भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कागारळू सर, ती तेव्हा १९ वर्षांची होती. तिला विचारूनच प्रयोगात सहभागी करून घेतलं. त्यापुढचं तुमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. तुम्ही राहू द्या.
बिल्किस बानोसारख्या अनेक प्रकरणांत सावरकरांचा उपदेश अंमलात आणला गेला. तेव्हा सावरकर फक्त बोलले असं राहत नाही.

सावरकर भाजपचे कुठे? ते संघात नव्हते आणि जनसंघातही.
तुमचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला तेव्हा यांनी सावरकरांना पळविलं.

आता सावरकरांवरून राहुलची अक्कल काढणार कोण तर कट्टर नथुराम समर्थक शरद पोंक्षे. मुळात या असल्या लोकांना भारत जोडो मान्य तरी असेल का? >>> भरत, जे कट्टर आहेत ते बद्लणार नाहीत. त्यांना रागा बोलला काय किंवा न बोलला काय काही फरक पडत नाही. हे त्यांच्याकरता नाही.

भारत जोडो चा नक्की उद्देश काय आहे? १९८९ पासून भाजपविरोधी सगळे गट एकत्र येउन जसे सगळा मतदारवर्ग एकाच गटाच्या मागे आणून भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे कमीअधिक यशस्वी प्रयत्न केले गेले, तसेच हे काहीतरी आहे का? तसे असेल सर्व प्रकारचे राजकारण त्यात आलेच. मग होऊन जाउ दे जे काय जुनेपुराणे काढायचे ते. ते एडविनाचा किंवा ब्रह्मचर्याच्या प्रयोगांचा विषय चघळतील, तुम्ही माफीचा चघळा.

पण भाजपविरोधी गट एकसंध नाही. त्यात अनेकांचे स्वार्थ आहेत. रागा स्वतः क्लीन असला, तरी या बाकीच्यांमधले अनेक मुळात स्वतःच जातीयवादी आहेत, प्रतिगामी आहेत. ते केवळ एक संधी म्हणून याकडे पाहतील आणि पुन्हा सत्तेत वाटा मिळायचा चान्स दिसेल तेव्हा बिनदिक्कतपणे भाजपकडे जाउन बसतील. वरती शाखाहारी पिशाच्च यांनी त्याबद्दल बरेच काही पटण्यासारखे लिहीले आहे. तेव्हा भाजपचीच गेम त्यांच्यावर उलटवणे नजीकच्या काळात अजिबात शक्य दिसत नाही. मी "सावरकरांबद्दल असले काही आत्ता काढू नका" लिहीले ते त्या संदर्भाने. कारण त्यातून जितके लोक मिळतील त्यापेक्षा जास्त दूर लोटले जातील. सावरकरांनी जे काय चुकीचे केले आहे त्याचे समर्थन करायची किंवा लपवायची मला काही गरज नाही.

रागाला जनमत आपल्या बाजूला वळवायचे असेल तर क्लीन राजकारण हाच फक्त त्याचा चॉइस आहे. एक कुंपणावरचा वर्ग आहे. अनेक जातींमधे विखुरलेला. तो सध्या भाजपकडे झुकलेला आहे. पण त्याला बिल्किस बानो केस मधल्या गुन्हेगारांना सोडणे वगैरे गोष्टी पसंत नाहीत. त्यांना टॅप करायला पुन्हा भाजपसारखेच राजकारण अजिबात उपयोगाचे नाही. रागासारखा स्वच्छ राजकारण करणारा नेता व आजूबाजूला जुन्या खोडांना निवृत्त करून, ते सगळे जुनेपुराणे आणि आता मतांच्या हिशेबात न चालणारे पैतरे बाजूला ठेवून नवीन तरूण नेते काहीतरी भरीव कार्यक्रम ठरवतील. असले काही केले तरच सुरूवातीला एक भारतव्यापी विरोधी पक्ष म्हणून व भविष्यात एक समर्थ पर्याय म्हणून काही चान्स आहे. नाहीतर सध्याचे बुरूज अभेद्य आहेत. असले काही खडे त्यावर मारून काही फरक पडणार नाही.

