धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद सगळ्यांना!!

२०२५ सम्पत आले..
या सगळे नवीन वर्षाचे नवे संकल्प घेऊन या धाग्यावर.

मी एका ठिकाणी वाचलं की चालण्याचा व्यायाम ( ५-१०किमीटरस) काही उपयोगाचा नसतो. ( आणि काय ती apps त्यातून इतरांना कळवायचं आज इतकी हजार पावले ... एक किमीटर म्हणजे दोन हजार पावले...चाललो. ॲपवरच्या शाबासक्या वेगळ्याच.)
हल्ली रेल्वे स्टेशन्सना( मुंबई लोकल)लिफ्ट लावत आहेत. ( २५ फुट वर जाण्यासाठी). तिकडे तरुण लोकच अधिक रांगेत सापडतात. मेट्रोची लिफ्ट समजू शकतो कारण मेट्रो लाईन ३ जी आता सुरू झाली ती जमिनीखालून आहे. आठ मजले खोल नेली आहे कारण इमारतींचे पाये आहेत वरती. पण लिफ्टने / सरकत्या जिन्याने नाही गेल्यास जिने चढ उतरल्यास कामावर जाताना बराच व्यायाम होऊ शकेल. घाटकोपर ते कफ परेड किंवा मुंबई टर्मिनस जायचे झाल्यास...
घाटकोपर स्टेशनला पोहोचणे...सहा मजले चढ उतार,
मरोळ नाका ( मेट्रो वन) येथे उतरून लाईनवनमध्ये चढणे ...तेरा मजले उतरणे.
मुंबईत बाहेर पडणे ..आणखी आठ मजले चढणे.
परतताना एवढेच संध्याकाळी.

मी एका ठिकाणी वाचलं की चालण्याचा व्यायाम ( ५-१०किमीटरस) काही उपयोगाचा नसतो. >>>>>>>>

बरोबर आहे.. चालणे हा व्यायाम नाही...

>>>>>चालणे हा व्यायाम नाही
???? मग काय आहे? अ‍ॅक्टिव्हिटी?
माझ्या मते चालणे हा व्यायामच आहे. व्यायामाची व्याख्या काय?

>>>>>"NEAT exercise" refers to non-exercise activity thermogenesis, which are the calories you burn through daily physical activities that are not structured exercise. Examples include walking, gardening, cleaning, and fidgeting, all of which contribute to daily calorie expenditure and can be increased by taking the stairs, using a standing desk, or pacing during phone calls.

इन्टेन्शनल वॉकिंग - हा व्यायाम आहे, असा माझा तरी समज होता.

चालणारी व्यक्ती, वय, फिटनेस goal, चालण्याचा प्रकार यावर ठरते चालण्याला व्यायाम म्हणायचा कि नाही..
रमत गमत गप्पा मारत वर्षानुवर्षे सेम अंतर सेम जागेवर चालणे व्यायाम होत नाही..
वृद्ध व्यक्ती किंवा काही health issue असतील तर त्यांच्यासाठी एकवेळ चालणे हि light इन्टेन्सिटी ऍक्टिव्हिटी होउ शकते.

काल लेग
वॉर्मप, लेग stretching, हँगिंग लेग raise, ऑब्लीक

Free squats 15*2
स्मिथ मशीन squats 15*3
Close feet squats 15*3
सुमो squats dumbells 15*3
हॅक squats front 15*2
हॅक squats rev 15*3
लेग एक्स्टेंशन 20*3
लेग curl 20*3
RDL dumbells 12*3
Calf raise 25*3

Cooldown

मृणाली, अभिनंदन!
तुमचं डेडिकेशन आणि आवड अगदी प्रेरणा घ्यावं असं आहे.

--
8fit हे अ‍ॅप वापरणारं कोणी आहे का? गेले काही दिवस ते मध्ये मध्ये हँग व्हायचं. आज इंटरनेटला कनेक्ट होत नाही , व्हिडियो डाउनलोड होत नाहीत, असा एरर मेसेज आला. सगळी मेमरी क्लिअर केल्यावर पुन्हा लॉगिन विचारलं. आणि मग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्ह नाही, असा मेसेज आला.

