दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या शेजारच्या इमारतीतले मानस पिंगळे आदल्या दिवशी त्या जागेवर होते. मग श्रीनगर जम्मू रस्ता पावसाने बंद झाल्याने परत आले.

शरदकाका तुम्ही आणि कुटुंबिय काळजी घ्या. हेमंत जोशी यांची बायकोही भाचीची मैत्रीण आहे.

कल्पनाच करवत नाहीये, ज्यांचा नाहक बळी घेतलाय त्यांच्या कुटुंबाबाबत, ते कुठल्या मनःस्थितीतून जात असतील, सुन्न.

प्रचंड दुःखद आणि संतापजनक घटना

Srd आणि आर्च तुमच्या कुटुंबियांना ह्यातून सावरण्याचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना

srd, तुमच्या कुटुंबाला सावरायचे बळ मिळो. Sad
अरे मानस माझा वर्गमित्र. srd, तुम्ही रॉकेल डेपोच्या गल्लीत रहाता का?

srd,
तुमच्या कुटुंबाला यातून सावरायचे बळ मिळो.

होय. डीएनएस बँकेजवळ.
______________
भागशाळा मैदानाच्या समोरच हेमंत जोशी राहातं होते. पावणे आठला विमानतळावरून शवपेट्या आणण्यात आल्या
तिघांच्या. अगोदरपासूनच प्रचंड गर्दी होती मैदानात. नातेवाइकांनी दर्शन घेतल्यावर मैदानात शव ठेवण्यात आले. पावणे नऊपर्यंत इतर दोघांच्या शवपेट्या आणल्यावर एकत्रच स्मशानाकडे जातील. भरपूर पोलीस आहेत. पत्रकार चानेलवालेही तीन वाजल्यापासूनच जागा पकडून आहेत.
___
सांत्वनासाठी सर्वांचे आभार.

नाहकबळी जावून त्यांच्या घरावर दु:खकळा पसरली व काश्मिरमध्ये व्यवसाय उभारी घेत होते ते बंद पडले हे दु:ख सारखेच का?
व्यवसायची चिंता इथे कशाला?
काही प्रतिसादांची क मा ल आहे.

—- एस आरडी, भावपुर्ण श्रद्धांजली तुमच्या नातेवाईकास!

काश्मिरमध्ये व्यवसाय उभारी घेत होते ते बंद पडले हे दु:ख? व्यवसायची चिंता इथे कशाला?>>>

काश्मिरात व्यवसाय सुरु होऊन स्थानिक लोकांना पैसे मिळायला लागले तर ते दहशतवादी लोकांना विकले जाणार नाहीत. पोटाचेच वांधे व्हायला लागले की सारासार विवेक संपतो. ३७० रद्द करुन तिथे उद्योगधंदे जाण्याची व्यवस्था यासाठीही केली गेली.

साधना,
ईथे चर्चा नको तरीही …
माझा प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून न्हवताच. पण वरती एक प्रतिसाद वाचला व तो सूर विचित्र दिसला म्हणून लिहिला. ज्यांच्या घरातील व्यक्ती गेलीय तिला हा प्रश्ण पडेल का? निदान ह्या क्षणी? ते हि ह्या धाग्यावर म्हणून रहावले नाही व लिहिले.
त्या नवविवाहित स्त्रीचा विडिओ पाहून शहारा आला.
——-
आता, प्रश्ण गरीबी आहे म्हणून हे घडतंय का?
विचार करा, प्रश्ण रोजंदारी नाही म्हणूनच दहशतवाद वाढलाय हा भ्रम आहे.
गरीबी हे एक कारण आहे/असु शकते. पण इतर बरीच कारणे आहेत. मिळालेला पैसाही ह्यात उडवणारे व दहशतवादाला मदत करणारा हा जो समुदाय आहे त्यात प्रामुख्याने त्यांची फिरवलेली डोकीच आहे. कित्येक वर्षे जे “कथित” ( नॅरेटीव) मांडलं गेलय त्यात बर्‍यापैकी शिकलेले सुद्धा अडकलेले आहेत.
इथे आता ज्यास्त लिहित नाही.

काल आणि आज पेपरात सविस्तर बातम्या वाचून सुन्न व्हायला झालंय. एकमेकांच्या नात्यातले तिघे जण. Sad

srd,
तुमच्या कुटुंबाला यातून सावरायचे बळ मिळो.

srd,

फार फार वाईट वाटले

सावरा व धीर ठेवा

>> पर्यटकांवर अवलंबून असलेले व्यवसाय पुन्हा उभारी घेत होते या सगळ्याला या घटनेमुळे धक्का पोहोचेल याचे दु:ख आहे.<<
ह्या वाक्याचा ह्या धाग्यावर निषेध.

इथेच असे किती जण आहेत बघण्यात ज्यांना अशा वेळेसही ज्यांनी हे हीन कृत्य केलं त्यांच्याबद्दल व त्यांच्या धर्माबद्दल सॅाफ्ट कॅार्नर आहे. ही मंडळी वेळोवेळी आपल्या लिखाणातून ते दाखवून देतात.

आपल्या हिंदू लोकांमध्येच एकजूट नाही. अशा लोकांचा धिक्कार आहे.

Srd आणि आर्च तुमच्या कुटुंबियांना ह्यातून सावरण्याचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना>>+१
आउटडोअर्स +१

अत्यंत दुःखद घटना.

Srd आणि आर्च तुमच्या कुटुंबियांना ह्यातून सावरण्याचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना>>+१

हिंसाचार घराजवळ पोहोचला असे जाणवले ! >>> अगदी अगदी. डोंबिवलीतले तिघेजणही माझ्या भाचेसुनेचे माहेरचे नातेवाईक आहेत, असं आज समजलं .

सुन्न झाल्यासारखे झालेय गेले काही दिवस..
आता बातम्याही पहावत नाही ...
Srd आणि आर्च, तुमच्या कुटुंबाला यातून सावरायचे बळ मिळो.
कोविड काळात उगाचच असे वाटले की यानंतर सर्वसामान्य माणसे दुसऱ्याचा एक माणूस म्हणून विचार करतील. सगळ्यांनाच जिवंत असणे म्हणजे काय हे समजले असेल. भ्रामक समजूती तुटतील.
पण भ्रमनिरास होतोय. अवघड आहे.

Srd आणि आर्च तुमच्या कुटुंबियांना ह्यातून सावरण्याचे बळ मिळो ही देवाकडे प्रार्थना _/\_

माधव वझ्यांनी संपादीत केलेलं रंगकर्मी पुस्तक मध्यंतरी आणलेलं. दिग्गज नाट्यकलावंतांच्या दीर्घ मुलाखती स्वरुपाचं आहे. आवडलेलं.
त्यांना श्रद्धांजली.

Pages