स्थानिक राजकीय पक्ष च bjp ची खोड मोडतील.
दक्षिण भारतात bjp चे जास्त लाड तेथील जनता कधीच करत नव्हती आणि करणार पण नाही.
महाराष्ट्र मध्ये आघाडी टिकली तर bjp जिंकत नाही.
बंगाल मध्ये ममता पुरून उरेल.
.
काँग्रेस कडे अजून पण कार्यकर्ते आणि यंत्रणा आहे
Bjp जिंकली ती फक्त बाबरी मशीद आंदोलने मुळे.
ना मोदी मुळे जिंकली ना त्यांच्या ढोंगी राष्ट्रवाद मुळे.
आता यूपी,आणि बिहार सोडला तर कारण ती दोन्ही राज्यात मतदार परिपक्व नाहीत.
म्हणून bjp ल चान्स आहे.
Bjp च गड मजबूत वैगेरे काही नाही.
सत्ता जातीय असे वाटले की सर्व मीडिया bjp विरोधी जाईल.
अर्णव आणि काही मोजकेच गुलाम चॅनेल सोडले तर.

फारएण्ड, thank God for your posts on the political forums. नाहीतर इकडे तेच तेच ID त्याच त्याच पोस्ट्स टाकत असतात. कधी कोणी दुसर्‍याचे म्हणणे मान्य केले आहे की विचार परिवर्तन झाले आहे असे कधीच पाहिले नाही इथे. दळण चालू असते.

एखादी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी किंवा पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाही आहे. सर्व सामान्य जनतेचा विश्वास आणि स्वच्छ राजकारण हेच राहुल गांधी यांचे बलस्थान आहे.

बहुतांश भारतीय समाज शांतताप्रिय आहे, त्या सर्वांना भारत - जोडो मधे आशेचा एक किरण दिसत आहे. मिळणार्‍या अफाट यशामुळे राहुल गांधी हुरळणार नाहीत पण त्यांनी सावधानता ठेवायला हवी. पक्षांत लोकांचे येणे जाणे सुरुच राहिल, तो मानवी स्वभाव आहे.

२०१४ तसेच २०१९ मधे काँग्रेस पक्षाला मत दिले नाही पण भारत जोडो सहभागासाठी खास सुटी काढून आलो असे सांगणारायुवा. किंवा एका आईने तिच्या दोन कच्च्या बच्च्यांसाठी, त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी या यात्रेत सामिल होणे अशी शेकडो उदाहरणे दिसत आहे.

प्रत्येक राजनैतिक पक्षाला त्याचा स्वातंत्र सेनानी असावा असा नियम आहे का? आपचा, मविवाचा कोणता;
एक तर आताची काँग्रेस इ आहे; त्यात फक्त नेहरू प्रोजींनी ने या काँग्रेस इ वर आणि पर्यायाने देशावर राज्य kelay....बाकी सगळे स्वातंत्र्य सैनिकाचे वंशज आज नोकरी धंधा करतात किंवा काय करतात हे आपल्याला माहित पण नाहीये; आणि त्यांना आताच्या काँग्रेस इ मधून कस हाकललं हेही नवीन नाहीये ....सो रागा काहीही बोलू शकतो कारण तो नेहरूंचा प्रोजींनी आहे; पर्यायाने त्याचा तो अधिकारच आहे अस वाटण प्रचंड गुलामगिरीचा लक्षण aahe.
भारताचा स्वातंत्र्य लढा हा बहुजिनसी होता आणि त्याला फक्त गांधी नेहरूंचा कारण यानेच खरे प्रॉब्लेम्स सुरु zalet. आणि आजही रागा तेच kartoye. रागा अपील न होण्याचं हे खूप मोठे कारण aahe, की त्याला काँग्रेस इ आणि दिल्ली स्वतःची मालमत्ता vatate.

