॅटर करत नाही...

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर मिळवणारा भारतीय खेळाडू कोण आहे?

याचे उत्तर आधीच रोहीत शर्मा होतें....

आज एकाने आकडा अजून वाढला Happy

हो, शोधायला नाही गेलो..
सामनावीर मिळाले तेव्हा कॉमेंट्री वाचतो तिथे हे आले..

तसेच पाचवा सिक्स मारून चेन्नईविरुद्ध १००० धावा केल्या तेव्हाही आलेलं..

अजूनही एक व्हॉट्सॲप पोस्ट सुद्धा आली..
खाली देतो.
पण ती खरी खोटी करायला गेलो नाही..
आपल्याला काय...

Only Thrice, CSK Lost in IPL
(By 10 or 9 Wickets)

10 Wickets v MI at Sharjah (2020)
9 Wickets v MI at Wankhede (2008)
9 Wickets v MI at Wankhede (2025)*

doMInation

doMInation
>>
MI / चेन्नई / रोहित / धोनी / पंत यांचं असेल तर स्टॅट्स
इतरांचं असेल तर स्क्रिप्टिंग

त्वाड्डा कुत्ता कुत्ता
साड्डा कुत्ता टॉमी...

चूक !

धोनीला सुद्धा त्या दिवशी हिरो बनायला दिले असे लिहिले होते मी..
पंत ने बिश्नोईला गोलंदाजी न दिलेला सामना.

असो Happy

बाकी राजस्थान गेले दोन सामने काय करतेय हे डोळ्यांनी उघड दिसते.
कलकत्ता पंजाब लोवेस्ट टारगेट डिफेंड सामना कसा झाला हे सुद्धा आपण पाहिले.
ज्याला समजायचे तो समजतो. बोलायची गरज पडत नाही फार हल्ली.

पुरावे फक्त्त सोसायटीच्या व्हॉट्सअप group वर मिळतील. धोनी ने मुद्दाम new zealand विरुद्धची वर्ल्ड कप सेमी हरवली होती. याचे पुरावे इन्स्टा रील्स वरती मिळतील.

तसेही माझा मूळ मुद्दा स्टार्क अक्षर यांची चूक काढण्यापेक्षा मागच्या सामन्यात जे मी म्हणालो होतो की राजस्थान फलंदाजांनी काही वेगळे केले नाही म्हणून स्टार्क जास्त प्रभावी वाटला ते अधोरेखित करणे होते. >> वेगळे करता आले नसेल असा थोडा विचार करून पाहा एकदा. उंच लेफ्ट आर्म बॉलर जेंव्हा १४४+ च्या स्पीड ने प्रेशर सिच्युएशनमधे पूर्ण र्‍हीदममधे रीव्हर्स स्विंगिंग यॉर्कर वर यॉर्कर टाकत असतो तेंव्हा काहीतरी वेगळे करणे म्हणजे नक्की काय करणे अभिप्रेत होते ? ते तेव्हढे सहज शक्य असेल का ? बटलर नि ध्रुव जुरेल किंवा हेटमायर एकाच लेव्हलचे खेळाडू आहेत का ?

>>बटलर नि ध्रुव जुरेल किंवा हेटमायर एकाच लेव्हलचे खेळाडू आहेत का ?
नक्कीच नाहीत पण इंटेंट दिसायला हवा होता.... तो दिसला नाही रे!!
हेटमायर त्याच्या कमीटमेंटसाठीच मला आवडतो खरेतर पण यंदा त्याचे शॉट्स बसत नाहीयेत.... हसरंगा आणि आर्चरच्या बॅटींग वर आर आरला भरवसा नाहीये.... त्यामुळे ते नावालाच ऑलराउंडर आहेत,

त्यामुळे बरी सुरुवात नंतर अडखळती मिडल ऑर्डर आणि मागे कुशन नसल्याने परत डिफेन्सीव्ह झालेली लोअर मिडल ऑर्डर अशी काहीतरी गोची झालीय आर आरच्या बॅटींगची!!
असो आता वैभव आणि बेंचवरचे इतर चमकावेत इतकीच अपेक्षा!!

