दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातंत्र्यसैनिक , गांधीवादी गुणवंतराय गणपतराव , अर्थात जी जी पारीख यांचे आधी गांधीजयंतीच्या दिनी वयाच्या १०१व्या वर्षी निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘पिंजरा’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही अमर आहेत. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

अरे, आत्ताच तर मी त्यांचा कपिल शर्मा शो मधला एपिसोड सहज आठवत होतो. "हिरो बनने की कोशीश तो बहुत की" असं मिश्किलपणे सांगून मग त्यांनी सुरवातीच्या आयुष्यातला झगडा काय होता तो सांगितला होता. शोले मधला जेलर ते धमाल मधला हेलिकॉप्टरच्या त्या प्रसिद्ध कॉमेडी दृश्यातला बाप!
उमदा अभिनेता हरवला. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

संध्या आणि असरानी यांना श्रद्धांजली.

बरेच पिक्चर्स असरानीशिवाय अपूर्ण वाटले असते, इतकी छाप होती, शोले जेलर तर अफलातून.

“बरेच पिक्चर्स असरानीशिवाय अपूर्ण वाटले असते” - ह्या कॅटेगरीत कदाचित सगळ्या वरच्या क्रमांकावर ‘छोटीसी बात‘ येईल. इतका अ‍ॅडोरेबल बॅड गाय दुसरा कुणी आठवत नाही.

कदाचित सगळ्या वरच्या क्रमांकावर ‘छोटीसी बात‘ येईल>>>>>>अगदी
अमोल पालेकर वर जेलस होणारा
त्याचबरोबर विद्या सिन्हा ची काळजी घेणारा
चायनीज खाताना तारांबळ उडालेला

>>>>>इतका अ‍ॅडोरेबल बॅड गाय दुसरा कुणी आठवत नाही.
_/\_ सुरेख वाक्य. फक्त एखाद्या लेखकास सुचेल असे.

अरेरे असरानी.. फार वाईट
मला वरच्या चित्रपटासोबत तकदीरवाला सुद्धा आठवला ज्यात तो चित्रगुप्त झाला होता. आणि यम कादरखान.. यापेक्षा परफेक्ट कास्टिंग काय असती हे सुचू नये खरेच असा होता तो कित्येक रोल मध्ये.

अगदी लहान असताना पाहिलेला 'चोर मचाये शोर' आठवला , त्यात डॅनी आसरानी या जोडीने धमाल केली होती.
classy comedian.
श्रद्धांजली !

>>> कदाचित सगळ्या वरच्या क्रमांकावर ‘छोटीसी बात‘ येईल.
अगदी!
'अभिमान'मधला रोलही मस्त होता त्याचा आणि त्याने केलाही फार सुंदर होता.

> कदाचित सगळ्या वरच्या क्रमांकावर ‘छोटीसी बात‘ येईल.
अगदी!
'अभिमान'मधला रोलही मस्त होता त्याचा आणि त्याने केलाही फार सुंदर होता. >>> +१
भावपूर्ण श्रद्धांजली!

फेरफटका आणि बेफिकीर यांच्या नावात माझा प्रचंड गोंधळ उडतो. नेहमी म्हणजे नेहमी. का माहीत नाही त्यामुळे 'लेखका'स सुचेल असे लिहीले Happy

“ फेरफटका आणि बेफिकीर यांच्या नावात माझा प्रचंड गोंधळ उडतो.” - चला, त्या निमित्ताने ह्या ‘दु:खद’ धाग्यावर एक स्मायली पहायला मिळाली. Happy

Pages