Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55
सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!
मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?
आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सावरकरांना मानणारा मोठा वर्ग
सावरकरांना मानणारा मोठा वर्ग आहे, तसा तो असेलही पण म्हणून राहुल गांधी यांनी सत्य बोलायला नको असे आपण म्हणू शकत नाही. त्यांनी वक्तव्य केले यात काही खोटे असेल तर जरुर दाखवा.
सत्ता स्थापन करणे हाच राहुल गांधी यांचा उद्देश असायला हवा असे सर्व भाजप विरोधी विचारांना वाटत रहाते, उगाचच कशाला वाद निर्माण करुन आपल्यात दुफळी निर्माण करायची? हा अगदी सामान्य विचार झाला.
सत्याच्या मार्गावर चालणारा हा महान पुरुष आहे. राहुल गांधी यांच्या सत्य बोलण्याच्या कृत्याचा त्यांना / पक्षाला २०२४ च्या निवडणूकांत महाराष्ट्रात फटका बसेल पण त्यांचा उद्देश सत्तेचे राजकारण करण्याचा नाही आहे हे वारंवार स्पष्ट झाले आहे. सत्तेच्या लोभापाई किंवा ED/ CBI ला घाबरुन किती आमदार/ खासदार गेले, पराभूत झाले त्याने राहुल गांधी यांना काडीचाही फरक पडत नाही. पक्ष सोडलेल्यांबद्दल ते कटुता, आकसही बाळगत नाही.
त्यांचा मार्ग अत्यंत खडतर आहे. आणि व्यक्ती प्रामाणिक पण निडर आहे.
आज तरी राहुल गांधी हे सामान्य भारतीय जनतेच्या मनात राज्य करत आहे. भारत जोडो च्या पवित्र कार्यात त्यांना भरभरुन यश मिळण्यासाठी लाखभर शुभेच्छा.
प्रत्येक भारतीय किमान एव्हढे तर करु शकतो?
माफिनाम्यामुळे अडचण येतेय का
माफिनाम्यामुळे अडचण येतेय का भारतरत्न द्यायला?
त्यांचा मार्ग अत्यंत खडतर आहे
त्यांचा मार्ग अत्यंत खडतर आहे. आणि व्यक्ती प्रामाणिक पण निडर आहे.
+१
त्यांचा मार्ग अत्यंत खडतर आहे
त्यांचा मार्ग अत्यंत खडतर आहे. आणि व्यक्ती प्रामाणिक पण निडर आहे. >>> हे बरोबर, पण
उगाचच कशाला वाद निर्माण करुन आपल्यात दुफळी निर्माण करायची? हा अगदी सामान्य विचार झाला. >>> याच्याशी अजिबात सहमत नाही. भारत जोडो वगैरे प्लॅन असेल तर हे त्याच्या उलटे आहे हे नक्की.
महाराष्ट्रात सतत कोणीतरी "अपमान टीआरपी" खेचत असते. आता कोश्यारी आज खेचत आहेत. त्या भाषणाची क्लिप पाहिली तर त्यात अपमान करायचा उद्देश दिसत नाही. पण शिवाजी महाराज नावाभोवती महाराष्ट्रात किती सेन्सिटिव्हिटी आहे याचा अजिबात गंध कोश्यारींना नाही असे त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसते. त्याचे इंग्रजी/मराठी भाषांतर ठरवून केल्यासारखे केले आहे अपमान दाखवायला.
सावरकरांना मानणारा वर्ग ,
सावरकरांना मानणारा वर्ग , राहुल- सावरकरांवर बोलला नसता, तर त्याच्यासोबत यायला तयारच होता.

हा वर्ग आणि गांधी नेहरू आंबेडकर ( आता फुले, शाहु महाराजसुद्धा)
यांच्याबद्दल विशिष्ट धारणा असलेला वर्ग यांचा छेद घेतला तर फार फरक असणार नाही.
एक बरं झालं. सावरकरांनी माफीनामे लिहिलेच नाहीत, असं आता कोणी म्हणत नाहीए.
