भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गांधी घराण्याची कॉन्ग्रेस खरं म्हणजे कुणालाच नको आहे. >>> गेल्या ३-४ वर्षांतील ट्रेण्ड माहीत नाही पण भारतीय जनतेमधे गांधी घराण्याबद्दल एक सुप्त आदर्/आकर्षण कायमच आहे. ते संपलेले नाही. रागाला जनतेपुढे थेट आणून ते पुन्हा जागवण्याचा हा प्रयत्न दिसतो. तो ज्या कोणी पीआर वाल्यांनी आणला आहे त्यांना मानायला पाहिजे. परफेक्ट काम आहे. व्हॉटसॅप मधून भेटणार्‍या त्याच्या कार्टून इमेजपेक्षा हा खरा राहुल बघा. तो तुमच्याशी कसा बोलतो बघा आणि इतर नेते बघा. तुलना करा.

महाराष्ट्रात आलेला असताना त्याला कोथरूडच्या सोसायट्यांमधे जाण्याची गरज होती Happy वास्तविक कोथरूड मधे एक "गांधी भवन" आहे. तेथे असे कार्यक्रम नेहमी होत असतात. हे गांधी भवन म्हणजे आजूबाजूच्या भाजप (व सेना) बालेकिल्ल्यांमधे मधेच एक बेट आहे तेथे इतर संघटना/पक्षांचेही कार्यक्रम होत असतात.

महागाई,Gst, बे रोजगारी , धार्मिक द्वेष ,नोट बंदी इतक्याच मर्यादित विषयात ते सरकार लं प्रश्न विचारत आहेत.
नागरिकत्व कायदा, 370 कलम, सीआरपीएफ जवानाचे अतिरेकी हल्यात मृत्यू,शेतकरी कायदे ह्या सारख्या स्फोटक विषयात >>> वास्तविक त्याने याच विषयांवर बोलायला हवे. इतिहासात अजिबात घुसू नये.

<< अगदी बरोबर.
सावरकर सोडा नि भारत जोडा! >>

------ सावरकरांचे विखारी विचार सोडल्यावर भारत जोडलाच जाणार आहे.

मोदी जी पण खूप विषय देतात पण त्या वर राहुलजी नी बोलणे योग्य नाही.
त्यांचे प्रवक्ते बोलू शकतात.
* निवडणूक आली की त्याचं वेळेस नेमका दाऊद त्यांना धमकी कसा काय देतो.
* निवडणूक आली की pok, Pakistan ह्या वर सरकार काही ना काही कॉमेंट करत असते.
*

जनमानसात लोकप्रिय असलेले गांधी कंपनीचे मालक श्री राहुलजी यांची भारत जोडो यात्रा राजस्थान मध्ये पाऊल ठेवण्या अगोदरच गेहलोत नी पायलट ला गद्दार संबोधून फटाके फोडायला सुरवात केली !
बिचारे मालक जीवापाड कष्ट करून कंपनीला ऊर्जितावस्था मध्ये आणण्याचा प्रयत्न करत असताना गेहलोत सारखे his obedient servant गांधी कंपनी बुडवायला निघाले आहेत .
तरी बरं आहे , गेहलोत ला गांधी कंपनीचा नामधारी अध्यक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला होता , पण त्यांनी राजस्थान ब्रांच मॅनेजरपदी राहणे पसंत केले ...

पायलट, थरूर, सिंदीयाकडे कान्गरेस नेतृत्व द्या ही मागणी भाजपावालेच सतत करत असतात. कशाला? कारण हे फुटीर आहेत, आतून भाजपाला मिळालेले आहेत हे काॅन्ग्रेसी विचारधारेशी इमानदार नाहीत. सिंदीया तर गेलेच, पायलटही सतत नाटके करीत असतात.. थरूरही रंग दाखवतीलच वेळ आली की.
म्हणूनच रागाचे नेतृत्वच योग्य आहे. तो एकच वयक्ती आहे जो कधीही भाजपाला जाऊन मिळणार नाही. म्हणूनच जनतेसाठी तो महत्वाचा नेता आहे. हे भाजपाला समजते म्हणून रागाचे पप्पू म्हणून चारित्रहनन जोरदार सुरू आहे आठदहा वर्ष.

