लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
कुणीच असे म्हणत नाही की...
कुणीच असे म्हणत नाही की... मला तर आवडते बुवा..चमच्याने खाताना प्लेट चा आवाज करणे, ..अथवा मला काहीच प्रॉब्लेम नाही कुणी मला पगार विचारला तर......>>> हा धागा डोक्यात जाणाऱ्या गोष्टीं नमूद करण्यासाठी आहे त्यामुळे इतरांनी नोदवलेल्या पण माझ्या डोक्यात न जाणाऱ्या गोष्टीं बद्दल आपले मत नोदवण्याची मला व्यक्तिशः निकड वाटली नाही.
म्हणजे आपण....आपल्या आयुष्याचा कितीतरी मोठा भाग या अशा नापसंतीत च घालवत आहोत!>>> किमान मी व्यक्त केलेल्या पेटपिव्ह या दररोजच्या रुटीनचा भाग नसल्याने, जरी वरवर पहाता तुम्ही केलेले हे विधान अपीलींग वाटले ( या धाग्यावर असलेल्या पेटपिव्हज च्या ॲक्यूमलेशनमूळे) तरी वास्तवात ते तसं नाही.
“फलटण चली बोलो ऐ जाती, ऐ जाती
“फलटण चली बोलो ऐ जाती, ऐ जाती रे” -
संदर्भ लागायला ज….रा वेळ लागला. 
आधीचे प्रतिसाद वाचले बरेचसे.
आधीचे प्रतिसाद वाचले बरेचसे.
काहींच्या पेट पीव्हजशी सहमत नाही, पण निरीक्षणांची गंमत वाटली.
प्रतिसाद दिल्याबरोबर थँक्स म्हणणे ही पेट पीव्ह नाही, पण अशा एखाद्या सवयीला नावं ठेवली जाऊ शकतात असं वाटलं तर लोक थँक्स सुद्धा म्हणायला बिचकतील.
एक निरीक्षण (पेट पीव्ह नाही) - एखाद्या जुन्या चार पाच वर्षांपूर्वीच्या (धागाकर्त्या व्यतिरिक्त) काही विशिष्ट आयडींनी प्रतिसाद दिला कि तो धागा वर येतो. ताबडतोब धागा वर काढलेल्या आयडीला वगळून मागच्या चार पाच आयडींना उद्देशून प्रतिसाद देणारे काही जण असतात. हे एखाद दुसर्या धाग्यावर आणि एखादे वेळेस होत नाही. काय काय प्रॉब्लेम्स असतात लोकांचे !
कुणीच असे म्हणत नाही की...
कुणीच असे म्हणत नाही की... मला तर आवडते बुवा..चमच्याने खाताना प्लेट चा आवाज करणे, ..अथवा मला काहीच प्रॉब्लेम नाही कुणी मला पगार विचारला तर......>>>>>> छल्ला , मला माझी ताईच आठवली या वरून. ती असं मुद्दाम करायची उदा. कोणी मचमच आवाज करुन खातय, तर आपण म्हणू नं कि मला नाही आवडत असं कोणी आवाज करत खाल्लेलं! तर ती सिरीयस चेहरा करून म्हणायची, हो? मला तर बाई फाssssर आवडतं
हसत बसायची ,जाम राग यायचा तिचा . खूप चिडवायची ती अशा टाईप.
एक निरीक्षण (पेट पीव्ह नाही)
एक निरीक्षण (पेट पीव्ह नाही) - एखाद्या पाच वर्षांपूर्वीच्या धाग्यावर का असेना, काही ठराविक लोकांनी प्रतिसाद दिला कि तो धागा वर येतो.>>>> आपला धागा सतत लोकांसमोर पहिल्या पानावर दिसावा यासाठी आपल्याच धाग्यावर एखादी नवीन माहिती वा शंका आपणच द्यायची. मग समोर जे दिसते ते हाताळले जाते या रितीने मग कुणीतरी वाचक त्यावर प्रतिसाद देतो. मग पुन्हा त्यावर प्रति प्र्तिसाद अशी साखळी परत एकदा तयार होते. काही धागाकर्ते ही ट्रिक वापरुन माझच घोड अन जाउ दे पुढं! ( यात मी ही काही प्रमाणात आलोच) करुन सतत डॅश बोर्डवर झळकत राहतात. त्यामुळे कधी कधी उत्तम आशय असलेले धागे पडद्याआड जातात. उत्खनन करुन आशयसंपन्न धागे वरती येण्यासाठी उपदव्याप करावा लागतो.
धनुडी:-)
धनुडी,
मलाही समज की तुझी ताई!! नो प्रॉब्लेम.
तंबाखू
तंबाखू
टू मच.