ANI हे भारत सरकारचं अघोषित
ANI हे भारत सरकारचं अघोषित मुखपत्र आहे. मोदीसोबत केदारनाथच्या गुंफेत फक्त Ani होतं. नोटा बंदीचे आणि कृषी कायद्यांचे फायदे सांगणारा एकच माणूस Ani वरचं दिसला होता.
त्यांनी ठरवून असं भाषांतर केलं असेल, तर हा महाराष्ट्रासाठी काहीतरी संदेश असावा.
कोशियारी राज्यपाल आहेत. मदर इंडियाच्या कन्हैयालालसारखे दात काढत ते फुले दांपत्याबद्दल जे बोलले त्याचा अभिप्रेत अर्थही वाईट नव्हता. पण राज्यपालांने काय आणि कसं बोलावं यांची काही अपेक्षा असते. त्यांनी राज्यपाल म्हणून केलेली, न केलेली कामं हा आणखी वेगळा भाग.
मुख्य म्हणजे त्याला माफीनामा
मुख्य म्हणजे त्याला माफीनामा मानणारा बुद्धिजीवी नेहरू आणि गांधी च्या पत्रबाबत गप्प बसतो हा खरा दुटप्पपणा

)
दुसरी गोष्ट सावरकरांना पेंशन मिळत होती तर गांधींना येरवड्यातील आगाखान पॅलेस मध्ये पी एफ मिळाला होता काय ?
त्याची ही पावती मीडियावर व्हायरल होत आहे .
पण उगीचच एखाद्याच्या देशभक्ती वर शिंतोडे उडवायला आपल्याला नाही आवडत
तिसरी गोष्ट सावरकर इंगर्जांचे हस्तक होते आणि गांधी नेहरू इंग्रजांचे शत्रू होते तर सत्ता वाटपात इंग्रजांनी नेहरूंना पंतप्रधान पद कसे घेऊ दिले ? ( अधीच सांगतो , एडविना च्या ओळखीचा आणि पंतप्रधान पदाचा संबंध न्हाय
सावरकर इंग्रजांचे हस्तक असून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गीली आणि गांधी नेहरू शत्रू असताना त्यांना रॉयल ट्रीटमेंट ये बात हजम हो नहीं रही है !
मागच्या पानावर लिंक दिलेलं
मागच्या पानावर लिंक दिलेलं ट्वीट उडालीय.
ती क्लिप इथेही आहे
https://twitter.com/t_d_h_nair/status/1593985786042798080
कागाळू सर, तुम्ही मस्त करमणूक
कागाळू सर, तुम्ही मस्त करमणूक करता. असेच शेंडाबुडखा नसलेले मुद्दे मांडत रहा. उद्या बोलू त्यावर. तुमचा कोडगेपणा प्रतिपच्चंद्रलेखेव असल्याने तुम्हांला फरक पडणार नाहीत.
<< उगाचच कशाला वाद निर्माण
<< उगाचच कशाला वाद निर्माण करुन आपल्यात दुफळी निर्माण करायची? हा अगदी सामान्य विचार झाला. >>> याच्याशी अजिबात सहमत नाही. भारत जोडो वगैरे प्लॅन असेल तर हे त्याच्या उलटे आहे हे नक्की. >>
------- उलटे आहे असे अनेकांना वाटत रहाते, किंवा ते तसे आहे हे दाखविण्याचा आटापिटा असतो.
अनेक दशकांच्या खोट्या समजाला खर्याचा मुलामा देऊन बोगस भारत-जोडो त्यांना नकोच आहे. सत्य आणि अहिंसा हे दोन परिणामकारक शस्त्र महात्मा गांधींनी या देशातल्या जनतेला दिली. ते सत्याला चिकटून रहाण्यावर ठाम आहेत. त्यांचा हेतू अगदीच स्वच्छ दिसत आहे. सामान्य राजकारणी व्यक्तीने यावर भाष्य करणे टाळले असते - पण राहुल गांधी अनेक योजने पुढे गेले आहेत. अत्यंत खडतर मार्ग त्यांनी निवडला आहे (म्हणून माझा आदर वाढला आहे).
