वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Red, white and Royal blue नावाचा चित्रपट आहे, मी चिकवावर लिहिले होते पण लिंक नाही आता. >>>> खरंच चांगला मुव्ही आहे हा. त्याचा सिक्वेल पण येतो आहे या वर्षात.

Sweet Bobby - My catfish Nightmare (Netflix )

फिल्म category मधे आहे, पण खरं तर सत्यकथेवर आधारित डॉक्युमेंटरी आहे. सुरुवात फार विचित्र erie वाटली. म्हणजे तुम्ही एका व्यक्तीला न भेटता virtual प्रेम प्रकरणातून किती टोकाचं involve व्हायचं आणि ते ही 7-8 वर्षे?
Wedding.con ची आठवण झाली. लग्नासाठी / प्रेमासाठी आसुसलेल्या आणि वय वाढत आहे आणि बाळ लवकर हवं आहे अशा घाईला आलेल्या स्त्रिया किती vulnerable असतात. कुठूनही किंचित प्रेम मिळालं तरी वाहवत जातात. ही घटना UK मधील असली तरी एका NRI पंजाबी मुलीबद्दल आहे.

ती मुलगी सत्यापर्यंत पोचली आहे असं वाटता वाटता, अचानक एक ट्विस्ट येतो. आणि फाडकन तोंडावर काही आपटल्यासारखा आपल्याला धक्का बसतो. सव्वा तासाची डॉक्युमेंटरी आहे. नक्की पहा.

Finding Ola चा दुसरा सीजन आलाय. हलका फुलका आहे हा सीजन पण. मला आवडला.
Bollywood wives पण आलाय पुढचा सीजन. Beverly hills बघितले असतील तर सेम कार्बन कॉपी आहे. म्हणजे og भंगार आहे, त्यात ही सिरीज म्हणजे og ची आठशे नऊशे वी कॉपी असेल. तद्दन भिकार. सगळे सी ग्रेड लोक. सगळ्यात फेमस नीलम म्हणजे काय असेल ते ठरवा. संजय कपूर ची दोन्ही मुले दिसायला बरी पण नाहीत, काहीतरी विचित्र ठेवण आहे चेहेर्याची खासकरून जबड्याची, तीच गत सोहेल खान च्या मुलाची. हे लोक स्टार किड्स म्हणून येणार आहेत मोठ्या स्क्रीन वर. देव आपले भले करो.
सेलिंग सनसेट पुढचा सीजन आलाय. टीपी नेहेमीप्रमाणे.

संजय कपूर ची दोन्ही मुले
सोहेल खान च्या मुलाची. हे लोक स्टार किड्स म्हणून येणार आहेत
>>>
हिंदी पिक्चर बघणं कमी करावं लागणार बहुतेक.

Bollywood wives पण आलाय पुढचा सीजन>>> पहिल्या सीजन चाच १स्ट एपिसोड अर्धा तास ही बघवला नाही..श्रिमंत लोकांचे सो कॉल्ड प्रोब्लेम्स..स्ट्रगल..

हे लोक स्टार किड्स म्हणून येणार आहेत मोठ्या स्क्रीन वर. देव आपले भले करो.>>> सुनिल शेट्टी ला सहन केले (तो नंतर सुधरला अ‍ॅक्टींग ला म्हणुन माफ) पण त्याच्या विचित्र लुकिंग मुलांना पण सहन करा..शाखाची अनेक गूड लुकिंग सामान वापरून तरी शाहरुख च दिसणारी मुलगी, अजय देवगण मुलगी ह्यांना बघून धीर सुटतो..

ह्यांच्या पेक्षा ऑफ बीट जिमी शेरगिल, संजय सुरी, पुरब कोहली, अर्जून रामपाल हे किती छान होते..

मीरा धन्यवाद, स्वीट बॉबी बघणार.

मला सुहाना काही ऍडमध्ये बरी वाटली, आवडली. मला शाहरुखची मुलगी हे लक्षातही नाही आलं, ट्यूब जरा उशिराच पेटली माझी.

जिमी शेरगिल डोळ्यात बदाम बदाम दिसतो. प्लस तो ॲक्टींग चांगली करतो. आणि रोल्स हटके घेतो. त्याचे साहिब, बिबी और गॅंगस्टर सिरीज, तनु वेडस् मनु सिरीजमधले रोल मस्त आहेत.
रामपाल चांगला दिसायचा पण ड्रग कॉंट्रोव्हर्सीमधे सापडल्यापासून आवडत नाही.

