लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
विकु
विकु
माझे अनुभव -
काय म्हणतेय अमेरिका विचारणं, मग इथे करमत नसेल ना, काय म्हणतोय ट्रंप/ बुश/ ओबामा/ तात्कालिक राष्ट्राध्यक्ष. जसं काही मला व्हाईट हाऊस मधून रोज सगळे अपडेट्स दिल्याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला जेवण जात नाही. त्यांच्यासाठी मी अस्तित्वातही नाही, मग मी भारतात महिनाभरासाठी जाऊन कशाला हुरहूर लावून घेऊ. शिवाय "तुमच्या देशात" म्हणणं माझा देश आधी भारतच राहणार ना मरेपर्यंत, मग "आमचा देश तुमचा देश" का ? जेथे जन्मलो तिथली नाळ कधीही तुटत नाही, परकं का करायचं..!
क्युबन सिगार काय सुगंधी असतात
क्युबन सिगार काय सुगंधी असतात. म्हणजे आमच्याकडे कोणाला सवय नाही. पण रस्त्यामध्ये कोणी व्यक्ती जवळून गेली तर वास आलेला आहे.
अमेरिकेत क्युबन सिगारवर बंदी
अमेरिकेत क्युबन सिगारवर बंदी आहे हो! तात्यांच्या माणसांनी पकडलं तर भारताऐवजी एल साल्वाडोरला पोचतील ते खडी फोडायला
सगळेच
सगळेच
क्यूबन सिगार आणि अंडरवर्ल्ड
अंडरवर्ल्ड माफिया peace offering म्हणून एकमेकांना क्यूबन सिगार देतात त्याचं मला सुप्त आकर्षण आहे. मी मेटलच्या डबीतले बबलगम ऑफर करताना जीवाला तसेच वाटवून घेते.
>>>>>>>कधीही माझ्याहातून मार
>>>>>>>कधीही माझ्याहातून मार खातील असे ग्रहमान आहे.
हाहाहा हिंसक विचार मनात येतात
माझी ट्रिक
माझी ट्रिक
अमेरिकेत पगार किती मिळतो ?
मिळतो पोटापुरता.
पण तरीही...
बरा मिळतो.
नक्की किती.
फार कट होतात.
तरीही सगळे कट होऊन किती हातात येतात ?
दर महा तीस डॉलर्स !
'असे कसे?
'अहो बायको एक तारखेला पगार काढून घेते व रोज कॉफीला एक डोलर देते पॉकेट मनी ! '
हाहाहा विकु
हाहाहा विकु
मला आग्रह केलेला आवडत नाही.
मला आग्रह केलेला आवडत नाही. तसच पानात टाकलेलंही आवडत नाही. खासकरून कोणाच्याही घरी जेवायला गेल्यावर. न आवडणारा पदार्थ असेल तर सुरुवात करायच्या आधीच काढून ठेवायचा किंवा सेल्फर्व्व्ह असेल तर पानात घ्यायचाच नाही. अन्न वाया घालवलेलं अजिबात आवडत नाही. काही काही पालक मुलांच्या ताटात एवढ वाढून ठेवतात न!
विकु
विकु
बायको एक तारखेला पगार काढून
बायको एक तारखेला पगार काढून घेते व रोज कॉफीला एक डोलर देते पॉकेट मनी >>
तंबाखू
तंबाखू
पगार
>>>
विकु
आग्रह अजिबात आवडत नाही. पूर्वी नको असलेला पदार्थ पटकन संपवून पळून जावं असा विचार करून पस्तावले आहे. कारण तो पदार्थ आवडला असं समजून अजून पानात येतो. असल्या गोष्टी मुळे एका मैत्रिणीच्या लग्नात दोन वाट्या भरून श्रीखंड गिळावं लागलं होतं
आता असा नावडता पदार्थ असेल तर तो पानावरून उठेपर्यंत अजिबात खात नाही आणि जस्ट उठायच्या आधी फटाफट संपवून पळते 
काय म्हणतेय अमेरिका
तुमच्या देशात
>>> याबद्दल माझं मोठ्ठं पेट पीव्ह. अस्मिताला मम.
काय म्हणतोय ट्रंप/ बुश/ ओबामा
काय म्हणतोय ट्रंप/ बुश/ ओबामा/ तात्कालिक राष्ट्राध्यक्ष
>>>
पुर्वी इन्फोसिस मध्ये काम करणार्यांना नुकतेच पेन्शनर झालेले ज्येष्ठ्य नागरीक विचारत तसे "मग काय म्हणतात तुमचे नारायण मुर्ती?". जसं काही नारायण आमच्या बरोबर चहा प्यायला येतात रोज कँटीनमध्ये.