गांधी हत्या कटातला सहभाग, महिना ६० रुपये पेन्शन / मानधन/ नुकसान भरपाई , अनेक माफीनामे, नावाच्या आधी स्वयंघोषित (?) ' वीर' हे सर्व मला २०१४ च्या आधी माहित नव्हते. आज पुरावे समोर आल्यावर अनेक दशकांच्या समजूतीला धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण खोट्या विश्वात वावरणे हा पर्याय नाही आहे. सत्याला सामोरे जा... डरो मत.
उलटे आहे असे अनेकांना वाटत
उलटे आहे असे अनेकांना वाटत रहाते, किंवा ते तसे आहे हे दाखविण्याचा आटापिटा असतो. >> हे काय आहे नक्की? कसला आटापिटा? रागा चांगला माणूस आहे. स्वच्छ आहे. पण उगाच त्याला फार कसलेला राजकारणी दाखवण्याची गरज नाही.
सत्याला सामोरे जा... डरो मत >> हे ही कोणाकरता आहे? माझ्या पोस्टचा वरती संदर्भ आहे. जे काय असेल सत्य ते आहे. ते नाकारायचे नाही म्हणजे गरज नसताना उगाच उगाळत बसायचे असे ही नाही. लोक काय वाट्टेल ते विचारतील. नेत्यांना बरोबर कळते काय बोलायचे आणि काय नाही ते.
आपल्या निष्ठा नेत्यांच्या चरणांशी न वाहता तत्त्वांना वाहिलेल्या असतील तर कोणत्याच माहितीने धक्का वगैरे बसत नाही. अगदी आवडत्या नेत्याची चूक कळाली तरी त्या चुकीचे समर्थन न करता त्या नेत्याबद्दल आदर असू शकतोच.
रागाने एका झटक्यात एक मोठा वर्ग एलियनेट केला आहे. तो वर्ग मुळात त्याचा समर्थक नव्ह्ता वगैरे ठीक आहे. पण त्याची जी इमेज तयार केली गेली आहे ती भेदून लोकांसमोर जाण्याची एक संधी या यात्रेने मिळत आहे. आज अमेरिकन निवडणुकीतून हे स्पष्ट दिसत आहे की लोकांनी कितीही कॉन्स्पिरसी थिअरी पसरवली तरी हे पसंत नसलेला एक मोठा वर्ग कुंपणावर असतो. तो सहसा रिझनेबल वागतो. निवडणुकांचे निर्णय हाच वर्ग बदलतो. नाहीतर यांचे व त्यांचे ठरलेले घट्ट बेस असतातच, ते कधीच बदलत नाहीत. त्यांना काही सांगून तसाही उपयोग नसतो. पण हे विषय काढायचे नाहीत ते केवळ त्या कुंपणावरच्या लोकांना दूर लोटायचे नाही म्हणून.
गुन्हे हिंसक आणि अहिंसक अशा
गुन्हे हिंसक आणि अहिंसक अशा दोन प्रकारात मोडतात. भारतीय दंड संहिता १८६० नुसार दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांना ब्रिटिशकालीन भारतात वेगवेगळ्या शिक्षा होत्या, आजही त्या तशाच कायम आहेत . दोन गुन्हे प्रकारांतला फरक शाळकरीला समजायला अवघड नाही.
सरकार विरोधात शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन, असहकार, उपोषण हे अहिंसक प्रकार. पोलिस अधिकारी, किंवा कलेक्टरवर गोळी झाडणे, शस्त्र गोळा करणे, नेत्यावर प्राणाघातक हल्ला करणे, खून करणे हे हिंसक प्रकार. दोन्ही अपराधांसाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत.
गांधी, आणि नेहरु यांना त्यांच्या अपराधासाठी section 124A ( sedetion) लावण्यात आले होते. सावरकरांच्या अपराधासाठी sections 121, 121A, 122, 123 अंतर्गत कारवाई होती.
भारत (Indian Penal Code १८६० ) तसेच पाकिस्तान, आणि बांग्लादेश या तिन्ही देशांच्या संहितेचा पाया ब्रिटीश कायद्यावर आधारलेली आहे. वरचे सर्व section तिन्ही देशांत आजही सारखेच आहेत.
