दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. नारळीकर आणि श्रीनिवासन यांना श्रद्धांजली.
टीआयएफआरमध्ये नारळीकरांचं व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायचा योग शाळकरी वयात आला होता. त्यांच्या विद्वत्तेबरोबरच त्यांचं सौम्य सस्मित व्यक्तिमत्त्व, अस्खलित बोलणं आणि सहजसोप्या भाषेत अवघड विषय समजावणं यांचीही छाप पडली होती मनावर. मराठीत विज्ञानकथा त्यांच्याच प्रथम वाचल्या.

डॉ नारळीकर व श्रीनिवासन यां दोघांना श्रद्धांजली _/\_

नारळीकरांची "आकाशाशी जडले नाते" या पुस्तकातून त्यांची ओळख झाली होती. भारावून गेल्यासारखे वाचले होते.
काही वर्षापूर्वी एका कार्यक्रमात त्यांना भेटलो होतो. त्यांच्या प्रेषित पुस्तकावर त्यांची सही सुद्धा घेतली होती. जबरदस्त व्यक्तिमत्व.

नारळीकर चांगला वक्ताही होते. पुण्याची आयुका उभारण्यात त्यांचे प्रयत्न होते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आदर्श होते.

प्रेषित हे मी वाचलेले पहिले खरे खुरे सायन्स फिक्शन पुस्तक. त्यांच्यामुळे एक वेगळ्या दुनियेची ओळख झाली.
श्रद्धांजली!

बंगळूर येथे चेंगराचेंगरीची अजून एक घटना, किमान अकरा जणांचा बळी गेला आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. जाणार्‍यांत बहुतेक तरुण मंडळीच गेली आहे . : अरेरे:

कानांवर आलंय की आज सकाळी दिव्याजवळ ट्रेनमधून पडून सहाजण लगेच मृत्युमुखी पडले. सविस्तर वाचायलाही कसंतरी वाटतंय. (ट्रेनमधून जातायेता मुंबईतील जीवन सरतं. तरीही)

४ मृत्युमुखी ६ जखमि - विविधभारती
आकडेवारी अशी ऐकल्यासार खी वाटते.
वाईट वाटले.

मृतांना श्रद्धांजली

हॉरिबल आहे सगळं. मुंबईतल्या लोकसंख्येपायी पब्लिक ट्रान्सपोर्ट उसवत चाललं आहे. मेट्रोचं नेटवर्क पूर्ण नाही. आणि ज्यांना ऑफिसला येण्याची गरज नाही त्यांनाही बोलवण्याचा कंपन्यांचा हट्ट. यात शेवटी गरीबच मरतो कारण त्याला खर्चिक पर्यायही उपलब्ध नाहीत. पण नवनवीन वस्त्या, उपनगरं उभी राहताहेत आणि दूरदूरच्या उपनगरात राहून का होईना रोजगाराच्या खात्रीपायी माणसं ट्रेनमधला नरकापेक्षा भयंकर प्रवास सहन करताहेत. देशात आणि राज्यात रोजगाराचं विकेंद्रीकरण झालं नाही तर मुंबई इम्प्लोड होईल.

भयंकर!

दुर्दैवी जीवनशैली!

श्रद्धांजली!

माझेमन उत्तम प्रतिसाद. रोजगाराचे विकेंद्रीकरण ही संकल्प ना योग्यच वाटते. भयंकर वाईट बातमी आहे.

सकाळी आणि संध्याकाळी फारच गर्दी असते. मुंबई उसवण्याच्या मार्गावर आहे. कितीही परिवहनाचे प्रकार काढले तरी अपुरेच पडत आहेत.

फ्रेडरिक फोरसाईथ - थ्रिलर्स आणि हेरगिरीच्या कथांचा सिद्धहस्त लेखकाचं निधन.

त्याचं नाव कदाचित लोकांना माहिती नसलं तरी ‘द डे ऑफ द जॅकल’ ऐकून तरी ठाऊक असतं. रॉयल एअरफोर्समध्ये पायलट, रॉयटर्सतर्फे पत्रकार व नंतर MI 6 साठी अज्ञात मुशाफिरी केलेल्या या लेखकाची कथानकं गुंतागुंतीची असायची. पहिली ५०-६० पानं कशाचा कशाला संबंध लागायचा नाही आणि शेवटाकडे ते सगळं कोलाज जुळत यायचं तेव्हा आपणही थक्क व्हायचो.

माझ्या आवडत्या लेखकाला श्रद्धांजली

आजचा लोकसत्तेचा अग्रलेख फ्रेडरिक फोरसाईथ यांच्यावर आहे. हे नाव कधी नोंदलं गेलं नव्हतं. पण अग्रलेख वाचताना आठवलं की द अफगाण ही कादंबरी वाचली आहे. त्यांची इतर पुस्तकेही वाचायला हवीत.

फ्रेडरिक फोरसाईथ ची एखाद दोन वाचली असतील, पण फार वाचलेली नाहीत. वाचेन आता.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आणतो आणि बघतो पोराला क्लिक होतात का.
श्रद्धांजली.

भयंकर घटना

मृतात्म्यांना श्रद्धांजली

Pages