दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह सतिश शाह… त्याला ये जो है जिंदगी मध्ये प्रथम पाहिले होते. हाडाचा कलाकार!

भावपुर्ण श्रद्धांजली.

सतीश शाह ह्यांना श्रद्धांजली.
त्यांचे हिंदी सिनेमे सर्वांना माहित आहेतच पण वाजवा रे वाजवा नावाच्या सिनेमात त्यांनी मुलीच्या बापाचा रोल केला होता आणि मस्त केलं होतंमराठीत ही काम.
प्रशांत दामले, अशोक सराफ, निशिगंधा वाड वगैरे कास्ट होती. मिळाला कुठे तर जरूर बघा.

“ त्याला ये जो है जिंदगी मध्ये प्रथम पाहिले होते” - ‘थट्टी ईयर्स का एक्स्पिरियन्स’ हरपला. Sad

ये जो है जिंदगी आहेच. पण गंमत जंमत मध्येही होते इन्स्पेक्टर फुटाणे म्हणून. साराभाई vs. साराभाई पण. श्रद्धांजली!

असरानी आणि सतीश शाह या दोघांनाही श्रद्धांजली.
जमल्यास कुणीतरी दोघाही विनोदवीरांवर स्वतंत्र धागा काढावा.
दे डिजर्व इट !

एकनाथ वसंत चिटणीस>>>>

भावपूर्ण श्रद्धांजली..

शतक ओलांडलेला शास्त्रज्ञ :
प्रा. एकनाथ वसंत चिटणीस

ज्येष्ठ भौतिक व अवकाश शास्त्रज्ञ ‘पद्मभूषण’ प्रा. एकनाथ वसंत तथा ई. व्ही. चिटणीस यांचं आज 22 ऑक्टोबर रोजी पुण्यात निधन झालं.. गुरुवार, 25 जुलै 2025 रोजी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती.. असल्याने कोल्हापुरात जन्म झालेल्या या शास्त्रज्ञाविषयी...

1985 मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरवले असे हे शास्त्रज्ञ. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण देऊन वयाच्या शंभरीत त्यांचा गौरव करावा अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गेल्याच वर्षी केल्या होत्या, पण तसे घडू शकले नव्हते..

‘चांद्रमोहीम-3’ यशस्वी झाल्यावर एका लेखात भारतातील अवकाश संशोधन क्षेत्रातील पाया रचणारे वैज्ञानिक म्हणून प्रा. चिटणीस यांचा उल्लेख होता. भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी थुंबा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच शोधली व निश्चित केली होती. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मुलाखतीसाठी आल्यानंतर त्यांनी चिटणीस सरांची गुणवत्ता ओळखून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवावी, याबाबत डॉ. विक्रम साराभाई यांना सूचना दिल्या होत्या..

प्रा. चिटणीस जसे कोल्हापूरचे तसेच शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले हेही कोल्हापूरचे. डॉ. भोसले अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीतून निवृत्त झाल्यावर जन्मगावाच्या ओढीने 1988 मध्ये कोल्हापुरात परतले. डॉ. भोसले यांचे प्रा. चिटणीस, डॉ. कलाम यांच्याशी जवळचे संबंध होते. साहजिकच अवकाश संस्थेच्या ‘एज्युसॅट’ या उपग्रहाच्या योजनेची डॉ. भोसले यांना माहिती होती. शिवाजी विद्यापीठाने स्वतंत्र अवकाश संशोधन विभाग सुरू करून या संधीचा फायदा उठवावा, असा डॉ. भोसलेंचा प्रयत्न होता.

डॉ. भोसलेंना कोल्हापूर महापालिकेने ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. समारंभात नाव पुकारले तरी डॉ. भोसले सन्मान स्वीकारण्यासाठी उठले नाहीत. ‘सर, काय झालं?’ असं विचारलं तेव्हा डॉ. भोसले म्हणाले, ‘माझ्यापेक्षा सर्वार्थाने ज्येष्ठ आणि कोल्हापुरातच जन्मलेला माणूस इथे असताना मी ‘कोल्हापूर भूषण’ सन्मान कसा स्वीकारू?’ डॉ. भोसले यांच्या आधी प्रा. चिटणीस यांचा सत्कार केल्यानंतर डॉ. भोसले यांनी आपला सत्कार स्वीकारला.

