पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयडी बदलला होय ? Proud
तेच म्हटलं आणखी कुणी सेम धागा काढला ?
मला पण चतुर्थी करावंसं वाटतंय आयडीनेम. Lol

^^मला पण चतुर्थी करावंसं वाटतंय आयडीनेम. Lol
नवीन Submitted by रानभुली ^^

करून टाक... मग काही दिवसांनी ते पण एक पेट पीव्ह येईल इथे Happy

माझे २ पेट पीव्ह्ज ( my 2 cents च्या चाली वर)
१. बालवाडीत सोडायला मुलांना नेताना त्यांना रहदारीच्या बाजूला ठेवून फोनात गुंतलेल्या आया (खरं तर सर्वच पण जनरली आयाच असतात)
२. पुण्यातल्या मगरपट्ट्यात असणार्‍या एच डी एफ सी शाळेत मुलांना टू व्हीलरवर रहदारीच्या उलट्या बाजूने सोडायला येणारे पालक. फक्त १००-१५० मीटरच्या यु-टर्न चे पेट्रोल वाचवून काय मिळते काय माहीत.

खरं तर पेट पीव्ह्ज नाहीत हे. मुलांच्या वर सब चलता है चे संस्कार करताना काहीच कसं वाटत नाही यांना. उद्या मुलं देखील सर्रास राँग साईडने चालवतील आणि काही बरं वाईट झालं तर आपण केलेल्या संस्कारामुळेच हे झालंय हे यांच्या गावीही नसेल.

बालवाडीत सोडायला मुलांना नेताना त्यांना रहदारीच्या बाजूला ठेवून फोनात गुंतलेल्या आया
>>>>
हा माझा फार जुना पेट पीव्ह आहे.

त्यात भर पडली ते आपल्याला जागा मिळतेय ना जायला मग आपल्या पोराला जागा मिळतेय का नाही ते न बघता घुसणाऱ्या बायका. काल स्टेशनवर एक बाई अगदी चिकटून शेजारून पुढे गेली. मी छत्री बंद करून हात खाली घेत होते. तेवढ्यात पायाला काहीतरी जाणवलं म्हणून खाली बघितलं तर २-३ वर्षाचं गुढग्याएवढं मुल. अक्षरशः 2 सेकंदाने चुकलं नाहीतर छत्री त्याच्या तोंडावर नाहीतर डोक्यात लागली असती. बरं पुढे जाऊन ती बाई काय करतेय तर सोबतीणीशी गप्पा मारतेय. भारतात तेही मुंबईत रेल्वे स्टेशनवर २-३ वर्षाच्या मुलाचा हात सोडून फिरण्याची हिम्मत कुठून येते?

आजकाल बर्याच रील्स मध्ये लोक बिछान्यात बसून जेवतात .
बिछान्यावर स्वच्छ चादर अंथरलेली असते , त्यावर ताट ठेउन चपाती भाजी डाळ भात खातात .
मला तरी प्रचंड ईरिटेट होतं.
हातात ताट घेउन बिछान्यात बसून खाणं वेगळं आणि असं खाली ताट ठेउन जेवणं वेगळं .

अमेरिकेत राहणारे बहुतेक NRI (विशेषत:) पुणेकर फारच डोक्यात जातात.

भारतात आले की स्वतःला खूप entitled वगैरे समजतात. बँकेच्या, पोस्टाच्या किंवा कुरियरच्या कर्मचाऱ्यांना एफिशियन्सीचे महत्व समजावून देतात त्रागा करून तेव्हा तर कानफटातच द्यावीशी वाटते. नाहीतर उबरच्या ड्रायव्हरला टेस्ला बद्दल सांग किंवा म्यूचूअल फंडात पैसे टाकत जा वगैरे सल्ले देतात. १४० कोटी लोकांच्यात व्यक्तीस्वातंत्र्याचे मूल्य साडे तीन वर्षात रुजावे असा त्यांचा आग्रह असतो. मग त्यांना इथला लोकांचा आग्रह म्हणजे काय 'मेरे पर्सनल बबल मे दखल अंदाजी' वगैरेच वाटतो थेट.