मस्त पोस्ट्स सगळ्याच.
मस्त पोस्ट्स सगळ्याच.
शेवग्याच्या चोखून उरलेल्या शेंगा, आंब्याची सालं कोयी अश्या गोष्टी कोणी पानात टाकून उठला तर मला ते उचलून बिन मध्ये टाकायला अजिबात आवडत नाही. घरच्यांना स्वतःच स्वतः उचलून टाकायची सवय लावली आहे पण पाहुणे आले तर ते अनेक वेळा तसेच उठतात. म्हणून मी कोणी आलं तर किती ही आवडत असली तरी शेवग्याच्या शेंगांची आमटी करतच नाही.
>>कोणी आलं तर किती ही आवडत
>>कोणी आलं तर किती ही आवडत असली तरी शेवग्याच्या शेंगांची आमटी करतच नाही. >>

मला क्षणभर वाटलं आता पानात टाकायचं नाही तर कोयी आणि शेंगांची सालं पण खायला लावता का काय!
मग काय म्हणतात तुमचे नारायण
मग काय म्हणतात तुमचे नारायण मुर्ती? >>
समोशाची इथली पोस्ट कुमार सरांच्या धाग्यावर टाकली.
वाचा लोकहो.
आग्रहाबद्दलच्या सर्व
आग्रहाबद्दलच्या सर्व पोस्टींशी टोटली सहमत. मला आग्रह करायलाही आवडत नाही आणि करवून घ्यायलाही. सुवर्णमध्यच्या बाबतीत - मी एकदोनदा विचारतो - तसे सहसा विचारले जातेच. पण तरीही कोणाला नको असेल तर सोडून देतो.
अन्न वाया घालवण्याच्या बाबतीत अनिंद्यशीही टोटल सहमत. अन्न वाया जाउ नये म्हणून ते खाउन टाका या आग्रहाला वेळोवेळी मेलोड्रामॅटिक विरोध करून ही प्रथा बंद पाडली पाहिजे
काय म्हणतीय अमेरिका - बुश, ओबामा, ट्रम्प, बायडेन - याबद्द्लही सहमत.
विनाकारण सल्ला देणारे..
विनाकारण सल्ला देणारे..
Specially नवमाता
किंवा लहान मुलांची आई असेल तर जाम पिडतात
.
. हल्ली मी त्यांना comedy angle णे घेते.
अगं तुझं लक्ष नाही मुलगा पडेल.
.
मी : हो मला तो पडायला हवा आहे
ऑलिम्पिक मध्ये तशी स्पर्धा आहे ना तयारी सुरुये
असं (मनात )बोलते
कधी कधी प्रकट सुद्धा!!
कोयी आणि शेंगांची सालं पण
कोयी आणि शेंगांची सालं पण खायला लावता का काय >>>
शेंगांसाठी ममो टिळक मोड ऑन करत असतील
लहान मुलांच्या आईबद्दल एकदम
लहान मुलांच्या आईबद्दल एकदम सहमती.
विशेषतः टू व्हीलर वरून जात असतील तर शेजारून जाणार्या काकू मुलाला कसं धरलंय असा लूक देतात आणि सल्ला देतातच.
आग्रहाबद्दलच्या सर्व
आग्रहाबद्दलच्या सर्व पोस्टींशी टोटली सहमत. मला आग्रह करायलाही आवडत नाही आणि करवून घ्यायलाही.>> +१ माफफ खेळिमेळित एक दोन वेळेस 'घ्या ' म्हणणे ठिक आहे पण लोक खरच कधी कधी अतिच करतात.
काय म्हणतेय अमेरिका
तुमच्या देशात
>>> याबद्दल माझं मोठ्ठं पेट पीव्ह. अस्मिताला मम.
ट्र्म्प आल्यापासुन त्यात अजुन भर म्हणजे 'काय म्हणतो तुमचा ट्र्म्प?"
मध्यतरी ग्रिन कार्ड असलेल्या लोकाना परत पाठवल , इलिगली आलेया लोकाना बेड्ञा घालुन पाठवल म्हणून लोक मलाच जाब विचारत होते.
मी म्हटल बरय ना " अमेरिकेत इकडून तिकडुन घुसायला करोडोने खर्च आला परत भारतात यायला फुकट, तिकिटाचाही खर्च नाहि!"