Aaj लेग...
लेग stretching, वॉर्मप

1. Free squats.. 50
2. Barbell squats .. 22kg bar+20kg प्लेट्स.... 12*3
3. Walking लंजेस 5-5kg dumbell..
4. सुमो squats.. 10,12.5,15kg.... 15*3
5. हॅक squats मशीन.. 30+30kg प्लेट लावले.. 12*3
6. लेग एक्स्टेंशन.. 25kg... 14*3
7. RDL 10-10kg dumbells.. 15*3
8. Calf raises.. 20*3

हँगिंग knee raise.. 12*3
हँगिंग ऑब्लीक.. 10*2

Cooldown

Hi
मी ऑनलाईन workout classes सुरु केले आहेत..
Only for females
कुणाला join व्हायचं असेल तर मला संपर्क करू शकता..
Mail id : mrunali.samad@gmail.com

कसे आहात सगळे?
व्यायाम सुरु आहे नियमित?

माझा आठवड्यात पाच सहा दिवस सुरु आहे..
४ दिवस weight ट्रैनिंग, एक दिवस योगा, एक दिवस cardio..
आज back, biceps, abs

वॉर्मप
Back... सुरुवात deadlift 52kg/62kg...10rep each
Assisted pullups.. 10*3
Lat pulldown wide.. 30kg प्लेट्स.. 10*3
Lat pulldown close.. 10*3
सीटेड cable row.. 47kg.. 15*3
Single arm cable मशीन row.. 15each *3
Lat pulldown traingle बार
Rev फ्लाय मशीन.. 12*3
Shoulder shrugs.. 15*3

Biceps...
Dumbell Biceps curl 7.5-7.5kg... 10*3
Cable मशीन biceps curl close/wide...20*3
Pronation ग्रीप बार curl forarms साठी.. 15*3

Abs
Half crunches ऑन declined बेंच.. 40*2
Russian ट्विस्ट.. 10*2
V in out.. 20*3

Cooldown stretches..

माझी जिम मी सकाळी आठ ते दहा करून येते..
सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते बारा ऑनलाईन workout सेशन घेतेय डिसेंबर पासून...
Bodyweight workout/full बॉडी workout
Cardio
Weight ट्रैनिंग

कुणाला join करायचं असेल तर मला msg करू शकता..
Free ट्रायल सेशन अटेंड करू शकता..

आज पहाटे चार ते सहा पर्यंत चालणे, धावणे हा व्यायाम झाला.
३ - १ - ३ या जपानी पद्धतीने धावण्याचा व्यायाम सुरू केलाय.

नवीन वर्ष सुरु होऊन तीन महिने सम्पलेले आहेत...
व्यायामासंबधीचे कुणाचे काही संकल्प कसे सुरु आहेत?

माझी नेहमीप्रमाणे जिम सुरु आहे.. ऑनलाईन classes सुरु आहेत...

आज back, biceps
वॉर्मप, सायकलिंग
1. Lat pulldown wide.... 100
2. Lat pulldown close... 100
3. Deadlift 40kg.... 60
4. Rev peck फ्लाय.... 100

Biceps
1. Cable मशीन wide biceps curl.... 100
2. Hammer curl dumbell.. 50each

Cooldown stretches

ऑफिसातून आल्यावर जिमला गेलो - ९:३० वाजता. वेळेअभावी फक्त मसल ट्रेनिंग केले, ट्रेडमिल सायकल जमले नाही. जिम दहाला बंद होते. वॉर्म अप म्हणून जो व्यायाम प्रकार करणार आहे त्याचाच एक सेट सगळ्यात हलके (१.५ किलो) वजन घेऊन. त्यानंतर लगेच जितके जास्त वजन घेता येईल तितके घेऊन फेल्युअर पर्यंत (४-५ reps.) मग त्यानंतर झेपेल असे वजन घेऊन ८-१२ चे दोन सेट.