अमेरिकेत जाणे म्हणजे त्यांचे स्वतःचे कर्तृत्व असल्यासारखे आणि कर्तबगारी दाखवल्यासारखे त्यांचे वागणे असते. त्यामागे किती सोशल कॅपिटल लागले आहे याची त्यांना काही कल्पना नसते. विशेषत: म.म.व सवर्ण कुटुंबातून अमेरिकेत गेलेले लोक स्वतःच्या कर्तबगारीचे ढोल बडवायला नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी भारतात केलेले काबाडकष्ट (!!) सांगून सगळ्यांना वात आणतात.

एकवेळ हे अमेरिकेत गेलेले NRI परवडले पण त्यांचे पालक नकोत.

>>>>सोशल कॅपिटल
शहरात सर्वांनाच आता समान सोशल कॅपिटल आहे.

>>>>>>मला अशी विधानं खूप आवडतात. Wink
मुख्य म्हणजे - सोशल कॅपिटल म्हणजे, समान हक्क, कायदे, रिसोर्सेस, संधी ना? ते नाहीयेत का समान?

धन्यवाद भरत. हे माहीत नव्हते Sad दोन्ही लिंक वाचते आहे.

Social capital also has limitations. Some people have different access to social capital and the ability to activate it. This lack of social capital can constrain particular groups, sometimes perpetually. For example, a disadvantaged immigrant population could have more difficulty finding jobs due to a shortage of social capital. Unfortunately, those with capital may also work to exclude those without. Individuals and groups can harness social capital to force others to conform rather than embrace differences.
-------------
दुसर्‍या आर्टिकलवरुन सॉलिड अभ्यासपूर्ण लेखांच्या/ रिसर्चच्या लडीच्या लडी उलगडत आहेत. _/\_

रमड - संदर्भ इथे आहे

पण त्या चाकूला लागलेल्या रक्तातून तिला "चंदन की खूशबू" येते. और ऐसी खूशबू पूरे चित्तौड मे एकही आदमी लगाता है! राजगुरू राघव चेतन! आणि ही माहिती हजारो मैलांवरून नुकत्याच आलेल्या नवीन राणीला उपजत माहीत असल्यासारखी दाखवली आहे. तिला काय कोणत्या प्रजेच्या अंगाला कसले वास येत असतात याचे ओरिएण्टेशन दिले गेले होते का?

मुख्य म्हणजे - सोशल कॅपिटल म्हणजे, समान हक्क, कायदे, रिसोर्सेस, संधी ना? ते नाहीयेत का समान?>>> Legendary!!!

IMG_20250722_161150_913.jpg

नाही क ठीण नाही. पण जर चूकीचे आहे हेच माहीत नसेल आणि आपले बरोबर आहे अशी खात्री असेल तर कोणी कशाला गुगल करेल?
पहील्यांदा पहील्यांदा, अमेरिकेत एका ऑफिसात २ स्त्रिया (कलीग्ज) सचिंत मुद्रेने उभ्य होत्या की कॉफी आता कशात बनवायची. समोर केशरी कडा असलेले कॉफीचा पॉट होता. त्या गप्पा मारत होत्या म्हणुन त्यांना डिस्टर्ब न करता मी त्या केशरी कडेच्या पॉटमध्येच कॉफी करायला घेतली.
पैकी एकजण सूज्ञ होती, म्हणाली - तुला माहीत नसेल कारण तू अमेरिकेत नवीन आहेस पण केशरी कडेचे पॉटस फक्त डिकॅफला वापरतात.

मी इतक्या आत्मविश्वासाने पुढे सरसावले होते कारण असे काही असू शकते हेच मला माहीत नव्हते.
-------------
आताही मी समाजशास्त्राबद्दल फारसे वाचलेले नाही आणि त्यामुळे अशा चूका होतात. पण चांगली गोष्ट ही की भरत यांनी लगेच उत्तमोत्तम लिंक दिल्या.माझ्यासारखे अनेक जण असू शकतात. मग ते वामा (वाचन मात्र) असतील अथवा गप्प असतील. त्यांना फायदा झालाच.