हे भाजपाला समजते म्हणून रागाचे पप्पू म्हणून चारित्रहनन जोरदार सुरू आहे आठदहा वर्ष.>>>>
+४४४

इंदिराजी जेव्हा सत्तेवर होत्या तेव्हा काँग्रेस मधील कोणत्याच नेत्याची पक्ष विरुद्ध कटकारस्थान करण्याची हिम्मत होत नव्हती.
कोणी केलीच अशी चूक तर त्याचे राजकीय भविष्य संपलेच असे समजायचे.
पक्षाची स्थिती ही सत्ता सापेक्ष असते.
आज bjp कडे सत्ता आहे म्हणून सर्व त्या पक्षाला चिकटून आहेत.
उद्या सत्ता गेली की बरेच पक्ष सोडून पळून जातील किंवा पक्षात फूट पाडतील.

त्या काँगेस च्या अंतर्गत मामल्यावर चर्चा करण्यात ह्या धाग्यावर काहीच आवशक्याता नाही.
राहुल जी chya यात्रे मुळे स्थिती बदलत आहे.

एक संदेश इथे paste करण्याचा मोह आवरता येत नाहीय.

" पत्रकार रश्मी पुराणिक यांचा भारत जोडो यात्रेतील अनुभव:>
राहुल गांधी यांना भेटून ओळख करून दिली, माझं नाव, संस्थेचं नाव..
पत्रकार असेल तरी ही मुलाखत नाही असं राहुल गांधी स्वतः सांगितल..म्हटलं हो सर..
मग सुरुवात झाली संवादाची... कैलास मानसरोवर यात्रा ह्या विषयावरून..राहुल गांधी यांनी विचारलं... तू पूर्ण चाललीस की घोड्यावरून गेलीस..मी म्हटले चालले मी. फक्त मधल्या कठीण भागात घोडा वापरला. मग हसले. म्हणाले, मग तू यात्रा केली नाहीस, घोड्याने केली.. पुढच्या वेळी तू चालत जा...मग त्यांनी विचारले यात्रेच्या सुरुवातीला एक पॉइंट आहे, माहित आहे का? पॉइंट माहीत होता, पण नाव विसरले होते..त्यांना सांगितलं की ते एक द्वार आहे, जिथून गेलं की तुम्हाला मोक्ष मिळेल असं मानतात. मग राहुल गांधी म्हणाले त्याला यमद्वार म्हणतात..
का म्हणतात माहीत आहे..तिथून आपली इच्छा, अहंकार, greed मागे टाकले पाहिजे,यात्रेचा हेतू तो आहे..मी म्हटले detachment शिकावी हेच ना? राहुल गांधी म्हणाले तो एक शब्द आहे ..पण मूळ गोष्ट आपल्यात जे काही आहे हव्यास आहे, हे हवं ते हवं अहंकार आहे मनात, तो तुम्ही सोडणे.. गोष्टी आहेत तशा स्वीकारणे, हे त्यातील moral आहे...
मग अचानक एक मुलगी धावत आली आमचे बोलणे थांबले..लिंक तुटली...ती मुलगी गेल्यावर त्यांना विचारलं. तुम्ही meditation करता का? म्हणाले हो...यात्रेत चालतो हे पण meditation आहे...
मी त्यांना महाराष्ट्रातील अनुभवांविषयी विचारलं त्यांनी सांगितल, महाराष्ट्र आवडला..इथे जो प्रतिसाद मिळाला..लोक आजही विचारधारा मानतात, त्यासाठी ते आले, इतरांना खुल्या मनाने स्वीकारतात हे आवडले. उत्स्फूर्तपणे लोक भेटले - बोलले, हेही त्यांनी सांगितलं..
ही चर्चा सुरू असताना मागून राहुल गांधी यांची टीम त्यांना सांगत होती. आता दुसऱ्यांचा नंबर आहे ..मला निरोप देण्याची वेळ आली आहे.. मी निघणार तितक्यात त्यांनी विचारलं घरी मुलं आहेत का, कसा वेळ काढला..तेव्हा त्यांना म्हटले मी एकटी आहे, मुलं नाहीत, जबाबदारी नाही, त्यामुळे काम करू शकते मनासारखं... मग त्यांनी विचारलं. समाजात, आसपासच्या सर्कल मध्ये अविवाहित असण्याचा त्रास होतो का,कोणी बोलत का? मी सांगितल, आई वडील आहेत त्यांनी स्वातंत्र्य दिलं वैयक्तिक आयुष्य आणि करीयर करण्याचं. ते पाठीशी उभे आहेत. त्यामुळे विशेष त्रास होत नाही.. आमच्यात इतकं स्वातंत्र्य मुलींना आहे..
मग त्यांनी आई वडील काय करतात, कुटुंबाची चौकशी केली. त्यांना सांगितल आई बँकेत होती वडील BMC मध्ये होते. बहीण अमेरिकेत नोकरी करते.. ते सगळे नेहमी सपोर्ट करतात..त्यांनी मला financially, emotionally support केला म्हणून मी पत्रकारिता या क्षेत्रात करियर करू शकले.. मग त्यांनी विचारलं पत्रकारिता का निवडली ? ..मी सांगितल बहीण इंजिनियर आहे..मला काही तरी वेगळे करायचं होतं..लिहायला आवडत होतं.आपण काही तरी समाजासाठी करावं या हेतूने पत्रकारितेत आले...
