भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शापि सहमत. जेलमध्ये राहणे हा काय सद्गुण नाही. माफी मागून बाहेर येण्यात कसलीच वाईट गोष्ट नाही. बाकी, तुमच्या लिस्ट मध्ये सावरकरांची जातिवरची मते सुद्धा वाढवा. https://indianexpress.com/article/opinion/columns/truth-about-savarkar-a...

आणि, राहुल गांधी काही हे फक्त "रोचक ऐतिहासिक तथ्य" म्हणून सांगत नाहीयेत. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे.

main land मध्ये त्यांच्यावर नजर ठेवली जाणार हे उघड होते. सावरकरांनीही असे काही लिहून दिले होते का त्यांच्या माफीपत्रांपैकी कुठल्यातरी पत्रात ते नक्की आठवत नाही. पण माफीपत्रातली भाषा खूपच लाचारीची आहे.
ह्या शिवाय त्यांच्याविषयीच्या आणखीही काही प्रकरणांची उदात्तीकरणे केली गेली आहेत.
सावरकर हे साहित्यिक म्हणून खूप मोठे आहेत. त्यांच्या साहित्यातून त्यांची देशभक्तीची तळमळ मनाला भिडते.
हे जरी खरे असले तरी त्यांनी निवडलेला मार्ग चुकला होता हे निश्चित. त्यांच्या सशस्त्र मार्गाला तुटपुंजे अनुयायी मिळाले, संपूर्ण भारताच्या समाजमनाला, काळजाला त्यांना हात घालता आला नाही. समकालीन नेत्यांसमोर ते खुजे ठरले.

सावरकरांचे माफीनामे, गांधीहत्येशी संबंध या गोष्टी काँग्रेसने चघळल्या नव्हत्या. त्यांच्या कार्यानुसार त्यांना योग्य ते स्थान दिलेच होते. माझ्या शालेय पाठ्यपुस्तकांत माझी जन्मठेपमधला उतारा, त्यांच्या कविता, त्यांच्यावर लिहिलेली कविता यांचा समावेश होता. इंदिरा गांधींचा दाखला देतच आहेत. त्यांनी माफीनामे लिहिले आणि गांधीहत्येशी त्यांचं नाव जुळलं या गोष्टी मला १५ वर्षांपूर्वी माहीतही नव्हत्या.
संघपरिवाराने राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीवर आमचाच हक्क असा दावा करायला सुरुवात केल्यावर स्वातंत्र्यासाठी लढलेला कोणी नेता दाखवता येईना म्हणून सावरकरांचा वापर केला. त्यांना झाली तशी काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या काँग्रेस नेत्याला झाली असे असंबद्ध प्रश्न विचारायला सुरुवात केली. याच्या जोडीला गांधीनेहरूंबद्दल अपप्रचार. यांना हीन लेखायला सावरकर वापरले.
या सगळ्याचा परिपाक म्हणून सावरकरांचे माफीनामे, आंदोलनांच्या , निवड णुकांतली हिंदू महासभेची भूमिका या गोष्टी पुढे आल्या.

इतकी दशके गांधी-नेहरू , नेहरूंच्या पुढच्या पिढ्या इतकंच काय आंबेडकरांबद्दल कुजबूज स्वरूपात आणि आता सोशल मीडियावर काय वाट्टेल त्या गोष्टी रचून सांगितल्या जात आहेत. सावरकरांबद्दल जे सांगितलं जातंय ते खरंच आहे.

धन्यवाद मानवजी! धागा राजकारण विभागात हलवायचा प्रयत्न केला आहे!.
भरतजी सगळ्यांन्नाच आपापली मते मांडण्याचा समान अधिकार आपल्या लोकशाहिनेच दिला आहे. त्यामुळे कुणी प्रतिसाद द्यावे / देऊ नये ह्याचा ह्याबद्दल बंधन असण्याचे काहीच कारण नाही.
माझे साधे एकच मत आहे की 'तुम्हाला नफरत कमी करायची आहे नं? जरूर करा! खरंच एक चांगला उपक्रम आहे, ...पण मग त्याची सुरुवात स्वतःपासून करा! उगाच मागील गोष्टींन्ना विनाकारण हात घालु नका!
स्वातंत्य संग्रामात प्रत्येकाचे योगदान काहिना काही स्वरुपात आहेच त्याबद्द्ल त्यांचे त्याबाबत त्या प्रत्येकाचे ऋणी असावे.
पण त्या व्यक्तींन्ना जोपर्यंत आपण मनापासून समजवून घेत नाहीत तोपर्यंत उगाच रा़जकारणात गढुळपणा आणू नये असे माझे वैयक्तिक मत.