प्रा. चिटणीस यांचा जन्म कोल्हापूरचा. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया भक्कम व्हावा यासाठी पंडित नेहरू यांनी डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम साराभाई तसेच प्रा. चिटणीस यांना विश्वासू सहकारी म्हणून कसे स्वातंत्र्य दिले, यासह अनेक बाबींचा तपशील माहीत होताच. प्रा. चिटणीस यांनी प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर रेडिओ संपर्क क्षेत्रातील पदविका पूर्ण केली. इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदव्युत्तर पदवीही मिळवली.

अहमदाबादच्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत संशोधन कार्याचा प्रारंभ केला. थुंबा व श्रीहरिकोटा या अनुक्रमे अग्निबाण व उपग्रह प्रक्षेपणासाठी निवडलेल्या जागांच्या निश्चितीत प्रा. चिटणीस यांचा वाटा मोलाचा होता. ‘इन्सॅट’ ही उपग्रहांची मालिका आखण्यामध्येही प्रा. चिटणीस यांची लक्षणीय भागीदारी होती.

प्रा. चिटणीस यांनी 1950 ते 60 या दशकात वैश्विक किरणांशी संबंधित संशोधन केले. त्यांची पीएच.डी.ही याच विषयाशी संबंधित आहे. पुढे तीन वर्षे अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् तंत्रज्ञान संस्थेत संशोधन केल्यानंतर 1960 -70 या दशकात त्यांनी अवकाश संशोधन व क्ष-किरण या विषयावरील संशोधनावर लक्ष केंद्रित केले. अंतराळ संशोधनविषयक तंत्रज्ञानाचा शेती, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात वापर करण्याच्या द़ृष्टीने 1970 च्या दशकात ‘नासा’च्या सहकार्याने ‘साईट’ हा बहुपयोगी प्रकल्प आखला गेला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. चिटणीस यांनी केली होती. याच प्रकल्पामुळे 1975-76 च्या दरम्यान देशातील विविध राज्यांमधील 2900 खेड्यांमध्ये दूरचित्रवाणी संच पोहोचू शकले होते.

1962 मध्ये अंतराळ संशोधनासाठी डॉ. साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे प्रा. चिटणीस हे सदस्य सचिव होते. ‘कंट्रीवाईड क्लासरूम’ यासारखा दूरदर्शनवरचा शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यातही प्रा. चिटणीस होतेच! आज ते गेले आणि त्यांच्या गौरवाची संधी महाराष्ट्र सरकारने गमावली असेच म्हटले पाहिजे..

प्रा. चिटणीस ग्रेट व्यक्तिमत्व, श्रद्धांजली.

काहीच माहिती नव्हतं मला. सविस्तर पोस्ट साठी धन्यवाद साधना.

काहीच माहिती नव्हतं मला. सविस्तर पोस्ट साठी धन्यवाद साधना. >>>> +१
प्रा चिटणीसांना भावपूर्ण श्रध्दांजली !

आयुकाचे सहसंस्थापक आणि माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांचं बीजिंगमध्ये निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. संशोधनाशी निगडित कामासाठी ते तिथे गेले होते. भावपूर्ण आदरांजली _/\_
मी त्यांना एकदाच बघितलं आहे. कॉलेजमध्ये असताना मी काही कारणाने आयुकामधे गेले होते आणि ज्यांना भेटायचं होतं त्यांची वाट पहात असताना डॉ. दधिच समोरून चालत गेले. तेव्हा ते आयुकाचे संचालक होते. ती चहा/कॉफीची वेळ होती. ते आपला कप भरून घेऊन शांतपणे परत आपल्या ऑफिसकडे गेले. तो साधेपणा तेव्हा मनावर ठसला होता. सुदैवाने नंतरच्या काळात अशी, सर्वार्थाने मोठी असूनही तितकीच साधी असलेली अजूनही अनेक माणसं बघायला मिळाली, अजूनही मिळत आहेत. पण तेव्हा हा पहिलाच अनुभव होता त्यामुळे जास्त लक्षात राहिला. Happy

ओहह वावे चांगली आठवण, त्यांना थोडा वेळ का होईना तू जवळून बघितलंस. संशोधन निगडीत गेलेले असताना परदेशात मृत्यू आला, म्हणजे शेवटपर्यंत काम करत राहिले.

एकामागोमाग एक बरेच जण Sad

श्रद्धांजली.

मुलीची ईशाची पोस्ट आहे तब्येत स्थिर आहे, सुधारणा होतेय. असं युट्युबवर बघितलं.

Pages