क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण अंदाज कोणीही लावू शकतं आणि ते बरोबर यायची प्रॉबॅबिलिटीही काही फार खास नाही. त्या करता म्हणत होतो. की क्षुल्लक गोष्टी वापरुन स्वता:ची सारखी ........ कॉलर टाईट करताना थोडी तरी..... खंत वगैरे वाटली पाहिजे. Proud
>>>>

फार विचार करता तुम्ही. क्रिकेट बघताना अंदाज बांधणे आणि ते बरोबर आल्यावर खुश होणे असाच आनंद लुटायचा असतो क्रिकेटचा Happy

आजचा विजय खतरनाक होता त्यापेक्षा जास्त खतरनाक हे आहे की आता हे रोजचेच झाले आहे ..
ईन्शाअल्लाह हा विश्वचषक आपलाच आहे...

जितेगा तो मोदी ही सारखे कप तो शर्माजीका बेटा ही लायेगा असे म्हणू शकतो आता Happy

बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत जी काळजी घेतली व विश्वचषकासाठी तो पूर्ण ताकदीनिशी उपलब्ध होईल हे नियोजन केलं, हे कौतुकास्पद !
>>>>>

+७८६
बरेच लोकं त्याचे प्राधान्य आयपीएललाच म्हणून नावे ठेवायची त्याला..

बुद्धीला खाद्य !

आज शमीला सामनावीर का दिले?
३५८ टारगेट होते. विनिंग टोटल नक्कीच होती.
त्यातही शमी गोलंदाजीला आला तेव्हा आधीच ९ ओवर १४ धावा आणि पहिले ४ फलंदाज बाद अशी स्थिती होती.
त्याचा स्पेल खतरनाक असला तरी सामन्याचा निकाल आधीच लागलेला.

शर्माच्या सामनावीरावर आक्षेप घेताना जे निकष / फंडे लावले होते ते इथे पडताळून बघा Happy

२००० मध्ये कोका कोला ट्रॉफी शारजा मध्ये असताना लंके ने आपल्याला ५४ मध्ये बाद केले होते , त्याचा आज बदला घेतला गेला ....

आजचे सामनावीर कोणाला द्यायचे होते ह्याबद्दल मला संभ्रम आहे. कोणा एकालाच देण्याची गरज नाही. अय्यर नि सिराज ह्यांना एकत्र द्यायला हवे होते असे मला वाटते. शमी यायच्या आधी सिराज ने हवा काढलेली होती. तीस ओव्हर्स मधे दोन विकेट गेल्या असताना दोनशे धावा असा स्कोअर असेल तर उरलेल्या वीस ओव्हर्स मधे साधरण डबल व्ह्याला हवा. आपले शेपूट बघता आपण त्याच्या आसपास आलो ह्यामधे श्रेयसच्या इनिंगचा जबरदस्त वाटा होता.

नसीर हुसेन चे श्रेयसबद्दलचे निरीक्षण कसले अचूक आहे. तो अ‍ॅग्रेर्सीव्ह खेळला कि वेगळाच खेळतो. त्याने हाच अ‍ॅप्रोच ठेवायला हवा नाहितर शॉर्ट बॉल च्या डावपेचामधे फसत राहणार.

२०१५ च्या वर्ल्ड कप मधे पण आपण असेच बेधुंद सुटलेले होतो. बॅटींग क्लिक होत होती नि तिघेही फास्ट बॉलर्स (शर्म, झहीर नि शमी) धुमाकूळ घालत होते. सेमी ला लॉ ऑफ अव्हेरेजेस् लागला नेमका. Sad क्लच प्लेयर्स ह्या वेळी तसे होउ देणार नाही अशी आशा ठेवूया.

+७८६
बरेच लोकं त्याचे प्राधान्य आयपीएललाच म्हणून नावे ठेवायची त्याला.. >> दोन दिवसांपूर्वी तू माझ्याशी वितंडवाद घातलास जेंव्हा मी बुमरा नि शर्माला विभागून द्यायला हवे होते कारण बुमरा हा भारतीय बॉलिंग च्या बदलामधला मह्त्वाचा फॅक्टर आहे असे म्हटलेले तेंव्हा. Lol

काहीही म्हणा पण या वेळीं आपला तोफखाना जरा जास्तच धाडडतोय , बिचारा कुलदीप कधी बोलिंग मिळेल याची वाट पहात होता.....