Indian Penal Code येथे उपलब्द आहे.
https://www.indiacode.nic.in/handle/123456789/2263?sam_handle=123456789/...
121. Waging, or attempting to wage war, or abetting waging of war, against the Government of India. 121A. Conspiracy to commit offences punishable by section 121.
122. Collecting arms, etc., with intention of waging war against the Government of India.
123. Concealing with intent to facilitate design to wage war.
124. Assaulting President. Governor, etc., with intent to compel or restrain the exercise of any lawful power.
124A. Sedition.
सावरकर हिंसक क्रांती चे कट्टर पुरस्कर्ते होते, त्यामुळे होणार्या परिणामांची त्यांना जाण होती. त्यांनी स्वत: हिंसा करण्यासाठी शस्त्र चालविले नसावे (माहिती उघड झालेली नाही आहे) पण ते तरुण देशभक्तांना हिंसेसाठी प्रोत्साहन द्यायचे.
अवघ्या १७ व्या वयांत अनंत कान्हेरे यांनी नाशिकमधे जॅक्सनला मारले (२१ डिसेंबर, १९०९), त्या आधी ब्रिटन मधे मदनलाल धिंग्रा यांनी कजर्न कर्झन वायली (१ जुलै, १९०९). मुंबई प्रांताचे गवर्नर अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर वासुदेव बळवंट गोगटे यांनी पुण्या मधे प्राणघातक हल्ला केला (२२ जुलै, २०३१), हल्ल्यामधून हॉटसन बचावले. पुढे ३० जानेवारी १९४८ मधे महात्मा गांधी यांच्या खुन्यालाही तात्यारावांचे आशिर्वाद मिळालेले होते. प्रत्येक कटांत त्यांचा सहभाग होता , त्यांनी इतरांना पुढे केले आहे, पण स्वत: मागेच राहिले. तुम्ही लढा, मी पोस्तूल/ शस्त्र पुरवितो.
गांधी यांनी स्वत: सत्य आणि अहिंसेचे तत्व कडकडीत पाळले, इतरांना सांगितले आणि आज कोट्यावधी लोक त्यांच्या तत्वाचे आचरण करत आहे. गांधी यांनी कोट्यावधी जनतेला "सोबत" घेतले.
फारएण्ड -
फारएण्ड -
राहुल गांधी हे कसलेले राजकारणी आहेत असे मी कधी, कुठेही म्हटलेले नाही. ते तसे नाही आहेत. (त्यांना किंवा कुणाला देवत्वही देणार नाही.... पण ते मिळेल तेव्हा विरोधही करावा लागेल) ते सत्तेचे राजकारण करत नाही एव्हढेच मला म्हणायचे आहे.
भारतीय राजकारणातला स्तर त्यांच्या यात्रेमुळे उंचावल्या जात आहे, त्याचा फायदा सर्वांनाच होईल. सामान्य जनतेने आपला स्वार्थ बघावा... आणि (तुलनात्मक दृष्ट्या - आज आहे त्यापेक्षा)चांगले, शिकलेले, प्रामाणिक, पुरोगामी, पारदर्शी राजकारण्यांचा टक्का वाढावा.
>सावरकरांना मानणारा वर्ग ,
>सावरकरांना मानणारा वर्ग , राहुल- सावरकरांवर बोलला नसता, तर त्याच्यासोबत यायला तयारच होता.
आलं लक्षात.
मला एक कळलं नाही.
मला एक कळलं नाही.
भाज्यपाल कोश्यारी फुले दांपत्याबद्दल थिल्लरपणे बोलले. गुजराती मारवाडी नसते तए मुंबईत पैसा नसता असं म्हणाले. महाराज आदर्श असण्याचा काळ जुना झाला असं म्हणून त्यांचं आणि गडकरींचं नाव एका वाक्यात घेतलं. भाजप प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीनाम्यांची तुलना महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रांशी केली. ही सगळी त्यांची मतं होती. पण त्यात काही वावगं नाही. त्यावरून कोणी कालवा केला तर तो अपमान टीआरपी. या वरच्या गोष्टींमुळे कोणताही वर्ग भाजपपासून दुरावण्याची भीती नाही.