त्यांना तसं का करावं लागतंय तेच लिहिलंय . त्यांच्या योगदाना बद्दल काँग्रेसने आदर दाखवीत आली आहे. पण नंतरच्या काळातल्या त्यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह आहेच.
भाजप - संघ परिवाराने सावरकरांच्या नावाचा वापर थांबवावा. तसंही ते जिवंत होते, तोवर संघपरिवाराने काही त्यांना जवळ केलं नव्हतं. आता जसं पटेल, आंबेडकरांना वापरतात तसं सावरकरांना.- फक्त द्वेष पसरवायला.

राजकारणात गढूळपणा कोणी आणला? समाज माध्यमात काँग्रेस आणि त्या काळच्या प्रमुख नेत्यांविरोधात अत्यंत गलिच्छ भाषा कोणाच्या प्रेरणेमुळे वापरली गेली? गेली कित्येक वर्षे आणि आजही हा शिमगा सुरू आहे त्याने समाजजीवन गढूळ झाले नाही का? आजही होत नाहीय का? ही जुनी पुराणी गोष्ट नाही. आज, आत्ताही ही विध्वंसक प्रेरणा काम करते आहे. भाजपा परिवाराने कितीतरी फेक संदेश पसरवले, त्याद्वारे नेत्यांचे चारित्र्यहनन केले हे खोटे आहे काय? त्याला कोणी उत्तर देऊ नये काय?

ब्रिटिश चे राज्य जवळ जवळ पूर्ण जगात होते.
असंख्य देश हे ब्रिटिश सरकार चे अंकित होते.
आणि प्रतेक देशात स्वतंत्र लढा पण दिला गेला.
पण भारत सोडून बाकी कोणता देश तो विषय उगाळत बसला असेल वाटत नाही.
स्वतंत्र सेनानी ची इज्जत आवडत्या नावडत्या कोणीच काढत नसेल.

आज जे देशासमोर प्रश्न आहेत त्याचाच विचार ते देश करत असणारा.

भारत हाच एक विचित्र देश आहे आताचे ज्वलंत प्रश्न सोडून फालतू विषयात गुंतलेले असतात..

Mumbai मध्ये इतके ब्रिटिश टुरिस्ट येतात पण हे सीएसटी station आम्ही बांधले आहे.
अशा वल्गना करत नाहीत.
हिरोशिमा आणि नागासाकी वरून आता जपणाध्ये राजकारण होत नाही.
आता काय करायचे देशाच्या हिताचे काय आहे हे त्यांच्या डोक्यात असते.

ANI
@ANI
Official
If someone asks you who is your idol, you don't have to go out looking for it, you'll find them right here in Maharashtra. Chhatrapati Shivaji Maharaj has become an old idol now, you can find new ones from Babasaheb Ambedkar to Nitin Gadkari: BS Koshyari, Governor of Maharashtra

उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून - यांना याच कामासाठी इथे बसवलंय का?

भावनिक मुद्द्यावर राजकारण करून सत्ता मिळवणे भारतात खरेच सोप आहे.
ह्याचा अर्थ आज पण जनता शिक्षित असेल पण विचारी नाही.
सावरकर,मुस्लिम,हिंदू,जाती,भाषा असल्या अत्यंत फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत देतात.
महागाई,बेरोजगारी,भ्रष्ट कारभार,शिक्षणाचा खेळ खंडोबा,शेतकरी,कष्टकरी ह्यांची अवस्था .
ह्या वर चर्चाच होत नाहीं

राज्यपाल मनाने काही बोलत नाहीत.
Bjp जे सांगते तेच ते बोलतात.
भाषण लिहून दिले जाते.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.
घटनेने त्या पदाला संरक्षण दिले आहे.
काही ही बोलले तरी कायदेशीर कारवाई करणे शक्य नसते.
म्हणून त्यांच्या तोंडून असे vadavle जाते.
जेणे करून मूळ प्रश्न बाजूला राहून लोक भलत्याच विषयात अडकून राहतील.
आणि मदत करणारे आपलेच राज्य द्रोही
आणि आपण मित्रं मिळून देश लुटावा आणि लोकांच्या लक्षात पण येवू नये हा हेतू

अर्णव (मीडिया) कंगना ( स्त्री) सुशांत सिंग(उत्तर भारतीय ह्या प्रदेशात कधीच सुशासन वर मतदान होत नाही भावनिक प्रश्नावर होते)
राज्यपाल.
हे सर्व मोहरे bjp ek षडयंत्र म्हणून वापरात आहे.
खरे सांगा .
सावरकर न विषयी सर्व सामान्य लोकांना किंचित पण प्रेम नाही है सत्य आहे हे मान्य आहे.
Dr Babasaheb Ambedkar, शिवाजी महाराज,सभाजी महाराज,शाहू महाराज.
अनेक संत, आणि मराठी साम्राज्य हेच फक्त महाराष्ट्र ल वंदनीय आहेत.
सावरकर फक्त राजकारणी लोकांना आवडतात.

