हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
खरेच की, "भारतावर हल्ला,
खरेच की, "भारतावर हल्ला, स्वतच्या देशात काय होते लक्ष नाही का, soros" वाले सगळे गायब झाले की.
काही म्हणा पण शिस्त आहे
काही म्हणा पण शिस्त आहे त्यांच्यात.
आदेश आल्या शिवाय एक कॉमेंट लिहीत नाहीत.
भूमिगत होतात.
एकजूट पण आहे.
आदेश आला की जो मजकूर दिला आहे सरदार नी तितकाच सर्व समाज माध्यमावर धडाक्यात फिरवला जातो.
खुप उस्तहाने.
मोहीम संपली की परत भूमिगत.
स्वतच्या देशात काय होते लक्ष
स्वतच्या देशात काय होते लक्ष नाही का
नाई न देवा, अटीच तर हाओ, मी कुटीच जायत नाई न देवा, फक्त जरा वखर वाई सुरू होती खरपाच्या पैलेची वावरात तेच्यानं ट्रॅक्टर तेल पानी सोकारी सालदाराईचे जेवन खावन इत्यादी मदी लागेल होतो.
बाकी, अर्थशास्त्रात जरी मले खास गती नशीन तरी मानवी मानसशास्त्र विषयात आहे उलशिक. बोलाले काई नाई पर बोलून बी काई नाई
त्यापायी,
थोरा मोठ्याईचा हेला गामन म्हनतो अन् खाली बसतो देवा हो.
दोन चार मिंटाच्या मजेपाई उजवा शिक्का (कवा डावा शिक्का बी) कोनी लावून घ्या डोकश्यावर, नाई ?
तरी बोलायचे असन तर आपली मना नाई पर वैयक्तिक होन्यात पाईंट नाई.
सादर जय गजानन
In response to another
In response to another question, Gandhi said, "My name is not Savarkar, it is Gandhi and Gandhi never offers apology."
<<<दोन चार मिंटाच्या मजेपाई
<<<दोन चार मिंटाच्या मजेपाई उजवा शिक्का (कवा डावा शिक्का बी) कोनी लावून घ्या डोकश्यावर, नाई ?>>>
नाय व महाराजा, इथं उजवे डावे हा प्रश्नच यत नाय. इथ प्रामाणिक आणि अप्रामाणिक प्रश्न हाय जी. रीपोट मदे काय लिवलय ते सोडून कोन जर निक्क त्या हिंडणबर्ग्या बद्दल बोलत असल, ते पण काही बी, तर मी त्याला अप्रामानिक म्हंनार.
<<<अर्थशास्त्रात जरी मले खास गती नशीन तरी मानवी मानसशास्त्र विषयात आहे उलशिक.>>>
अर्थशास्त्रात गती इथ कुनाला असून राहिली व? आव अर्थशास्त्र लै मोठा इषय झाला. पण शेअरचे भाव फुगवले असे कोन म्हणत असल तर उत्तर देशभक्ती नाय होऊ शकत ओ. त्यासाठी तपास व्हावा लागतो.
आणि मानसशास्त्रात गती असल बुवा तुम्हासणी. आर्थिक बाबी उडवायला तुम्ही मानसशास्त्राचा वापर करत असाल तर म्या पामराला कोप्र्यापासून हात जोडण्याखेरिज पर्याय बी नाय महाराजा.
<<<अटीच तर हाओ, मी कुटीच जायत नाई न देवा, फक्त जरा वखर वाई सुरू होती खरपाच्या पैलेची वावरात तेच्यानं ट्रॅक्टर तेल पानी सोकारी सालदाराईचे जेवन खावन इत्यादी मदी लागेल होतो.>>>
आटोपली ना आता ही समदी कामं ? आता चार सबुद बोलला तर चालल राया. आता खर रिपोट मध्ये काय लिवलय ते बगा. आन त्या रिपोट वर काय व्हावे ह्यावर तुमचे मत द्या.
जय हरी विठ्ठल.
असं म्हनता त ऐका,
असं म्हनता त ऐका,
पईले त ज्यानं रिपोर्ट वर शंक्या घेल हाय त्याले "बिन कामाचा देशभक्त" म्हनन्यात काईच पाइंट नाई असे मले वाटते. ज्याले जशी वाटन तशी देशभक्ती कऱ्याचा हक्क आमच्या बाबासाहेबांनी देल होय.