तेच राहुल सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल बोलला, , तेही जे आहे ते - तर मात्र मोठा वर्ग काँग्रेसपासून कायमचा दुरावणार. तसंही राहुले हे काही पहिल्यांदा बोलला नाहीए.
आता सावरकरांवरून राहुलची अक्कल काढणार कोण तर कट्टर नथुराम समर्थक शरद पोंक्षे. मुळात या असल्या लोकांना भारत जोडो मान्य तरी असेल का?
आता महाराज आणि सावरकरांकडे वळू. महाराजांचा उदय आणि त्यांनी आदिल शहा, निजाम यांचा पराभव करणं , औरंगजेबाला न जुमानणं या गोष्टी करणार्या महाराजांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा , कर्तृत्वाचा गौरव एकीकडे आरती लिहून करीत त्यांना अवतार रूप द्यायचं आणि मानवी पराक्रमाला कमी लेखायचं आणि दुस रीकडे सोनेरी पानांत त्याला काकतालीय न्याय, दैवगती असली कारणं जोडायची - या सगळ्याला काय म्हणायचं ?
कागाळू सर, आता तुमच्याकडे
कागाळू सर, आता तुमच्याकडे वळतो.
प्रथम आगाखान पॅलेस उचलून येरवड्याला नेल्याबद्दल तुमचं कौतुक.
दुसरं, तुम्ही गांधींना पी एफ देत होतं का असं म्हणताय तो १९४२ च्या चले जाव आंदोलनात गांधी आणि इतर नेत्यांना आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारला होत असलेला खर्च आहे. आता तुम्ही त्यांना पॅलेसमध्ये का ठेवलं असं विचाराल्,तर त्या वेळी इतक्या मोठ्या संख्येने सामान्य लोकांना आणि नेत्यांना अटक करण्यात आलं की नेहमीचे तुरुंग अपुरे पडले. त्या आधीच्या कैदेत ते येरवडा व इतर तुरुंगांतच होते. गांधींनी अगदी दक्षिण आफ्रिकेपासून अनेकदा तुरुंगवास भोगला आहे.
गांधींनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहून कळवलं की देशात ( त्यावेळी दुष्काळ होता) लाखो लोक उपासमारीने मरत असताना मला व माझ्या सारख्या हजारो लोकांना तुरुंगात ठेवण्यासाठी होणारा खर्च हा पैशाचा अपव्यय आहे. हा पैसा लोकांना मदत करण्यावर खर्च व्हायला हवा.
तुम्हांला मला सोडायचं नसेल, तर कोंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांना सोडा. मला दुसर्या कोणत्याही साध्या तुरुंगात ठेवा.
काळ्या पाण्याची सजा होईपर्यंतच्या सावरकरांना कोणीही नावे ठेवत नाही.
<उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?> हे तुमच्या प्रत्येक प्रतिसादाला चपखल बसतं. हा प्रतिसाद तर तुमच्या मुकुटातला शिरपेच आहे.
भारत जोडो यात्रेच्या
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हे लिहिलं जात आहे तर एक नोंद इथे करावीशी वाटते.
काँग्रेस मेली पाहिजे असं म्हणणारे योगेंद्र यादव, इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि जनलोकपाल या नावाखाली जे काही चाललं होतं त्यातले अग्रणी प्रशांत भूषण ते रोहित वेमुलाची आई आणि गौरी लंकेशची आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाले.
एकाच वेळी राहुलजी गांधीजी आणि
एकाच वेळी राहुलजी गांधीजी आणि सावरकर या दोघांनाही मानणारा आणि राहुलजींच्या सावरकरांबद्दलच्या मुग्ध बोलांमुळे दुखावला बिखावला जाणारा मोठा वर्ग???
हे म्हणजे शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या आणि पेप्पा पिगचं टायटल म्युझिक सारख्याच तन्मयतेने ऐकणारे लोक असणार.