अय्यर नि सिराज ह्यांना एकत्र द्यायला हवे होते असे मला वाटते. शमी यायच्या आधी सिराज ने हवा काढलेली होती.>>>>> अग्रि ऑन सिराज. बॅटिंग बाबत असं आहे की ऐय्यर ला काढा किंवा गिल्/कोहलीला. स्कोअर कमी पडतो. पण बॉलिंग मध्ये खरी हवा कोणी काढली तर पहिली विकेट बुमराह आणि बाकी ३ सिराज. सिराजनी बेसिकली सगळ्या आशा आकांक्षांना डायरेक्ट सुरुंग लावला. त्यात ते टॉप ऑर्डर बॅट्समन होते! शमी नी बाकी सगळे गुंडाळले त्यात काहीच दुमत नाही पण पहिले ४ फार महत्वाचे.

नसीर हुसेन चे श्रेयसबद्दलचे निरीक्षण कसले अचूक आहे. तो अ‍ॅग्रेर्सीव्ह खेळला कि वेगळाच खेळतो.>>>>>> +१!!!!!
बॉस! काय सिक्स हाणल्या राव ऑन द अप! रोरावत अंगावर येणार्‍या फास्ट बॉलर ला असले बेदरकारपणे सिक्स मारणे म्हणजे.... अवघड रसायन आहे. खरं मी सुर्या ला आवारा पागल दिवाना म्हणतो पण आज श्रेयस निव्वळ टेरर वाटला मला. बारका बुरका माणूस अन काय वाजवतो एक एक शॉट, कमाल कमाल!

बॅटींग क्लिक होत होती नि तिघेही फास्ट बॉलर्स (शर्म, झहीर नि शमी) धुमाकूळ घालत होते. सेमी ला लॉ ऑफ अव्हेरेजेस् लागला नेमका.>>>>>> ह्याची मलाही भिती वाटून गेली पण मला वाटतं हा अ‍ॅटिट्युड, ही भिती आपण प्रेक्षक, फॅन म्हणून ठीक आहे, टीम मधल्या एकाही खेळाडूच्या मनात डोकवायला पण नको, चुकून सुद्धा कारण this is a no.1 formula to choke! It's typical human psychology to overthink and start coming into their own way/flow. This is exactly what happens to players during bad form. When you are thinking way too much about how to play, something is wrong! You just need to go there and play. Don't think about winning, don't think about losing, just play.
This doesn't mean you don't play with a winning and positive attitude. Not thinking about outcome is huge in any sport or in general in life too.

अजून एक गोष्ट म्हणजे मला वाटतं पुर्वी ऑसीजनी पुर्णपणे सिरिज शेवट पर्यंत डॉमिनेट करुन कप जिंकलेला आहे. आपली टीम त्याच टाईपच्या फॉर्म मध्ये दिसत आहे. न्यु झिलंड विरुद्धच्या आपल्या सामन्यात हे खास दिसून आलं कारण त्यांनी सॉलिड बिलिड केली इनिंग्स आणि आपल्याला आज मिळाले तितके ब्रेकथृ नाही मिळाले पण बॉलर लोकांनी लगाम टाईट धरुन ठेवला होता लाईन लेंत वर. म्हणजे विकेट पटकन नाही गेल्या पण फार मोठ्ठा स्कोअर उभा नाही राहिला आणि त्यामुळे आपण चेस करून जिंकू शकलो. ह्यावेळी आपली बॉलिंगच बहुतेक कप जिंकून देइल.

कोका कोला ट्रॉफी शारजा मध्ये असताना लंके ने आपल्याला ५४ मध्ये बाद केले होते , त्याचा आज बदला घेतला गेला
>>
29 oct 2000 to be precise...

ह्यावेळी आपली बॉलिंगच बहुतेक कप जिंकून देइल. >> तुमच्या तोंडात साखर वगैरे पडो असे म्हटले असते पण तुमचे दाएट आड येईल बुवा Wink

त्याचा आज बदला घेतला गेला > >अरे एशिया कप मधे पण असच धुतलेले ना वाईट ५० ला ऑल ऑउट करून. ते तर अजून नामुष्कीचे होते.

