दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बब्रुवाहन रुद्रकन्ठावार या माझ्या आवडत्या मराठी लेखकाचे नुकतेच दु:खद निधन झाले. ते वर्तमानपत्रात नियमित सदर लिहीत असत.
त्याण्चे बर्ट्राण्ड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी नावाचे पुस्तक प्रसिद्ध होते. https://www.maayboli.com/node/28074

बब्रुवाहन रुद्रकन्ठावार - खरे नाव काही वेगळे होते ना? लोकसत्ता मधे बातमी आली होती त्यात वाचले

धनंजय चिंचोलीकर (माबो धाग्यावर सापडले)

हो… सकाळच्या धुक्यात बहुतेक दिसले नाहीत.

रेल्/रोड्/जल रस्ते बांधताना जनावरांचाही विचार करणे आता आत्यंतिक गरजेचे बनले आहे. हत्तींचा कळप एक कुटुंब असते आणि एकाच वेळी कुटुंबातले सातजण जाणे हे कुटुंबावर आभाळ कोसळण्यासारखे आहे. Sad

७ हत्ती?
बाप रे. काय विशाल स्मृती असते या प्राण्याला. कोणी त्यांचे पिल्लू मारलेले तर त्या गावावर झुंडीने हल्ला केलेला. त्यांच्या सोशल बिहेव्हिअर असते, त्यांना मानवांसारखे विकार असतात.--

Pages