>कागाळू सर, आता तुमच्याकडे
>कागाळू सर, आता तुमच्याकडे वळतो.
Why ? oh why ?
एखाद्याच्या विधानाचा
एखाद्याच्या विधानाचा तर्कशुद्ध प्रतिवाद करता अला नाही की मग त्याला मुग्ध बोल म्हणायची नवीच ट्रिक समजली आज !
सखाराम गटणे 'मुग्ध वाक्य' असं
सखाराम गटणे 'मुग्ध वाक्य' असं म्हणतो(वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांथस्थ येतात)- त्यावरून लिहिलंय ते मुग्ध बोल.
चालू दे करमणूक.
सिरीयस चर्चा(आणि 'प्रतिवाद'!) कसली करायची राहुलजी गांधीजींच्या स्टेटमेंट्सची
शत्रूपक्षातील स्त्रियांची
शत्रूपक्षातील स्त्रियांची खणानारळाने ओटी भरून त्यांची सन्मानाने पाठवणी करणे चूक, त्यांच्यावर बलात्कार करायला हवा होता, आपल्या जनानखान्यात भरती करायला हवं होतं - सावरकरांच्या या स्टेटमेंट्सवर चर्चा करायची का?
महाराज हे आयडॉल म्हणून जुने झाले. गांधींना आयडॉल ठरवणं तर सपशेल चूकच होतं. सावरकर हेच आमचे खरे आयडॉल.
होऊन जाऊ द्या.
सावरकरांनी हे लिहिलं आहे ते
सावरकरांनी हे लिहिलं आहे ते चुकीचंच आहे. कोणतंही reverse discrimination चूकच. त्याने अन्याय दूर कधीच होत नाही. कोणीतरी केलेल्या रेपसाठी बदला म्हणून निष्पाप स्त्रियांचा रेप करणं. हजार वर्षांपुर्वीच्या गुन्ह्यासाठी आताच्या वारसांवर अन्याय करणं. कोणीतरी केलेल्या खुनासाठी त्याची सगळी वस्ती पेटवून देऊन मजा बघणं आणि त्याचं समर्थन करणं. हे सगळे प्रकार नैतिकदृष्ट्या चुकीचेच आहेत.
सावरकरांनी त्या काळी हे असले वादग्रस्त विचार उघडपणे लिहिणं. हे खूपच shocking आहे.
गांधींनी तर विचार सोडा प्रत्यक्ष कृतीच अत्यंत वादग्रस्त करणं- The facts are that after his wife, Kasturba, died in 1944, Gandhi began the habit of sharing his bed with naked young women: his personal doctor, Sushila Nayar, and his grandnieces Abha and Manu, who were then in their late teens and about 60 years younger than him.
आता हे करण्यामागे त्यांचा उद्देश कितीही 'उदात्त'(?!) असला तरी आजच्या काळात कोणी आईबाप आपल्या स्वतःच्या तरुण मुलीला अशा आश्रमात अशा गुरुपाशी सोडतील का?
एकूणच तो काळ आजच्यापेक्षा वेगळा होता हे जाणवतं.
महाराष्ट्राच्या राजकारणी
महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांचं, फडणविस आणि ठाकरे, आणि जनतेच मला कळत नाही. एकाच वेळी दोन विरुध्द सांगणारे आदर्श कसे असू शकतात यांचे. सावरकर सांगतात की शत्रूच्या स्त्रियांवर अत्याचार करा. जे करत नाहीत ते बुळगे. शिवाजी महाराज नुसतं सांगत नाहीत तर कृतीतून दाखवून देतात स्वकीय आणि शत्रूच्या स्त्रियांना आदराने, मानाने वागवा.
सावरकर यांच्याबद्दलची झाकली मूठ सवा लाखाची परिस्थिती बदलली कारण भाजप आणि संबंधित लोकांनी केलेली महात्मा गांधी आणि नेहरूंची केलेली बदनामी. अतिशय विकृत असे फोटोशॉप केलेले फोटो शेअर केलेत. म्हणून सावरकरांचे flaw इतरांनी बाहेर काढलेत. नाहीतर शालेय अभ्यासक्रमात सावरकरांची चांगली बाजूच शिकवली गेली. मला स्वतः सावरकरांचे सत्य हे मागच्या तीन चार वर्षात ज्ञात झाले.
