भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक पक्षाचा ठराविक खात्रीचा मतदारभाग आणि मतदार आहेत आणि वैचारिक पाया आहे. कॉग्रेस आणि इतर पक्षांनाही हे लागू असून. ते अंतस्थ हेतू अधुनमधून उघड केले जातात. हीच ती वेळ, हाच तो मोर्चा.

Happy
अनेकांच्या दुखर्‍या नसेवर नेमकं बोट ठेवलेलं दिसतंय.

त्याने स्वतः तो विषय काढला की पत्रकार परिषदेत त्याला विचारलं गेलं?
जास्त जाण नसलेला म्हणजे काय? चुकीचं काही सांगितलंय का? राजनाथ सिंगांची साक्ष काढायची का?

तोडो , मरोडोची व्याख्या ऐकायला आवडेल. नेहरू पटेलांच्या अंत्ययात्रेत सामील झाले नव्हते यासारखी विधाने जाणूनबुजून करणे हे जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवणे यात बसते का?
हे आपल्याला गती नसलेल्या विषयातले असे मी म्हणणार नाही. कारण ते जाणूनबुजून केलेले खोटे विधान आहे .
हे विधान सर्वोच्च नेत्याने केले. बाकी फुट सोल्जर्सच्या माध्यमातून काय काय जाणूनबुजून, द्वेष पसरवायला केलं जातं, ते वेगळं.

आताच्या नेत्यांचे गुण आणि वर्तन बघून कोणाला ही पटेल.
राहुल गांधी हे आतिशय नम्र,उच्च शिक्षित,सभ्य,सुसंस्कृत, नितीवान असे व्यक्ती आहेत
त्यांच्या वर खालच्या भाषेत टीका करणारे स्वतःच्या दिवाळखोर बुध्दी मत्तेचेच प्रदर्शन
करतात.
मी काँग्रेस समर्थक नाही तरी माझे हे मत आहे.

मोदीसाठी ' हत्ती आणि १०० कुत्रे' वगैरे कथा प्रसवणरे आणि पसरवणारे आता स्वता:च कुत्र्याच्य कळ्पात सामिल झालेले दिसतात

आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन
तुम्हाला आहे का जाण आणि गती. सांगा बरे ती पत्रे (माफीनामे) लिहिली होती की नाही. की त्यांचे अकाउंट हॅक झाले होते?

सिनेमे काढून सरळ सरळ चुकीचा इतिहास पसरवला जातो .
त्या वर प्रश्न का विचारत नाहीत .
सावरकर प्रेमी.
सिनेमे चुकीचं इतिहास दाखवत आहेत ह्याचे किती तरी पुरावे आहेत.

Doble ढोलकी लोकांचा खरेच खुप संताप येतो

बरें झाले की सहपक्षाने आपले हत्यार वेळेत उचलले व सोनारातर्फे आपोआप कान टोचले गेले! महाशयांना आपण काही भलतेंच बोंललो आहे ह्याची जाणीव (वेळेत झाली).

अरे तुम्हाला नफरत कमी करायची आहे नं? जरूर करा! खरंच एक चांगला उपक्रम आहे, ...पण मग त्याची सुरुवात स्वतःपासून करा! उगाच आपली ठरवलेली वाट सोडून भलत्याच आगीत हात घालु नका!

एकाने गाय मारली की दुसरा वासरू मारणार
पण मग त्याने भारत जोडला जाईल ?

एकाने पर्जन्यास्त्र सोडले की दुसर्‍याने वायु अस्त्र सोडायचे असते.
ढगावर ढग आपटल्याने, द्वेषाला द्वेषाने उत्तर दिल्याने भारत जोडला जाईल ?

भारत खरोखरच जोडायचा असेल तर सगळे आपलेच आहेत असेच वागा-बोलायला हवे
'आम्ही आणि ते' ही भाषा भारत जोडण्याचे काम कधीच करणार नाही.

एवढे दिवस भारत जोडो यात्रा चालू आहे, बेरोजगारी,शिक्षण ,महिला सुरक्षितता ,चीन च्या कुरापती,अर्थव्यवस्था ,समाजात जाती धर्मावर पसरलेला द्वेष ,माध्यमाची गळचेपी या सगळ्या मुद्द्यांवर राहुल गांधी बोलत होते ,तेव्हा गोडी मीडिया सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करून या सगळ्या इव्हेंट ला साईडलाईन करून टाकलेलं ,आता सावरकरांविषयी कागदपत्र दाखवून त्यांची मत सांगितली तर अचानक सगळ्यांना भारत जोडो यात्रेचा साक्षात्कार झाला आणि राहुल गांधींनी हे बोलायला नको होत ते बोलायला नको होत असं म्हणणं बालिशपणा आहे. पप्पू पप्पू म्हणून एवढी वर्ष येड्यात काढून झाल्यावर आता एवढा जनप्रतिसाद मिळताना दिसतोय तर आता बीजेपी बिथरलीय .गांधी नेहरूंविषयी कुठल्या दर्जाच्या पोस्ट्स सोशल मीडिया वर फिरवल्या जातात आणि कोण याच्या मागे असत हे समजणं काही कठीण नाहीय. तेव्हा कोण विचारत नाहीत कि का बाबा का गांधी नेहरूंविषयी फेक न्यूज फिरवताय !