त्यावर ते म्हणाले मी अनेक तरुणांशी बोलतो त्यांना डॉक्टर,इंजिनियर किंवा सरकारी नोकरीमध्ये इंटरेस्ट आहे..तुम्ही वेगळं क्षेत्र निवडले.. महाराष्ट्रात कसं अजून तसं मोकळं वातावरण आहे..पत्रकार आपली भूमिका मांडत आहेत. इतर ठिकाणापेक्षा हे आश्वासक आहे असं त्यांनी मत मांडले..
त्यांच्यावर होणारी टीका, trolling हा विषय निघाला.. तेव्हा राहुल गांधी म्हणाले,जे तुमच्यावर टीका करतात, वाईट शब्दात बोलतात.. They are not grounded . They can only offer hate, nothing else.. त्यांच्या मनात द्वेष आणि राग आहे. त्यामुळे तुम्हाला ते तेवढंच देऊ शकतात..पण हा द्वेष राग ,भीती जास्त काळ टिकू शकत नाही..एक दिवस तेही संपणार... त्यामुळे कोणालाही न घाबरणे, आपले काम करत राहणे हेच करायचं.. आम्ही सात मिनिटं बोलत होतो..त्यात ते म्हणाले मला फक्त राहुल म्हण सर म्हणू नकोस...
शेवटी मागून खूप वेळा आता दुसरे पत्रकार येऊ दे असे संकेत आल्याने चर्चा थांबवली..आणि हँडशेक करत निरोप घेतला...
राहुल गांधी यांना भेटल्यावर जाणवलं की जे चित्र उभं केलं होत त्यात आणि खरा राहुल गांधी ह्यात तफावत आहे..राहुल गांधी गोष्टी गांभीर्याने घेत नाही,धरसोड वृत्ती आहे...किंवा ते पप्पू आहेत..वगैरे. त्यांना भेटून बोलून किंवा यात्रेत चालताना बघून असं कुठेच वाटलं नाही.
महत्वाचं म्हणजे ज्या माणसावर इतकी टीका झाली..तो मूर्ख आहे..त्याचे पणजोबा ते आई यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले.. आणि ही चर्चा कुठे बंद खोलीत नाही तर संपूर्ण देशात झाली, कुटुंबाची मानहानी झाली, तो माणूस किती संतप्त असेल..मनात किती राग असेल त्याच्या..एका क्षणी तो निराश होऊन सगळं सोडून निघून जाईल, खूप कडवट होईल..पण राहुल गांधी कुठेच नकारात्मक दिसले नाहीत..त्यांच्यावर होणारी टीका असो किंवा त्यांची भूमिका नीट कुठे दाखवत नसली तरी...
ते आपलं काम करत आहेत..लोकांच्या वेदना,समस्या जाणून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी तयार आहेत..त्या माणसात प्रचंड सहनशक्ती आहे जे येईल ते स्वीकारण्याची..आणि त्यांची स्वतःची philosophy आहे.. त्यामुळे ते नकारात्मक गोष्टी मनाला लावून घेत नाहीत हे जाणवलं!
राहुल गांधी हा माणूस जे करतो ते convictionने करतो...तो तेच करतो जे त्याला पटतं..त्याची प्रत्येक कृती राजकीय फायदा किंवा तोटा पाहून नाही...म्हणजे राजकारणात असून पण politically incorrect वागणारा नेता राहुल आहे.. ज्याची वैचारिक बैठक आहे.. त्याला खोटेपणाने वागता येत नाही,उगीच बडेजाव नाही,मला खूप समजतं, मीच सगळं l करीन,मीच देशात बदल घडवून आणीन असा कोणताही हा आव ते आणत नाहीत.
राहुल गांधी यांच्या शेगाव सभेतील एक वाक्य खूप आवडलं, जे कायम लक्षात राहील आणि तीच त्यांच्या जगण्याची फिलॉसॉफी वाटते..
ज्या माणसाने हिंसा सहन केली आहे, त्याच्या जखमा भोगल्या आहेत त्याच्या मनात कसलीही भीती नसते..आणि तो कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही,दुसऱ्याला जखमा देणार नाही कारण त्याने तो त्रास भोगला आहे..
राहुल गांधी genuine राजकारणी आहे..पण आपल्या देशातील राजकारण इतकं प्रगल्भ आहे का की इतक्या प्रामाणिक, politically incorrect व्यक्तीला ते स्वीकारतील? हा प्रश्न यात्रेच्या अखेरीस मला पडलाय.
-- पत्रकार रश्मी पुराणिक यांचा भारत जोडो यात्रेतील अनुभव.

