दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बब्रुवाहन रुद्रकन्ठावार या माझ्या आवडत्या मराठी लेखकाचे नुकतेच दु:खद निधन झाले. ते वर्तमानपत्रात नियमित सदर लिहीत असत.
त्याण्चे बर्ट्राण्ड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी नावाचे पुस्तक प्रसिद्ध होते. https://www.maayboli.com/node/28074

बब्रुवाहन रुद्रकन्ठावार - खरे नाव काही वेगळे होते ना? लोकसत्ता मधे बातमी आली होती त्यात वाचले

धनंजय चिंचोलीकर (माबो धाग्यावर सापडले)

हो… सकाळच्या धुक्यात बहुतेक दिसले नाहीत.

रेल्/रोड्/जल रस्ते बांधताना जनावरांचाही विचार करणे आता आत्यंतिक गरजेचे बनले आहे. हत्तींचा कळप एक कुटुंब असते आणि एकाच वेळी कुटुंबातले सातजण जाणे हे कुटुंबावर आभाळ कोसळण्यासारखे आहे. Sad

७ हत्ती?
बाप रे. काय विशाल स्मृती असते या प्राण्याला. कोणी त्यांचे पिल्लू मारलेले तर त्या गावावर झुंडीने हल्ला केलेला. त्यांच्या सोशल बिहेव्हिअर असते, त्यांना मानवांसारखे विकार असतात.--

हत्तीचं वाचून वाईट वाटलं.

कलमाडी, झिया श्रद्धांजली.

माधव गाडगीळ खरोखर अभ्यासू पर्यावरणवादी होते, फार आदर वाटायचा. श्रद्धांजली.

मायकेल परेंती इज नो मोअर – दुःखद घटना तर नाही म्हणता येणार, कारण ते 92 वर्षांचे होते. 1960 च्या दशकापासूनचा वसाहतवाद आणि खासकरून अमेरिकन साम्राज्यवादाविरोधातला एक सतत, एकसंघ आणि बुलंद आवाज. स्वतःच्या ब्ल्यू कॉलर बॅकग्राऊंड वर मात करून मेहनतीने Academician झालेले ज्याचा त्यांना अत्यंत अभिमान होता. त्यांच्या अमेरिकाविरोधी धोरणामुळे सिस्टीम ने त्यांना कधीच सेटल होऊ दिले नाही, tenure मिळाले नाही. तरी त्यावरही मात करून आपल्या असंख्य भाषण आणि पुस्तकांतून सर्वसामान्यांपर्यंत आपला आवाज पोहोचवलाच. Blackshirts and Reds हे त्यांचे खूप गाजलेले पुस्तक. त्यांची कितीतरी भाषणे youtube वर मिळतील, त्यापैकी yellow tainted parenti म्हणून प्रसिद्ध झालेले सोविएत युनियन च्या शेवटच्या दिवसांत दिलेले हे भाषण https://youtu.be/xP8CzlFhc14?si=Fd7W95UgjV7kPRkT एकदम खास – "The Third World is not poor. You don't go to poor countries to make money. There are very few poor countries in this world. Most countries are rich! The Philippines are rich! Brazil is rich! Mexico is rich! Chile is rich—only the people are poor. But there's billions to be made there, to be carved out, and to be taken—there's been billions for 400 years! The Capitalist European and North American powers have carved out and taken the timber, the flax, the hemp, the cocoa, the rum, the tin, the copper, the iron, the rubber, the bauxite, the slaves, and the cheap labour. They have taken out of these countries—these countries are not underdeveloped—they're overexploited". इराक युद्धा संबंधीचा Hitchens शी केलेला debate ही बघावा https://youtu.be/jzkmP3XFFX8?si=rQTJnRu6v7tCjX4N, Parenti समोर Hitchens ची मांडणी किती बाळबोध आणि चुकीची हे तेव्हाही दिसत होते आणि आज जवळपास २० वर्षानंतर तर चांगलेच सिद्ध झाले आहे.
एका भाषणात Antonio Gramsci बद्दल बोलताना Parenti हळवा होतो. ग्रामचीला शेवटची दहा बारा वर्षे मुसोलिनीने तुरुंगात सडवले. तरीही खचून न जाता त्याने तिथे अभ्यास करून तुरुंगाच्या अधिकाऱ्यांपासून लपवून cultural hegemony चा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला. "Pessimism of intellect, but optimism of will" असे ग्रामची म्हणायचा. अमेरिकन साम्राज्यवादाच्या ऐन उमेदीच्या काळात मनाने खचून न जाता आणि स्वतःच्या करियर ची पर्वा न करता Parenti असाच optimism ने अविरत बोलत राहिला. उद्या जेव्हा साम्राज्यवादाचा सगळीकडे पराभव होईल, आणि खऱ्या लोकशाहीची पायाभरणी होईल तेव्हा Parenti साठी मानाचा मोठा मुजरा नक्कीच राखून ठेवला जाईल.

The creativity on Maayboli is always so inspiring! To truly appreciate the rich colors and fine details of the artworks shared here, I always make sure my monitor is perfectly calibrated. I use a purple screen to check uniformity and dead pixels—fullscreen background tool makes it quick on any device. It’s a great way to ensure we see these beautiful creations exactly as intended

भरत, स्वतंत्र लेख लिहायला आवडेल, सध्या कामाचा व्याप आहे, वेळ मिळेल तसा लिहीन. Blackshirts and Reds नक्कीच recommend करेन.

Pages