रागा स्वतः क्लीन असला, तरी या बाकीच्यांमधले अनेक मुळात स्वतःच जातीयवादी आहेत, प्रतिगामी आहेत. //

खुद्द काँग्रेसचे अनेक समर्थक टोकाचे जातीयवादी आहेत. नेतेही आहेत. आणि हे समर्थक अगदी क्लिन भाषा बोलणारे, मायबोलीवर आयडी टिकवू शकणारे असे आहेत पण मनात विखार इतका की ब्रिगेडिना complex देतील. नितीन राऊतांसारखे काँग्रेसचे लोक उघड वादग्रस्त बोलतात आणि मग त्यांच्याबद्दल बोललं जातं पण दुसरे क्लिन बोलणारे जास्त डेंजरस आहेत. They will throw any community under the bus to get few extra votes.
आणि आता पूर्णपणे सोनिया व मुलांच्या हातात सत्ता आहे, समजुतीचे चार शब्द सांगायला प्रणब मुखर्जी नाहीत, मनमोहन सिंग आजारी, सगळा आनंदच आहे.

रागा अपील न होण्याचं हे खूप मोठे कारण aahe, की त्याला काँग्रेस इ आणि दिल्ली स्वतःची मालमत्ता vatate.>>>>>>>>>
नाही हो !
देशात सध्या मोदी ,/ भाजप विरोधात लाट आहे , त्यांनी देश विकून खाल्ला म्हणून .
युक्रेन रशिया युद्धामुळे आख्या जगात महागाई नसताना फक्त भारतात महागाई वाढवली म्हणून ( येथील कट्टर काँग्रेसी कार्यकर्ते हा विषय छान समजावून सांगतात !)
सावरकरांवर राहुल ने छान पैकी भाषण देवून मधमाशांचे मोहोळ उठऊन दिलेच आहे , आता त्याचे हिंदुत्व बद्दलचे अगम्य विचार पुन्हा एकदा ऐकायला मिळाले म्हणजे काँग्रेसला भरघोस मते मिळतील यात शंकाच नाही .
यात्रेच्या उर्वरित काळात हा योग येईलच याची खात्री आहे .
सावरकरांवर त्याची अतोनात श्रद्धा होती हे सर्वश्रुत होते , आणि यात्रेकडे अख्या भारताचे लक्ष लागलेले असताना सावरकरांबद्दल बोलून भारतातील तमाम हिंदूच्या मनाला फुंकर घालण्याची चलाखी दाखवून आपण उत्तम राजकारणी असल्याचे गुण दाखवून दिले .
खरंच राहुलजी आता लहान राहिलेले नसून महान आणि धडाकेबाज देखील झाले आहेत या बद्दल कोणालाही शंका राहिलेली नसेल .
पक्षाच्या पंतप्रधानाचा आदेश भर पत्रकार परिषदेत फाडून त्यांनी स्वतःची प्रगल्भता दाखवून दिलीच होती, त्यांच्या त्या असीम पराक्रमाबद्दल आतल्या गाठीचे काँग्रेसी कार्यकर्ते अजूनही मूग गिळून बसले आहेत .
आणि भाजप कार्यकर्त्यांना गांधी घराण्याचे कौतुक करण्यासाठी छोटेसे कारण देखील पुरत असताना राहुलजी मात्र ढिगाने कारणे देत आहेत...

काँग्रेसच्या हक्काच्या दलीत मुस्लिम मतांनी काँग्रेस चे शेकड्यांनी खासदार २०१४/१९ ला निवडून आणले , पण बहुमत थोडक्यांनी हुकले !
आणि काँग्रेसची सत्ता येवू शकली नाही .
थोडक्यात सर्व दलीत मुस्लिम मते काँग्रेसच्या पाठीशी उभी असल्याचा त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे , आता त्यांना पंतप्रधान बनण्यासाठी हिंदूच्या मताची गरज आहे .
म्हणून त्यांनी हिंदूंना आपलेसे करण्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल सुरू केलेली दिसते . याचे उत्तम उदाहरण त्यांनी नुकतेच सावरकरांवरील आदर व्यक्त करून दिले आहेच आता फक्त पूर्वी प्रमाणे कट्टर हिंदुत्व , भगवा दहशतवाद , बद्दल बोलून देश विरोधी हिंदूंना टार्गेट केले की उरलेले सगळे हिंदू त्यांच्या मागे उभे राहतील
आणि २०२४ ला राहुलजी पंतप्रधान पदावर विराजमान होतील याची खात्री वाटते ........

