धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अज्ञातवासी हा व्यायाम जास्त नाही का वाटत?
की तुम्हाला सवय झालीय?
मला इतका जास्त व्यायाम करणारे लोकं वैयक्तिक माहिती मध्ये नाहीत म्हणून विचारले.
असा व्यायाम जमला तर शरीर किती तंदुरुस्त असेल ह्याच भावनेने विचारलेय हा.

झकासराव, मला ankylosing spondylitis आहे. सुरुवात झाली तेव्हा गुढघ्यांचाही त्रास होता. त्याचे व्यायाम केले आणि चांगलाच फरक पडला.

ब्रह्मविद्येसाठी Happy

बरं, ज्या किल्ल्लीदेवींसाठी हा धागा काढलाय, त्या इथे कधी फिरकणार?

मला गुडघ्यात माइल्ड संधीवात(?) - आर्थ्रायटिस आहे.
आज मस्त झाला व्यायाम. ४० मिनिटे elliptical machine आणि नंतर स्त्रियांच्या लॉकररुममध्ये १० मिनिटे अरशासमोर नाच Happy

गेल्या वीकएंड ला दोन दिवसांचा range ट्रेक केला (रायरेश्वर -> कोळेश्वर -> महाबळेश्वर). त्यामुळे सोमवार, मंगळवार व्यायामाला दांडी !!
बुधवारी बॅक, biceps, overall stretching
आज - चेस्ट आणि triceps

फार खातेय आणि वजन परत वाढू लागलय Sad आज ३०-३५ मिनिटेच व्यायाम झाला. दुपारी वॉक घेत होते मस्त तर मधेच एका रिक्रुटरचा फोन आला.

आज core workout on floor
5 types with 2-2kg dumbbells
25/20*3
Plank 30sec*3
काल पाठीचे व्यायाम
गुरुवारी चेस्ट वर्काऊट
उद्या सुट्टी.

सोमवारी शोल्डर आणि core workout केले.

मंगळवारी cross fit..jumping jack..With kettlebell, high knees वगैरे 5 type 100counts each.

बुधवारी लेग वर्काऊट
फ्रि स्कैव्ट्स १००
स्मिथ मशीन स्कैव्ट्स, सुमो स्कैवट्स, मशिन स्कैव्ट्स वीथ वेट १५*३
लेग curl,leg extension, calf raises 15*3

आज चेस्ट वर्काऊट
बेंच प्रेस फ्लाट , inclined, declined 15*3..(5kg डंबेल्स वरून 7.५kg ला पोहोचले..)
फ्लाय flat, inclined, declined 5-5kg 15*3
Butterfly machine 20*3
Ajun ek मशीन १५*३
वार्मडाऊन
वार्मडाऊन सायकलिंग+ स्ट्रेचींग

मागच्या पानात रोज वजन चेक करणे गरजेचे आहे का या प्रश्नाला उत्तर दिले नव्हते कारण

- या धाग्यावर ते असावे का हे समजले नाही.
- मी एक्स्पर्ट नाही
- प्रश्न कुणाला आहे हे स्पष्ट नव्हते
- ऑफेन्सिव्ह आहे असे कुणीच म्हटलेले नव्हते
- थोडक्यात उत्तर देणे शक्य नव्हते आणि मोठे उत्तर द्यायचा कंटाळा आलेला होता.

हा प्रश्न दुसरीकडे आणि थेट असता आणि वेळ असता तर उत्तर दिले असते.

व्यायामा सोबत डाएट महत्वाचे
त्याविषयी इथे लिहीत नाही कोणी
तेही फॉलो केलेले लिहिले तर बाकीच्यांना प्रोत्साहन मिळेल

मी सध्या योगासने करतोय तासभर
ग्रुप ऍक्टिव्हिटी असल्याने होउन जातंय
एकट्याने घरी करायला नाही जमत
आठवड्यात 5 दिवस
ट्रेनर सांगतील तसे आणि ते करायचे
शरीरातले अनेक अवयव कुठे असतात ते चांगलेच जाणवतं करताना. Lol

डाएट मात्र दिवाळी पासून नेटकं नाहीये
प्रोटीन intake साठी प्रयत्न करतो.
Refined साखर , मैदा , package फूड कट ऑफ केलेले दिवाळीच्या आधी. दिवाळी मध्ये हे बिघडले.
नंतर अजून रुळावर नाही गाडी.
कळतंय पण वळत नाही.

>>>>>>>व्यायामा सोबत डाएट महत्वाचे
त्याविषयी इथे लिहीत नाही कोणी
तेही फॉलो केलेले लिहिले तर बाकीच्यांना प्रोत्साहन मिळेल

होय. व्यायामामुळे माझी तरी भूक मंदावते. म्हणजे सकाळी ४० मिनिटे आणि संध्याकाळी३० व्यायम केला तर. आज कॉफीच प्यायला विसरले व तशीच जिम ला गेले. मग परत घरी आले. त्यामुळे व्यायामाची वेळ चुकली आहे. आता थोड्या वेळाने जाइन.