दुसरं, रिपोर्ट वरी काई बी बोलाचं हाव कोनी बी सरक्या वानाने सरका विचारन का बुआ
हा रिपोर्ट कोनी काढेल होय ?
ह्या अन् अश्या तेनं आदी काढेल रिपोर्ट जितले असतीन ते कुठल्या पद्धतीनं काढेल हाव ?
हे रिपोर्ट काढन्याची तसदी घेनार मधल्या संस्थेले/ अडत्याले काई फायदा होय काय ?
आता सुलभ भाषेतनी मले ह्याचे उत्तर भेटले त मले त्यानंतरच्या पावलात रिपोर्टच्या अंद्रे जे काई लीहेल होय त्यावर प्रश्न पडतीन
अजून उदाहरन देता,
मले अनोडखी सोर्स मधून मस्त गिफ्ट आले का पयले विचार का बावा हे
कोन पाठवू राहला?
काऊन पाठवू राहला ?
काय पाठवू राहला?
कसं पाठवू राहला?
कधी पाठवू राहला ?
ह्यांचे उत्तरं देयाची कोनाची तयारी असन तर रिपोर्टच्या आंद्रे काय लिहिल होय ते अभ्यासाची आमची बी पूर्ण तयारी हाव न बाप्पा.
लागन त त्या explanation ले Pro Hindenberg pitching वाटू देसा मी सोताच्या खर्चानं त्याहीले शिफारस पाठवन, पर आपला पाईन्ट शिंपल होय
१. संस्थेची पत अन् हेतू establish करा
२. रिपोर्टची प्रत अन् दाखले क्रॉसचेक करा
३. मजकुराचे जे काही साधक बाधक अशीन त्यावर चर्चा करा
डायरेक्ट मुद्दा क्र. ३ वर आपुन भरोसा कसाच ठुत नाई
मुद्दा क्रमांक १ वर पुऱ्या भारतात रिपोर्ट समर्थक अन् विरोधक एक बी यक्ती कवा च्यानल बोलेल दिसत नाई. इथं तरी कोनी बोलावं ही अपेक्षा हाव
तेच्यानं रिपोर्ट वर शंका घेनारे लोकं हे "मूर्ख अंधभक्त गुलाम" असतीनच हे काई गृहितक असन त पईले ते सोळा. शंका घेनारे बहुसंख्य तुमाले गुलाम वाटत असतीन अन् ते तशे असतीन तरी तो तो तुमचा/ त्याहीचा राजकीय सोय अन् घटनात्मक हक्काचा विषय होय तेच्यात कोलदांडा घालणारे आपून कोनीच नाई पर वस्तुनिष्ठ चर्चा कराची असन तर
आपुन बेसिक से शुरू मांगता हय.
आर्थिक बाबी उडवायला तुम्ही मानसशास्त्राचा वापर करत असाल तर म्या पामराला कोप्र्यापासून हात जोडण्याखेरिज पर्याय बी नाय महाराजा.
मले असं वाटत आहे की बा आर्थिक बाबी ह्या लई टायमाले sentiment वर बी चालतेच तेच्यानं मानसशास्त्र अन् अर्थशास्त्र लॉजिक क्रॉस ओवर होऊ जमत नोय असे मले काई वाटत ना.
वायलं बोलता, मी कोणता बी मुद्दा उडवू नाई रायलो तर पुऱ्या मुद्द्याच्या बेसिक पासून खरवळू राहलो, पटलं त बघा बाप्पा.
(गिमिक भाषेत टाईप करणे
(गिमिक भाषेत टाईप करणे कंटाळवाणे आहे.)
१. Hindenburg ने पुरावा न देता काही लिहिले आहे का, जिथे Hindenburg ची authority आहे म्हणून मुद्दा मान्य करावा लागेल ???
शेल कंपन्या आणि मार्केट मनीप्युळेशन वगळता इतर पूर्ण रिपोर्ट पबलिक माहितीवर आधारित आहे. अडाणी शेअर खूप ओव्हर्व्हाल्युड होता\आहे हे काही शिक्रेट नाही आणि नव्हते.
मग असे असताना hindenburg ची "पत" कशाला बघायची ? "मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवा" असे ती संस्था कुठे म्हणते आहे काय ?
