पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण जे हॉटेल मध्ये होतं ते विमानात ही होतं. रडणारी वगैरे पोरं असली तर झोपेच पार खोबरं होतं. आयल मधल्या अरुंद पॅसेज मध्ये एखादं मोठं सॉफ्ट टॉय हातात घेऊन जेव्हा मूल पळत तेव्हा लोकांना त्रास होत असणारच. आपल्या शेजारच्या सीटवर एखादं पोरग आलं तरी त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. एकदा एक छोटं मूल त्याच्या आईच्या मांडीवर आडवं झोपलं होतं आणि दर दोन मिनिटांनी त्याचा पाय मला लागत होता. मला त्याच काही वाटल नाही पण कोणाला ते त्रासदायक वाटू शकतं .
मला पोरांनी टाकलेल्या पसाऱ्याचा, त्यांच्या गोंगाटाचा, त्यांनी केलेल्या तोड फोडीचा, सांड लवंडीचा त्रास होत नाही, मी एकदम कूल असते. पण हे किती वर्षापर्यंत मूल म्हणून सोडून द्यायचं हा मुद्दा ही आहेच. कधी कधी मग ट्रेन मध्ये सुद्धा मोठी मोठी मुलं ही खूप आवाज ,दंगा करून इतरांच्या प्रायव्हसी ची पायमल्ली करताना आपण पाहतो. मुलं करणारच म्हणून कायम सोडून न देता त्यांना कसं वागायचं हे शिकवलं ही गेलं पाहिजे फक्त त्यासाठी योग्य वय कोणत हे व्यक्ती गणिक बदलू शकतं.

मुलांनी आपापल्या टेबलांवर अती आवाज न करता गोंधळ घातला तर माझी हरकत नसते. अती आवाज म्हणजे माझ्या टेबलवर मला बोलता/ऐकता येऊ नये एवढा आवाज ही माझी लिमीट आहे. मुलं जसं एन्जॉय करतात तसं इतरांनाही रिलॅक्स्ड मुडमध्ये जेवावंसं वाटतं. दोन टेबलांच्या मधे रॅंडमली तीरासारखी धावणारी मुलं मला पटत नाहीत. मुलांचे वय लहान असले तरी बरोबरच्या मोठ्यांनी त्यांना समजवावे अशी माझी अपेक्षा असते. त्यांनी ते न केल्यास मी मोठ्यांना तु. क. देते. आणि रेस्टॉरंटवाल्यांना दखल घ्यायला लावते.
अगदीच ३-४ वर्षांची मुलं अपवाद कारण जनरली ती इरीटेट करण्याएवढा गोंधळ घालत माहीत.

लहानपणी मी पण गोंधळ घातला असेनच. पण त्या बदल्यात भरपूर चापट्या खाल्ल्या आहेत.

मुलं करणारच म्हणून कायम सोडून न देता त्यांना कसं वागायचं हे शिकवलं ही गेलं पाहिजे >>> १००++

आ_रती , I am with you . मला धुमाकुळ घालणार्य मुलांपेक्षा जास्त , आमचा काहीच संबंध नाही असं वागणारे पालक जास्त irritate करतात. अगदी etiquettes नाही पण जरा मुलांना समजावणे ही अपेक्षा अवाजवी नाही.
बाकी मुलं धिंगाणा नाही घालणार तर मग काय म्हातारे कोतारे ???
माझेमन , हजार अनुमोदन.

इथे लॉन्ग आयलंड ते मॅनहॅटान रेल्वे मध्ये अजिबात गर्दी नसते कारण पीक अवर्स $१३ आणि नॉनपिक $९ तिकीट असते. नॉन-पिक अवर्स, प्रत्येक माणसी कमीत कमी ५ ते ८ सीटस तरी रिकाम्या असाततच. तेव्हा हे जे लोक तंगड्या पसरुन समोरच्या बाकावर पाय ठेवतात त्यांच्या ना श्रीमुखात भडकवाविशी वाटते. बरं चेकर आला की त्याला दिसायच्या आत हे लोक सावरुन नीट बसतात आणि मग पुनश्च ये रे माझ्या मागल्या. म्हणजे त्यांना ही कळत असतं की असे समोर पाय ठेउन ते सीट डुकरासारखे, मळवणे चूकीचे आहे पण ... तसेच वागतात.
मला फार राग येतो.

