आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण पंत च्या 50 नंतर ही पोस्ट नाही ??
>>>

उद्या मला आणि केशवकूल यांना यावरच चर्चा करायची आहे. आज सामना एन्जॉय करूया आधी Happy

आयपीएल मध्ये कॅच सोडायचे पैसे मिळतात वाटते. किती सोपे गोळे टाकतात हातातले.. >> आपले सहज म्हणून सांगतो कि २०२५ मधे रोहितने देशासाठी खेळताना सोडलेले कॅचेस किती आहेत ते बघा Wink

रोहितच्या स्लिप कॅच नका सांगू जिथे रियाक्शन टाईम कमी असतो..
हातातले गोळे दाखवा कोणाचेही.. सातत्याने सोडलेले..
असो

११ बॉल २६
माही मार रहा है.. खेचला एकहाती सामना
बिश्नोईला चौथी ओवर दिली नाही घाबरून... धोनीची दहशत!

रोहितच्या स्लिप कॅच नका सांगू जिथे रियाक्शन टाईम कमी असतो.. >> फक्त स्लिप कॅचेस नाहियेत. चुकीच्या गोष्टीला डीफेंड करणे थांबवा. कोहली जाणून बुजून आयपील मधे कॅचेस सोडत असेल तर देशासाठी हिरिरीने खेळणारा रोहित तिथे जे कॅचेस तेंव्हा सोडतो त्याचा अर्थ तुझ्याच भाषेत काय होणार ह्याचे उत्तर स्वतःलाच दे. शेवटी कोण कधी कसे खेळते ह्याचे स्टँप्स तू मारतो आहेस Happy

आज धोनी मारत असताना रवी बिश्नोई चौथी ओवर बॉलिंग का दिली नाही कोणी मला सांगेल का Happy

बाई दवे,
सामनावीर धोनी का आज??

लखनौ जिंकले असते तर पंत ला मिळाले असते.

“ आयपीएल मध्ये कॅच सोडायचे पैसे मिळतात वाटते” सर!! जिथे आर्काईव्ज मधला स्टेडियमच्या बांधकामाचा फोटो पाहून तुम्ही त्या स्टेडियममधल्या १०० व्या मॅचमधे, १२.५ व्या ओव्हरला, १५ व्या प्लेयरच्या मनातल्या भावना अचूक ओळखता, तिथे असं “वाटते” वगैरे मोघम शब्दप्रयोग तुम्हाला शोभत नाहीत.

7 ला 2 विकेट होत्या.
तिथून 55 ची पार्टनरशिप होत 62-2 झाले..
रहाणे एल बी डब्ल्यू आऊट नव्हता… मिसिंग होता.. पण रिव्ह्यू घेतला नाही.. आता पस्तावत असेल कारण तिथून 76-7 झाले.. टारगेट 112

79…8

रसेल 6 6 4..
चहललाच 16 मारले
त्या आधी त्याने 3 ओवर 12-4 काढलेले

हा पीच एवढ्या कमी स्कोरचा बिलकुल वाटत नव्हता..
सगळ्या विकेट पुन्हा बघायला हव्यात.. काय गडबड आहे का

चहल सुटलाच एकदम बॉल व्हेरियेबल टर्न होऊ लागताच. गेल्या मॅच मधे २४३ डीफेंड करू शकले नाहित नि आज लोवेस्ट टोटल डीफेंड केली. Happy

मुळात रोहीत कोहली कुठे आले इथे.. >> सर मागच्या पानावर आपण विषयाला सुरूवात केली आहे तेंव्हा लोकांनी आपली डोकी तुमच्यापुढे व्यर्थपणे फोडली. आपल्या आवडत्या जग्गजेत्या विक्रमवीराचे उदाहरण दिल्याने इतरांचे फर्स्ट्रेशन लक्षात येईल अशी एक भाबडि आशा होती. दिल है छोटासा , छोटीशी आशा ! पण कसले काय , तुमचे आपले 'शीषा होया दिल हो' मोड सुरूच आहे

हायलाईट पाहिले आता. काही नव्हते विशेष पीच मध्ये. ठरवून विकेट फेकायची स्पर्धा सुरू होती असे वाटले..
#scripted

.
Rohit Sharma stand at Wankhede Stadium

India captain Rohit Sharma will join the likes of Sachin Tendulkar and Sunil Gavaskar in getting a stand named after him at the iconic Wankhede Stadium in Mumbai. The Mumbai Cricket Association approved proposals for the same in its AGM on Tuesday, April 15.

अभिनंदन Hitman

यंदाच्या आयपीएलची पहिली सुपर ओव्हर
शेवटची पूर्ण ओवर सेम बॉल सेम शॉट
ना बोलर काही वेगळे करत होता ना बॅट्समन काही वेगळे करत होता.
सेकंड लास्ट बोलला दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला नाही.
दोन्ही संघांना सुपर ओवरच हवी होती असा खेळ चालू होता.

Its very painful to see the way RR playing.
With such kind of senseless decisions and exexution; they deserve to loose Sad

Pages