Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झेल खरंच किती सोपा, किती कठीण
झेल खरंच किती सोपा, किती कठीण , झेल घेण्याचा प्रयत्न किती निकराचा होता इ इ कोण ठरवणार?
>>>>>
आपण सारे एवढे वर्ष क्रिकेट बघून कुठला झेल सोपा आणि कुठला कठीण हे खरेच आपल्याला कळू शकत नाही का?
'' खेळणारा हे ठरवणार कोण,
'' खेळणारा हे ठरवणार कोण, त्याला निकष काय ?
सोप्प आहे. आवडता खेळाडू चांगला खेळला तर फुल डेडिकेशन नाही खेळला तर फुल डेडिकेशन नाही. सिच्युएशन नुसार हे बदलत जाणार. आपला मुद्दा सिद्ध करायचा असेल तर आपल्या सोयीनुसारही त्यात बदल करत येतो. कोलांटी उडी मारायची असेल तर त्याचीही सोय आहे
सोप्प आहे. आवडता खेळाडू
सोप्प आहे. आवडता खेळाडू चांगला खेळला तर फुल डेडिकेशन नाही खेळला तरीही फुल डेडिकेशन.
*कुठला झेल सोपा आणि कुठला
*कुठला झेल सोपा आणि कुठला कठीण हे खरेच आपल्याला कळू शकत नाही का?*
१ आकडेवारी गोळा करताना प्रत्येक झेल कसा सुटला होता याचं असं नेमकं विश्लेषण शक्य व महत्त्वाचं आहे का ?
2. ' गली ' च्या फिल्डरकडून उंच उडालेला, साधा सोप्पा वाटणारा झेल सुटल्यावर, गावसकरने कसोटी स्तरावर असा झेल सुटणं योग्य नसल्याचं समालोचनात सांगितलं. पण लगेचच त्याने हे पण जोर देवून सांगितलं की स्क्वेअर कट करतांना बॅटने chop केलेला चेंडू हवेत उडाला तरी प्रचंड स्पिन होत असतो व दिसायला सोपा वाटला तरीही पकडायला तो खूपच कठीण असतो. नेमकं डोळ्यावर ऊन येणं, पाय निसटणं, इ अनेक बाबी झेल घेण्यासंदर्भात लक्षात येत नाहीत. झेल सोपा की कठीण हेही ठरवणं सोप्पं नाही !!!
नुसते वादाला वाद घालणं चालू
नुसते वादाला वाद घालणं चालू आहे
आयपीएल मध्ये हातातले गोळे सोडले जातात हे जो लाईव्ह बघतो त्या सर्वांना समजते. कारण इतके वर्षे क्रिकेट बघितलेच नाही तर खेळले सुद्धा आहे.
आता यामागे मुद्दाम ते झेल सोडले जातात की जीवाला जपून खेळताना डेडिकेशन चा अभाव हे त्यांचे त्यांना माहित.
ही पोस्ट लिहायचे आधीच विराट कोहली ने हातातला झेल सोडला
*नुसते वादाला वाद घालणं चालू
*नुसते वादाला वाद घालणं चालू * - अरे, कोण म्हणतंय हे !या धाग्यावरचा सगळ्यात मोठ्ठा विनोद !!!!!
खुप म्हणी आठवतायात... पण नकोच
खुप म्हणी आठवतायत... पण नकोच ते!!
आता परागने कोहलीचा काय सोडला.
आता परागने कोहलीचा कॅच सोडला.. फिट्ट फाट..
सेहवाग म्हणाला की ऐसे कॅच आप प्रॅक्टिस मे सौ मे से सौ बार पकडते है. त्याला कल्पना नसावी बहुधा की मॅच मध्ये पकडणे अवघड असते
ओके.. नंतरच्या कोट अँड बोल्ड सुटल्यावर मात्र तो म्हणाला की ऐसे डिफिकल्ट होते..
म्हणजे अवघड सोप्याची जाण आहे त्याला म्हणू शकतो
Digvesh Rathi to Rutherford,
Digvesh Rathi to Rutherford, 1 run, dropped by Pant.
सर, तुमचा हिरा पंत.
Submitted by केशवकूल on 12 April, 2025 - 16:57
>>>>
केशवकूल आपली कालची पोस्ट..
मी पाहिले नाही हे.