आ_रती , I am with you >>> +१

फा वि द डी यांनी करेक्ट शब्दांत मांडलं आहे. त्यांच्या पोस्टीला अनुमोदन.
माझेमन, स्वस्ति आणि ममोताईंनी पण बरोबर लिहिलं आहे.

फार्स, अनुमोदन.
अमितव, मुलांनी दंगा घालण्यायोग्य ठिकाणी दंगा नक्की घालावाच, पण योग्य ठिकाणी जरा लावले नियम तर चालायला हरकत नाही.

फाविद्डि आणि स्वस्ति, सुनिधीशी सहमत.
अमित, तुझा निबंध वाचला पण सगळ्या पार्टशी मी सहमत नाही. तुझा जरा नॉस्टॅल्जिया मोड ऑन झाला असं वाटलं. Wink

अमितच्या निबंधावरून असा मी असामी आठवलं -
"आता त्याची मुलं करतात खुर्च्यांची गाडी-गाडी, त्याला तो तरी काय करणार!... मग मी फक्त जिन्यात जाऊन विडी शिलगावून येतो..." Wink

हॉटेलमधे दंगा करणार्‍या मुलांबद्दल वाचुन मलापण जुने दिवस आठवले.. मुलगी सिनिअर के जी मधे असताना आम्हा १० आयांचा मस्त ग्रुप जमला होता.. नियमित भेटता यावे , मुलांची आणि एकमेकींची ओळख व्हावी म्हणुन आम्ही भिशी सुरु केली. सुरुवातीचे २ वर्ष प्रत्येकीच्या घरी, एकमेकींचा सुगरणपणा बघण्यासाठी ही भिशी चालली. मग हळुहळु कंटाळा आला.. तिसर्‍या वर्षी पासुन म्हणजे आमची मुलं साधारण दुसरी-तिसरी च्या वर्गात असताना मग हॉटेल मधे भेटायला लागलो.. मुलं एकत्र भेटली की खुप मस्ती आणि पळापळी करायची. त्यांना कंट्रोल करायचं काम आम्ही नेटाने करायचो.. खाणं आलं की पोटं भरेपर्यंत शांत आणि मग परत दंगा सुरु.. तरी शक्यतो गार्डन सिटींग असलेलं, कोपर्‍यातली टेबले असलेलं असं हॉटेल आम्ही शोधायचो.. तरी बाकी टेबल वरच्या लोकांचे पच पच आवाज आणी आठ्या मिळायच्याच.. यांना कधी लहान पोरं नव्हती की काय असं त्यावेळी वाटायचं.. एकदा तर आम्हाला कोथरुड कर्वे पुतळ्याच्या जवळ असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेल वाल्यांनी इतक्या मुलांसोबत परत येउ नका असं प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं.. पुढे मग नळ स्टॉप जवळ च्या एका हॉटेल मधे वरती एक स्वतंत्र डायनिंग सेक्शन होता तिथे जायला लागलो.. आम्हाला पण मोकळीक आणि मुलं पण खुश... हॉटेल च्या बाकी कस्टमर चा तिथे काही संबंध यायचा नाही त्यामुळे कितीही दंगा केला तरी चालुन जायला लागलं.. .. आमची भिशी बर्‍याच लोकांसाठी पेट पीव्ह्ज कॅटेगरीत असणार असं आत्ता हा धागा वाचुन वाटलं ;-)... आता मुलं मोठी झाली आहेत. ..शांत झाली आहेत . अजुनही अधुन मधुन भेटतो आम्ही...त्यावेळी चुकुन हॉटेल मधे आमच्या सारखा एखादा आया-मुलांचा गट दंगा करताना दिसला तर राग मात्र कधी येत नाही...कारण आम्ही गेलोय त्यातुन.. त्यांची मस्ती बघत आणि जुन्या आठवणी आठवत वेळ मस्त जातो...

