हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी

Submitted by अमितव on 2 February, 2023 - 00:09

हिंडेनबर्ग या न्यूयॉर्कच्या शॉर्ट सेलर ने दोन वर्षे विविध लोकांच्या मुखाखती घेऊन, ज्यात अदानीकडे पूर्वी काम करणारे लोकही समाविष्ट आहेत, पब्लिक डोमेन मधील विखुरलेली माहिती एकत्र करुन, अर्धा डझन देशांतील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आणि हजारो कागदपत्रांची छाननी करुन १७.८ ट्रिलअन रुपये (२१८ बिलिअन अमेरिकन डॉलर) मूल्यांकन असलेल्या अदानी समुहावर शेअर्सच्या किमती निश्चित करणे आणि अकाउंटिंग फ्रॉड असे अनेक अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

गौतम अदानी याची संपत्ती गेल्या तीन वर्षांत चक्रवाढ गतीने वाढून २० बिलियन ची १२० बिलियन झाली, आणि त्याच काळात अदानी गृपच्या ७ महत्त्वाच्या शेअर्सची किंमत तब्बल ८१९% वाढली आहे. अदानी कंपन्यांचे फंडामेंटल फारच तकलादू असल्याने या प्रचंड मूल्यांकनामुळे एकुणच त्या कंपन्यांतील गुंतवणूक function at() { [native code] }यंंत धोकादायक आहे. अदानी ग्रुपहा कौटुंबिक व्यवसायासारखा लागेबांधे ठेवून चालू असल्याचा दावा ही अहवालात आहे.

गौतम अदानी, त्यांचे भाऊबंद, मेव्हणे, जावई इ. इ. लोकांनी परदेशात, जेथे करसवलती आहेत तिकडे कशा बेनामी कंपन्या काढल्या आणि तिकडून पैसे कसे सायफन करुन गैरव्यवहार केले हे वाचलं तरी भिती वाटते. अदानी कुटुंबातील अनेकांवर पूर्वी सेबीने कारवाई केली आहे, अनेकांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे पण नंतर त्या सर्वांची पदन्नती होऊन ते सगळे आता डायरेक्टर इ. झाले आहेत.

सविस्तर अहवाल इथे बघता येईल. https://hindenburgresearch.com/adani/
बराच मोठा अहवाल आहे. त्यात एकाच व्यक्तीच्या १४ कंपन्या आहेत, त्यांचं डोमन नेम एकाच दिवशी रजिस्टर झालं आहे, अनेकांच्या वेबसाईट तंतोतंत जुळणार्‍या आहेत, त्यातील एकाने अदानीला काही शे मिलियन डॉलरचं कर्ज दिलं आहे. ती चांदीच्या व्यापारात कंपनी आहे, पण त्यांच्या फाईलिंग रिपोर्ट नुसार त्या कंपनीत शून्य लोक काम करतात, त्यांचं ऑफिस मोडकळीला आलेल्या इमारतीत कायम स्वरुपी बंद आहे, आणि तिकडे गिचमिड अक्षरांत संपर्काचा दूरध्वनी क्रमांक दिला आहे अशा अनेक रंजक आणि सिनेमातील वाटतील अशा कथा आहेत.

हा रिपोर्ट आल्यावर अदानी कंपन्याचे शेअर्सची घसरगुंडी झाली नसती तरच नवल. त्यांचा एफपीओ जो ११२% (ओव्हर सबस्काईब) झालेला तो ही काल मागे घेतला आहे. क्रेडीट स्विसने अदानी बॉंड इ. नाकारण्यास सुरुवात केली आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्ट, अदानी आणि त्याचे भारतीय गुंतवणुकीवर, सेबीवर पडणारे पडसाद याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात काय काका नेहेमीच मित्रपक्षांना तोंडघशी पाडतात.

एनिवे मविआत समन्वय नाहीये अजिबात, विरोधी पक्ष मजबूत वगैरे होईल असं सध्या तरी वाटत नाहीये.

Ed,cbi, police', ही जी सरकारी गुलाम खाती आहेत.
केंद्र,राज्य मध्ये ह्यांचे सरकार आहे.
सरकारी अधिकारी किती ही मोठा असू ध्या सत्ता धारी लोकांचा गुलाम असतो.
हे पवार जाणतात.
त्यांनी गुगली टाकली आहे.
चाणाक्ष लोक ते ओळखतील

अर्थसंकल्पीय अधिवेशनांत संसदेचे कामकाज किती झाले? लोकसभेचे नियोजित वेळेच्या 33% (46 तास) आणि राज्यसभेचे 24% (32 तास) कामकाज झाले. परम मित्र गो तम ला हिंडेनबर्ग चर्चेपासून वाचविण्यासाठी संसदेला वेढीस धरले गेले, पुढच्या वर्षी संसदेचे कामकाज १०० % झाले तरी ७० वर्षांतला काम न करण्याचा निच्चांक १७ व्या लोकसभेने गाठला आहे.

https://prsindia.org/files/parliament/session_track/2023/vital_stats/Ses...

