पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

If you must waste food, waste it OUTSIDE your body >> अगदी अगदी!!!

विकु Lol Lol

मला विचारल्या जात असणाऱ्या प्रश्नांवरून मी अमेरिकेतल्या माबोकरांना काय विचारत असतील याचा अंदाज बांधू शकतो. उदा. तुम्ही न्यू जर्सीत राहत असाल तरी "आमच्या जावेची भाची (सुलक्षणा) माहिती आहे का तुला? ती पण तिकडेच असते म्हणे!" तुम्ही - "तिकडे म्हणजे कुठे?". "कॅलिफोर्नियात की कुठेतरी. तुमचं काहीतरी मंडळ वगैरे असेलच की तिकडे".

Happy
मलाही , आधी कुठे राहते किंवा कुठे काम करते विचारून, मग तिथे असणारा कुठला तरी दूरचा संदर्भ काढून, तो/ ती माहिती आहे का? विचारणारी लोकं डोक्यात जातात!
इतक्या मोठ्या जिओग्राफी मधे कोण असे ओळखीचे सापडणार आहे? आणि समजा योगायोगाने, मी त्या सुलक्षणा ला ओळखत असेनही...तर यांचे काय त्यात कर्तृत्व अथवा लाभ?

ज़बरदस्ती नावडते पदार्थ वाढून वर फुकाची “अन्न वाया घालवू नये” “माजू नका” वगैरे प्रवचने देणाऱ्यांच....

अनिंद्य, असे कोण लोक भेटतात तुम्हाला अजूनही?
लहान मुलांच्या बाबतीत एकवेळ ठीक आहे!
Happy

आग्रहाचे किस्से ऐकून मागच्या काही दिवसांपुर्वी मी संध्याकाळी बाहेर चालले होते. खाली सोसायटी मधल्या ज्येष्ठ बायकांची वडापाव जिलेबी पार्टी सुरू होती. मला बघून हाक मारली आणी खाण्याचा आग्रह झाला. आता मी वडापाव खूप क्वचित म्हणजे सहा महिन्यात एकदा वगैरे खाते. त्यांना शांतपणे मी आत्ता मला नको आहे म्हणल तर राग आलेला.

काय म्हणतात तुमचे गव्हर्नर ? जरा रेपो रेट कमी करायला सांगा त्यांना
>>>
मला एकदम जोळ्यासमोर आलं की ममो रघुराम राजनना कॅंटीनमध्ये घेऊन गेल्यात आणि सांगताहेत ‘सर जरा रेपो रेटचं पहा. लोक फार त्रास देतात हो.’

सामो बरोबर.

आता अमितने विचारले काय म्हणतो ट्रम्प? तर ते खोचक असु शकते हे माहीत असल्याने खटकले तर गोष्ट वेगळी. Wink

महाराष्ट्रात गेले तरी लोक काय म्हणतो KCR / रेवंथ रेड्डी ओवेसी विचारतात.

तर काही लोक किती सिटा आहे तेलंगणात लोकसभेच्या असेही विचारतात. दुसऱ्या राज्यात जाताना अशा गोष्टी पाठ करून जायच्या असतात हे माझ्या डोक्यात येत नाही कधी.

यावरून आठवलं. पुण्यात काही लोक गटगला येताना गाड्यांचे पासिंग पाठ करून येतात आणि येणार जाणाऱ्या गाड्यांची नंबर प्लेट बघुन हे चिंचवड ते हे फलटण पासिंग अशा कॉमेंट्स करतात असा अनुभव आहे.

सामो+१.
मला अजिबात खटकत नाही. पण कोणाला कोणाला खटकतं आहे ते नोट करून ठेवलंय. योग्य वेळी खटकावण्यात येईल. Wink
मानव Wink

>>> महाराष्ट्रात गेले तरी लोक काय म्हणतो KCR / रेवंथ रेड्डी ओवेसी विचारतात.

>>> किती शिटा आहे तेलंगणात लोकसभेच्या

#MeTooVictim Lol

कोऽनैत तुमचे खासदार? KCRचेचैत की?
मला माहित नाही.
अं! तितंच ऱ्हाता की ओ तुमी, कसं म्हाईत नाई? नुसतं पैशेच बगत ऱ्हाऊ नका ओ वामन्राव् तितं, जरा लक्श ऱ्हाऊ देत ऱ्हा.