सुहाना दिसायला सामान्य आहे. तिची ॲक्टींग पाहिली नाही. पण फक्त लूक्सवरून जज करायचं तर (आणि भारतात अजूनतरी दृश्य मिडीयात गुड लूक्सला डोळे झाकून प्राधान्य मिळतं म्हणून (टॅलेंट वगैरे नंतर, भरपूर स्ट्रगल करून स्वतःला बिनशर्त प्रूव्ह केल्यानंतर)) शाखाची मुलगी नसती तर कुणी हिंग लावून विचारलं नसतं.

मिडनाईट मास, नेटफ्लिक्स. खुप आवडली >>> त्याच्या मेकरच्या - Mike Flanagan च्या - बाकीच्या मालिका पण चेक करा Netflix वर. चांगल्या आहेत.

हो Mike Flanagan च्या बाकीच्या मालिका ही मस्त आहेत, मिडनाइट मास तर फारच भारी. Haunting of the hill house पण ग्रिपिंग आहे खूप. Fall of house of Usher सुद्धा.
हिल हाउस आणि हाउस ऑफ अशर सुपरनॅचरल असल्या तरी एक सॉलिड लॉजिकल / सायकॉलॉजिकल बाजू आहे त्याला. बाकी इथे लिहीत नाही. बघा म्हणजे कळेल.

होय rmd, हिल हाऊस पाहिलेली पण आता ब्लाय मॅनर आणि हाऊस ऑफ अशर पण नक्की बघीन.

हिल हाउस आणि हाउस ऑफ अशर सुपरनॅचरल असल्या तरी एक सॉलिड लॉजिकल / सायकॉलॉजिकल बाजू आहे त्याला. बाकी इथे लिहीत नाही. बघा म्हणजे कळेल.
>>>होय हिल हाऊस मधले हॉरर सायकोलॉजिकलच आहे असे आठवतेय. हाऊस ऑफ अशर लघुकथा वाचलीये, ती पण मस्त आहे.

येस, जरूर बघा. एक मिडनाईट क्लब नावाची सिरीज पण आहे . ती ओके आहे, खूप ग्रेट नाही. या बाकीच्या जास्त चांगल्या वाटल्या.

करण जोहरच्या लाडक्या कुचाळक्या क्विन मधे अजुन तिनाची भर घालुन तिसरा सिझन आणलाय...अगागा! ओव्हर द टॉप खोटारडेपणा, नसलेला एलिगन्स दाखवायचा प्रयत्न...एकच भाग बघितलाय, नविन मधे रिधिमाच जरा बरी वाटतेय.

मी नेटफ्लिक्सवर सध्या मॉंक आणि क्लाऊड नाईन पाहत आहे . दोन्ही जुन्या आहेत . मोंक TV वर पहिली होती , आता दुसऱ्यांदा चालू आहे . क्लाऊड नाईन सिटकॉम आहे . मस्त आहे .

LL S3 बघायला सुरुवात केली.
पहिल्या 2 seasons पेक्षा खूप slow आहे. 2 एपि बघितले, अजून पकड घेत नाहीये.
मिकीचा कोर्टातला चार्म कमी होतोय. अगोदर courtscenes बघायला मजा यायची , आता ओढून ताणून वाटतायेत.
ती andrea डोक्यात जाते , तीच्या पाठीत कण्याऐवजी लाकडाची काठी असल्यासारखी चालते. Izzy आणि Lorna are best.

तीच्या पाठीत कण्याऐवजी लाकडाची काठी असल्यासारखी चालते >> Happy

ताबडतोप पाहिला नवा सिझन व पुढच्या सीझनची वाट पाहाणे सुरु केलं. यावेळचे वकिली डावपेच, शब्द, भाषा जरा अवघड होती. पण मिकी व त्याच्या ग्रूपचे संबंध फार छान दाखवलेत. व तरीही अ ती गोड वाटत नाहीत. (मलातर एका सीनमधे आपणही ही नोकरी सोडुन एखाद्या वकिलाच्या टीममधे क्राईम इंवेस्टिगेशन करायची नोकरी शोधावी वाटली).