हेतू काय तर शेअर शॉर्ट करून पैसे मिळवणे. हा.
बर, आणि पत काय आहे हे बघायची असेल तर ट्रॅक रेकॉर्ड बघा. पूर्ण चूक आणि खोट्या माहितीवर आधारित किती रिपोर्ट आले हे पहा. आणि किती रिपोर्ट खर्या महतिवर आधारित हे पहा. पत पाहण्याचा निकश "तुम्ही अमुक कंपनीवर का लिहिले नाही" हा कसा होईल ? कोणत्या विश्वात कंपनीची पत बघायला whataboutry करतात ???
Hindenburg टार्गेट वर काही वर्षे रिसर्च करते आणि रिपोर्ट प्रकाशित करते. त्यांच्या अडाणी रिपोर्ट ची क्रेडिबिलिटी कमी करण्यासाठी त्यांनी SVB का शॉर्ट केली नाही हे विचारणं म्हणजे BUFFET ने apple आणि कोका कोला मध्ये पैसे लावले पण फेसबुक गुगल अमेझॉन वर का लावले नाहीत, म्हणजे buffet क्रेडिबल नाही. असे म्हंन्यासारखे आहे. प्रत्येक सेक्टर आणि प्रत्येक कंपनीचा अभ्यास रिसर्च संस्थांनी करावाच, नाहीतर ते क्रेडिबल नाहीत हे म्हणणे शुद्ध मूर्खपणाचे आहे.
बर आतापर्यंत काय म्हणणे होते की अमेरिकन कंपनीकडे का बघत नाहीत ? आज ब्लॉक वर रिपोर्ट आला तर आता hindenburg एकदम क्रेडीबल झाला म्हणता येईल काय ?
इथे वाचा ट्रॅक रेकॉर्ड -
https://www.financialexpress.com/industry/what-is-hindenburg-research-wh...
<<>>
शेल कुंपण्यांनी मार्केट हॅण्डल केले ह्या संशोधनात कसले मानसशास्त्र वापरणार समजावून सांगावे ही विनंती.
आपल्यासमोर प्लेट मध्ये दोन
आपल्यासमोर प्लेट मध्ये दोन पुरणपोळ्या आल्या व चव बघा असे विचारले गेले तर आपण त्या खाऊनच चव बघू. गहू बन्सी आहेत की सरबती, डाळ तुरीची की हरभर्याची, रेसिपी हेब्बार ची की संजीव ची वगैरे चर्चा करत नाही. सर्वोत्तम घटक वापरूनही वातड पुरणपोळी होतेच, स्वस्त घटक वापरून चांगलीही होऊ शकतेच.
इथे या हिंडेनबर्ग ने आपला रिपोर्टच समोर ठेवला आहे. दूध का दूध व पानी का पानी. त्यात काही खोटे असेल तर सहज सिद्ध करता येइल. त्यासाठी जन्मकुंडली वगैरेची गरज नाही.
गिमिक भाषेत टाईप करणे
गिमिक भाषेत टाईप करणे कंटाळवाणे आहे.
विषयांतर कराचा विषय नाई पर तुमाले जमत नाई ते भाषा गिमिक असते अशे काई म्हनने अशीन तर आमचा बी कोपरा पासून रामराम समजा दादा, आमची भाषा आमची होय, तुमाले तिच्यात टाईप कराची गरज नोती अन् असा काई आग्रह बी नोता आमचा, अमाले तुमची प्रमाण मराठी समजते. कृपया कोन्या समृद्ध बोली ले गिमिक वगैरे म्हनने टाडावे.
रामराम.
माझ्यासाठी तसे टाईप करणे
माझ्यासाठी तसे टाईप करणे गीमिक आहे, कारण मी तसे बोलत नाही. त्यात भाषा समृद्ध नाही, बोलीभाषा श्रेष्ठ वैगरे काही जजमेंट नाही. तुम्ही अवश्य तसे बोला.
(कपाळाला हात लावलेली पण काहीशी खजील बाहुली.)
आता विषयाकडे,
आता विषयाकडे,
जर कॉमी अन् विजय भाऊ म्हनत असतीन तर मुद्दा मान्य कराच लागन. जाता कुटी !