गाय वासरु तुलना चूक आहे. पहिला द्वेषमूलक खोट्या गोष्टी पसरतो. त्यासाठी गेलेल्या लोकांना वापरतो.
दुसऱ्याने इतकी वर्षे त्या गेलेल्या माणसाबद्दलच्या अशा गोष्टींबद्दल कधी काही बोललं नव्हतं. त्यांचा आदर केला हे पहिलाच सांगतोय. पण त्यांचा वापर इतरांना कमीपणा आणायला केल्यावर काही खऱ्या गोष्टी दाखवायलाच् लागणार.

भरत. इतक्या वर्षांची तपस्या भंग झाली म्हणून वाईट वाटतं पण हल्ली वाईट वगैरे वाटून घ्यायची; मवाळ हळवे वगैरे असण्याची फॅशन नाही तेव्हा पुरे करतो. तुमचे चालू द्या.
सहसा मी ज्यात पडत नाही; पडायची ईच्छाही नाही तो विषय ललीत मधे आल्याने वाचला गेला. आणि अनवधानाने प्रतिसाद दिला गेला. क्षमा असावी.

<< आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन
तुम्हाला आहे का जाण आणि गती. सांगा बरे ती पत्रे (माफीनामे) लिहिली होती की नाही. की त्यांचे अकाउंट हॅक झाले होते?
नवीन Submitted by झम्पू दामलू on 18 November, 2022 - 00:55 >>

------- झम्पू.... ७ माफीपत्रे लिहीली होती.... पण हे सर्व गांधी यांच्या सांगण्यावरुन असे भाजपाचे कुठले तरी नेते म्हणाले होते ना.

सावरकर जेल मधे १९११ मधे गेले. पहिले, दुसरे माफीपत्रे लिहीली तेव्हा गांधी द अफ्रिकेत होते. गांधी भारतात १९१५ मधे आले. द. अफ्रिकेत असतांना सल्ला दिला असेल.

हर्पेन, मझी क्षमा कशाला मागताय? तुम्ही लिहीत राहाल तर बरंच आहे. ज्यांच्याशी संवाद शक्य आहे, त्यांच्याशी तो करत राहावा, हा प्रयत्न आहे. हा लेख ही त्यासाठी योग्य जागा नसेल कदाचित.

राहुल गांधी यांनी काहीच चुकीचे वक्तव्य केलेले नाही. कटू आहे पण सत्य आहे.

सावरकरांनी माफी मागितली हे खरे आहे, ६ -७ वेळा लोटांगण घातले. जेलमधे यातना केवळ सावरकरांनाच झाल्या असे काही नाही (अतिशयोक्ती होते कधी कधी). गांधी हत्ये मधला त्यांचा सक्रिय सहभाग - केवळ सबळ पुराव्या अभावी ते सुटले. गांधीहत्या करणार्‍यांना " गांधी यांची शंभरी भरली..... यशस्वी परतून या" अश असा तोंडभरुन आशिर्वाद दिला होता. अपराधी पणाची भावना शेवटपर्यंत टोचत राहिली असेल आणि म्हणून शेवट वाईटच झाला.

२०१४ नंतर भाजपा सरकारने सावरकरांबद्दल असलेली झाकलेली मुठ उघडी पाडली . आता सावरकर म्हटल्यावर माफीवीर, ब्रिटिशांचा महिना ६० रुपये पेन्शनर, अनेक ड्यु आय डी ने लिहीणारा स्वयंघेषित स्वातंत्र्यवीर , १९४२ चले जाव ला विरोध करणारा अशी नवी पण खरी प्रतिमा तयार होत आहे.

हर्पेनजी हा धागा हलवावा कसा ? हे मला जमले नाही. आपण मार्गदर्शन केल्यास पुन्हा प्रयत्न करेन. तसेच कुठला विभागात हलवावा हे कृपया सुचवावे.
आपल्या सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

<< पप्पू पप्पू म्हणून एवढी वर्ष येड्यात काढून झाल्यावर आता एवढा जनप्रतिसाद मिळताना दिसतोय तर आता बीजेपी बिथरलीय . >>

------ त्याने एकाही शब्दाने उत्तर दिले नाही. पप्पू पप्पू म्हण णार्‍यांनाच त्याने आपल्या कृतीने मोठे पप्पू ठरवले.

तो १- १ तास नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांशी चर्चा करतो, पत्रकारांशी वाट्टेल त्या विषयावर बोलतो, युवक युवती, आबाल वृद्ध सर्वां मधे समरसून जातो. चुकत असेल, पण दुरुस्ती करायचीतयारी ठेवतो. विविध विचारांचा / जातीचा/ धर्मांचा सन्मान करणे

आजीची गोळ्यांच्या वर्षावांत हत्या, जनते मधे मिसळतांना वडिलांची बाँब स्फोटांत हत्या.... हे सर्व डोळ्यांनी पाहिल्यावरही आज ते जनते मधे अगदी सहजपणे मिसळंत आहे... हत्या करणार्‍यांच्या धर्मा बद्दल चिड, द्वेष नाही. एक एक करत सर्व जवळचे नेते पक्ष सोडून गेले.... पण याने कशाची चिंता केली नाही. तत्वांशी तडजोड नाही, एकला चलो रे.... द्वेष को तोडो, भारत जोडो.