नंबर प्लेट बघुन हे चिंचवड ते हे फलटण पासिंग अशा कॉमेंट्स करतात असा अनुभव आहे.
<<<<<<< Lol
फलटणच्या गाड्या पण खरंच खूप पॉप्युलर आहेत. संजय दत्तच्या सिनेमात गाणं पण आहे फलटण पासिंगच्या कारवर...
'फलटण चली बोलो ऐ जाती, ऐ जाती रे...
फलटण चली बोलो ऐ जाती रे....'

श्र Lol
आग्रह pet पीव्ह आहेच म्हणा Happy

फलटणला वेगळा नंबर आहे? सातारा जिल्ह्याचा आहे तोच नाही का? (कुकातकुका)
आम्हालाही महाराष्ट्रात गेल्यावर पूर्वी 'काय म्हणतायत येडुरप्पा?' असा प्रश्न असायचा. मध्यंतरी, बंगलोरला भयानक पाणीटंचाई आहे अशी बातमी पुण्यात पसरली होती. म्हणजे पाणीटंचाई होती, पण सगळ्या शहरात अजिबात नव्हती. पण त्यावर्षी पुण्याला गेल्यावर जो तो आपला ' काय पाणी नाही म्हणे तुमच्या बंगलोरला' असं म्हणत होता. हे काही माझं पेट पीव्ह वगैरे नाही. सहज आठवलं म्हणून.

लोकहो संभाषण सुरु करण्याची ती एक निरुपद्रवी स्टाईल आहे असे कुणालाच वाटले नाही का? जसे काय हवा-पाणी काय म्हणते तशी Happy>>>>स्टाईल आहे हे मान्य. पण निरुपद्रवी आहे की उपद्रवी हे संबंधीतांची फ्रिक्वेन्सी मॅच होते की नाही यावर ठरते. let us agree to disagree या मुद्द्यावर परस्पर विरोधी विचारसरणी देखील सहमत होउन विषय बदलतात. पण संभाषण चालु राह्ते.बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य. दोघेही माणसंच आहेत पण संस्कार भिन्न असल्याने रुची देखील भिन्नपणे विकसित होत जाते

फलटण चली बोलो ऐ जाती, ऐ जाती रे >>> Lol

एखाद्या शहराचे लोक असेच असतात असा निष्कर्ष काढणारे असतात. फलटणच्या लोकांबद्दल ते बढाईखोर असतात असा समज आहे. असं काही नसतं हे सांगूनही पटत नाही लोकांना. पण मला एक फलटणचा एक जण खरंच असा भेटला होता.
त्याला म्हटलं ना कि हल्ली भोर साईडला खूप शूटींग असतं... कि तो म्हणणार
"आमच्या फलटणला तर पाय ठेवायला जागा नाही, सुभाष घई पासून सगळे पडीक असतात शूटींग साठी"

एकदा त्याला सांगितलं कि पुण्यात ऑडीओ रेकॉर्डिंग साठी चांगली सोय आहे तर हा म्हणाला
"आख्खं पुण्याचं पब्लीक फलटणला येतं रेकॉर्डिंगला, आणि तू काय पुण्यात रेकॉर्डिंग चं सांगतेस ?"

पण अशा एखाद दुसर्‍या नमुन्यावरून आख्ख्या शहराबद्दल मत बनवू नये हे माझं ठाम मत आहे.

आधी मन दुखवून नंतर काहीच झाले नाही असे दाखवत गोड गोड बोलणारे आणि आपणही तसेच वागावे अशी अपेक्षा ठेवणारे लोक माझ्या डोक्यात जातात.

Happy एकुणात, मायबोलीकर खूपच चिडचिडे आणि पटकन राग येणारे... असे आहेत असा माझा समज झाला आहे!
किती ते पेट पीव्ह्ज !

इथल्या पोस्टी वाचल्यावर संभाषणास सुरुवात करण्यासाठी 'तुमचे ते हे काय म्हणतायत' या ऐवजी दुसरे काहीतरी योजून ठेवायला हवे, मला स्वतःला असे वाटले. Happy

सांत्वनासाठी गेल्यावर काय बोलावे आणि काय बोलू नये, याची काहींना अजिबात भिडभाड नसते.