Bjp कडे आम्हाला मत ध्या . का?
ह्याची काय उत्तर आहेत.
१) ३७० कलम रद्द केले.
रोजगार साठी ह्या राज्यातून जास्त लोक राज्य सोडून जातात त्यांच्या साठी हे महत्वाचे आहे
बाकी लोकांना ह्याच्या शी काही देणे घेणे नाही.
२)वर्षाला ६ हजार रुपये अल्प भू धारक शेतकरी ह्यांना सरळ account madhye miltatm
जास्त नियम अटी न ठेवता आणि सरकारी यंत्रणेचा स्वार्थी पना ,भ्रष्ट पना ह्यांना फाट्यावर मारून सर्वांना मिळतात
हे bjp चे काम देशाच्या इतिहासात पहिल्याच वेळी उत्तम काम म्हणून गौरव स पात्र आहे.
बाकी कशाच्या जोरावर आम्हाला मत ध्या असे bjp बोलू शकते.
Bjp देशासाठी योग्य नाही त्यांचे सरकार परत नको.
१) धार्मिक द्वेष मंत्री आणि bjp चे नेते च वाढवतात.
नेते ठीक पण मंत्री पण,हे जरा वेगळे आहे
२) शेती विषयक कायद्या मुळे शेतकरी कमजोर झाला असता आणि भारताची जमीन काहीच उद्योग पती नी हडपली असती .
हेतू तोच होता.
३) अडाणी कुठेच नव्हता bjp काळात श्रीमंत झाला कसा हे लोक ओळखतात.
४) भारta मधील प्रामाणिक उद्योग पती चे khachhi करणं करून अडाणी अंबानी ह्यानाच मोकळे रान दिले हे लपून राहिले नाही.
५) महागाई.
६) बेरोजगारी
७) कामगार गरीब समाज ह्याचे प्रचंड शोषण.
खूप कारणे आहेत bjp नको ह्या साठी.
आज तक,republic भारत, हे सर्व न्यूज चॅनल फक्त bjp चीच सेवा करतात .
त्या बदल्यात त्यांना काहीतरी नक्की मिळत असेल
उद्योग पती कर्ज बुडवून देश बाहेर.
अनेक बँका ह्याच उद्योग पती मुळे बुडाल्या.
अनेक चोरांची कर्ज माफ केली
सरकारी उद्योग विकले.
अनेक सरकारी उद्योग नीट चालू च नयेत आणि बंद पडावेत म्हणून bjp सरकार नी सक्रिय काम केले आणि तेच उद्योग किरकोळ किमतीत मित्रांना दिले .
ह्यांचे काहीच मोजकीच लोक मित्र आहेत.
बोलायला पण लाज वाटते पण भारत सरकार चे फक्त गुजराती दोन तीन उद्योग पती च मित्र आहेत
सरकार त्यांच्या साठी च चालले आहे.
किती तरी कारणे आहे .हे सरकार परत नको म्हणून

१०लाख कोटींची कर्जं ब्यांकांनी write off करुन टाकली. पण शेतकर्‍यांना मात्र कर्ज माफि साठी झगडावे लागत आहे

Bjp देशासाठी उत्तम आहे .
कशावरून.
दोन कारणे कोणी पण सांगावीत.
Bjp देशासाठी योग्य नाही ह्याची वर मो काही कारण सांगितली आहेत.
अजून पंचवीस तरी नक्कीच सांगेन.

बीजेपी आणि इतर तृणमूल सोडा.
कॉंग्रेसच एक बिनजोडतोड राहिली तरी खूप झाले.
"राहुल गांधी genuine राजकारणी आहे..पण"
आहेच.
इतक्या जागा गडगडत असताना कुणी निवडून आले तर कौतुकाची थाप फक्त प्रदेश कमिटीला जाते त्यांत त्यांचेच नेमलेले निष्ठावान असतात.
ही चाल भारी आहे. ती पाळली आहे.