गुंतवणूकीसाठी २०,००० कोटी रुपये चा उल्लेख राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. केंद्रिय तपास यंत्रणा राहुल गांधी यांच्या कडे गेली का चौकशी करायला?

ते अदानीच्या प्रेस कॉन्फरन्स ला गेहलोत चा मुलगा मोदींवर २० हजार कोटींचे आरोप करायला हजर होता का ?
गेहलोत बाप बेट्या ने त्यांच्याच नेत्याच्या मोदीवरील आरोपाची हवा काढून घेतली .
मग गेहलोत राहुल ला हफ्ते पुरवत होता असे अर्थ काढायचा का ?
काँग्रेसचेच नेते अदानी साठी रेड कार्पेट टाकत असतील तर पैसे खाल्ल्याचे आरोप एकट्या मोदी वर का ?
राहुल वर देखील व्हायला पाहिजेत.

भरत, ती बातमी आजच वाचली. "सहा महिने थांब.'
बाकी बऱ्याच जणांचे हात दगडाखाली आले आहेत. म्हणून तर भेटी गाठी घडत आहेत.

National security कन्सन म्हणजे यूएसमधील कंपन्यांचे धंदे धोक्यात येणे. त्याचे दुसरे सोज्वळ नाव. भारतीय लोक आइफोन दणक्यात खरेदी करत आहेत म्हणून भारत चांगला देश.

बाजार समिती निवडणुकांत यश म्हणजे जनतेचा कौल मविआला.

बाकी वाटसपवरील अर्थशास्त्रज्ञ (आणि वैद्य, डॉ., योगासनगुरु, अध्यात्मिक गुरु,सौंदर्य सल्लागार, घरच्या सोडून बाहेरच्या अडचणी सल्लागार )सॉल्लीड आहेत.

"हो, घेतले मी पैसे. बोला काय उखडणार आहात माझे?" असे सरळ सरळ ठणकावून सांगायला पाहिजे.
आमचा आदर द्विगुणीत होऊन , " व्वा, अस पाहिजे." अस म्हणून २०२४ मध्ये प्रचंड बहुमताने निवडून देऊ.
नाही बोलले तरी प्रचंड बहुमताने निवडून देऊ.

दाऊद ल अजून आणले गेले का भारतात.
निरव la कसे काय आणणार.
हे आता भारतात येत नसतात.
आले तर निवडूनिक ल उभे राहून केंद्र सरकार मध्ये मंत्री किंवा एकध्या राज्याचे राज्यपाल म्हणून च येतील

भाजपचा त्यांच्यावर वरदहस्त आहे ना ?
मग काँगेस चे सरकार निवडून आणा आणि त्या आरोपींना घेवून या !
काय अवघड आहे त्यात ?

सेबीकडून सहकार्य मिळेल अशी आशा नव्हतीच. सेबीच्या सहमतीनेच हे सर्व व्यावहार चालले होते हे स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सप्रे कमिटीला सेबीकडून कसलेही सहकार्य मिळणार नाही. दिरंगाईसाठी १७५० कारणे तयार आहेत.

अडाणीला वाचविण्यासाठी संसद बंद पाडली जाते, महत्वाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात केवळ ३० % कामकाज होते.
संसदेत प्रश्न विचारणार्‍यांचे माईक बंद पाडले जातात.
कुठल्याही वृत्तपत्राला किंवा पत्रकाराला अशा महाघोटाळ्याबद्दल प्रश्न विचारण्याचे धाडस उरत नाही. भ्रष्टाचारा बद्दल किती भाजपा उदासिन आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.

हिंडेनबर्गच्या ९ लोकांनी दोन वर्षे काम केले आणि अडाणीच्या शेअर गैरव्यावहारा बद्दल एक अहवाल दिला. या ९ लोकांनी दोन वर्षांत इतरही कामे केलीच आहेत.

सेबीमधे ९०० अधिक उच्च शिक्षित (MBA, LLB, MCA, BE, BeEch, MSC... ) आणि तब्बल १५ महिने लागणार अभ्यासकरायला. अर्थात त्यांना केवळ अडाणी गैरव्यावहारांची ( फुगविलेल्या शेअर किंमतींची) चौकशी हेच एक काम नसावे.

कुणासाठी हे काम करत आहेत, देशातली १४२ कोटी जनता का गोतम अडाणी?

अदाणी पावरफुल झाले आहेतच.
"ज्यांना कुणाला अदाणीचे शेअर घेऊन नुकसान झाले वाटतेय त्यांचे बायबॅक करीन" असं काही करता येत असेल तर तेसुद्धा अदाणी करेल. (माझा तिरपागडा अंदाज आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.)

Breaking down SC expert panel’s report on Adani-Hindenburg saga being claimed to be a ‘clean chit’. : https://www.youtube.com/watch?v=D2JykEXpnTs

A panel set up by the Supreme Court to look into allegations made against India’s Adani Group by US short seller Hindenburg Research has given a clean chit to the former. The panel was asked to answer 3 broad queries, and that is what they have done in a 173-page report released Friday. In Ep 1235 of Cut The Clutter, Editor-in-Chief Shekhar Gupta breaks down the panel’s findings, and explains the key arguments made.

Pages