पगार
>>>
विकु
ते पगार वाला प्रश्न मला ही विचारला गेलाय..पोटपुरते हेच उत्तर देते तरी भागत नाही. माझ्या हेल्पर चा पण पगार विचारून झालाय म्हणजे त्या पटीत पगार कॅल्कुलेट करायला
तेकाचं पेट पिव्ह आलं की ते
ते एकाचं पेट पिव्ह आलं की ते बरेच जणांचं पेट पिव्ह होऊन जातं, नॉट रियली.
मला जेवताना आग्रह करणारे डोक्यात जात नाही.. उलट माशाची २ पैकी १ च तुकडी मला वाढणारी & माझं ताट रिकामं होऊन मी वाट बघत बसले तरी दुसरी तुकडी न वाढणारी चा राग येतो
पगार विचारलेला लोकांना आवडत
पगार विचारलेला लोकांना आवडत नाही, लोकं काकू करतात सांगायला. पण पेन्शन चा इतके रुपये इतके पैसे असा आकडा मात्र चारचौघात अगदी मोठ्याने सांगतात लोकं हे माझं निरीक्षण आहे. तो पेन्शनर सिनिअर असेल वयाने तर " अहो एवढा पगार पण घेतला नव्हता कधी " हे ही अभिमानाने सांगतात आकडा सांगितला की...
मला जेवताना आग्रह करणारे
मला जेवताना आग्रह करणारे डोक्यात जात नाही.. उलट माशाची २ पैकी १ च तुकडी मला वाढणारी & माझं ताट रिकामं होऊन मी वाट बघत बसले तरी दुसरी तुकडी न वाढणारी चा राग येतो Lol>>> टू बी फ्रॅंक आशु आवडणाऱ्या गोष्टींचा आग्रहच कुणी करत नाही मुळी....जेवणावर आग्रह करणं सोडा मला ज्यांनी ज्यांनी बाहेर मासे खाताना पहिल आहे ते मला मास्यांच्या जेवणाचं आमंत्रणच द्यायला धजावत नाही मुळात मला कधी
पगार विचारलेला लोकांना आवडत
पगार विचारलेला लोकांना आवडत नाही, लोकं काकू करतात सांगायला. पण पेन्शन चा इतके रुपये इतके पैसे असा आकडा मात्र चारचौघात अगदी मोठ्याने सांगतात लोकं हे माझं निरीक्षण आहे. तो पेन्शनर सिनिअर असेल वयाने तर " अहो एवढा पगार पण घेतला नव्हता कधी " हे ही अभिमानाने सांगतो आकडा सांगितला की...>>> +१
>>>>>>करुन सतत डॅश बोर्डवर
>>>>>>करुन सतत डॅश बोर्डवर झळकत राहतात.
हे तुमचं प्रोजेक्शनही असू शकतं. हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आपण उत्खननही करत असतो नेहमी मग सुसंगत शंका विचारण्याकरता, स्वतःचा एखादा धागा वर काढण्यात लाज मानू नये हे दुसरं.
>>>>पण पेन्शन चा इतके रुपये
>>>>पण पेन्शन चा इतके रुपये इतके पैसे असा आकडा मात्र चारचौघात अगदी मोठ्याने सांगतात
चांगली गोष्ट आहे. असेच पाहीजे.
सामो, रानभुलीच्या निरिक्षणाला
सामो, रानभुलीच्या निरिक्षणाला पूरक असे माझे निरिक्षण मांडले. ते गैर ही नाही व पेट पिव्ह देखील नाही.
नक्कीच प्रघा. मला कळले ते.
नक्कीच प्रघा. मला कळले ते.
खूप दिवसांनी आले इथे.
खूप दिवसांनी आले इथे.
आग्रहावरून आई आठवली, ती खूप आग्रह करायची, आम्ही म्हणायचो तुझा बडोद्याचा आग्रह ठेव बाजूला. नातेवाईक सरळ सांगायचे तुझा स्वयंपाक आवडतो म्हणून जेवायला येतो पण तू आग्रह नको करुस, ती करतच रहायची. मी डोंबिवलीत माहेरच्या जवळ रहायला आल्यावर, तिथे जेवून आलेले नातेवाईक, अंजू पाणी दे फक्त, बाकी काही करू नकोस, तुझ्या आईकडून जेवून आलोय म्हणायचे. मग चहा, कॉफी, सरबत असं काही थोड्या वेळाने करायचे, फळं वगैरे कापायचे.
बहिणीला आणि मला अजिबात आग्रह करता येत नाही, आम्ही आधीच सांगतो पोटभर जेवा, लाजू नका, हवं ते मागून घ्या, आईसारखा आग्रह करता येत नाही.