मुलं करणारच म्हणून कायम सोडून न देता त्यांना कसं वागायचं हे शिकवलं ही गेलं पाहिजे फक्त त्यासाठी योग्य वय कोणत हे व्यक्ती गणिक बदलू शकतं.>> +१
आणि माझ्याच लेकीबद्दल "लहान आहे ती, इतकं कसं समजेल? उगाच काय कायतरी?" यावर मी एकदा शांतपणे "आत्ता नाहीच समजणार, पण आत्ताच सांगितलं नाही तर पुन्हा कधीच समजणार नाही. कारण दरवेळी तिला पाठिशी घालाल तुम्हीच" असं कुटुंबातल्या ज्येनांना सांगितलं होतं. दंगा-गोंधळ करायच्या ठिकाणी, प्रसंगाला साजेसा गोंधळ मुलांनी घालावाच, तिथे स्क्रीन बघत किंवा हाताची घडी तोंडावर बोट नकोच बसायला. पण पालकांचं लक्ष हवं, गरजेनुसार थोडं आवरावं लागलं तर ते त्यांनी करावं. मुलांपेक्षा पालकांचा रोल महत्त्वाचा आहे.

(एका बर्थडे पार्टीला एका ३-४ वर्षांच्या मुलीने सोफ्यावर उड्या मारून अशक्य दंगा केला. तिचं बघून आणि २-३ मुलं तशीच नाचली. होस्टीण बाईंनी सांगून पाहिलं. पण पोरीची आई तिला काही सांगेना, उलट गप्पाच चालू होत्या. वर्षभरापूर्वीचा तो सोफा, स्प्रिंगच तुटली त्याची. पार्टी महागात गेली.)

आमच्याकडे पण एका मुलाने जाम गोंधळ घातला होता. सोफ्यावरून कॅबिनेटवर चढणे, किचनमधल्या गोंधळात घुसणे, खुर्चीच्या हातावर उभे राहणे त्याची आई (इन्व्हिटेशन असून) त्याला त्याच्या २ वर्षे मोठ्या बहिणीवर सोपवून निघून गेली. तिने एन्जॉय नाही का करायचं? नवऱ्याला पूर्ण वेळ त्याच्याकडे लक्ष द्यावे लागले. नाहीतर तो तरी पडला असता किंवा इतर कुठल्या तरी लहान मुलाला काहीतरी लागलं असतं.

वयाने थोड्याच मोठ्या असलेल्या मुलावर धाकट्याची जबाबदारी सोपवायची आणि जरा काही झालं की मोठ्या मुलाला ओरडायचं. हा पण माझा पेट पीव्ह आहे. जनरली मुलं भावंडांची आपसूक काळजी घेतात पण पालक तुम्ही आहात.

https://www.maayboli.com/node/86847
मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे. पटापट नावनोंदणी करा, लोकहो.

इतरांच्या घरी जाऊन दंगा घालणारी, इतरांना मारणारी, रेस्टॉरंट, flights आणि अशाच इतर ठिकाणी हैदोस घालणारी मुले आणि त्यांच्याकडे कौतुकाने पहात असणारे आणि आमचा हा ना फार active आहे, मुलं दंगा करणारच म्हणणारे parents हा annoying प्रकार आहे

. म्हणजे त्यांना ही कळत असतं की असे समोर पाय ठेउन ते सीट डुकरासारखे, मळवणे चूकीचे आहे पण ... तसेच वागतात. >>> अरे , पुनर्वसु.. आमच्या मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये नॉन पीक अवरला हे चित्र सर्रास असतं. एकदा माझ्यासमोरच्या सीटवर एक साठी उलटलेली बा आणि दोन मध्यमवयीन स्त्रिया येऊन बसल्या. मी खिडकीच्या बाजूला एकटीच बसले होते. थोड्या वेळाने त्यातल्या एकीने चपल्या काढल्या आणि दोन्ही पावलं माझ्या बाजूला सीटवर ठेवली. मी तिला प्रेमाने सांगितले पाय खाली घे म्हणून. त्या तिघींचे चेहरे मी त्यांच्या कायदेशीर हक्कांची पायमल्ली करतेय असे झाले. ती बाई मला , चपला नाही घातल्या आहेत , अस पाय सीटवर ठेवणं काही चुकीचे नाही, तुला का त्रास होतोय या शब्दात समजावयला लागली. मग मी चुपचाप आपली सीट बदलली.
समोर बसलेल्याच्या बाजूला खुशाल पाय ठेवणे , its just disgusting .

आज जारण पहायला गेलेलो, तिथे बाजूच्याच ( नशीबाने पाठच्या नाही) खुर्चीवर या होटेलमधल्या पेट पिव्हचं मुव्ही हॉल वर्जन पहायला मिळलं. इतकं असह्य की त्यांच्या पुढच्या सीटवर बसलेला दर्शक मध्यांतरानंतर नाईलाजाने काही रो पुढे मोकळ्या असलेल्या सीटवर जाऊन बसला.