“मी काही किरकोळ बदल केले आहेत.” असे मोघम म्हणत ते किरकोळ बदल केलेले भलेमोठे डॉक्युमेंट मेलवर पाठवणारे लोक. किरकोळ जे काही करतात ते नेमके काय आहेत, हे नमूद करणार नाहीत. समोरच्याने त्या डॉक्युमेंटची आधीची आवृत्ती आणि ही बाजूबाजूला उघडून बदल जाणून घ्यावेत अशी अपेक्षा ठेवतात.

कॉफी म्हणजे कॉफिन नसलेली कॉफी म्हणजे डीकॅफ >>>
ख्रिस्ती लोकांची शवपेटिका! >>>> Happy Happy यातील उद्गारचिन्हामुळे मी हे वाक्य आपोआप "ऐकले" Happy

गजानन - टोटली Happy

तसाच आणखी एक प्रकार - भला मोठा स्प्रेडशीट एबी११५ किंवा अशाच कोणत्यातरी लांबवरच्या सेलवर थेट उघडेल असा सेव्ह करून पाठवणारे. मग आपण स्क्रोल करून तो जागेवर आणायचा आणि त्यानंतर त्यात नक्की कोठे व काय वाचायचे आहे ते शोधायचे. किंवा फिल्टर्स किंवा काय काय लावून आपल्याला पाठवतात. आपण उघडला की दोनच रो दिसतात आणि आपल्याला जे बघायचे आहे त्याच्याशी त्यांचा काही संबंध नसतो. मग रील्स मधे पायात तारा अडकलेल्या पक्ष्याला मोकळे करतात तसे एकेक करून ते शोधा व मोकळे करा. असली मेहनत आपल्यालाच घ्यायला लागते.

मग रील्स मधे पायात तारा अडकलेल्या पक्ष्याला मोकळे करतात तसे एकेक करून ते शोधा व मोकळे करा. <<< अमोल, अगदी.

दुसरे -
कॉलमध्ये अजिबात सांधा न देता आपलीच बडबड सुरू करायची. बाकीचे त्यातल्या त्यात मुरवत दाखवत संपायची वाट बघत गप्प बसतात. आणि एकदाचे ते बोलणे संपले आहे असे खात्री करून आपला मुद्दा बोलायला सुरुवात करावी तर मध्येच पुन्हा कर्णा फाटल्यागत दुसर्‍याचा मुद्दा संपायच्या आत आपला पट्टा सुरू करायचा. अशा मानवांना संत तुकारामांच्या सडेतोडपणाने उत्तर दिल्याखेरीज पर्याय नसतो.

स्प्रेडचं अजून एक - मागचा पुढचा विचार न करता स्प्रेडमध्ये आपल्या लोकल पाथवरचे रेफरंस घालून ते पाठवणे. समोरच्याने ते उघडताक्षणीच त्याचे ‘मॅनेज वर्कबुक लिन्क्स’ च्या अगत्याने स्वागत झाले पाहिजे.

गर्दीच्या वाहत्या रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर बागेत फिरायला आल्यासारखे रमतगमत फिरणाऱ्या लोकांचा मला राग येतो.

छोट्या दुकानात, सुपरस्टोअर्सच्या छोट्या गल्ल्यांमध्ये विठ्ठल पोजमध्ये म्हणजे कंबरेवर हात त ठेवून उभे राहणाऱ्या लोकांचे काय करावे कळत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना यांचे कोपर लागत राहते. पण हे लोक हात खाली घेत नाहीत.

एक्सेस न देताच गुगल स्प्रेडशिट ची लिंक शेअर करणे. मग आपल्यालाच एक्सेस ची भीक मागावी लागते.

कॉफिन म्हणजे...ख्रिस्ती लोकांची शवपेटिका >> Lol Lol

हे मी शोले मधल्या संवादाच्या चालीत वाचले Proud ( भाई ये सुसाड क्या होता है)

Pages