पण सुटलेला झेल अवघड की सोपा याचे एखाद्या एक्स्पर्ट कडून प्रमाणपत्र घेऊन या मग त्यावर मत नोंदवतो
राजस्थान आतापर्यंत तरी आपल्या
राजस्थान आतापर्यंत तरी आपल्या लौकिकाला जागणारा खेळ करत आहेत
आंघोळ करून येतो. बघूया काही चित्र बदलते का..
सर तुम्ही अंघोळ करायला गेलात
सर तुम्ही अंघोळ करायला गेलात आणि इकडे घोळ झाला.
सर, प्रोफाईल वरचे चित्र गोड
सर, प्रोफाईल वरचे चित्र गोड आहे.
अवघड कॅच सोडणे सोप्पे असते.
अवघड कॅच सोडणे सोप्पे असते. सोप्पे कॅच सोडणे अवघड असते. ते पंतने करून दाखवले.
धन्यवाद केशव कुल..
धन्यवाद केशव कुल..
घोळ काय झालं..
हरले की राजस्थान.. काहीही नाट्य न घडता..
आता मुंबई फलंदाजी सुरू झाली..
शर्मा बाद झाल्यावर भेटूया
राजस्थान आतापर्यंत तरी आपल्या
राजस्थान आतापर्यंत तरी आपल्या लौकिकाला जागणारा खेळ करत आहेत Happy
आंघोळ करून येतो. बघूया काही चित्र बदलते का..>.>>
चांगले जिंकत होते ते हरले असा घोळ झाला.
<<<आयपीएल मध्ये हातातले गोळे
<<<आयपीएल मध्ये हातातले गोळे सोडले जातात हे जो लाईव्ह बघतो त्या सर्वांना समजते.>>>>
ते तर माझ्यासारख्या फारसे न कळणार्याला सुद्धा लक्षात आले.
मला वाटले की तेहि आय पी एल ची काही strategy असेल, वाइड बॉलसारखी!!
नन्द्या जी,
नन्द्या जी,
स्ट्रॅटेजी म्हणजे हमखास मनोरंजनाची हमी. आणि आयपीएल मध्ये मनोरंजन फलंदाज देतात. त्यांना उठसूठ बाद केले तर कसे चालेल.
कोणालाही ते लक्षात येईल असेच आहे. पण टीव्हीवर जे पॅनल असते त्यातील एक्सपर्ट तुम्हाला ते झेल सुटण्याची हजार कारणे देतील. कारण ते याच सिस्टिमचा भाग आहेत.
आयपीएल धुतल्या तांदळाची नाहीये. त्यातील असे खडे वेचून त्याचा आनंद घ्यावा हेच धोरण मी अवलंबतो. मांजरासारखे डोळे मिटून दूध पिण्यात काही मजा नाही.
आज जेव्हा पांड्या २ धावा
आज जेव्हा पांड्या २ धावा काढून बाद झाला तेव्हा बाकीच्यांनी २०० केले
करूण नायर क्लास खेळतोय!!
करूण नायर क्लास खेळतोय!!
नायर ऑन फायर !!।
नायर ऑन फायर !!।
Happy for him
करूण नायर म्हणजे तोच ना
करूण नायर म्हणजे तोच ना ज्याला BCCI ने खड्यासारखे उचलून वाळीत टाकले होते. आणि सगळे चूप होते.
नायर आज फार उच्च दर्जाची
नायर आज फार उच्च दर्जाची इनिंग खेळून गेला.. मजा आली बघायला
आणि सगळे चूप होते.
आणि सगळे चूप होते.
>>>>
बीसीसीआय बॉस आहे.. त्यांच्या समोर कोण काय बोलणार..
श्रेयस अय्यर ला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर केले होते.. वर्ल्डकप मध्ये ५०० धावा करून..
आला बघा परत आपले नाणे खणखणीत वाजवून
धमाल मॅच जिंकत झाली...
धमाल मॅच जिंकत झाली...
मुंबई आजवर एकदा ही २०० मारून हरली नाही...
आजवर मुंबईने कोणाला २०० चेस करू दिले नाही..
रोहित शर्मा आज खूप दिवसांनी खुश दिसला.. एकसायटेड दिसला..
नायर साठी वाईट वाटले. दिल्ली सुद्धा एक हरली बरे झाले.. लेव्हल होईल जरा पॉइंट टेबल
मस्त जिंकली मुंबई. आज मी
मस्त जिंकली मुंबई. आज मी टीव्हीसमोर बसून मॅच बघत होतो तेव्हा दिल्ली जिंकत होती. घरात इकडेतिकडे करताना, कामे करताना बघत होतो तेव्हा मुंबई जिंकत होती. त्यामुळे तेच करत राहिलो. मुंबईही जिंकली आणि घरची पेण्डिंग कामेही झाली.