कालची match अगदीच एकतर्फी झाली.
Fight back दिसलाच नाही.
बॉल फार स्विंग होत होता.
शामी सिराज बुमराह त्रिकुट भारी जमलंय.
हे असे स्विंग आधी पाकिस्तानी बॉलर चे पाहिलेत.
आणि प्रॉपर line length बाबत एकदम खडूस म्हणजे मॅकग्रा
दोन्हीचे कॉम्बिनेशन दिसत होते काल.
Batting ला easy पिच अचानक कसे बदलले?

*Batting ला easy पिच अचानक कसे बदलले?* - पीचचं देखील घोड्यासारखंच असावं; स्वार कोण झालंय हे लक्षात आलं की त्यानुसार वागायचं !! Wink

फेफ Lol ५० आणि ५५. श्रीलंकन सिलेक्टर्स दोन्ही वेळच्या श्रीलंका संघांना एकत्र करून "वयं पंचाधिकं शतम्" असा उपदेश करतील Happy

Batting ला easy पिच अचानक कसे बदलले?
>>>>

सुरुवातीला १०-१५ ओवर मदत होती. पण लंकेने फायदा नाही उचलला. तसे गोलंदाजसुद्धा नव्हते त्यांच्याकडे. जो चालत होता त्याला फक्त ३ ओवर देऊन बदलला.

अर्थात रात्री जास्त मदत मिळाली. जे अपेक्षित होते. नंतर कमी झाली असती पण ती वेळ आलीच नाही.

त्यांची पहिली फलंदाजी असती तरी ते हरले असते. पण अश्या नामुष्कीने नाही..

आपणच एक असे संघ आहोत जे फलंदाजी पाहिली असो किंवा दुसरी दणकून जिंकत आहोत.

तरी आफ्रिकेसमोर येत्या सामन्यात आपण चेस करावे. आणि त्यांना पहिल्या फलंदाजीत रोखता येते का बघावे.

नेदरलंड रन ऑट झाली आज...
१८० टारगेट
व्हायला हरकत नाही...
अफगाण आहे स्पर्धेत... आता ऑस्ट्रेलिया आफ्रिका कोणाला धक्का देते का हे बघायला मजा आहे.

हो, ते तर आहे.
न्यूझीलन्ड आपले सामने जिण्कले तर प्रश्नच नाही.
बघितले तर लन्का पाक सोपे पेपर आहेत तुलनेत. निदान एक लंकेचा सामना जिंकला तरी १० गुण होतील.

२३ ओवर १५०-१
न्यूझीलंड गेअर चेंज करत मोठ्या स्कोअर कडे
३५० झाले तर पाकला अवघड.. सध्या त्यांची कॉन्फिडस लेव्हल डाऊन आहे...
की हीच ती वेळ आहे जिथे मोठा स्कोअर चेस करत कॉन्फिडन्स ऊंचवायचा..
पाकिस्तान जिंकली तर पॉईंट टेबल जिवंत राहील.. अन्यथा चार संघ ठरल्यात जमा

पांड्या नसल्याने आता बॉलर जपावे लागतील.
ऐन सामन्यात कोणालाही दुखापत होऊन चालणार नाही.
नेदर सामन्यात एक दोन वेगवान गोलंदाजांना विश्रांती देता येईल.
कोणाला गरज भासल्यास आफ्रिका सामन्यात सुद्धा त्या.
गोलंदाजी युनिट आता सेमीला ताजेतवाने आनि पुर्ण फिट हवे...

शर्मा, कोहली, गिल, अय्यर, सारेच नेटमध्ये गोलंदाजीचा देखील सराव करत आहेत... तशीच गरज पडली तर.

रवींद्र अफलातून फलंदाजी करतोय या स्पर्धेत ! आजही शतक !! न्यूझीलंड 350+ करण्याची दाट शक्यता. पाकवर मोठा दबाव येईल तसं झालंच तर.

न्यूझीलंड 350+ करण्याची दाट शक्यता. पाकवर मोठा दबाव येईल तसं झालंच तर.
>>
,400 झाले भाऊ, अन् बदल्यात पाक नी दुसऱ्या ओव्हर च्या शेवटी 6 च्या स्कोअर वर पहिला गडी गमावला

१० ओवर ७५-१
अपेक्षेपेक्षा चांगले खेळत आहेत सध्या तरी.... बराच लांबचा पल्ला आहे अजून

Pages