धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आजचा व्यायाम - लेग्स -
१. लेग प्रेस
२. Calf raises
३. Lunges
४. लेग कर्ल्स
५. Farmer's walk

स्ट्रेचेस आणि कूल-डाउन

जानेवारी १ : २
जानेवारी २ : ०
जानेवारी ३ : २
जानेआरी ४ : ४ + ६० मिन योग

जानेवरी ५,६,७ : ०

जानेवारी ८: ६ सु न + ६० मिन योग स्ट्रेचिंग.

इंटरमीटंट फास्ट: १६तास
सकाळ:
५ मी. वॉर्मअप
१५ मी. Abs workout
१५ मी. HIIT workout
१० मी. Cool down Stretch
३ मी. कपालभाती
५ मी. प्राणायाम
५ मी. ध्यान

आज लेग वर्काऊट
आधी सायकलिंग दहा मिनटं..
मग फ्रि स्कैवट्स ७०
ओळीने ५,७.५,१०,१२.५kg dumbbell मांडले..कमी पासून सुरुवात करून दहा गोब्लेट स्कैवट्स मग नेक्स्ट वजन असे तीन राऊंड ..१२० counts..
मग परत सेम डंबेल्स पण आता सुमो स्कैवट्स १०रिपीटेशन्स तीन राऊंड...120counts..
लेग प्रेस 8०kg 10*4
Leg curl 15each side *3
Leg extension 20*२ शेवटचा अजून एक सेट झालाच नाही माझ्याच्याने..
Calf raise 15*3
Warm down.

आज शोल्डर्स -
१. Overhead press
२. फ्रंट raises
३. Lateral raises
४. Shrugs

Stretching and cooldown

२० मिनिटे कसाबसा.
आज मळमळतय, झोप येतेय, इन्टर्व्ह्यु आहे. त्यामुळे, मूड नाहीये.

इंटरमीटंट फास्ट: १६तास
सकाळ:
५ मी. वॉर्मअप
३० मी. Full body cardio workout
५ मी. Cool down Stretch
२० सूर्यनमस्कार
४ मी. कपालभाती
५ मी. प्राणायाम
५ मी. ध्यान

आज चेस्ट वर्काऊट
७.५kg डंबेल्स प्रेस flat, inclined, declined
Fly flat, inclined, declined
12.5kg dumbell pullover
Ajun ek dumbbell workout on flat bench
Butterfly machine
Trademill 10 min.

३० मिनटस व्यायाम झाला. ठीक होता.
- तू नज्म नज्म सा मेरे
- मोह मोह के
- परिणीता ची गाणी

~~~~~~~ तू इत्र इत्र सा मेरे
सांसोमे बिखर जा
मै फकीर तेरे कुर्बत का
तुझसे तू मांगू रे
~~~~~~~~~

जानेवारी १ : २
जानेवारी २ : ०
जानेवारी ३ : २
जानेआरी ४ : ४ + ६० मिन योग
जानेवरी ५,६,७ : ०
जानेवारी ८: ६ सु न + ६० मिन योग स्ट्रेचिंग
जानेवारी ९: ०
जानेवारी १०: ६ सु न + ६० मिन योग स्ट्रेचिंग.

पहिले ३ सुर्य नमस्कार व्यवस्थित होतात. पण पुढचे ३ सु न होता होता दंडातली ताकद संपते. ६ नंबर साष्टांग नमस्कार
साष्टांग होत नाही, त्या प्रयत्नात पुर्ण शरीर जमिनीवर पडते. ८ नंबर पर्वत करायला पायांतली ताकद संपते, एक गुढगा टेकुन शरीर वर घ्यावे लागते. हे दोन्ही विनासायास जमत १२ सु न व्हायला हवेत. आजच्या दिवसापासुन तिथे पोचायला किती दिवस लागतात ते पाहते. ते कळावे म्हणुन आज हे लिहुन ठेवले.

- तू नज्म नज्म सा मेरे
- मोह मोह के
- परिणीता ची गाणी>>>>

व्यायाम करताना लक्ष शरीरावर हवे, प्रत्येक स्टेपला शरीरात काय स्ट्रेच येतोय ह्याकडे ध्यान हवे तरच योग्य तो फायदा होईल. गाणी ऐकत व्यायाम केला तर तो ठिकच होणार, गाणे उत्तम वाटणार, मन गाण्यात असणार. Happy Happy

हलकेच घ्या, तुम्ही दोन्ही एकत्र करता असे लिहिले
नाही, मी अशीच गंमत करतेय.