मग घरी आलो तर लिफ्ट समोर ही मोठी रांग लागलेली. मी दररोज दहाव्या मजल्यापर्यंत लिफ्ट घेऊन १४ मजले चढून जातो, व्यायाम म्हणून. काल सर्व चोवीस मजले चढले. नंतर घरी येऊन च्याट जिप्पिटिस आजचा आहार, व्यायाम सगळे डिटेल दिले. त्याने मला चोवीस मजले चढले, रोज रोज करू नकोस, गुढघ्यांसाठीं चांगले नाही असे सांगितले.

8fit बंड पडलं हे नक्की कळल्यावर पैसे भरून fityfy app घेतलं. यात दाखवलेले व्यायाम जास्त चॅलेंजिंग आहे. यातल्या अनेक हालचाली अगदी नवीन आहेत. जानेवारीतले काही दिवस सोडले तर व्यायाम व्यवस्थित सुरू आहे.
स्ट्रेचिंग , मग strength training, मग फिटि फाय आणि शेवटी ब्रह्मविद्या. दीड तास व्यायाम होतो. मॉडरेट इन्टेन्सिटी.

फिटिफायमध्ये रोज नवं शेड्युल असतं. पण मी एका दिवसाचं शेड्युल आठवडाभर रिपीट करतो. आठवड्याचे पाच दिवस . अ‍ॅपनुसार तिसर्‍या आठवड्याचा पाचवा दिवस सुरू आहे. म्हणजे १५ आठवडे या अ‍ॅपनुसार व्यायाम केला.

strength training मध्ये मोठा खंड पडला की १० रिपिटिशन्स पासून सुरू करून दर आठवड्याला एक रिपिटिशन वाढवतो. सध्या २६ रिपिट्शन ३ सेट्स सुरू आहे. तीसपर्यंत जाईन.

मध्ये एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहायला होतो. लिफ्ट बिघडली होती. सहा मजले खाली उतरून आणि काही वेळाने परत सहज चढून आलो.
आमच्या घरच्या इमारतीला लिफ्ट नाही. दुसराच मजला आहे. पण लिफ्टवाल्या इमारतींत राहणारे लोक आमच्याकडे आले की धापा टाकतात.

गुढीपाडव्याला मराठी नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाल्यामुळे दिवसभरात ८ + किलोमीटर चालणे झाले. १४०००+ पावले. त्यातली ८००० सलग. मॉर्निंग वॉक दोन वर्षे झाली, बंद असल्याने सलग अर्ध्या तासाच्या वर चालायची सवय मोडली आहे. त्यामुळे एवढे चालता आले ही सुद्धा एक अचीव्हमेंट . पुढचे दोन दिवस पाय दुखले. पण ते माझ्यासोबत चाललेल्या इतरांचेही दुखले.

माझं वीकली शेड्युल..५ days
तीन ते चार दिवस strength ट्रैनिंग, एक दिवस cardio/किंवा योगा असं सुरु आहे..
सध्या कमी वजन, कमी वेरीएशन आणि counts जास्त असं करत आहे.. स्टॅमिना चा कस लागतोय, एकतर आधिच उन्हाळा वाढतोय....water intake वाढवलंय... समतोल आहार with high प्रोटीन food हे हि follow करतेच आहे..

आज chest, shoulder press, triceps

वॉर्मप, pushups, knee pushups

Chest :
1. फ्लॅट bench press... 12*3
2. Low cable pully... 15*3
3. मशीन press.. 15*3
4. Peck फ्लाय मशीन... 20*3
5. Dumbell pullover.. 15*3

Shoulder press.. 15*3

Triceps
1. Rope pushdown 15*3
2. Single arm kickback 15*3each
3. Scull crusher.. 15*3
4. Bench dips... 10*3

Forearms.. 15*3

Cooldown

आज core on a floor
वॉर्मप
1. Shoulder tap.. 15*3each
2. Hip sides.. 15*3
3. Rainbow.. 15*3
4. Donkey किक.. 15*3
5. Cross toe touch in mounten pose.. 15*3
6. Cat cow pose.. 20
7. बालासन to भुजंगासन. 100counts

Pages