उगाचच गंमत म्हणून Bollywood wives Vs fabulous lives बघायला सुरुवात केली.
नीलम मला sensible वाटायची इथे अगदीच मनातून उतरली.
दिसायला मला सगळ्या आवडल्या , सीमा- ईशा देओलची मोठी बहीण वाटते.
सगळ्यात जास्त मला शालिनी आवडली. She is like cute sweetheart kid.
काय प्रचंड श्रीमंत आहे ती. गरम पाणी हवं प्यायला तर स्टाफला सांगते , kitchnमें टीमको whatsapp करदो.
नेहमी luxury dresses घालते ती.
But atleast she didnt seem bi**y like other ladies .
केजो कधी कधी sensible बोलतो.

ते शालिनीचं , "what is vadapav" एकदम "what is weekend " ची आठवण करून देणार होतं .

स्वस्ति, Bolywood Wives Season 3 मी देखील पाहिली. त्या शुन्य बावळट्ट Bolywood Wives आवडल्या नाहीत. जेलस, मठ्ठ आणि negative आहेत. ( त्यातल्या त्यात सीमा बरी आहे. ) पण दिल्ली मधील तिघीजणी मला तरी ( season च्या नावाप्रमाणे fabulous वाटल्या. Classy आहेत)

टिपिकल नीलम मला sensible वाटायची इथे अगदीच मनातून उतरली. >>> हो, अगदीच आवडली नाही.

सगळ्यात जास्त मला शालिनी आवडली. She is like cute sweetheart kid. >>> याच्याशी देखील सहमत आहे. थोडी ढ वाटते, पण काही बोलण्यावरून वाटले की नसावी. खूप pure soul आणि positive वाटली.

. खूप pure soul आणि positive वाटली. >>> exactly . ती जे पण काही करते , वागते ते ती तशी आहे किंवा स्वतःला तसं बनवलयं म्हणून. उगाचच शो-शा साठी तात्पुरतं नाही. तिचा नवरा पण कसला down to earth माणूस वाटला. चंकी पांडेने सांगितले की त्याच्या सासर्यांसाठी शालिनीच्या नवर्याने plasma donate केला होता. (Plasma tv नाही Happy . , medical term plasma )

LL s3 बघून संपवला . आता S4 ची वाट पहाणं आलं . शेवटचे 2-3 episodes fast आहेत. Lorna is best . त्या सगळ्यांच bonding खरच मस्त आहे.

Murder Mindfully : Netflix . ( मूळ जर्मन)
हिरो एक lawyer आहे. सतत कामात अडकलेला. त्याचे अशील सरळ साधी माणसं नाहीत , गुन्हेगार आहेत. बायको , त्याचं घराकडे दुर्लक्ष होतं , 4 वर्षाच्या मुलीला वेळ देत नाही म्हणून वैतागली आहे.
ती त्याला एका mindfulness practitionerकडे जायला सांगते. मुलीसाठी म्हणून तो नाईलाजाने तयार होतो. थोडा मनाविरुद्धच डॉक्टरला भेटतो. पण मग त्याच आयुष्य बदलतं. आपली मुलगी त्याची priority बनते.
एका weekend ला तो मुलीला घेऊन lake house ला picnic ला जात असताना , त्याच्या client - drug cartel boss ड्रैगनचा फोन येतो. त्याला ताबडतोब भेटायला बोलवतो. हा नाईलाजाने मुलीला घेऊन ऑफिसमध्ये जातो. एका प्रकरणात अडकल्यामुळे ड्रैगन मदत मागतो म्हणजे ते निस्तरायचे आदेश देतो. Mindfulness techniques शिकल्यामुळे आता वकिलाच्या priorities clear आहेत. आपलं आयुष्य आपली मुलगी त्याला जास्त जवळचे आहेत.
आणि मग अनिच्छेनेच तो ड्रैगनला मदत करायला तयार होतो. आणि मग सुरू होते black commedy .
2-3 एपिसोड्स बघितले , टाईमपास वाटली. थोडी stretched आणि gross आहे.
प्रत्येक वेळी कुठे फसल्यावर त्याला mindfulness चे sessions आठवतात . खरतर , आपल्यालालाही practice करायला हरकत नाही अस वाटलं .

सीटाडेल - हनीबनी

बघितल्यावर एक गाणं आठवलं - 'कसा पिसारा फुलला'. पिसं काढायची असल्यास प्राइमवर बघू शकता.

