पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती बाई तरी भोळी होती, पण शिकले सवरलेले लोक मूर्खपणा करताना बघतो (अगदी इथे मायबोलीवरपण) तेव्हा कीव येते.

खरे पहाता, व्हॉटसॅपचे स्टेटस म्हटले तर खाजगी म्हटले तर सार्वजनिक असते. पण स्वतःच्या मुलीचे किती गोडवे गायचे त्याला काही लिमिट! ती गेली सासरी. तुला तुझं आयुष्य आहे की नाही? बाबा/महाराज नाही तर मुलगी बाकी काय आवडीनिवडी असतील ते देवालाच माहीत.

इतरांचे स्टेटस न पाहण्याचा चॉइस असतो. कुणाच्या स्टेटसेसचा त्रास होत असेल तर त्याचं स्टेटस हाइड करायचा पर्याय असतो.
--
मागच्या सूर्यग्रहणाच्या वेळी मी कालनिर्णयात मागच्या पानावर ग्रहणाचे वेध , काय करू नये इ. माहितीचा फोटो काढून स्टेटसला लावला होता आणि खाली सूर्यग्रहणाच्या शुभेच्छा असं लिहिलं होतं. यातला उपरोध किती लोकांना कळला असेल ?

माझेमन आत्याबद्दल वाचून फार हळहळ वाटली. निदान ती भोळी भाबडी तरी होती, अशिक्षित होती.
पण उपाशी बोका म्हणतात तसं शिकले सवरलेले लोक सुद्धा (शिक्षण फक्त पैसे मिळवण्यासाठी) असल्या बुवांच्या आहारी जातात.
आपण असले बाबा बुवा भोंदू असतात असं म्हटलं की फॉलोवर्स लगेच म्हणतात तुला काय कळते? तिथे मोठे मोठे लोक येतात. राजकीय मंडळी सुद्धा येतात. ही शरमेची बाब आहे खरंतर. पण ही लोक गर्वा ने सांगतात. कठीण आहे आपल्या देशाचे.

कोविड काळात vaccination ची जबरदस्त चर्चा होती. मी माझ्या कलीगला विचारले तुम्ही कधी घेणार? तर तो म्हटला आम्ही घेणार नाहीये. आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला सांगितलं आहे की इथे आलेल्या (दर्शनाला) कोणालाही कोविड होणार नाही. मी बंद पडायची बाकी होते.
काही दिवसांनी पहिल्यांदा धाकट्या भावाला, मग आईला, मग स्वत:ला मग वडील असे सगळे बाधित झाले. फक्त बहिणीला झाला नाही. आई तर खूप सीरियस होती, त्यातून होमिओपॅथी चा अट्टहास . पहिले काही दिवस घरीच होमिओपॅथी चे उपचार सुरू होते ते पण ऑनलाइन. शेवटी त्या डॉक्टर ने हात टेकले तोपर्यंत आई सीरियस झाली होती, तोल जात होता, electrolytes कमी झाले होते, सात दिवस सतत उलट्या सुरू होत्या.

नशिबाने रुबिला अॅडमिशन मिळाली, आणि अडीच लाख घालून बाई परत आली. तरी परत आल्यावर सफरीचे कापड बाबाला आणि homeopathy डॉक्टरला दिले. रुबि हॉल ला ठेंगा. (कारण त्यांनी अडीच लाख बिल केले म्हणे)

>> सर्वायवल ऑफ द फिटेस्ट वर माझा जबरदस्त विश्वास आहे. त्याने मूर्ख लोक यमसदनी लवकर जातात.
माझाही होता, पण बहुतेक जाणार्‍या मुर्खांपेक्षा नवीन जन्माला येणार्‍या मुर्खांचा रेट जास्त आहे बहुतेक.

>>नवीन जन्माला येणार्‍या मुर्खांचा रेट जास्त आहे बहुतेक >> Lol नव मूर्खांंना पण सर्वायवल लॉ अ‍ॅप्लिकेबल आहे की! Lol

इतरांचे स्टेटस न पाहण्याचा चॉइस असतो. कुणाच्या स्टेटसेसचा त्रास होत असेल तर त्याचं स्टेटस हाइड करायचा पर्याय असतो.>>> या संदर्भात स्टेटस ब्लॉक करण्याच्या फिचर साठी मी मेटाच्या फीडबॅकमार्फत रिक्वेस्ट टाकलेली....