भारताला कट्टर धार्मिक देश बनवायचं आहे की प्रगत देश बनवायचा आहे असे दोन पर्याय वर देशातील लोक विचार करतात.
हिंदू ,हिंदुत्व, मुस्लिम ,muslimatv देशाला प्रगत होवू देणार नाहीत.
Bjp नी हिंदुत्व वर भर देण्यापेक्षा देशाच्या प्रगतीवर लक्ष दिले तर च bjp टिकेल.
भावनिक प्रश्न ची तीव्रता कमी वेळ असते.
शेवटी रोजगार,सुरक्षा ,सुशासन हेच अती महत्वाचे असते.
Bjp रोजगार,सुशासन, प्रगती ह्या वर न बोलता
फक्त धार्मिक पॉइंट वर बोलते आणि हेच लोकांना आता आवडत नाही.
Bjp विषयी तिरस्कार त्या मुळेच वाढत आहे.

Bjp ची सत्ता च आता देशात आली आहे.
त्या कमी वेळात पण bjp नी देशातील लोकशाही धोक्यात आणली आहे.
देशातील अनेक संस्था मोडकळीस आणल्या आहेत.
खूप धोकादायक आहे हे.
लोकशाही नसेल आणि भारत हिंदू राष्ट्र असेल तरी असे हिंदू राष्ट्र हिंदू ना पण नको आहे.

काल जयराम रमेश यांनी भाजपला उत्तर दिलं आहे - तुम्ही जोवर आमच्या नेत्यां बद्दल खोटंनाटं बोलत राहाल, तो पर्यंत आम्ही तुमच्या नेत्याबद्दलचं हे सत्य सांगत राहू. हे बरोबरच आहे. या आक्रमकपणाची गरज आहे. भाजपवाले काहीही पसरवत राहतील आणि काँग्रेसवाले गप बसतील हे दिवस गेलेत. आता केसेसही ठोकल्या जातात. भाजपवाल्यांना संघशाखेपासून असल्या विकृत कुजबुजीची सवय आहे आणि या गोष्टी चारचौघात बोलू नयेत याचं तारतम्य सुटलंय किंवा आता सैंया भए कोतवाल फिर डर काहे का? असं झालंय.
बाकी सटरफटर नेते जाऊ द्या. खासदार अनंतकुमार हेगडे ज्याप्रकारची गलिच्छ वक्तव्ये करत आलेत त्यामुळे वातावरण गढूळ होतंय असं कोणी म्हणत नाही. भाजपचा पाठिराखा असलेला स्वतःला सुशिक्षित , सुसंस्कृत समजणारा मतदारवर्ग त्यामुळे दुरावत नाही, तो सावरकरांबद्दलचं सत्य सांगून दुरावणार असेल तर त्यांच्यासारखे ढोंगी तेच.

महाराजांबद्दल , फुल्यांवर इतक्या थिल्लर कमेंट्स भाजपवाले करतात त्यावर मात्र काही नाही. उलट त्याचं स्पष्टीकरण आणि सारवासारव. हा दुटप्पीपणा आहे किंवा दुसरं काही ज्याबद्दल काही लोक बोलत असतात.

सावरकरांनी महाराजांबद्दल आणि शत्रूपक्षातल्या स्त्रियांबद्दल (हेही खरं तर महाराजांबद्दलच) जे लिहिलं त्यानंतरही सावरकर इतके आदरणीय वाटणं हा ढोंगीपणाचा कळस आहे. तुमचे हेच विचार आहेत, हे उघडपणे सांगा.