सावरकरांनी सर्वप्रथम द्वी राष्ट्र संकल्पना मांडली हे सत्य आहे. सावरकर सोनेरी पाने ह्या पुस्तकात लिहितात की शत्रूच्या स्त्रियांवर अत्याचार करा. न करणारे बुळगे. त्यात शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात. हेही सत्य आहे. हिंदू राष्ट्र दर्शन ह्या पुस्तकात, पाने १०४ ते १०६, सावरकर लिहितात ब्रिटिश जपानी सैन्य विरुध्द लढत आहेत. तेव्हा हिंदू महासभेच्या युवकांनी सैन्यात भरती होवून त्यांना मदत करावी. हेही सत्य आहे. सावरकरांनी इंग्रजांची पेन्शन घेतली हेही सत्य आहे.
मग हे राजकारणी सत्य ऐकून भडकले का? लोकांनां सत्य ऐकून एवढा त्रास का होतोय?
https://youtu.be/oV_Dr85vPZU
https://youtu.be/oV_Dr85vPZU
गांधींबद्दल नेहमीचं तुणतुणं
गांधींबद्दल नेहमीचं तुणतुणं आलं. - त्याचं उत्तर याआधी दिलं आहे.
सावरकरांचे शत्रूपक्षातील स्त्रियांबद्दलचे विचार चुकीचे आहेत, हे इथे तोंडदेखलं लिहून काय उपयोग? मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार केले पाहिजेत असं म्हणणारा भगवा वेशधारी हा लाखो लोकांसाठी आदरणीय आहे, असं उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलाने न्यायालयात सांगितलंय. बिल्किस बानोच्या बलात्कार्यांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं जातं. तेव्हा सावरकरांचेच विचार हिंदुत्ववाद्यांनी अंगिकारले आहेत, असं म्हणता येतं.
<< भारत जोडो यात्रा कन्हैय्या
<< भारत जोडो यात्रा कन्हैय्या कुमारने काढली असती तर त्याचा इम्पॅक्ट जबरदस्त झाला असता. त्याची वक्तृत्वकला, हजरजबाबीपणा, अचूक माहिती ने दावे खोडून काढणे हे सर्व अशा मोहिमांसाठीच आहे. >>
------- सहमत, कन्हैय्या कुमार अभ्यासू आहे... आणि बिनतोड युक्तीवाद करतो.
त्यांचं उत्तर आधीच दिलंय ?
त्यांचं उत्तर आधीच दिलंय ?
काय वांगे सर !
सावरकर फक्त बोलले तरी त्यांच्या विरुद्ध रान पेटवताय आणि
महात्म्याने त्या लहान मुलींच्या भावनांचा विचार न करता केलेल्या ब्रह्मचार्य प्रयोगाला हेतुपुरस्सर समर्थन देताय ?
हे जुन्या काळातील # me too आहे का ?
बर वांगे सर , महात्म्याला ब्रह्मचर्याचे घाणेरडे प्रयोग करण्याची आवश्यकता का भासली ? त्यावेळी अशी कोणती परिस्थीती होती की असले प्रयोग करण्याची गरज भासली ? आणि म्हातारपणात केलेल्या असल्या प्रयोगाचे निष्कर्ष अचूक असतील का ? याचे योग्य उत्तर देऊ शकता का ?
तुम्ही जरा अभ्यासू दिसता म्हणून विचारले हो !
सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक
सार्वजनिक जीवन आणि वैयक्तिक आयुष्य ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.
चार बायकांशी संबंध ठेवले, बाहेर अफेअर केले म्हणजे त्या माणसाचे महत्व कमी होत नाही
जर त्याचे समजतील कार्य चांगले असेल तर.
असे पण सावरकर सोडले तर bjp
असे पण सावरकर सोडले तर bjp कडे कोणी आदरणीय व्यक्ती नाही
ज्याने देशासाठी काही केले आहे असा
Pages