इंटरमीटंट फास्ट: १७ तास
सकाळ:
१० मी. वॉर्मअप
३० मी. Full body HIIT workout
१० मी. Cool down Stretch
१० मी. Yoga pose holding
४ मी. कपालभाती
५ मी. प्राणायाम
५ मी. ध्यान

१२ सूर्यनमस्कार
१० मिनिटे सूक्ष्म योग /व्यायाम
झाला
Walk झाला की लिहिते

6th Jan - लेग वर्कआउट
7th Jan पुश वर्कआउट
8th Jan फन्क्शनल ट्रेनीन्ग, कोर वर्कआउट
9th Jan - ब्रिस्क walk - ४० मिन्स
10th Jan - पुल वर्कआउट

आज पाठीचे व्यायाम पाच प्रकार..
डेडलिफ्ट ४५किलो 12*३ केले आज..
Core workout 2 प्रकार.
Decllined bench leg raise 14*3
Standing cross elbow knee touch 25*2
सायकलिंग १० मिनटं
वार्मडाऊन पाच मिनटं.

आज अलार्म बंद करून पुन्हा झोपलो, तर मी व्यायाम करतोय असं स्वप्नं पडलं. थोड्या वेळाने चालायला गेलोय आणि परतायला उशीर झालाय असं स्वप्न पडलं.

या आठवड्यात शुक्रवार सोडला तर बाकी पाच दिवस stretching and strength training केलं. शुक्रवारी फक्त ब्रह्मविद्या. 8 fit सोमवार ते गुरुवार केलं. आठवड्याला चार दिवस केलं की ते चांगलं म्हणतात. चालायला जायला अजून जमत नाही.
शुक्रवार glute & core साठी होता आणि हेच राहतात. म्हणून पुढल्या आठवड्यापासून वेळापत्रक बदलून हे सोमवारी करेन. सोमवारी व्यायाम सहसा चुकत नाही.

आज क्रॉसफीट
८kg kettelbell side cross bend 25each side *3
7kg / 10kg kettlebell sumo swing 20*4
8kg ball throw 20*3
Rope 10sec*3
Machine crunches 20*3
Cycling 10min.
Warm down 5 minute

इंटरमीटंट फास्ट: १७ तास
सकाळ:
१० मी. वॉर्मअप
2० मी. Cardio
१० मी. Core workout
१० मी. Cool down Stretch
१० मी. Yog
५ मी. ध्यान

३० मिनीटे आज.
पॉल अंकाची गाणी. युथफुल आवाज.

आज १० सु न केले. आज साष्टांग व ८ पर्वतला तितका त्रास झाला नाही. पण ६-७ झाले की ९ नंबरचा, पाय परत पुढे घ्यायचा प्रकार करताना पाय पुढे घ्यायला त्रास व्हायला लागतो.. तरी उजबा पुढे येतो, डावा खुप मागे पडतो. गेले कित्येक वर्षे सु न करतेय पण ही स्टेप मला कधीही निट जमलेली नाही. उजवा पुढे घेताना मॅटच्या कडेला, जिथु सुरु केले तिथुन अर्धा पाऊण फुट बाहेर पडतो. पहिल्यांदा डावा फक्त एखाद दिड फुट पुढे यायचा. आता तो सुरबातीच्या जागेपासुन फुटभर मागे राहतो आणि जसे सु न वाढतात तसे अजुन अजुन मागे पडतो. ह्या एका स्टेपचा हा त्रास जुनाच आहे. प्लेसिंग बरोबर होतच नाही. सु न चे विडिओ बघितले तर त्यात लोक सहज पाय परत दोन हातांच्या मध्ये घेतात. मला ते अजुन जमले नाहीय.

सूक्ष्म व्यायाम
Stretching
प्राणायाम
अर्धा तास walk - काल झाले
.
आज वरचे सर्व झाले + १२ सू न + ४ मिनिट टबाटा
आणि walking राहिलंय
.
व्यायामाची सवय नसल्यामुळे की काय खांदे, arms,मान, पाठ दुखत आहे

हो सुरूवातीला थोडं दुखेल ना किल्ली, स्ट्रेचिंग मधे खांदे, मनगटं, मान, कंबर, गुडघे, ankles क्लॉकवाईज, anticlockwise 10-10 वेळा फिरवतेस का?
साधनातै सुरूवातीला सूर्यनमस्कार मला ही प्रॉपर जमत नव्हते, सराव करून करून जमतेय...
आज रेस्ट डे..

हो मृ
सौरभ बोथरा चा beginner video follow करतेय.
हे जरा जमू देत रुटीन बसू देत
मग दमवणारे करीन

gym consistent होत नाही, वॉकला बाहेर पडण जमत नाही, काहीतरी routine हवे होते, काल search करतांना chloe ting 2 वीक चॅलेंज दिसले, results छान आहेत net var, म्हणून आज पासून सुरुवात केली. बघते कीती दिवस जमते.

Pages