'कसा पिसारा फुलला' >> हे पिक्चरचे नाव आहे? Happy

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या काळातील घटनांवर "फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट" हे फेमस पुस्तक आहे. त्यावर बेतलेली याच नावाची सिरीज सोनी लिव्ह वर रिलीज झाली आहे. थोडी बघायचा प्रयत्न केला. पुस्तक वाचलेले आहे पण त्यातले डिटेल्स आता पार विसरून गेलो आहे. सिरीज चे सादरीकरण इतके एंगेजिंग वाटले नाही. बघत राहीन अधूनमधून असे वाटते. मुख्य म्हणजे यातले गांधी व नेहरू यांचे कास्टिंग बरोबर वाटले नाही. दोघेही प्रभावी वाटत नाहीत. "गांधी" पिक्चरने व बेन किंग्जलेच्या कामाने गांधीजी या व्यक्तिरेखेचा बार इतका वर सेट केला आहे की इतर कोणी त्या रोल मधे पटत नाहीत. थोडेफार रोशन सेठच्या नेहरूंचेही तसेच आहे.

मी याची ॲड यूट्यूब वर बघितली, सतत लागत आहे.
नेहरू म्हणजे तू लिहिलेले 'क्षौर केलेले कोहली तरूण' वाटले. एकताच्या मालिकेतून निघताच कोट-टोपी घालून अवतीर्ण. गांधी गांधीपेक्षा जास्त बेन किंगस्लेची ॲक्टिंग करतोय असे वाटले. Happy

शेवटच्या चार ओळींना अनुमोदन. रोशन सेठ - नेहरू आणि भारत एक खोज समिकरण डोक्यात फिट्ट बसले आहे. 'सृष्टी से पहले सत नही था असत भी नहीं' वाजायला लागते.

माधव, समान्थाची ना. मला ती प्रियांकाची सिटाडेल वाटली आधी.

सृष्टी से पहले सत नही था असत भी नहीं >>> जाम आवडायचं हे ऐकायला. उगाच गूढ वगैरे पण वाटायचं. मला उगाचच त्या सिरीजमधे कधीतरी युनिव्हर्स कसे निर्माण झाले वगैरे दाखवतील असं वाटायचं. पण काहीतरी भलतंच दाखवत राहिले ते शेवटपर्यंत Proud

रमड, ऋग्वेदातील (१० वेळ मंडल), नासदीय सुक्ताचा हिंदी अनुवाद आहे तो. आजकाल लोक ऋग्वेदाचा काळ पार २००००+ वर्षे आधी सांगतात पण किमान ४००० वर्षे आधी ऋग्वेद रचला गेला असं मानायला जागा आहे. हो चार हजार वर्षांपूर्वी लोक नुसत्या डोळ्यांनी आकाशात दिसणारे तारे पाहून 'बिग बॅंग' च्या जवळ जाणारे विचार करत होते हेच गुढ आहे.

'भारत एक खोज' मलाही टायटल साँग पुरती आणि नेहरुंपुरती आठवते. परत एकदा बघायला हवी.
संसद टीव्ही म्हणून एक युट्यूब चॅनल आहे. त्यात भारतातील पुरातन शासन व्यवस्था अशा काही तरी थीम वर चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांची मालिका आहे. त्यात पहिले दोन भाग वेदकालीन शासन व्यवस्थेवर आहेत. ते चांगले केले आहेत. सायनाचार्य आणि त्यांच्या जवळचे लोक विष्फला कोण होती (घोडी की स्त्री) इ. चर्चा करतात वगैरे संदर्भ अचुक पेरले आहेत. मस्ट वॉच.

चार हजार वर्षांपूर्वी लोक नुसत्या डोळ्यांनी आकाशात दिसणारे तारे पाहून 'बिग बॅंग' च्या जवळ जाणारे विचार करत होते हेच गुढ आहे.
>>> Happy अगदी. मी काही महिन्यांपूर्वी लिहिलेला अतिशय क्लिष्ट असा Can you hear the music..! लेख साधारण याच थीमच्या आसपास जाणारा होता. तेव्हा या विषयावर फार विचार केला होता.
इंट्रेस्टींग पोस्ट पर्णीका. Happy चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांची मालिका नोट केली आहे.

काहीतरी भलतंच दाखवत राहिले ते शेवटपर्यंत >>> Proud

Pages