हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.
गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.
सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.
हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.
हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.
२०१७ ची बातमी
२०१७ ची बातमी
Govt blacklists 300,000 shell company directors in corporate sector clean up
२०२३ No data available on offshore shell companies owned by Indians: MoS Finance in Rajya Sabha
No data available on offshore
No data available on offshore shell companies owned by Indians: MoS Finance in Rajya Sabha >> गौतमदासची करणी!
To be completely fair, पहिली
To be completely fair, पहिली बातमी भारताच्या roc ने भारतात रजिस्टर असणाऱ्या कंपन्यांवर केलेल्या कारवाई बद्दल आहे. ऑफशोअर कंपण्यांबाबत नाही. दुसरी बातमी ऑफशोअर शेल कंपनीज बद्दल आहे.
NDA =No data available. How
NDA =No data available. How many times has this government given this reply?
EPFO invests in NIFTY index fund. Adani Enterprises and Adani Ports are part of Nifty . They have not been removed from Nifty even after two months. So EPFO continues to invest in these two shares. Neither of these would use their discretion.
https://www.adaniwatch.org
https://www.adaniwatch.org/exclusive_adani_group_s_china_connection_alle...
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्ती यांनी सेबीला दोन महिन्यात चौकशी अहवाल देण्यासंबंधी सांगितले . सेबी च्या कुठल्याशा महत्वाच्या कमिटीवर अडाणीचे जवळचे नातेवाईक ( सिरिल श्रॉफ ) काम करतात , अजूनही काम करत आहेत का? conflict of interest शी काही देणेघेणे नाही.
सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहा तज्ञांची समिती तयार केली आहे, पण यांना माहिती कोण पुरवणार आहे? सेबीच.
याचाच परिणाम म्हणून अडाणी सेलच्या पगारी नोकरांनी CJI ना आपले लक्ष बनविले आहे.
सेबीचे माजी अध्यक्ष यु के
सेबीचे माजी अध्यक्ष यु के सिन्हा आता अदाणी ग्रुपच्या एन डी टी व्ही या कंपनीवर डिरेक्टर झालेत.
केन नावाच्या भारतीय संस्थेने
केन नावाच्या भारतीय संस्थेने अडानी कंपनीने पूर्ण कर्ज परतफेडीचा दावा केलेला त्याला चॅलेंज केले आहे. त्यांचे म्हणणे आहे, की संपूर्ण प्लेज केलेले शेअर रिलीज झाले असल्याचे बँकेकडून आणि कंपनीकडून, कसलेही डिस्क्लोजर आले नाहीये. त्यामुळे पुन्हा काल अडानी स्टॉक पडले. मूळ केन अहवाल पेवॉल मागे आहे.
https://m.economictimes.com/markets/stocks/news/adani-stocks-lose-up-to-...
अडाणी, हिंडेनबर्ग, सावरकर
अदानी, हिंडेनबर्ग, सावरकर ह्यांत आता स्वारस्य राहिलेले नाही. आता फक्त एकच सनसनीखेज तोडक्या ( तुटक्या नव्हे)बातमीची आस आहे.
CJI ची पदावनती किंवा हकालपट्टी आणि शिवाय ED वगैरेंमुळे तुरुंगवास. इथे हकालपट्टीला आपण impeachment म्हणू शकतो का? कायदेतज्ज्ञांनी माहिती पुरवावी.
(No subject)
आज व्हॉट्स अप वर आले की स्टेट
आज व्हॉट्स अप वर आले की स्टेट बँकेने अडानींना १२००० कोटी कर्ज माफ केलेय. आता फक्त ८००० कोटीचीच परतफेड बाकी आहे.
खखो दे जा.
माफ नाही केले, अंडरराईटिंग
माफ नाही केले, अंडरराईटिंग केले- थोडक्यात कर्जासाठी आलेल्या अर्जाची पडताळणी करुन कर्जाला मान्यता दिली.
+१ स्वाती२.
+१ स्वाती२.
अंडर राईट, राईट ऑफ, माफ करणे ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माफ करणे ही गोष्ट अल्मोस्ट कधीही होत नसते. व्हॉट्स ॲपवर तिघांचा गुंता केलेला असतो नेहमी.
मजकुरात बाकी काही तपशील
मजकुरात बाकी काही तपशील नव्हते त्यामुळे नक्की काय ते कळले नाही. तरीही अशा परिस्थितीत कर्ज देणे बँकेला जोखमीचेच. अर्थात कागद पडताळले आहेत म्हणजे काहीतरी भविष्यात लाभदायी अशा income generating योजना असतीलच.
अदानी यांचे दोन्ही व्याही
अदानी यांचे दोन्ही व्याही महान आहेत. जतीन मेहतांविरुद्ध ची केस सीबीआय ने बंद केली. पण ब्रिटिश कोर्ट ने मात्र त्यात दम आहे असे सांगून त्यांचे बँक व ऑडिटर्स ना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. सीबीआय ची एक प्रकारे नाचक्कीच.
