दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंदुक उचलली आणि गोळ्या घातल्या असे केले नाही तर धर्म विचारुन फक्त हिंदु पुरुषांना गोळ्या घातल्या, हिंदु स्त्रियांनस नाही. काश्मिरी पंडितांचेही असेच शिरकाण केले होते. so much for सर्वधर्मसमभाव .. my foot..

<< बायकोचा भाचा मारला गेला यात. >>
------ sed फार वाईट घटना आहे. Sad
तुमच्या कुटुंबाला यातून सावरण्यासाठी बळ मिळू दे यासाठी माझी प्रार्थना.

हत्याकांड ज्यांनी रचले, घडवून आणले त्या सर्वाना कडक शिक्षा व्हायला हवी अशी अपेक्षा.

srd तुमच्या कुटुंबाला यातून सावरायचे बळ मिळो.

पाकिस्तानी दहशतवादी व त्यांना सपोर्ट करणारे लोकल यांना असा धडा शिकवला पाहिजे की परत असं काही करायची कुणाची हिम्मत होऊ नये.

हेमंत जोशीच. त्याचा मेव्हणा ही गेला. त्यांचे कुटुंबीय मागच्या बसमध्ये होते. मुलगा दहावीला परीक्षेला बसला आहे.
बस थांबली होती म्हणून काही जण खाली उतरले होते.
आज किंवा उद्या इथे आणतील.

^^^बंदुक उचलली आणि गोळ्या घातल्या असे केले नाही तर धर्म विचारुन फक्त हिंदु पुरुषांना गोळ्या घातल्या, हिंदु स्त्रियांनस नाही. काश्मिरी पंडितांचेही असेच शिरकाण केले होते. ^^^
हे अतिशय हादरवून टाकणारे आहे.

Srd, खूप वाईट वाटले वाचून. अगदी घरच्या उंबऱ्यावर झळ आल्यासारखे वाटले.
काश्मीर नक्की १० वर्षे मागे गेले आहे शांतता या मार्गावरून.

srd ,
तुमच्या कुटुंबाला यातून सावरायचे बळ मिळो.

Srd तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना यातून सावरायचे बळ मिळो _/\_
तीव्र निषेध. आता सरकारने टोकाचं पाऊल उचलून कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.

ह्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. मागे रेल्वेतील सुरक्षा रक्षकानेही असेच नाव विचारून प्रवाशांची हत्या केली होती. त्याला हे बळ कुठून मिळाले? अतिरेक्यांचे ब्रेनवॉश केले जाते परंतु देशातील जनतेची माथी कोण भडकवत आहे ह्याचा विचार कोण आणि कधी करणार?

कश्मीर मधील टुरिझम फारच वाढलेले आहे आमच्या फॅमिली मधील बरेच जण जाऊन आलेत यावर्षी. आमच्या शेजारील एक फॅमिली अजूनही तिथेच आहे त्याच एरियामध्ये. एवढं टुरिझम वाढला असताना सिक्युरिटी आपण वाढवली होती की नाही, 20 मिनिटं ते दहशतवादी फिरत होते त्यावेळेस गन शॉट चे आवाज ऐकूनही कोणी धावलं कसं नाही. फेमस टुरिस्ट स्पॉट तरी secured ठेवायला हवे होते.

फार वाईट बातमी
श्रद्धांजली

गेले काही काळात काश्मीर जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. ओळखीचे मित्रपरिवार काही जण जाऊन आलेले. जे छान वाटत होते. काश्मीर भारताचाच भाग आहे असे वाटू लागलेले.. आता पर्यटनाला फटका बसून पुन्हा हे वाटणे काही वर्षे मागे ढकलले जाईल.

snn, तिकडे खुप बंदोबस्त आहे. मी बैसारणला गेले नाही त्यामुळे माहित नाही पण पहलगामातील बेताब, चंदन व अरु ह्या तिन वादिया बघितल्या. तिथे जिथे वाहनातुन पर्यटक उतरतात तिथे पोलिस असतात. तिथे आलेल्या गाड्या खाली होतात आणि
घोडेवाले, एटिवीवाले, स्लेजवाले वगैरे गिर्हाईके पकडायला गर्दी करतात. खुप गर्दी, आवाज, गोंधळ, गाड्यांचे कसेही पार्किंग वगैरे आपल्या भारतीय समाजाचे अविभाज्य घटक तिथेही राज्य करतात.

दुःखद घटना Sad सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली!
srd, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो __/\__

Pages