माझाही होता, पण बहुतेक जाणार्‍या मुर्खांपेक्षा नवीन जन्माला येणार्‍या मुर्खांचा रेट जास्त आहे बहुतेक.>>>>बरोबर, आणि अशा इकोसिस्टिम मध्ये जे अल्पसंख्यांक विरोधात आहेत, ऑड बॉल आहेत, अशांचं नॅच्युरल सिलेक्शनच्या सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या तत्वाने लिंचिंग होतं. त्यामुळे नेहमी आपण कुठे काय ज्ञान देतो आहोत याचे भान ठेवून बोलणे उत्तम. Happy

माझाही होता, पण बहुतेक जाणार्‍या मुर्खांपेक्षा नवीन जन्माला येणार्‍या मुर्खांचा रेट जास्त आहे बहुतेक. >>> Rofl

म्हणूनच मी इथे लिहिलं. लिंचिंग नाही होणार, पण त्यांच्याशी संबंधांत या कारणाने काही बिघाड यावा असं वाटत नाही.

"शुभ सोमवार" , "मंगलमय सर्वपित्री अमावस्येच्या शुभेच्छा !" ई स्टेटस ठेवणार्‍यांचे स्टेटस निदान हाईड तरी करू शकतो, पण रोज न चुकता गूड मॉर्निंग / गूड नाईट चे डी एम पाठवणार्‍यांना कय करावे ?

नात्यातल्या एका मुलीचं लग्न झालं. कालच तिच्या स्टेटसमधे ' celebrating 11 days of being Mr. & Mrs. अमुक अमुक' असं वाचलं.
आज स्टेटसला रामनवमीच्या शुभेच्छा. त्यात तिचा बहुतेक रामनवमी आणि दासनवमी एकच असा घोटाळा झाला. त्यामुळे दासनवमीच्याही शुभेच्छा. आणि श्लोक कुठला निवडला, तर शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे!

आमच्या ओलखीचे एक दादा आहेत . त्यान्च्या राहत्या एरिआत ते फारच सोशल आहेत , खूप ओळखी , परोपकार , कोणाच्याही हाकेला धावून जाणे ई . ई . रोज वॉ स्टेटस कोणाचा ना कोणाचा वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस , पुण्यतिथी , परिक्शेचे रिजल्ट , कोणी बाहेर गावी शिकायला चाललं आहे त्याला शुभेच्छा असं असतं . आपण रोज वर्तमान पत्रात आजचे वाढदिवस हे सदर बघतो , तस आम्ही ते स्टेटस बघतो . Happy

लोकांची श्रद्धास्थानं , कर्मकांडांवरचा विश्वास आणि आग्रह हा स्वतंत्र चर्चेचा विषव होईल . मला सारखे ते दूसर्याच्या अनुभवच्या पोस्टी किन्वा व्हिडिओस दाखवणारे ही ईरिटेट करतात .

स्वत:च्या वाढदिवसाला, ज्यांनी ज्यांनी आपला फोटो आणि शुभेच्छा देणारे स्टेट्स ठेवले आहे, त्याचे स्क्रीन शॉट काढून आपल्या स्टेट्स ला ठेवणारे सेलिब्रिटी ???

वावे Lol

फार्स विथ द डिफरन्स मॉब लिंचिंगबद्दल म्हणाले ते खोटं नाही.

पुण्यात एका रस्त्यावर अक्कलकोट स्वामींच्या प्रकटदिनाचा कार्यक्रम होता. (हा गुढीपाडव्याच्या दुसर्‍या दिवशी असतो). त्या भागात राहणार्‍यांना वाहन घेऊन जायला अडवणूक. एका बाईंनी तिथे वाद घातला. मग फेसबुकवर पोस्ट लिहिली.
त्यानंतर पुढे काय झालं ते या फेसबुक पोस्टमध्ये वाचा.

मूळ फेसबुक पोस्ट लिहिणार्‍या सर्टिफाइड वैचारिक अध्यात्मिक इ. अल्पसंख्य, अर्बन नक्षल ठरू शकतील. बहुतेक मायबोलीवर होत्या. ईशान्येकडच्या राज्यांत बॅकपॅक घेऊन प्रवास केलेल्या याच असाव्यात असं वाटतं.

बापरे, भरत! या थराला गेल्या आहेत अंधश्रद्धा. फॅनाटिक झालेत लोक. भारताबाहेर असल्यामुळे तीव्रता कळत नाही बरेचदा. सुप्रिया?!

वावे Lol
प्रविणपा Lol
मी कुणाचेही स्टॅटस बघत नाही, स्वतःचेही कधीही लावले नाही. मला बोअर वाटतो तो प्रकार.

मी माझ्या स्तोत्रांच्या चारोळ्या टाकत बसते स्टेटस वर. पहील्या स्टेटसला ५ लोकं असतील तर आठव्या पर्यंत गठाळून १ उरलेले असते आणि ती इन्वेरिबली असते अ‍ॅमी Happy बिचारी सगळं वाचते माझं.
.
माझ्या मैत्रीणीही म्हणत असती. या बाईला स्तोत्रांपलिकडे जीवन आहे की नाही Wink

सामो मी पण बघते स्टेटस तुझं..
Proud
कधी कधी शेवटच्या slide पर्यंत जात नाही म्हणून रागावू नको हा...
तू लावलेली स्तोत्र शोधून वाचली जातात

Pages