कौतुकास्पद आहे त्यांचे धाडस, संयम, आत्मविश्वास.

यक्ष सर, पुढल्या वेळी धागा काढाल तेव्हा कोणी प्रतिसाद द्यावेत , कोणी देऊ नयेत, कोणत्या प्रकारचे द्यावेत हे किंवा तुम्ही कोणाच्या, कशा प्रकारच्या प्रतिसादांची दखल घ्याल हेही नमूद करा.
म्हणजे मी तुमच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचं थांबवेन असं नाही हं.

कुठल्या विभागात हलवावा यात काय एवढा यक्ष प्रश्न?
"राजकारण भारतात" विभागात हलवा.

लेख "संपादन" वर क्लिक करा.
मग "ग्रुप ऑडियन्स " फिल्ड मध्ये जाऊन सध्याचा ग्रुप बॅक स्पेस देऊन पूर्ण खोडा. मग तिथेच राज एवढे टाईप केले की "राजकारण भारतात" हा ग्रुप ड्रॉप डाऊन मध्ये दिसेल. तो निवडून सेव्ह करा.

त्यासाठी आधी राजकारण भारतात या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

तो १- १ तास नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांशी चर्चा करतो, पत्रकारांशी वाट्टेल त्या विषयावर बोलतो, युवक युवती, आबाल वृद्ध सर्वां मधे समरसून जातो. चुकत असेल, पण दुरुस्ती करायचीतयारी ठेवतो. विविध विचारांचा / जातीचा/ धर्मांचा सन्मान करणे

आजीची गोळ्यांच्या वर्षावांत हत्या, जनते मधे मिसळतांना वडिलांची बाँब स्फोटांत हत्या.... हे सर्व डोळ्यांनी पाहिल्यावरही आज ते जनते मधे अगदी सहजपणे मिसळंत आहे... हत्या करणार्‍यांच्या धर्मा बद्दल चिड, द्वेष नाही. एक एक करत सर्व जवळचे नेते पक्ष सोडून गेले.... पण याने कशाची चिंता केली नाही. तत्वांशी तडजोड नाही, एकला चलो रे.... द्वेष को तोडो, भारत जोडो.

कौतुकास्पद आहे त्यांचे धाडस, संयम, आत्मविश्वास. >>> हे आरती स्वरूपात येऊ द्या आता. तेवढंच राहिलंय.

जय देव जय देव जय पप्पूदेवा

तो १- १ तास नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांशी चर्चा करतो, पत्रकारांशी वाट्टेल त्या विषयावर बोलतो, युवक युवती, आबाल वृद्ध सर्वां मधे समरसून जातो. चुकत असेल, पण दुरुस्ती करायचीतयारी ठेवतो. विविध विचारांचा / जातीचा/ धर्मांचा सन्मान करणे

आजीची गोळ्यांच्या वर्षावांत हत्या, जनते मधे मिसळतांना वडिलांची बाँब स्फोटांत हत्या.... हे सर्व डोळ्यांनी पाहिल्यावरही आज ते जनते मधे अगदी सहजपणे मिसळंत आहे... हत्या करणार्‍यांच्या धर्मा बद्दल चिड, द्वेष नाही. एक एक करत सर्व जवळचे नेते पक्ष सोडून गेले.... पण याने कशाची चिंता केली नाही. तत्वांशी तडजोड नाही, एकला चलो रे.... द्वेष को तोडो, भारत जोडो.

कौतुकास्पद आहे त्यांचे धाडस, संयम, आत्मविश्वास.

>>> रागामध्ये हे गुण असतील तर त्याने सामाजिक कार्य करावे. त्याला राजकारणात इंटरेस्टही नाही आणि काही कर्त्रुत्वही दाखवलेलं नाही.

Lol
चित्रपट ताऱ्याच्या आप आम चूसके खाते हैं या काटके या प्रश्नाचं उत्तर येतं का त्याला?
मुख्यमंत्र्याला मैं जिंदा लौटके आया , असं कळवतो का?
मग तो पप्पूच.

बदलायच्या आधीचा प्रतिसाद वाचला Lol

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ह्यांनी फाशीची शिक्षा झाली असतानाही इंग्रज सरकारची माफी मागितली नव्हती, ह्यांचे कोलू ओढताच पाय लटपटायला लागले, माफी मागून मोकळे झाले. पूर्ण शिक्षा भोगली असती आणि कोलूचा पराक्रम सांगितला असता तर कौतुकास पात्र ठरले असते. आज माफीपत्राचा उल्लेखही काहींना खटकतो. सत्य स्वीकारायला शिका. राहुल गांधी काहीही चुकीचे केले नाही,सत्य तेच सांगितले.

Pages