बर, आणि पत काय आहे हे बघायची असेल तर ट्रॅक रेकॉर्ड बघा. पूर्ण चूक आणि खोट्या माहितीवर आधारित किती रिपोर्ट आले हे पहा. आणि किती रिपोर्ट खर्या महतिवर आधारित हे पहा.
बस हेच मी बी म्हनतो महाराज.
पत पाहण्याचा निकश "तुम्ही अमुक कंपनीवर का लिहिले नाही" हा कसा होईल ? कोणत्या विश्वात कंपनीची पत बघायला whataboutry करतात ???
ईचारलं तर बिघळते काय ? पत निकष म्हणून नाई तर किमान जुन्या केशी म्हणून ? Whataboutry हे लैच काई त्याज्य असल्याचे कहाले प्रोजेक्ट केले जाते ? पोस्ट ट्रूथ सोसायटीत जगू राहलो आपन देवाहो. तू मले आज असा बोलतं त तूनं त्या वख्ती तसे काहून नाई बोलला हे तर पब्लिक इचारतेच इचारते, तुमाले रूचो का ना रुचो बावा.
माझ्यासाठी तसे टाईप करणे
माझ्यासाठी तसे टाईप करणे गीमिक आहे, कारण मी तसे बोलत नाही. त्यात भाषा समृद्ध नाही, बोलीभाषा श्रेष्ठ वैगरे काही जजमेंट नाही.
--------------
तुमच्या वन लायनर मधून जशे दिसले तशे बोललो हो पांडुरंगा. तुमाले लागन तशे तुमी बोला मले जे जमते ते मी बोलन, तेच्यासाठी खजील होयाची गरज नोय.
(माह्या इकुन पूर्णविराम)
ई. ई.
Whataboutry establishes
Whataboutry establishes hypocrisy. पत नाही. विश्वासार्हता नाही. जर whatqboutry मुद्दा खोडायला वापरली तर ती त्याज्यच असते. तिचा परीघ केवळ दुटप्पीपणा दाखवणे इतकाच असतो.
आणि, मुळात, hindenbrg ने SVB वर का नाही लिहिले ही WHATABOUTRY म्हणून सुद्धा शुध्द भंकस आहे. not even good whataboutry as far as whataboutries go.
प्रत्येक रिसर्च कंपनीने प्रत्येक कंपनीचा रिसर्च करावा ही अपेक्षा शुद्ध
मूर्खपणाचीअतार्किक आहे.हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये
हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये आलेल्या गोष्टी खोट्या आहेत, असं अजून तरी कोणी म्हणताना दिसत नाही. तो रिपोर्ट सोडून इतर गोष्टींवर बोलण्यात वेळ आणि शक्ती का वाया घालवावेत? आणखी एक डायव्हर्शन टेक्निक.
प्रत्येक रिसर्च कंपनीने
प्रत्येक रिसर्च कंपनीने प्रत्येक कंपनीचा रिसर्च करावा ही अपेक्षा शुद्ध मूर्खपणाची आहे.
-------&-----
असन बुआ, तुमाले जास्त कडते, पर प्रत्येक रिसर्च कंपनीनं किमान ज्या कंपनी डामाडोल हायत (अदानी सकट) त्याहीच्यावर रिसर्च करावं ही अपेक्षा बी असते लई साऱ्या मूर्ख लोकायची.
मुडात मुद्दा सिंपल होय, अदानी महा सख्खा नाई का माह्यापाशी त्याचे शेअर बी नाईत, थो लै कमी टायमात लै लंबा पयाला हे बी गोठ खरी होय, पर somehow मले असे वाटते का बुआ ह्याचा अजून सखोल ईचार होने पडते. अदानी वाचवा (थो चुकीचा अशीन तर) हे नाही माहे म्हणनं पर जे reporting mechanism अन् techniques संस्थात्मक पातडीवर घेता येतीन ते घेऊन आपली सिस्टीम फाईन ट्यून व्हावी इतली माही सदिच्छा होय.
अन् कॉमी तुमचा काई राग संताप
अन् कॉमी तुमचा काई राग संताप होयल अशीन तर जरा शांत होऊन घ्या देवा. कधी कोन्या भाषेले गिमिक म्हणा तर कधी कोनाच्या अपेक्षेला मूर्खपणा म्हणाव इथ लग थांबलं तर बरं होईन हे हात जोडून नम्र विनंती.
