दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Red soil stories चॅनलवरची कुक पूजा गवस हिचा नवरा शिरीष गवस ब्रेन हॅमरेजने गेल्याची बातमी वाचली. एक लहान बाळ आहे त्यांचं. It is one of my favourite channels on YouTube.

खूपच वाईट आणि क्लेशकारक बातमी. त्यांची मुलगी फक्त एखाद वर्षाची असेल. ... एक काळ फॉलो करत होते त्यांचं चॅनेल. हल्ली एवढं आवडत नव्हतं
चटोरी रजनी अशी एक दिल्लीची vlogar आहे, तिचा सतरा वर्षांचा मुलगा ही मध्यंतरी रोड ऍक्सिडेंट मध्ये गेल्याची दुःखद बातमी होती.

शिरीष गवस बद्दल दुपारी वाचून जाम सुन्न व्हायला झालंय. मी हल्ली बघत नव्हते, मधे विष्णू मनोहर त्यांच्याकडे गेलेले तो एपिसोड बघितलेला आणि हल्ली मुलीच्या वाढदिवसाचा हायलाईट झालेला युट्युबवर, बघू बघू म्हणून राहीलेला आणि एकदम ही न्युज बघितली युट्युबवर, एकदम डोळ्यातून पाणी आलं. नंतर बड्डे व्हिडीओ बघताना, असं जाणवलंही नाही की ह्याला काही आजार आहे, ब्रेन ट्युमरचं लक्षात येत नाही बहुतेक लवकर असं वाटलं. तिचे वडील कॅन्सरने आजारी आहेत म्हणून मुलीचा पहीला बड्डे मुंबईत केला. तिथीने वाढदिवस कोकणात केलेला.

रेड सॉइलची न्युज एकुन खुपच वाईट वाटले.
मी काही चॅनेल कुठलेच अलिकडे पहात नाही तोच तोचपणा असतो सर्व कोकणी चॅनेलम्ध्ये.
पण सुरुवातीला खुप आवडलेला तेव्हा आवडीने प्रमोट करायची.

काल कळले तेव्हा धक्का बसला आणि खुप हळहळ वाटली. फेमस यु ट्युबर्सकडुन प्रेरणा घेऊन आपणही तसे करावे म्हणुन मुंबई सोडुन कोकणात सगळा सेटप उभारुन चॅनेल सुरु करणे हे एक धाडस होते जे या दोघांनी केले आणि ते यशस्वीही झाले. असा अकस्मात घाला घातला गेला हे खुप वाईट झाले. पूजा यातुन सावरुन परत उभी राहो.

फार दु:खद घटना, लहान वयात अस काहि घडण फार क्लेशदायक.
मुंबई सोडुन कोकणात सगळा सेटप उभारुन चॅनेल सुरु करणे हे एक धाडस होते जे या दोघांनी केले >> हे माहिती नव्हत मला.

Two Rupees Doctor ही ओळख असलेले डॉ. ए के रैरु गोपाल यांचे दुर्दैवी निधन झाले.
कन्नूर आणि आसपासच्या रूग्णांसाठी ते पहाटे ४ ते सायं. ४ पर्यंत आपल्या लक्ष्मी या घरगुती क्लिनिक मधे बसत असत. त्यांना जनतेचा डॉक्टर म्हटले जाई. त्यांनी आठवडी सुटी घेतली नाही.
रूग्णसेवा हा धर्म मानलेल्या डॉक्टरांनी पुरस्कार किवा प्रसिद्धीची कधीच अपेक्षा केली नाही. त्यांचे काम या पलिकडे होते.
देशातल्या एका रिअल हिर्रोला आपण आज पारखे झालो आहोत.

_/\_

तुझा हा मेसेज मी स्टेटसला ठेवला आहे.
त्यांचे कार्य जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे या साठी..

डॉ. ए के रैरु गोपाल यांच्याविषयी काहीच माहित नव्हते.
श्रद्धांजली

>>>>>Two Rupees Doctor ही ओळख असलेले डॉ. ए के रैरु गोपाल
अश्या लोकांना नोबल पुरस्कार दिला पाहीजे. ट्रुली नोबल पीपल.

राभु इथे दिल्याबद्दल खूप आभार.

भावपूर्ण श्रद्धांजली.

यांच्याबद्दल काही माहिती नव्हतं पण अशी माणसं गेल्याने समाजाचे खरोखर नुकसान होतं.

अश्या लोकांना नोबल पुरस्कार दिला पाहीजे. ट्रुली नोबल पीपल >> +११ मलाही यांच्याबद्दल माहीत नव्हते. इथे वाचल्यामुळे कळाले.
भावपूर्ण श्रद्दांजली!

अश्या लोकांना नोबल पुरस्कार दिला पाहीजे. ट्रुली नोबल पीपल >> +११ मलाही यांच्याबद्दल माहीत नव्हते. इथे वाचल्यामुळे कळाले. >>>> मलाही
भावपूर्ण श्रध्दांजली!

Pages