Cbi बोलका पोपट आहे.
Cbi बोलका पोपट आहे.
काही कामाचा नाही.
अशी सरकारी खाती बंद च करावीत देशाचं पैसा वाचेल .
जो ह्यांच्या पगारावर खर्च होत आहे
काल सीबीआय ला मालकाने
काल सीबीआय ला मालकाने कानमंत्र दिला
<< तरीही अशा परिस्थितीत कर्ज
<< तरीही अशा परिस्थितीत कर्ज देणे बँकेला जोखमीचेच. >>
----- " गौतमला पैसे द्या ... " असा स्पष्ट आदेश आला असेल तर बँकांना नाही म्हणायचे धारिष्ट्य आणि स्वातंत्र आहे का?
ही खरी लोकशाही. मी काही
ही खरी लोकशाही. मी काही ट्रंंपी नाही तरी पण...
But there is nothing in US law that prevents a candidate who is found guilty of a crime from campaigning for and serving as president -- even from prison!!
BJPच्या काही नेत्यांनी कॉंग्रेसचे समर्थक सूरतला जात होते यावर टीका केली होती, त्यांच्या परमप्रिय मित्राने काय केले ?
Security was tightened in New York, in particular the courthouse in lower Manhattan, as hundreds of Trump's supporters have landed in the city to rally behind him.
त्यांच्या परमप्रिय मित्राने
त्यांच्या परमप्रिय मित्राने काय केले ?<< याचा हिंदेनबर्ग शी काय संबंध
अरेरे. ही त्या अमेरिकन
अरेरे. ही त्या अमेरिकन धाग्यावर जायला पाहिजे होती ती चुकून इकडे आली.
पण राहू दे कि. नाही तरी मायबोलीचे हे खास वैशिष्ट्य आहे. संबंध म्हटला तर आहे म्हटला तर नाही.
सिलि़ऑन व्हॅली बँक बुडण्याचा
सिलि़ऑन व्हॅली बँक बुडण्याचा हिंडेनबर्गशी संबंध आहे की नाही?
वित्तविषयक सांसदीय समितीने अदाणी प्रकरणावर चर्चा करायला नकार दिला. पण सिलि कॉन व्हॅली बँक बुड ण्याच्या परिणामांवर चर्चा केली.
अडाणी, हिंडेनबर्ग आणि
अडाणी, हिंडेनबर्ग आणि राष्ट्रीय सुरक्षा ह्यांच्याशी संबंधित.
SC quashes Centre's ban on MediaOne news channel over security grounds
"National security claims cannot be made out of thin air, there must be material facts backing it," the bench said.
अडानी प्रकरणावर बोलताच 'मग
अडानी प्रकरणावर बोलताच 'मग SVB बँकेचे काय? ' असा प्रश्न केवळ दोन रुपयेवाले ट्रोल्सच विचारतात असे वाटले होते.
संसदेच्या अर्थविषयक समीतीने SVB वर चर्चा केली. साता समुद्रापार असलेल्या बँकेबद्दल चर्चा करतोच आहोत तर आपल्या अडानीवरही करूयात अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली पण ती सत्ताधारी खासदारांनी फेटाळली.
यारी है इमान मेरा यार मेरी
यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी
,2014,2019,मध्ये च जास्त
,2014,2019,मध्ये च जास्त प्रमाणात समाज माध्यम वापरली गेली.
व्यवसायिक कंपन्यांना प्रचाराचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले.
पगारी लोक समाज माध्यमावर कॉमेंट ,पोस्ट करण्या साठी नेमली गेली.
हे सर्व भारतीय जनतेला नवीन होते.
आता हा प्रकार चालेल असे वाटत नाही.
साता समुद्रापार असलेल्या
साता समुद्रापार असलेल्या बँकेबद्दल चर्चा करतोच आहोत तर आपल्या अडानीवरही करूयात अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली पण ती सत्ताधारी खासदारांनी फेटाळली.>>>>>
तुम्ही हो माता, पिता तुम्ही
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥
तुम ही हो साथी, तुम ही सहारे ।
कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥
तुम ही हो नईया, तुम ही खिवईया ।
तुम ही हो बंधू, सखा तुम ही हो ॥
जो खिल सके ना वो फूल हम हैं ।
तुम्हारे चरणों की धूल हम हैं ॥
दया की दृष्टि, सदा ही रखना ।
तुम ही हो बंधू, सखा तुम्ही हो ॥
Movie: Main Chup Rahunga (२०२३)
विकु
विकु
पवारांनी अदानी विषयी नेमके
पवारांनी अदानी विषयी नेमके आता भाष्य का केले असावे? त्यांच्या पुस्तकात देखील त्यांनी अदानीचे कौतुक केले आहे. कूछ तो गडबड है दया.
Pages