राहुलचं ते वाक्य प्रेस कॉन्फरन्समधलं आहे. भारत जोडो यात्रेच्या सभेत तो यावर बोलत नाही. मीडियानेही जणू भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकला होता, अगदी लोकसत्तेतही क्वचित बातम्या यायच्या. त्यांना नंतर शेगावची सभा कव्हर करावी लागली.
मी आणि इतर काहींनी म्हटल्याप्रमाणे सावरकरांबद्दलची ही माहिती भाजपने गांधीनेहरूंची बदनामी करायला सुरुवात केल्यावरच अधिक प्रमाणात समोर आणली गेली. आता त्या खर्‍या माहितीमुळे लोक दूर जाणार असतील तर तो त्यांचा दोष आहे.
-------
---------
जे लोक काँग्रेसला कधीही मत देण्याची शक्यता नाही, त्यांची काँग्रेसमधील राहुल व गांधी परिवाराचं स्थान याबद्दलची मतं लक्षात घ्यायची गरज मला वाटत नाही.
----------
जॉलीजुई, तुमची फटाके बंदीवरची मतं वाचली. इथली मतंही त्याच्याशी सुसंगतच आहेत. तुम्हांला उत्तर देऊन उपयोग नाही, हे कळलंय. पण तुम्ही मांडलेल्या मुद्द्याला उत्तर रेकॉर्डवर असणं गरजेचं आहे म्हणून ते नंतर कधीतरी देईन.
---

आज तरी राहुल गांधी हे सामान्य भारतीय जनतेच्या मनात राज्य करत आहे.
ह्या वाक्याशी सहमत... विनोदवीर म्हणून यांचे आमच्या सारख्या सामान्य भारतीयांच्या मनातले स्थान कोणीच घेऊ शकणार नाहीत.

हे म्हणजे शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या आणि पेप्पा पिगचं टायटल म्युझिक सारख्याच तन्मयतेने ऐकणारे लोक असणार.
ह ह पु वा

Bjp नेत्यांची भाषण ऐकली तर खरे विनोद वीर तेच आहेत त्यांना देशात तोड नाही
खरे तर आता आयटी सेल active झाला आहे.
पगारी नोकर ठेवले आहेत bjp नी विविध समाज माध्यमावर कॉमेंट करण्यासाठी.
काही पगारी आहेत तर काही रोजंदारी वर आहेत.
प्रति कॉमेंट त्यांना पैसे मिळतात.
अनेक पत्रकार रोजंदारी वर bjp कडे काम करत आहेत.bjp samarthan मध्ये जे युक्तिवाद करतात ती सामान्य लोक नाहीत .
हे सर्व पगारी आहेत.
त्यांना सर्व डाटा पुरवला जातो.
त्याच पद्धती नी त्यांना व्यक्त व्हायचं असते.
थोडे मन एकाग्र केले की सहज माहीत पडेल हे सर्व पगारी आहेत ते.
काँगेस चे समर्थन करणारी लोक ही सामान्य जनता आहे .
कोणाची नोकर नाही किंवा प्रती कॉमेंट त्यांना पैसे पण मिळत नाहीत
खरा जनतेचा आवाज आहे.

राहुल आणि काँग्रेसनेत्यांचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य पाणी गढूळ करण्यासाठी नसून आधीच गढूळ असलेल्या पाण्यात फिरवलेली तुरटी आहे.

<< महाराजांबद्दल , फुल्यांवर इतक्या थिल्लर कमेंट्स भाजपवाले करतात त्यावर मात्र काही नाही. >>

------ " राज्यपाल कोश्यारी यांचे " ते " वक्तव्य बघितले तर मला तरी त्यात वाद निर्माण करणारे बोलले असे आढळले नाही , त्यांच्या सगळ्याच मतांशी मी सहमत असेल असे नाही. " अशा निर्बुद्ध प्रतिक्रिया वाचायला मिळतात.