खाण्याचा आग्रह झाला आता दुसरा माझ्या डोक्यात जाणारा आग्रह म्हणजे कपड्यांच्या दुकानात १७६० प्रकारचे कपडे बघा ना....बघा ना करणाऱ्या सेल्समन्सचा आग्रह. अगदी दुकानात जाईपर्यंत मी स्वतःला बजावत असतो की ते त्यांचं कामचं असतं, त्यांचा उद्योगासाठी ते पुरक असते,, सगळ्यांच्या चॉईसेस काही तुझ्या सारख्या फिक्स्ड आणि सॉर्टेड नसतात, आणि तुझ्या त्या तशा आहेत हे काही तुझ्या कपाळावर लिहीलेलं नाही आहे ई. ई.....तरीही तो प्रकार माझ्या डोक्यात जातो... उदाहरणार्थ मला Henley प्रकारची टी-शर्ट हवी असताना तुम्हाला कॉलर नेक कसे अधिक चांगले दिसेल म्हणून १०-१२ टीशर्ट काढून दाखवणे....आवडलेल्या पॅटर्न मधे मी कलर निवडतो असं बजावून सुद्धा नको नको त्या कलरचे कपडे काढून पुढ्यात ढीग मांडून ठेवतात. त्यातून माझा स्वभाव असा की मनात असलेला/ कल्पिलेला नग नाही मिळाला तर फक्त डझनावारी दुकानंच पालथी घालत नाही तर महीनोंन महीने वाट पहायची देखील तयारी... त्यामुळे कित्येक वेळा दुकानांतून हात हलवत परत येतो, त्यामूळे ( माझ्या नॉन निगोशिएबल ॲटिट्यूडमुळे) उगाच त्यांना तसदी होते अस मला सारखं वाटतं रहातं....आताशा मॉल्स आणि ऑनलाईन शॉपिंग मुळे( No question ask return policy) ही डोकेदुखी काहीशी कमी झाली आहे.

फाविदडि >>> अगदी सहमत.

एकुणात, मायबोलीकर खूपच चिडचिडे आणि पटकन राग येणारे...
>>>> Lol

दुसऱ्या राज्यात जाताना अशा गोष्टी पाठ करून जायच्या असतात हे माझ्या डोक्यात येत नाही कधी. >>> Lol

फलटण चली बोलो ऐ जाती, ऐ जाती रे >>> Lol

एकुणात, मायबोलीकर खूपच चिडचिडे आणि पटकन राग येणारे... >>> Happy मला उलट वाटले. ठिकठिकाणी भिडस्तपणा केल्यावर तो व्हेण्ट करायला इथे लिहीतात Happy आणि तसा भिडस्तपणा काही ठिकाणी बरोबरच असतो. उदा - एखाद्या मित्राकडची ज्येष्ठ व्यक्ती. काकू एरव्ही एकदम आदरणीय व्यक्तिमत्त्व असतात. पण आग्रहाच्या बाबतीत त्यांच्या दुनियेत इतकी वर्षे लोक आग्रह केला नाही तर अर्धवट खाउन उठायचे, त्यामुळे त्यांचा अजूनही तसाच समज आहे. त्यांना काय फटकळ बोलणार अशा वेळेस. बोलायचेच असेल तर काकांना किंवा पुतण्यांना बोलायला हवे की तुम्हाला सरळ मागून खाता येत नव्हते का Happy

सगळ्यांच्या पेट पीव्हज वाचतांना अजून एक गंमत माझ्या लक्षात आली ती म्हणजे, कुणी एकाने काही सांगितले..की ते सगळ्यांचेच पेट पीव्ह होते. ..
Happy

कुणीच असे म्हणत नाही की... मला तर आवडते बुवा..चमच्याने खाताना प्लेट चा आवाज करणे, ..अथवा मला काहीच प्रॉब्लेम नाही कुणी मला पगार विचारला तर......

म्हणजे आपण....आपल्या आयुष्याचा कितीतरी मोठा भाग या अशा नापसंतीत च घालवत आहोत!
हे आरोग्याला चांगले नाही...
Happy

कुणी एकाने काही सांगितले..की ते सगळ्यांचेच पेट पीव्ह होते. ..>> काही अपवाद वगळता>>
खाण्याचा आग्रह करणे हा इतरांचा पेट पीव्ह असू शकतो हे माहीत असल्यामुळे मी आलेल्या लोकांना खूप नाही पण अवघड वाटणार नाही एवढा आग्रह करते.

मला कुणाकडे गेल्यावर मला आग्रह नाही केला तर मी उपाशी राहते मात्र. नुसता खाण्याचाच नाही तर इतरांनी मदतीचा आग्रह धरल्या शिवाय मदत घ्यायला/मागायलाही मला संकोच वाटतो.

Pages