वैयक्तिक होन्यात रस नाई पर ह्याहून जास्ती झालं तर ईचार करावं लागन, धन्यवाद.
<<<प्रत्येक रिसर्च कंपनीनं
<<<प्रत्येक रिसर्च कंपनीनं किमान ज्या कंपनी डामाडोल हायत (अदानी सकट) त्याहीच्यावर रिसर्च करावं ही अपेक्षा बी असते लई साऱ्या मूर्ख लोकायची.>>>
१. ही अपेक्षा
मूर्खपणाचीचुकीची आहे. असा रिपोर्ट प्रकाशित करायला वर्षांचा अभ्यास असतो. सगळ्या गोष्टी एकाच संस्थेच्या स्कॅनर मध्ये येतीलच असे नाही. प्रत्येक सेक्टर कडे बघण्याईतकी तांत्रिक पात्रता सर्व संस्थांकडे असेलच असे नसते.२. त्याचा अडाणी रिपोर्टशी आणि संस्थेची "पत" ठरवण्याशी काडीमात्र संबंध नाही.
<<< संस्थात्मक पातडीवर घेता येतीन ते घेऊन आपली सिस्टीम फाईन ट्यून व्हावी इतली माही सदिच्छा होय.>>>
म्हणजे काय ? स्पेसिफिकली सांगितले तर बरे होईल.
जाऊ द्या,
जाऊ द्या,
आपून शरण आलो, एकतर काई समजत नाई काई नवे शिकावं म्हणो तर लोकं मूर्ख म्हणते.
ज्याले अदानी वाचवाचा त्यानं वाचवा ज्याले धोपटून काढाचा त्यानं धोपटा, आपला रामराम.
ब्वॉर्र.
ब्वॉर्र.
हाऊ ना मंग,
हाऊ ना मंग,
राजकारणाच्या कृपेनं मुद्दे काई कमी नाईत, नसतीन, तदलोग हा ब्वॉर्र आपल्यापाशी जमा. तयारी ठुजा फक्त नगाले नग बोलाची...
संस्थात्मक पातडीवर घेता येतीन
संस्थात्मक पातडीवर घेता येतीन ते घेऊन आपली सिस्टीम फाईन ट्यून व्हावी इतली माही सदिच्छा होय.
जे Hindenberg ले दिसले ते आधीच बोंबलून सांगनारी एखाद देशी सिस्टीम असावं असं मले वाटते, सुलभपने सांगता.
Hindenberg शी ,अडाणी शी,मोदी
Hindenberg शी ,अडाणी शी,मोदी शी सामान्य लोकांचे काही देणेघेणे नाही.
रिपोर्ट खरा की खोटा ,भारतावर हल्ला आहे की नाही .
काही देणेघेणे नाही.
पण घोटाळा होतो म्हणजे मोदी च काही जाणार नाही.अडाणी चे काही जाणार नाही.
Hindenberg चे काही जाणार.
भारत सरकार चे काही जाणार नाही.
नुकसान होईल ते सामान्य लोकांचे ज्यांनी कष्ट करून कमावलेले पैसे बँकेत ठेवले आहेत .
आणि त्याच पैशा वर ह्यांचे खेळ चालू आहेत.
थेट भीती लोकांस तीच आहे आमचे पैसे तर dubnar नाहित ना?
आणि ही लोकांची भीती कमी करण्यासाठी adani आणि त्याचे धंदे,सरकार ची भूमिका .
ह्यांची निःपक्ष चोकशी व्हावी.
बाकी राजकारण,उजवे, डावे,देशावर हल्ला ह्याच्या शी काही देणेघेणे नाही.
आणि सरकार चोकशी करायचे टाळत आहे .
म्हणजे सामान्य लोकांच्या पैशावर मिळून दरोडा टाकला नसेल कशावरून
Adaani मध्ये बँकांचे
Adaani मध्ये बँकांचे एक्स्पोजर फार नाहीये. निव्वळ शेअर तारण असलेली कर्ज आणखी कमी आहेत. त्यामुळे अडानी पडला तर भारतीय बँकिंग व्यवस्था कोलमडेल किंवा खात्यातले पैसे बुडतील ही भिती अनाठायी आहे.
Directly किंवा indirectly
Directly किंवा indirectly ह्या प्रकरणं मुळे बँकिंग क्षेत्र किंवा बाकी finance institute ह्यांस आर्थिक फटका बसणार नसेल तर .