जर मुव्ही हॉलवाल्यांनी लहान मुलं दर्शक म्हणून अलाऊड न केलेले काही खास शोज आयोजित केले, तर असे शो ही पसंतीला उतरणारा पुरेसा दर्शकवर्ग उपलब्ध होऊ शकेल या निष्कर्षाप्रत आज मी येऊन पोहचलो आहे.

सल्ले देणारे लोक आजूबाजूला असणं आवडतं. पण जेव्हां आपण त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, वयाचा रिस्पेक्ट करतो आणि ते मर्यादा सोडून आग्रही सल्ले देतात ते खटकतं.
"तू हेच कर, ऐक तू माझं"
" सांगतेय बरं का, नंतर म्हणशील सांगितलं नव्हतं, खूप उशीर होण्याआधी मी काय म्हणते ते ऐक एकदा"
****

अशा लोकांना आपण एखादा पिक्चर आवडला म्हणून सांगितलं कि उसळून ते तो कसा आणि का वाईट आहे हे सांगू लागतात. तुला आवडला म्हणजे काय तुझी आवड (असं थेट न बोलता मर्म तेच) या अर्थाचं सुनावतात. किंवा मग तासन तास आपली आवड थोपायचा प्रयत्न करतात. कधी कधी न बघताही Lol
आणि याच्या उलट सुद्धा.
एखाद्याला आवडला, एखादाला नाही आवडला. एव्हढं साधं स्विकारावं ना. आपण कधी काळी केलेलं कौतुक डोक्यात जाऊन आपले ते मेण्टॉर असल्यासारखे वागू लागतात. प्रत्येक ठिकाणी असा एखादा तरी नग भेटतोच.
अशांना मग इग्नोर करावं लागतं.

मला ऑबसेसिव्ह लोकांची अ‍ॅलर्जी आहे. यांचा माईंडसेट एककल्ली असतो. डोळ्याला झापड असते. सतत एकाच विषयावरती टाळ कुटुन, दुसर्‍याचा वेळ घेण्यात प्रावीण्य असते.
माझ्या शेजारी एक शीख मुलगी (स्त्री) आहे. आमच्या घरासमोर बह्मविद्या हार्मनी सेंटर आहे. ती तिकडे जाते. मला आग्रह केलेला मी म्हटलं मला तो कल्ट वाटतो आणि मला रस नाही. पण नंतर ती त्याच त्याच विषयावर बोलते - बी के शिवानी हिट्ट् / फेमस टॉपिक.
मला व्यायामाबद्दल सल्ला देणे, स्वतः फायडेलिटीत असल्याने, इन्व्हेस्टमेन्ट बद्दल सल्ला देणे हा विरंगुळा. पैकी मी उत्तम ते वेचते व पुढे जाते. काही सल्ले ऐकते काही कानाआड करते.

मला जेवताना आग्रह करुन वाढणाऱ्यांची ॲलर्जी आहे....कारणं‌ दोन - पानात काही टाकायचं‌ नाही असा माझा शिरस्ता आणि अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत पोटात अन्न भरत रहायचे नाही हा कटाक्ष. मझ्या चुलत भावची बायको गुजराथी आहे, त्यांच्या ईथे जोवर पाहूणा ताटात अन्न टाकत नाही तोवर वाढत रहायचे ही पद्धत....माझ्या अगदी डोक्यात जातात...आणि मला असं ते मनातलं लपवता वगैरे ( खास करून नाराजी, त्रासीक भाव) येत नाही, आणि मग ती माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. म्हणून मग मी जातच नाही कधी जेवायला त्यांच्याकडे.

मला ही आग्रह अजिबात आवडत नाही.>> +१ आणि मला कोणाला तो करताही येत नाही. माझ्या काही मैत्रिणींच्या गावी आग्रह करणं हा मान समजतात. आग्रह केला नाही तर ज्येष्ठांचा अनमान समजला जातो. हे मला नवीनच होतं. म्हणजे मानसन्मान वगैरे.... थोडंसं "घ्या हो..." वगैरे वेगळं आणि नको असताना वाढणं वेगळं!

… आग्रह आवडत नाही….