पूर्ण दक्षिण भारतात भारत jodo यात्रा व्यवस्थित झाली काहीच अडचण नाही.
महाराष्ट्र मात्र संघर्ष निर्माण झाला
ह्याचा अर्थ एक महाराष्ट्र मधील लोक परिपक्व नाहीत किंवा. दिल्ली ची खेळणी आहेत.
किंवा.
राज्य हिताला तिलांजली देवून दिल्ली ची चाकरी करण्याची येथील काही राजकीय नेत्यांची सवय आहे

फडणीस लाचारी करून स्वतःची सोय करून घेतील आणि अंध भक्त.
राज्य हीत,स्वा हीत , पुढच्या पिढीचे भविष्य हे सर्व विसरून...
बिनडोक सारखे फडणवीस चे समर्थन करतील.
अंध च ते

अनेकांच्या दुखर्‍या नसेवर नेमकं बोट ठेवलेलं दिसतंय.

त्याने स्वतः तो विषय काढला की पत्रकार परिषदेत त्याला विचारलं गेलं?
जास्त जाण नसलेला म्हणजे काय? चुकीचं काही सांगितलंय का >>>>>>>>
वांगे सर ,
दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्यासाठी त्याने भारत जोडो यात्रा काढली होती का ?
पत्रकारांनी विचारले होते तर पत्रकारांचे गुगली प्रश्न त्याने सोडायला हवे होते , पण त्याने गुगली प्रश्नावर वर सिक्स मारण्याच्या आविर्भावात जुनी कागदे दाखवत बसला !
म्हणजे तो विषय वाढवण्याची त्याची फुल्ल तयारी होती , मग ती यात्रा भारत जोडो ची होती की तोडो ची असे प्रश्न पडणारच ना ?
बरं आता त्या प्रश्नावर गप्प बसायची वेळ आली म्हणजे त्यासाठी थोडी अश्लील म्हण होती , पण काळवेळ बघून टाळतो Happy

दक्षिणेतील राज्यापासून सुरू झालेली यात्रा आणि तिला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता त्याने सावरकरांवर वाद उपस्थित करून पायावर धोंडा मारून घेतला हे निश्चित !

याचाच अर्थ तो विषय हाताळण्याची ती योग्य वेळ नव्हतीच , पण याची त्याला समज नसल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले .
त्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी समयसूचकता दाखवून ( खुर्ची प्रेम लपवून ) त्याच्या मतावर सहमत नाही ,पण लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेस ला साथ देणार अशी नेहमीप्रमाणे गुळमिळीत प्रतिक्रिया दिली .
पण जेल मध्ये राहून फुल्ल चार्ज झालेल्या संपादकांनी युती तोडण्याचा दम भरल्यावर शंभर वर्ष जुन्या पक्षाचे घराणे मालक शरण आला की !

जाण / ज्ञान आहे होते तर तो विषय पुढील दोन चार दिवस चालू ठेवण्याची हिम्मत करायची होती , इथे बघा माफीनामा बद्दल कसा लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे !
हा येथील लोक २०१४ , २०१९ ला देखील सावरकरांविरुद्ध लिहीत होती , पण त्याने एका मताचा देखील फरक पडलेला नाही हे सिद्ध झालेय ....

कोश्यारी महोदयाना पण सावरकर हे आदर्श वाटत नाहीत?? अरेरे। कागाळु सर, त्यांच्या विरोधात बोंबा कधी मारणार ??

काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यापेक्षा मेन लॅण्ड वर येण्यासाठी माफी मागितली तर काय बिघडले ? असे न तसे सडून मरण्याने नेमके काय साधणार होते ?>>>>>>>>>
त्यांनी माफी मागितली की नाही ?
त्यांना पेन्शन मिळत होती की नाही ?
हे सगळे गौण प्रश्न आहेत !
त्याच प्रमाणे नेहरू आणि गांधींना काळ्या पाण्याची शिक्षा झाली नाही म्हणून एकजण राष्ट्रपिता तर दुसरे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले , म्हणून त्यांच्या देशभक्ती वर त्यागावर प्रश्न उपस्थित करणे देखील गौण ठरेल ....
त्या काळी स्वातंत्र्यसंग्रामात वाहून घेतलेल्या प्रत्येक सेनानीच्या कार्यावर आत्ताच्या काळात शंका घेणे चूकच ठरेल ....