ह्या प्रकरणाचे सामान्य लोकांशी काही देणेघेणे नाही.
उगाचच आपण आपला बीपी वाढवून घेत आहे
<<संस्थात्मक पातडीवर घेता
<<संस्थात्मक पातडीवर घेता येतीन ते घेऊन आपली सिस्टीम फाईन ट्यून व्हावी इतली माही सदिच्छा होय.
जे Hindenberg ले दिसले ते आधीच बोंबलून सांगनारी एखाद देशी सिस्टीम असावं असं मले वाटते, सुलभपने सांगता.
Submitted by इत्यादी इतिहासकार on 25 March, 2023 - 08:45>>
------- देशी सिस्टीम - आपल्याकडे SEBI नावाची, Statutory body, आहे.
मॉरिशस, UAE आणि कॅरिबियन सारख्या देशातून मोठी गुंतवणूक होत असतांना सरकारी तपास यंत्रणेच्या नजरेला समजले नाही असे मानणे भाबडेपणा ठरेल.
"H -बग " या १० लोकांच्या भारतीय कंपनीने संशोधन करुन अहवाल दिला असता तर त्या कंपनीत काम करणार्या जिवांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. जिथे सिस्टीम मधे कार्यरत असणार्या विविध मोठ्या तपास यंत्रणा/ संस्था काही करु शकत नाही, तिथे ८-१० लोकांच्या लहान कंपनीने काय केले असते?
लोकसभेत या ज्वलंत विषयावर किती खोलवर चर्चा झाली हे सर्वांना दिसत आहे. सिस्टीम सुधारावी असे वाटत असेल तर सिस्टीम बिघडली आहे हे आधी मान्य करावे लागेल.
मग तुमचा JPC ला विरोध नसेल
मग तुमचा JPC ला विरोध नसेल असा विश्वास आहे ई. इतिहासकार. JPC ने अडाणी प्रकरण तर पाहावेच आणि "देशी सिस्टीम" मध्ये काय करता येईल हे पण सांगावे, हो ना ?
बोफोर्सच्या दिवसांत, राम
बोफोर्सच्या दिवसांत, राम जेठमलानी रोज दहा प्रश्न विचारायचे... सलग ३० दिवस... एक्स्प्रेसमधे तसेच इतरत्रही प्रसिद्ध व्हायचे.
त्याकाळांत पत्रकारांना / पत्रकारितेला जे काही स्वातंत्र्य होते, आज तेव्हढेही स्वातंत्र्य राहिलेले दिसत नाही.
हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यावर किती पत्रकारांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे?
सरकार ने आपल्या मर्जीतल्या
सरकार ने आपल्या मर्जीतल्या उद्योगपतीवर मेहेरनजर करणे वगैरे नवे नाही. पण एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी सलग १० दिवस संसदेचे कामकाज बंद पाडणे ( सत्ताधारी पक्षाने हे करणे ७० वर्षात झाले नाही) गुजरात मधून कोर्टाचा निकाल मॅनेज करणे, मग लगेच संसदेतून हाकलणे, घर खाली करवणे.. हे अभूतपूर्व आहे. एका उद्योगपतीसाठी सारी लोकशाहीच पणाला लावणे !
उद्योगपती साठी नसणार .
उद्योगपती साठी नसणार .
हजारो कोटी चे लाभार्थी सत्ताधारी पक्ष असू शकतो.
बिंग फुटू नये म्हणून सर्व चालले असावे.
सरकार बदलेले तेव्हा सत्य माहीत पडेल च
EPF च खूप मोठा पैसा अडाणी
EPF च खूप मोठा पैसा अडाणी च्या कंपनीत epf नी गुंतवला आहे आणि अजून epf पैसे गुंतवत आहे .
अशा न्यूज मीडिया मध्ये आहे.
2022 चे व्याज आता मार्च 23 ला दिले आहे.
लोकांचा कष्टाचा पैसा असा सर्रास उडवला जात आहे.
पण भक्तांचे डोळे अजून काही उघडत नाहीत.
हिंदू ,राम मंदिर,पाकिस्तान,मुसलमान ह्या मध्येच भक्त अडकले आहेत..उत्तरेच्या राज्यातील अडाणी जनतेचा bjp वापर करून घेत आहे
Pages