स्वत:च्या घरी बोलवून आग्रह केला तर एकवेळ समजू शकतो परंतु कुण्या तिसऱ्याच्याच पार्टीत “घ्या घ्या” “तुम्ही काही जाड होणार नाही एका पेस्ट्री नी”, “एकदिवस बाजूला ठेवा तुमचे ते डाइट-फाएट, काही होत नाही” असे फालतू बोलून आग्रह करणारे कधीही माझ्याहातून मार खातील असे ग्रहमान आहे. I may very well slap them someday. काय संबंध ?

दुसरे टोक ते “थोडेसेच उरलेय, संपवून टाका” म्हणत सर्विंग प्लेट्स खरवडून, रोटी-चपातीचे उरलेसुरले तुकडे पाहुण्यांच्या ताटात ज़बरदस्ती ओतून “ताटातले संपवा” दरडावणारे प्रकरण झेपत नाही. अपमानजनक वाटते मला. माझे पोट तुमचा dustbin नाही.

ज़बरदस्तीने नावडता पदार्थ पोटात कोंबणे यासारखे दुःख नाही. आपण गायबैल नाही समोर पडला तो कडबा कुटार खायला. “If you must waste food, waste it OUTSIDE your body” हे माझे तत्व आहे.

मला कोणाला तो करताही येत नाही. माझ्या काही मैत्रिणींच्या गावी आग्रह करणं हा मान समजतात. आग्रह केला नाही तर ज्येष्ठांचा अनमान समजला जातो. हे मला नवीनच होतं. म्हणजे मानसन्मान वगैरे.... थोडंसं "घ्या हो..." वगैरे वेगळं आणि नको असताना वाढणं वेगळं

माझे पोट तुमचा dustbin नाही.
>>
१०००+++

आग्रहाच्या बाबतीत एक सुवर्णमध्य गाठावा लागतो. शून्य आग्रह केला तर अनेकवेळा भिडस्त पाहुणा उपाशी राहू शकतो. थोडा कमी भिडस्त असलेला माणूस "किती वेळा घ्यायचा आवडलेला पदार्थ" या भिडेखातर आवडलेला पदार्थ नको म्हणू शकतो. त्यामुळे थोडा आग्रह गरजेचा असतो घरी आलेल्या पाहुण्यांच्या बाबतीत.

खरं तर त्याला आग्रह ही नाही म्हणता येणार - कारण कोण खरोखरचं नाही म्हणतंय आणि कोण लाजेखातर ते बर्‍याचवेळा समजते. पाहुणा अगदी पोकर फेस असेल आणि आपल्याकरता अगदीच नवखा असेल तर बात निराळी.

मानव ' पेट ' Lol

इतरांना माफक दोन वेळा विचारणारा मी स्वतःच्या बाबतीत मात्र विचित्र वागतो. मीच माझा पेट पीव्ह आहे. आवडलेल्या गोष्टीचा स्वतःच स्वतःला आग्रह करत बसतो. तरी आता प्रकरण जरा सुधारलं आहे.

अमेरिकेतून सुटीवर भारतात गेले की हा आग्रह अगदी इरिटेटिंग होतो. एकतर भारतीय मिठाया अमेरिकेत सर्रास मिळतात त्यामुळे 'हे अमेरिकेत मिळत नसेल' ला अर्थ नाही. 'आमच्या सुनेने /मुलीने घरच्या घरी केलेला केक' हा तर असह्य प्रकार आहे. केक हा पदार्थ घरी कधीही छान बनत नाही (I am ready to die on this hill) पण पुल ना ज्या प्रमाणे फोटो पाहून 'ही वहिदा रेहेमान का हो ?' असे विचारावे लागत असे तसे 'केक फार छान जमलाय हो' असे म्हणावे लागते. अमेरिकेतून तंबाखूची डबी घेऊन जावी व लाडूचा आग्रह करणार्‍यांना अमेरिकन तंबाखूचा आग्रह करावा असे वाटते.

केक हा पदार्थ घरी कधीही छान बनत नाही (I am ready to die on this hill) पण पुल ना ज्या प्रमाणे फोटो पाहून 'ही वहिदा रेहेमान का हो ?' असे विचारावे लागत असे तसे 'केक फार छान जमलाय हो' असे म्हणावे लागते.
>>>> Lol

अमेरिकेतून तंबाखूची डबी घेऊन जावी
>>>
तंबाखू काय? निदान क्यूबन सिगार तरी आणा.

Pages