प्रघा सर, माझ्या प्रतिसादात
प्रघा सर, माझ्या प्रतिसादात मी बदल केला. कारण त्याला अनुसरून तुमचा प्रतिसाद आल्याने मलाही तसेच म्हणायचे होते असा समज होईल असं वाटलं. तसं मी माझ्या प्रतिसादात म्हटलेलं नव्हतं तरीही गैरसमज होऊ नये म्हणून जास्त स्पष्ट केलं.
अनेकदा एखादी गोष्ट ऐकली, वाचनात आली तर त्या वर आधीच धागा आहे का हे शोधून मायबोलीकर तिथे पोस्ट करतात. उगीच नवीन धागा काढत नाहीत. अनेक जण नेमक्या धाग्यावर लिहीतात. त्यासाठी सर्च देत असतीलच. कुणी नवीन धागा काढला कि कुणी न कुणी तिथे जुन्या धाग्याची लिंक देत असत. मायबोली डेटाबेस प्रमाणे आहे असे वेबमास्टर यांचे खुलासे पण वाचले आहेत. आता कुणीच त्याबाबत आग्रही नाहीत.
इडली सांबार चटणी खाताना ते
इडली सांबार चटणी खाताना ते तीनही घटक एकत्र करून भाता सारखे एकत्र कालवून खाणारे लोक.
मला पण मिरच्या कढीपत्ता वगैरे पदार्थ ताटात काढणारे लोक आवडत नाहीत. मी ताटातल्या मिरच्या कढीपत्ता खाऊन टाकते. शे. शेंगा अस्तील तर स्वतःच के. टोपलीत टाकते.
धागा पेट पिव्ह ते काय खटकतं
धागा पेट पिव्ह ते काय खटकतं किंवा कशाचं आश्चर्य वाटतं, काय आवडत नाही यावर केव्हाच गेला आहे.
त्यात कशाचं/कोणाचं आश्चर्य वाटतं याबद्दल:
सोशल मीडियावर/इतरत्र वेगळे विचार, त्यावरील चर्चा वाचली की जणु आपल्या प्रत्यक्ष जीवनात आपल्या घरात येऊन आपल्याला मनाविरुद्ध आपल्यावर जबरदस्ती होत आहे असा कांगावा करणारे लोक.
म्हणजे कुठली तरी चर्चा /विचार वाचुन "मला तर बाई/बुवा आजकाल अमुक करायचीच भीती वाटतेय."
मला पण मिरच्या कढीपत्ता वगैरे
मला पण मिरच्या कढीपत्ता वगैरे पदार्थ ताटात काढणारे लोक >>>> ताटाच्या बाहेर काढणारे…. तर अजूनच.
मला जेवताना आग्रह करणारे
मला जेवताना आग्रह करणारे डोक्यात जात नाही.. उलट माशाची २ पैकी १ च तुकडी मला वाढणारी & माझं ताट रिकामं होऊन मी वाट बघत बसले तरी दुसरी तुकडी न वाढणारी चा राग येतो >>>
ते दुसरे टोक आहे
- ताट रिकामं दिसल्यावरही न विचारणारे
- एक दोनदा विचारून तरीही नको असेल तर पुढे आग्रह न करणारे
- कितीही नको असेल तरी दामटून "घ्या हो काही होत नाही" करत वाढत राहणारे
यातल्या फक्त तिसर्या पॅटर्न बद्दल इथे पेट पीव्ह आहे
पहिल्याचा मला कधीच अनुभव नाही (पुण्यात सुद्धा
) पण तो इतका सार्वत्रिक असता तर तो ही पेट पीव्ह झालाच असता.
पंगतीत श्रीखंड वाढायला कोणी
पंगतीत श्रीखंड वाढायला कोणी आलं आणि आपल्या पुढच्या सगळ्यांनी वाटीवर हात ठेवला आणि ती व्यक्ती पंगतीच्या टोकापासून आपल्या पर्यंत एकदाही रिकामा न झालेला असा भरलेला डाव घेऊन आली की मला नाही म्हणणं फार जीवावर येतं. नको तिथे हिरीरीने स्पष्ट आणि प्रामाणिक विचार मांडणारं माझं मन इथे मात्र कसनुसं हसून थोडं वाढा म्हणतं.
मोकळ्या हाती जाऊ नये, मोकळ्या हाती कोणाला पाठवू नये च्या विपरीत भरलेल्या हाती कसं पुढे पाठवू अवस्था होते माझी.
तर पंगतीत आपल्या पुढच्या सगळ्यांनी वाढणाऱ्या व्यक्तीला नाही म्हणणे हा पेट पीव्ह होत असेल तर बघा जरा!