कोळसे पाटील
ह्या विषयात मी एक पोस्ट टाकली होती.
कोळसे पाटील आणि bjp चे उथळ नेते एकच लायकीचे आहेत असे लिहल होते.
Raga वेगळे आहेत.
सावरकर हे स्वतंत्र सेनानी आहेत.
त्यांनी ब्रिटीश विरुद्ध युद्धात भाग घेतला होता.
त्यांच्या वर टीका नाही.
स्वतंत्र मिळणार असे जाणवले तेव्हा स्वतंत्र सेनानी हे नेते .
जाती चे,धर्माचे झाले .
हे पण lihle होते
ते फक्त पुढील सत्तेत हिस्सा मिळवा म्हणून..
मानवी स्वभाव

कोळशाला म वी आ ने काडीची किंमत दिली नाही तरी त्याचे बाजार उठवण्याचे काम चालू आहे .
तो जर अशा अफवा पसरवत असेल तर न्यायाधीश असताना त्याने केलेला न्याय निवडा कोणत्या मापदंड ने मोजून बघणार ?

मला पण खरे वाटत नाही.
वरकरणी (गुगल) काही सापडले नाही. उलट विक्रम संपटचे फॅक्ट चेक आले "सदर आरोप आधारहिन आहेत"

न्याय निवडीची कागद पत्रे सापडत नाही ना ?
ये तो होना हि था !

अशीही शक्याता आहे की गांधीजी च्या महत्मापणाला धक्का लागू नये म्हणून ४७ नंतर सावरकरांबद्दल हेतुपुरस्सर गैरसमज पसरवले असावेत .
काहीं वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सेवादल ने गोडसे आणि सावरकरांचे समलैंगिक संबंध होते असे बेधडक विधान केले होते .
पण एका परदेशी लेखकाने गांधीजीवर लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या वर कालेनबाख बरोबर सम लैंगीक संबंध असल्याचा दावा केला होता . आपण भारतीय आहोत , गांधीजी महान होते ,त्यामुळे कालेन बाख प्रकरण झालेच नव्हते या बद्दल एकमत !
पण परदेशी लेखकाने लिहिलंय म्हणून ठीक नाहीतर भारतीय असता तर त्याच्या वर संघी असल्याचा ठळक ठिपका केंव्हाच बसला असता की नाही .
https://www-theguardian-com.translate.goog/world/2011/mar/30/gujarat-ban...

<< राहुल गांधी हा माणूस जे करतो ते convictionने करतो...तो तेच करतो जे त्याला पटतं..त्याची प्रत्येक कृती राजकीय फायदा किंवा तोटा पाहून नाही...म्हणजे राजकारणात असून पण politically incorrect वागणारा नेता राहुल आहे.. ज्याची वैचारिक बैठक आहे.. त्याला खोटेपणाने वागता येत नाही,उगीच बडेजाव नाही,मला खूप समजतं, मीच सगळं l करीन,मीच देशात बदल घडवून आणीन असा कोणताही हा आव ते आणत नाहीत.
राहुल गांधी यांच्या शेगाव सभेतील एक वाक्य खूप आवडलं, जे कायम लक्षात राहील आणि तीच त्यांच्या जगण्याची फिलॉसॉफी वाटते..
ज्या माणसाने हिंसा सहन केली आहे, त्याच्या जखमा भोगल्या आहेत त्याच्या मनात कसलीही भीती नसते..आणि तो कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही,दुसऱ्याला जखमा देणार नाही कारण त्याने तो त्रास भोगला आहे..
राहुल गांधी genuine राजकारणी आहे..पण आपल्या देशातील राजकारण इतकं प्रगल्भ आहे का की इतक्या प्रामाणिक, politically incorrect व्यक्तीला ते स्वीकारतील? हा प्रश्न यात्रेच्या अखेरीस मला पडलाय. >>

----- हिरा , असेच अनुभव थोड्याफार फरकाने अनेकांना आलेले आहेत.
भारतजोडो साठीचा ध्यास घेतलेले राहुल गांधी हे आज सलग ७८ दिवस चिकाटीपणाने पायी चालत आहे.... उत्साह कुठेही कमी झालेला नाही. सामान्य जनतेच्या प्रतिसादामुळे त्यांचा निर्धार प्रत्येक दिवशी अजून पक्का होतो आहे.

राहुल गांधी genuine राजकारणी आहे..पण आपल्या देशातील राजकारण इतकं प्रगल्भ आहे का की इतक्या प्रामाणिक, politically incorrect व्यक्तीला ते स्वीकारतील? हा प्रश्न यात्रेच्या अखेरीस मला पडला## खरं आहे, पण लोकशाही स्वीकारली की हे वास्तव देखील स्वीकारावं लागेल

म्हणजेच काय तर आपला आवडता नेता पक्ष जिंकला किंवा लोकांनी स्वीकारले तरच राजकारण/लोकशाही प्रगल्भ नाही तर नाही.
नाही तर EVM आहेच दोष द्यायला.

Pages