अरेरे। कागाळु सर, त्यांच्या विरोधात बोंबा कधी मारणार >>>>>
भ्रमर भाषा सुधार रे ! , नाहीतर admin साहेबांच्या नजरेत येशील
आणि प्रतिसादाची क्षमता जरा वाढव !!!
बघ प्रयत्न कर , नक्कीच जमेल तुला ...

देशाचा सर्वात महत्वाचा नॉर्थ इस्ट भाग रस्त्यांच्या , रेल्वेच्या आणि हवाई मार्गाच्या जाळ्यानी उर्वरित देशाशी अजून घट्ट जोडला गेला हे विशेष , असे तेथील लोकांची मत आहेत ....
म्हणजे दक्षिणेत भाजपला गड स्थापन करता आला नाही पण त्याची कसर नॉर्थ ईस्ट मध्ये नक्कीच भरून काढली असावी .

या यात्रेची सुरूवात मस्त झाली होती. रोज सामान्य लोकांबरोबर काढलेले रागाचे फोटो येत होते. एरव्ही मर्जी का मालिक टाइप कधीतरी एकदम इंटरेस्ट घेणारा तर कधी गायब होणारा रागा एक सलग काहीतरी करत आहे असे चित्र दिसत होते. फार सुंदर फोटो होते या यात्रेचे. अजूनही काही आहेत.

मग त्याला ग्लॅमर येउ लागले. अझर दिसला एका फोटोत. आता स्थानिक नेते दिसू लागले. ते ही ठीक आहे. पण राजकारणात असले गुगली प्रश्न येणारच - सावरकरांबद्दल विचारले तसे- त्याला वरवर काहीतरी गुडीगुडी उत्तर देउन बगल देता आली पाहिजे. भारत "जोडो" यात्रेत एका मोठ्या गटाला वंदनीय असलेल्या नेत्याबद्दल असे काही बोलून "जोडो" बिडो काही होणार नाही. नेहमीसारखेच राजकारण होईल. आणि त्यात त्याच्यापेक्षा मोठे आणि कसलेले खिलाडी आहेत.

रागाचा युएसपी "क्लीन कॅम्पेन" हा आहे. त्यातूनच त्याला यश मिळू शकते. या यात्रेचे मूळ स्वरूप जसे होते तसेच राहिले पाहिजे. याला मिळणार्‍या लोकप्रियतेला एन्कॅश करायला आता इतर पब्लिक घुसत आहे. त्यांना लांब ठेवले पाहिजे.

बाकी सावरकरांबद्दल आदर आहेच. पण तो आहे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या किंवा केलेल्या प्रत्येक गोष्टीचे हिरीरीने समर्थन करायची गरज नसते.

Bjp चे आधार स्तंभ फक्त भावनिक विषयाला महत्व देणार जास्त लोकसंख्या असलेली पण वैचारिक लेव्हल कमी असणारी तीनचार राज्य.
त्या मध्ये महारष्ट्र पण येईल असे वाटते.

राहूल गांधींच्या विधानाबद्दल तीन भूमिका घेता येतील.
१ ते जे बोलले ते factually incorrect होते. थोडक्यात, ते खोटे बोलले.
२ ते बोलले ते खरेच आहे पण ते बोलायची गरज नव्हती. एकतर महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत आहे. ४८ पैकी फक्त एक खासदार.
येत्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर आघाडी करावी लागेल असे दिसते. शिवाय सावरकरांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांना दुखवून मिळणारा राजकीय पे बॅक नगण्य आहे.
३ ते जे बोलले ते खरेच होते व ते बोलून योग्यच केले.

मी सध्या २

सावरकर ही मीडिया स्पेस मिळवायची खेळी दिसतेय कांग्रेस ची. त्यात यश देखील आलेले दिसतेय. जे आधी मिळत नव्हते.

सावरकरांचं भारत रत्न जाऊ द्या !
एका ५३ वर्षीय बालकाला पंतप्रधानपदाचे स्वप्न दाखवून सतत चालायला लावणे शोभते का तुम्हा लोकांना Happy

Pages