बटलर नि ध्रुव जुरेल किंवा हेटमायर एकाच लेव्हलचे खेळाडू आहेत का ?
>>>>>>
इथे बटलरशी तुलना करायचा प्रश्नच नाही.
जे खेळाडू एखाद्या संघात फिनिशर रोल निभावायला येतात त्यांना सलग सहा यॉर्कर पडताना वेगळे काय करावे हे माहीत नसणे मला तरी बिलकुल पटत नाही.
हेटमायर सारखा ओव्हरसीज प्लेयर मग घेतला कशाला जातो.

पुरावे फक्त्त सोसायटीच्या व्हॉट्सअप group वर मिळतील.
>>>>>>

असे काही नाही. सोशल मीडियावर बरेच ठिकाणी असे सामने झाले की त्यावर या अनुषंगाने चर्चा होते, कॉमेंट येतात. हे काही माझ्या एकट्याच्या डोक्यातून आलेले नाहीये.
जसे तुम्ही धोनी बाबत इन्स्टा रीळ म्हणत आहात तिथेच तुम्ही आयपीएल बाबत सुद्धा चर्चा वाचली असेलच..
आणि धोनी बाबत ज्याला तुम्ही पुरावे म्हणत आहेत ते सुद्धा निरीक्षणेच आहेत ना..

पण ते असो, भारतीय कर्णधारपदाचे राजकारण हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे आणि यावर स्वतंत्र धाग्यात चर्चा आधीच झाली आहे. तरी तुम्हाला खरेच यावर चर्चा करायची असल्यास तुम्ही त्या धाग्यात याल का?

इथे बटलरशी तुलना करायचा प्रश्नच नाही. >> बटलरची तुलना ह्यासाठी कि आपली कॅलिबर , लिमिटेशन काय आहे हे माहित असलेले खेळाडू स्टार्क च्या त्या स्पेलला फारस एकाही वेगळॅ का करू शकले नाही हे स्पष्ट होते. बाटलर फक्त त्याच दिवशी नाही तर आधीही स्टार्कला सहज हँडल करत आला आहे. स्टार्क ने हे असे आधी केलेले पाहिले असल्यामूळे किमान मी हेटमायर नि जुरेल ला त्याला हँडल न करणे समजू शकतो. हेटमायरने एक उचलूनही मारला होता त्यात त्यामूळे अगदीच तेच तेच खेळले असे म्हणता येणार नाही. हे दोघेही क्रीजमधे हलून खेळताना मी पाहिले नाहियेत. हेटमायर लेंग्थ किंवा फुलटॉस बॉल्स उचलून मिडविकेट, लाँग ऑन वर हातखंडा मारतो स्टार्कचा मिस झालेला यॉर्कर ह्यासाठी परफेक्ट बॉल आहे. बाकीच्या वेळी स्टार्क ने त्याला तो चान्सच दिला नाही. जुरेलला ते स्टार्कसारख्याला खेळणे अशक्य होते असे माझे एकंदर त्याच्याबद्दल मत आहे. त्याच्या बॅटींगला लिमिटेशन आहेत.

चर्चा झाली म्हणजे ती गोष्ट खरीच आहे असं नाही. चर्चा हाच न्याय लावला तर एक ही क्रिकेटर स्वच्छ नसेल. तसाही match हरली कि फिक्स आहे म्हणायचं आणि जिंकली कि आपण चांगले खेळेलो हे मी लहान पासून ऐकतोय. मला ना धोनीच्या रील्स खऱ्या वाटत आहेत ना IPL स्क्रिपटेड ची चर्चा.
फ़िक्सिन्ग वगैरे नक्कीच होत असणार पण ते वैयक्तिक लेव्हल ला.

Pages