काय म्हणतो तुमचा ट्र्म्प?">>>
काय म्हणतो तुमचा ट्र्म्प?">>> पुढच्या वेळी असं विचारल्यावर कुठल्यातरी अस्सल देशी, पण हा प्रश्न विचारणार्या व्यक्तीचा हातखंडा असलेल्या पदार्थाचं नाव घेऊन "मायबोलीवरच्या रेसिपीने करू की तुमच्या पद्धतीने?" असं विचारलंय म्हणून सांगायचं! नाहीतर "ट्रम्पच्या साडूच्या पुतण्याच्या कोणाचीसं लग्न ठरलंय, तुमच्या अमकीच्या तमक्याशी... स्थळाची माहिती घ्यायला फोन कधी करू असा निरोप आहे तुम्हाला..." असं सांगायचं.

अनिंद्य, आग्रहाबाबत अगदी
अनिंद्य, आग्रहाबाबत अगदी माझ्या मनातली स्पंदन. स्वत:च्या मनावर प्रचंड नियंत्रण मला ठेवावे लागते. मला आयबीएस चा त्रास होतो मला आग्रह करु नका असे सांगून ही त्यांच्या डोक्यातच ते शिरत नाही. पाहुणचार करताना मधुमेहीला साखर नसलेला चहा दिला जातो. गोड पदार्थ दिले जात नाहीत. हे प्रबोधन वा जनजागृतीने शक्य झाले. मी बाहेर कुणाकडे गेलो कि तिथे आदरातिथ्याचा भाग वा पारंपारिक चालीरितीचा भाग म्हणून चहा किंवा खायला न विचारताच आणुन ठेवले जाते. मला आयबीएस चा त्रास होतो म्हणुन मला काहीच नको आहे. आयबीएस म्हणजे काय/ असा प्रश्न जिथे येण्याची शक्यता आहे तिथे पोटाचा त्रास आहे हे मी सांगतो. हे सांगितल्यावर 'असं कसं? घ्या हो थोडे. थोड्याने काही होत नाही.' अस म्हणून आग्रह केला जातो. मला आयबीएस चा त्रास होतो हे महान पातकाची कबुली द्यावी असे सांगावे लागते. जस जसा आग्रह केला जातो तस तशी माझी चिडचिड वाढत जाते. प्रत्येक ठिकाणी जवळपास हेच घडत. त्यांची सांगण्याची वा प्रेमळ आग्रह करण्याची पहिलीच वेळ असेलही कदाचित पण माझी सांगायची ही शंभरावी वेळ असते. त्यामुळे सुट्या पैशाला वैतागलेल्या कंडक्टरसारखी अवस्था होते. सुरवातीच्या काळात हा अत्याचार सहन करण्याची क्षमता होती. पण अलिकडे तीही नाहीशी झाल्याने मला काही नकोच आहे हे मी स्पष्टपणे वा प्रसंगी थोडे उद्धटपणेही सांगतो. मग माझ्याकडे विक्षिप्त नजरेने पाहिले जाते. नातेवाईकांच्याकडे गेलो तरी परत परत तेच तेच सांगावे लागते म्हणून मी त्यांच्याकडे देखील जाणे टाळू लागलो आहे. माझ्यावर उपचार करणार्या डॉक्टरांना ही माझी व्यथा मी सांगत असतो. ते तरी काय उत्तर देणार यावर? मी अल्पसंख्यात मोडत असल्याने मला हा त्रास सहन करावा लागतो. खर तर आदरातिथ्यात काय हव काय नको असे विचारण्याची पद्धत असते. काही नको असणे हे मला स्वास्थकारक वाटत असेल तर मला ते स्वातंत्र्य हवे.
पदार्थ वाढतानाचा आग्रह हा
पदार्थ वाढतानाचा आग्रह हा प्रकार मलाही आताशा पटत नाही.
अर्थात माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांची आम्ही अगदी "हवे का?" यावर बोळवण करत नाही, त्यांचा अंदाज घेऊन माफक आग्रहवजा सुचवणी करतो. पण इतरांनी त्याहून अधिक आग्रह केलेला मला चालत नाही.
माझे एक परिचित किंवा मित्र म्हणा. त्यांच्या गावपातळीवरचे राजकारणी, कसल्यातरी जिल्हा समितीवर त्यांची निवड झाली होती त्याबद्धल त्यांचा सत्कार करण्यासाठी, भेटण्यासाठी त्यांच्या गावी एकदा गेलो. मी स्वतः चहा-कॉफी कधीही घेत नाही. ते मित्र मात्र चहाबहाद्दर! मला चहाचा आग्रह करत होते. मी साध्या शब्दांत सांगितलं, मी चहा घेत नाही. तरीही ते म्हणतात तुम्ही नाही घेणार तर आम्हीपण नाही घेणार! शेवटी तिथे उपस्थित आठ-दहा जणांपैकी मी आणि ते असे आम्ही दोघे सोडून इतर सर्वांनी चहा घेतला. मी मात्र पाणी पिऊन शेवटी बाहेर पडलो!