किती तो वाढप्याच्या मनाचा
किती तो वाढप्याच्या मनाचा विचार
याला पेट पीव्ह कसं बरं म्हणता येईल…
पोट पिऊ म्हणा.
पोट पिऊ म्हणा.
फोन वर किंवा आपापसात मोठ्या
फोन वर किंवा आपापसात मोठ्या मोठ्याने बोलणार्या स्त्रिया वा तोंडाचा पट्टा चालु करणार्या स्त्रिया एका विशिष्ट मर्यादे नंतर डोक्यात जातात. भले तुमचा त्यांच्याशी काही संबंध नसो.
नको तिथे हिरीरीने स्पष्ट आणि
नको तिथे हिरीरीने स्पष्ट आणि प्रामाणिक विचार मांडणारं माझं मन इथे मात्र कसनुसं हसून थोडं वाढा म्हणतं.
हे मी समजू शकते स्वतः वरून.
>>>>>
समोरून कुणी श्रीखंड नेत असेल तर मायबोलीवर राहतो तसं ठामबिम राहायची गरजच नाही. येथे फक्त फोटो दिसतात, मिळत काही नाही. येथे राहा ठामबिम.
आपण येथे ज्याला आग्रह म्हणतोय, तेथे खरंतर "जबरदस्ती" शब्द जास्त योग्य आहे. आग्रह तर सगळेच करतो आपण. पाहुण्यांना मोकळेपणाने खावं वाटावं इतकं मोटिव्हेट करणं म्हणजे आग्रह, "फोर्सफीड" करणं म्हणजे जबरदस्ती. आमच्याकडे आग्रह नाही केला तर उपाशी बसणारे लोक पाहुणे म्हणून येतात, नंतर म्हणतात तुमच्या मुलीने विचारलेच नाही. मी एकदा खाऊन झाल्यावर परत एकदा विचारलेले असते. "फक्त" एकदाच. याने तुम्ही मराठवाड्यातली (पुणेरी) ब्लॅकशीप होता.
मलाही खाऊ घालायचं- एवढा मोठा स्वयंपाक करायचं बाळकडू मिळालेलं आहे. माझ्या हातून मोजून, हातचं राखून होतच नाही - प्रयत्न केला होता. तुम्ही माझ्या घरी आलात तर फोर्स नाही पण आग्रह करवून- खूप खाऊ घालून, खायला वेळ नसेल तर किमान पिशवीभर खाऊ सोबत देऊनच पाठवेन बहुतेक. तेच "कल्चर" होऊन बसले आहे. मुद्दाम/ दिखावा म्हणून करत नाही पण तेच बघत लहानाचं मोठं झाल्याने तेवढं केल्याशिवाय समाधानच वाटत नाही.
आमच्याकडे आग्रह नाही केला तर
आमच्याकडे आग्रह नाही केला तर उपाशी बसणारे लोक पाहुणे म्हणून येतात, नंतर म्हणतात तुमच्या मुलीने विचारलेच नाही >>> हे मी पुण्यामुंबईबाहेर खूप पाहिले आहे. म्हणूनच ते वरती लिहीले होते की त्या लोकांना विचारले पाहिजे की तुम्हाला मागून घेता येत नाही का. आणि हे वरचे वाचून "तुम्हाला एकदा विचारलेले पुरे नाही का" हे सुद्धा त्यात टाकायला पाहिजे.
लग्नात लोकांच्या पंजाच्या मागच्या बाजूला अत्तराचा वास येत असेल. (अत्तर, गुलाबपाणी वगैरे नंतर). अमितच्या हाताला श्रीखंडाचा
पद्मावत मधली राणी त्यावरून आजूबाजूला अमित आहे हे ओळखेल.
आता आग्रह नको म्हणणाऱ्यांना
लग्नात लोकांच्या पंजाच्या
लग्नात लोकांच्या पंजाच्या मागच्या बाजूला अत्तराचा वास येत असेल. (अत्तर, गुलाबपाणी वगैरे नंतर). अमितच्या हाताला श्रीखंडाचा Happy पद्मावत मधली राणी त्यावरून आजूबाजूला अमित आहे हे ओळखेल.
तरीही आग्रहाबद्दल पेट पीव्ह लिहिली म्हणून 'पंगतनिकाला'ची शिक्षा दिली जाईल का?
<<<<<<
अमितच्या उदाहरणावरून पंगतीत
अमितच्या उदाहरणावरून पंगतीत भराभर पिठलं वाढत येणारे आणि त्यात नको म्हणणाऱ्याच्या ताटात वाढणारे आणि पुढच्याचं ताट वगळणारे आणि त्यामुळे एकाच दगडात दोन जणांचे पेट पीव्ह होणारे वाढपी आठवले.
Pages