दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहमदाबादवरून लंडन गॅटविकला जाणारे AI171 बोईंग ड्रीमलायनर उड्डाणानंतर काही मिनिटात क्रॅश झाले. दुर्दैवाने हे विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल मेसवर पडल्याने मृत व जखमींची संख्या वाढू शकते. या अपघातात सापडलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करूया.

दु:खद घटना Sad गुजरात चे माजी मुख्यमंत्री विजय rupani देखिल त्यात होते असे काही बातम्या म्हणत आहेत

दु:खद घटना Sad गुजरात चे माजी मुख्यमंत्री विजय rupani देखिल त्यात होते असे काही बातम्या म्हणत आहेत >>> होय भ्रमर. माझ्या एका कलिगने मला हेच सांगितले. Sad

दुर्दैवी घटना.

असे काही बोइंगच्या बाबतीत होऊ शकते ही शक्यता वर्तवली गेली होतीच. Sad

फारच वाईट झालंय!
सर्व मृतांना श्रद्धांजली __/\__

गेले काही दिवस लागोपाठ अशा दुर्दैवी घटना घडत आहेत - बंगलोर, मुंबई, अहमदाबाद. काही सुचत नाही अशावेळी Sad

बंगलोरला आयपीएल जिंकल्यावर काढलेल्या रॅलीत चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला.
मुंबईमध्ये लोकलच्या डब्यात गर्दी झाल्याने चालत्या गाडीतून पडून ४ जणांचा मृत्यू झाला.
आजचा अपघात तर फारच मोठा आहे. अत्यंत दुर्दैवी!

अहमदाबादेत सध्या रक्ताचा भीषण तुटवडा आहे.

तुम्ही तिथे असाल, किंवा तुमचे परिचित तिथे असतील, तर खालील ठिकाणी रक्तदान करा / करायला सांगा.

1. U. N. Mehta Institute of Cardiology and Research Centre,
Room no. 110, First Floor, A Block,
Contact no. - 9316732524

2. IHBT Department, Civil Hospital,
Second Floor
Contact no. - 9428265409

3. IKDRC Blood Centre
First Floor, IKDRC Hospital,
Manjushree Mill Road, Baliya Limdi.
Contact no. - 7922687500

4. GCRI Blood Centre
First Floor, Gujrat Cancer and Research Institute
Contact no. - 7922688026

दु:खद घटना.
सगळ्यांसाठी प्रार्थना! /\

दु:खद घटना.
या अपघातात सापडलेल्या सगळ्यांसाठी प्रार्थना! /\

Pages