..स्पष्टपणे वा प्रसंगी थोडे
..स्पष्टपणे वा प्रसंगी थोडे उद्धटपणेही सांगतो….
याबद्दल मी Arrogant, mannerless, snooty, snob आणि यांची हिन्दी-मराठी-गुजराती-तेलुगु किंवा ज्या कुठल्या भाषा असतील त्यातली समांतर दूषणं कमावली आहेत. Now I simply don’t care and firmly state myself at once. Often not very politely.
ज़बरदस्ती नावडते पदार्थ वाढून वर फुकाची “अन्न वाया घालवू नये” “माजू नका” वगैरे प्रवचने देणाऱ्यांचे ऐकून घेण्याची क्षमता आता क्षीण झाली आहे. Can’t help
एखाद्या कडे गेल्यावर आपल्याला
एखाद्या कडे गेल्यावर आपल्याला आग्रह होणार हे माहित असल्याने मी मनातल्या मनात येणार्या प्रसंगाची रंगीत तालीम करतो. प्रथम मी लाजत किंवा संकोचत नाही मला आग्रह मानवत नाही. मला माहित आहे तुम्ही प्रेमापोटी आग्रह करताये पण माझ्या प्रकृतीला ते मानवत नाही. तुमच्या मुळे आलेल्या पाहुण्याला त्रास व्हावा असे आपल्याला वाटते का? असे संहिता लेखन मनात करुन ठेवतो.
कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन बिघडू द्यायचे नाही असे ठरवतो. एकतर माणूस घाणा/ शिष्ट अशी काहीतरी माझी प्रतिमा नातेवाईकांमधे आहे. त्यात अजून भर पडायला नको. प्रत्यक्षात कल्पनेपेक्षा वेगळे व त्रासदायक घडले तर 1 ते 10 अंक म्हणायची तयारी ठेवतो. क्वचित प्रसंगी ओह, नाही आग्रह करीत आपण गप्पा मारु असे म्हणून एखादे सुखद वळण ही येते
मला अजुन असं राक्षसी आग्रह
मला अजुन असं राक्षसी आग्रह करणारे कोणी भेटलेले नाही. आमच्यात कोणी लाजत नाही आणि उगाच गळेपडूपणा करुन कोणी घ्या घ्या करत फिरत नाही. ती पद्धतच नाही मुळी!

आग्रहाच्या बाबतीत एक
आग्रहाच्या बाबतीत एक सुवर्णमध्य गाठावा लागतो. शून्य आग्रह केला तर अनेकवेळा भिडस्त पाहुणा उपाशी राहू शकतो. थोडा कमी भिडस्त असलेला माणूस "किती वेळा घ्यायचा आवडलेला पदार्थ" या भिडेखातर आवडलेला पदार्थ नको म्हणू शकतो. त्यामुळे थोडा आग्रह गरजेचा असतो घरी आलेल्या पाहुण्यांच्या बाबतीत.
खरं तर त्याला आग्रह ही नाही म्हणता येणार - कारण कोण खरोखरचं नाही म्हणतंय आणि कोण लाजेखातर ते बर्याचवेळा समजते. पाहुणा अगदी पोकर फेस असेल आणि आपल्याकरता अगदीच नवखा असेल तर बात निराळी. >>> पटलं.
मला क्षणभर वाटलं आता पानात
मला क्षणभर वाटलं आता पानात टाकायचं नाही तर कोयी आणि शेंगांची सालं पण खायला लावता का काय! >> अमितव

टिळक मोड >> rmd

बाकी ट्रम्प, आग्रह गप्पा भारीच.
मला ही " काय म्हणतात तुमचे गव्हर्नर ? जरा रेपो रेट कमी करायला सांगा त्यांना " हे किंवा तत्सम काही तरी बरेच वेळा ऐकावं लागत असे.
लोकहो संभाषण सुरु करण्याची ती
लोकहो संभाषण सुरु करण्याची ती एक निरुपद्रवी स्टाईल आहे असे कुणालाच वाटले नाही का? जसे काय हवा-पाणी काय म्हणते तशी
Pages