पूर्वी भारताच्या मॅचेस मधे असे लॉजिक अनेकदा लावले होते. आयपीएलमधे कधी केल्याचे लक्षात नाही
मात्र करूण नायरची बॅटिंग अफलातून होती.
करूण नायर म्हणजे तोच ना
करूण नायर म्हणजे तोच ना ज्याला BCCI ने खड्यासारखे उचलून वाळीत टाकले होते. >> मलाही असेच वाटायचे पण नायरचे नंतरचे आकडे फारसे प्रॉमिसिंङ नव्हते. त्यानंतर तू कुठल्या तरी अपघातामधे सापडला होता. केरला असोशियन्ने त्याला खूप सपोर्ट केला होता तेंव्हा मेंटल ब्लॉक दूर व्हायला. आजची करून ची इनिंङ खास होती. बुमरा अजून १००% स्ट्राईड हिट करत नाहिये हे लक्षात घेऊन त्याला ठोकणे कमेंडेबल आहे.
स्टब नि राहूलचे शॉट्स अनाकलनीय होते. आशुतोष रन आउअट होताना बांऊंडरीवरून थ्रो येण्या आधी पॉईटंचा फिल्डर खाली वाकला होता. रिले करणे थांबलेले दिसतेय. तीन रन आऊट हा जबरदस्त स्क्रिप्टेड प्रकार म्हणायचा. थेट सलीम-जावेद ने मनमोहन देसाई नि डेव्हिड धवन साठी रोहित शेट्टी च्या फायटींगसाठी स्क्रिप्ट लिहावी तसा प्रकार.
आजची मॅच संपल्यावर तिलक नि पांड्या किती कडकडून भेटले ते पाहिले का ? संटनर नि पांड्या मिठी मारत असताना मागे बुमरा नि सूर्या पंप करत आहेत ते बहितले का ? मधल्या ब्रेक मधे जयवर्धने, पांड्या, रोहित नि पोलार्ड किती जबरदस्त इंटेंसिटीने डिस्क्शन करत होते ते पाहिले का ? रोहित काही तरी हिरिरीने पांड्याला सांगत होता नि पांड्या मान डोलावत होता. तिलकची बॅटीग सुरू असताना पांड्या नि रोहित बॅटींग बद्दल काहीतरी जबरदस्त सिरीयस होऊन बोलत होते (बॅटींगबद्दल कारण हातवारे शॉट्स खेळण्याबद्दल सुरू होते) एकूण मला तिलक, रोहित ह्यांच्या मनात पांड्याबद्दल काही बेबनाव आहे असे वाटले नाही. एकूण रोहितचा वावर बघता इंटेंसिटी कुठेही प्रोफेशनल प्लेयरकडून जी अपेक्षित असावी तीच वाटत आहे. कुठेही अंगचोरपणा जाणवत नाही.
अर्थात खरं खोट सरांनाच माहित. त्यांना काय असलेले सोडा, नसलेले पण दिसते
असामी छान निरीक्षण
असामी छान निरीक्षण
वर मी सुद्धा तेच लिहिले.. रोहीत आज एक्सायटेड दिसत होता..
आज पहिल्यांदा हे पॅशन दिसले..
आणि विजय आला बघा..
मुंबई आणि बंगळुरू जिंकले आज -
मुंबई आणि बंगळुरू जिंकले आज - दोन्ही टीम्सचं अभिनंदन! छान खेळले.
पहिल्या मॅचमधे सुटलेले कॅचेस आणि दुसर्या मॅचमधल्या दिल्लीच्या काही विकेट्स वर ड्रेसिंग रूममधे चर्चा होईल असं वाटतं. आशुतोषला स्ट्राईक देण्यासाठी दुसरी रन घेण्याचा प्लॅन ठीक होता पण कुलदीप आणि मोहित पेक्षा स्टार्क चांगला बॅट्समन असताना ते दोन रन-आऊट्स अनावश्यक होते.
पुरण ला ग्रहण लागलं आज
पुरण ला ग्रहण लागलं आज
पण पंत च्या 50 नंतर ही पोस्ट नाही ?? कीबोर्ड ला ही ग्रहण लागलं का काय???
आयपीएल मध्ये कॅच सोडायचे पैसे
आयपीएल मध्ये कॅच सोडायचे पैसे मिळतात वाटते. किती सोपे गोळे टाकतात हातातले..
आता समदने सोडला
Pages