धावूगल्ली - आजचा व्यायाम

Submitted by mrunali.samad on 12 November, 2024 - 09:38

किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सामो सहीच....

ऋष्या अपडेट मस्त
पण बऱ्यापैकी नियमितपणे>>>> Lol

भरतसर, तुमचे व्यायाम अपडेट पण मस्त असतात...

पशुपतसर मस्त रूटीन ..

खूप रोचक आहे

र आ कशाला इतका ताण करून घ्यायचा.. काळजी घ्या...दोन दिवस मस्त आराम करून पुन्हा सुरू...

आज core workout on floor
Leg raise, 30*3
side toe touch, 30*3
bycycle crunches, 30*3
crunches on declined bench 30*3
आणि दोन वर्काऊट प्रकार 20*3
सायकलिंग 10 मिनटं, प्लांक 45sec*1, 37sec*2

झकासराव , ब्रह्मविद्येच्या वर्गांच्या नव्या बॅचेस सुरू होऊ लागल्या आहेत.
तुम्ही कोल्हापुरात आहात ना?
तिथे ७ डिसेंबरपासून सुरू होतील.
https://brahmavidya.net/online-registration-landing.php
याशिवाय पाच दिवसांचे रेसिडेन्शल कोर्सेसही आहेत.

आज पहिल्यांदाच रविवारचा व्यायाम केला. स्ट्रेचिंग आणि 8fit चं एक सेशन. शुक्रवारची कसर भरून काढली. शुक्रवार शनिवार चालणं फार झालं नाही. शनिवारी knees and hips. बुधवारचे प्रकार झोपून असतात, शनिवारचे उभ्याने.

आज सायकलिंग + स्ट्रेचींग १० मिनटं
बायसेप्स ७ वेरीएशन्स,वीथ ५-५kg dumbbells-3/वीथ बार-3/वीथ मशिन 1- २०*३
वार्मडाऊन ५ मिनटं...

मी चालायला सुरुवात केली आहे. ३ दिवस झाले. पहिल्या दिवशी ४ किमी, दिवस २, ३.५ किमी तर काल जरा जास्तच झाले ६ किमी त्यात टेकडी चढून गेलो. त्यामुळे आज पाय दुखायला लागल्याने दांडी झाली आता उद्या निग्रहाने सकाळी उठून जाण्याचा प्लान.

आज लेग एक्सरसाईसेस -

Warm-up and free squats
Leg press
Calf raises
Leg extensions
Lunges

All exercises 15*3 (increasing weight)

Stretching and cool-down

भरत,
मी।मूळचा कोल्हापूर पण नोकरीमुळे पिंचीमध्ये
चेक करतो, online क्लास जमेल.
धन्यवाद शेअर केलंत म्हणून.

आज क्रॉसफीट/कार्डिओ
stretching 5 Minuts
jumping jack 100
High knees 30each side *3
Sumo jumps 30*3
With steper jumps 30sec*3
Side toe touch with stepper each side 15*3
On floor balasan and cobra pose 60counts
Warm down 5min.

आज पहाटे चारच्या आधी जाग आली. चार वाजता नॉर्मल सायकल घेऊन खाली गेलो.
पण कालच्या सायकलिंगने आज अजिबात सायकल चालवता आली नाही. म्हणायला तासभर बाहेर होतो, पण काहीच कामाचं नव्हतं ते.
आजचा दिवस झीज भरून काढण्यासाठी ठेवावा असं ठरवून वर आलो. कदाचित उद्याही.
परवा पुन्हा जाऊन येऊन ५० किमी झाले कि या आठवड्याचा कोटा पूर्ण.

यानंतर जेव्हां आठवड्याचा कोटा पूर्ण होईल तेव्हां स्वतःला बजावण्यासाठी या धाग्यावर येईन.
जोपर्यंत सुरळीत चालू राहील तोपर्यंत या धाग्यावर अपडेट करण्यासाठी यावं असे वाटत नाही.

काल लेग वर्काऊट
फ्री स्कैव्ट्स १००
स्मीथ मशीन स्कैव्ट्स १५-१५kg -10*4
Leg press 80kg 10*4
Squats with machine 15-15kg..Both sides..15*3
Leh curl 10*4
Leg extension each side 15*3
Calf raises 15*3
वार्मडाऊन5 मिनटं.. सायकलिंग +स्ट्रेचींग १२ मिनटं

आज चेस्ट वर्काऊट
3 बेंच प्रेस with bar फ्लाट, inclined, declined 20*3
Machine press 20*3
Butterfly machine 20*3
Upper chest machine 20*3
Pullover 10kg dumbell 20*3
झेपतील तितक्या वजनावर आणि लास्ट सेट increased weight.
सायकलिंग +स्ट्रेचींग १०मिनटं
प्लांक ४५sec , 35sec*2
Warm down 5 मिनटं

काल सकाळी लवकर मतदानाला जायचं होतं म्हणून फक्त स्ट्रेचिंग. पण काल ८१०५ पावलं चालणं झालं.
आज फक्त ब्रह्मविद्या.

मी एक तापाने डाऊन होते म्हणून दोन दिवस नो व्यायाम.. बाकीचे कुठे आहेत? या अपडेट्स घेऊन..

आज सायकलिंग+स्ट्रेचींग १५ मिनटं.
शोल्डर वर्काऊट ७ वेरीएशन्स २०*३.

मी १ तास भरपूर व्यायाम .. ट्रेनर खूप variations घेते, म्हणून सान्गता येत नाही , नेमके काय काय केले.
पण whole body exercises असतात. योगासने, calisthenics , core strengthening असे सगळे असते.

मी १ तास भरपूर व्यायाम .. ट्रेनर खूप variations घेते, म्हणून सान्गता येत नाही , नेमके काय काय केले.
पण whole body exercises असतात. योगासने, calisthenics , core strengthening असे सगळे असते.

गेला आठवडा हे दुखतंय ते दुखतंय मुळे व्यायाम कमी केला. आज सगळे व्यायाम केलं. आज wrists and shoulders
मॉर्निंग वॉक पुन्हा सुरू करायचा आहे. पावसाळा गेल्यावर, दिवाळी झाल्यावर असे दोन्ही मुहूर्त चुकलेत. आता १ डिसेंबर.

Pages