आज पाठीचे व्यायाम
7 types 15/20*3
ट्रेडमिल दहा मिनटं, वार्मडाऊन पाच मिनटं.

मी पोस्ट वर्काऊट व्हे प्रोटीन पावडर घेते..
प्रीवर्काऊट भिजवलेले चार/पाच बदाम,दोन अक्रोड, दोन अंजीर,पाच काळे मनुके खाऊन जाते..इनफ एनर्जी मिळते..
साखर, तळण, मैदा,बेकरी पदार्थ बंद आहेत..
वीकेंडला बाहेर खाणं होतं महिन्यात एक दोनदा..पाणीपुरी फार आवडते महिन्यात दोनदा खाते..ती सोडता येणार नाही... Wink
फुलके एका वेळी दोन, भाजी, कडधान्ये, काकडी, गाजर, दही, भात (एक वाटी),चिकन,अंडी,फळं असते आहारात..
बाकी आयुष्यभर जे फॉलो करता येईल तेच डाएट फॉलो करतेय...

आत्ता व्यायाम करुन आले. - ३० च मिनिटे. पण किती प्रसन्न वाटतं.
>>>>ती सोडता येणार नाही... Wink
आय कॅन अंडरस्टँड प्रोफाऊंडली Wink

पायाच्या शिरा कडक झाल्या आहेत. पोटरीचा स्नायू कडक झाला आहे. आज चालता येत नव्हतं. Happy
ते दुखरं गुदगुल्या वालं सेन्सेशन असतं ना ? त्याला काय म्हणतात ? आज कार नेली आणि ट्रॅफिक जाम मधे येताना जे अडकलो ते क्लच दाबून दाबून जास्त पाय दुखले. Happy
रोजची जेवणाची वेळ आठ झाली आहे. नऊ वाजता झोप लागते. आज आलोच उशिरा.

आज बायसेप्स ५types , ट्रायसेप्स ४टाईप्स
वार्मप + वार्मडाऊन = १२मिनटं
या आठवड्यात सगळं कव्हर झालं..उद्या रेस्ट+चीट डे.

हा व्यायाम जास्त नाही का वाटत?>>>>
@झकासराव, माझ्या जीममधे आहेत काही एका दिवशी दोन - तीन मसल्स ग्रुपचे मिळून १७-१८ वेरीएशन्स करतात तास दिडतासात...

तुम्ही निरोगी आणि सुदृढ आहात याची एकदम सोपी टेस्ट सांगतो. मांडी घालून बसा आणि जमिनीला हात न टेकवता उभे राहून दाखवा. जर तुम्हाला हे जमले तर तुम्ही फिट आहात हे समजा.

सोमवारी weigheted core workout.
१०kg plates each hand 3 types 25*3
Hand to toe touch with dumbell 25*3 each side
Buttkicks 20sec*3
Ek with dumbell workout 20*4
By pressing boxing bag run 20*sec*3
Plank 30sec*3

मंगळवारी शोल्डर वर्काऊट
6types 20*3
वार्मप ट्रेडमिल+ स्ट्रेचींग १५मिनटं.

बुधवारी सुट्टी झाली..

काल चेस्ट वर्काऊट
बेंच प्रेस वीथ ७.५kg plates- flat, inclined 20*3
Declined 20*3
Butterfly machine 20*3
Ani 2 machines 20*3

आज पाठीचे व्यायाम
७ types 20*3
Cycling+ stretching 10 मिनटं
वार्मडाऊन

सोमवारी weighted core workout

मंगळवारी बायसेप्स आणि ट्रायसेप्स

बुधवारी लेग वर्काऊट

गुरुवारी चेस्ट वर्काऊट

शुक्रवारी पाठीचे व्यायाम

आज circuit workout
2types shoulder
2types chest
2 types back
3types abs

रोज नाही तर नाही आठवड्याला तरी टाकत चला व्यायामाचे अपडेट्स लोकहो.....

एक तास सायकल केली. मस्त फास्ट हिंदी गाण्यांवर -

- केसरिया
- तेरा फितूर
- झुमका
- ठुमका
- माशाल्ला
- स्वॅगसे स्वागत
- बाद्शाह (डी जे वाले बाबू , गेंदा फूल)

वगैरे वगैरे Happy
-----------
घरी येउन स्मोक्ड सालमन & एग सँडविच खाल्ले. आता स्मोक्ड सालमनचा कंटाळा आलाय. फार खारट असतो.

सामो मस्त... मलापण व्यायाम करताना फास्ट गाणी हवी असतात..तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्रजी शोधून फास्ट गाण्यांची प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे.
आज रेस्ट डे.. नो चीट डे..दर आठवड्याला चीट डे नसतो..महिन्यात एक/दोन दिवस.....

Pages