फुले दांम्पत्याबद्दल गलिच्छ बोलणारा, शिवाजी महाराजां बद्दल अप प्रचार करणारा कोश्यारी हा राज्यपाल पदावर रहाण्यास अपात्र आहे. कोश्यारी यांनी वादग्रस्त बोलायचे, देवेंद्र फडणविसांनी आणि भाजपाने त्याला पाठिशी घालायचे. राज्यपाल कोश्यारी भाजपाचा छुपा अजेंडा पुढे नेत आहे का? निव्वळ TRP चा प्रकार आहे असे दिसत नाही.

फुले दांम्पत्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध सर्व थरातून व्हायला हवा.

हा उन्मत्तपणा - मुजोरी आहे. शेतकर्‍यांवर गाड्या घालणा र्‍या मुलाचा बाप केंद्रात गृहराज्यमंत्री म्हणून राहतो. तिथे दिसणारा उन्मत्तपणा हाच. हेही व्यवस्थित विचार करून होतंय. उन्नावमध्ये अगदीच नाइलाज झाला म्हणून त्या आमदाराला आत टाकलं.

इथे काँग्रेसी लोक पगारावर आहेत असे आम्ही कधीच बोललो नाही बुवा !
कस आहे , आपल्याला आहे लष्कराच्या भाकऱ्या भाजायची सवय !
कोणी पदरच्या पैशाने मंथली पॅक करून मोबाईल वर मत ठोकत बसतो , तर कोणी जातपात धर्म पारड्यात टाकून मिळालेल्या सरकारी कार्यालइन् वेळेत !!!!!
म्हणून कोणी कोणाला पक्षाचे पगारी नोकर म्हणणे जरा चुकीच होईल

<< खरे तर आता आयटी सेल active झाला आहे. >>

------- अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांची " पप्प्पू " प्रतिमा तयार करण्यासाठी आय टी सेल झटत होती. पण फारसा उपयोग झालेला दिसत नाही.
आय टी सेल आता दुप्पट जोमाने कामाला लागणार, नवी भरती अपेक्षित आहे.

WhatsApp वर बीजेपी आयटी सेल नी बनवलेले msg आता खूप प्रमाणात यायला लागले आहेत.
मुळ गाभा.
हिंदू मुस्लिम मध्ये दरी कशी निर्माण होईल अशा अर्थाचे.
मोदी साहेबांना जगात किती मान आहे .
अशा अर्थाचे.
नेहरू,काँग्रेस,गांधी जी , आता शिवाजी महाराज (, सिनेमे पण निघाले ह्या वर )ह्यांचे महत्व नाकारणारे.
महागाई,बेरोजगारी, शेतकरी,कामगार ह्या विषयावर एक पण msg नाही.

मी असे msg लगेच delete करतो.
तोरसकर सध्या जोमात आहेत.तेच नेहमीचे रडगाणे गात असतात.
आणि पगारी आयटी सेल वाले वा wa wa करत असतात.
अर्णव च्या चॅनेल वर तर मुस्लिम ,मुस्लिम आणि मोदी मोदी ह्या पलीकडे काही नसते.
ही सर्व पाळलेली आहेत.

सध्या हिंदुत्वाचे फूट सोल्जर्स डॉ आंबेडकरांनी घटना कॉपी पेस्ट करून बनवली असं म्हणतात. काही त्यांना घटनाकार न म्हणता फक्त आरक्षणाचे जनक म्हणतात. उद्या हेच भाजपचे नेते बोलायला लागतील.

bjp चे हिंदुत्व म्हणजे सामान्य हिंदू ची मत नाहीत .
राहुल गांधी स्वच्छ आहेत, म्हणून तर अजून ed, CBI, च वापर करून त्यांना तुरुंगात टाकता येत नाही.
हीच मोठी समस्या आहे .
म्हणून ते पप्पू आहेत असे दावे ज्यांचे देश कार्यात काहीच योगदान नाही किंवा त्यांना पप्पू ठरवण्या इतके ते स्वतः जास्त हुशार नाहीत ते करत असतात.
पण राहुल जी हुशार आहेत,स्वच्छ आहेत,संवेदनशील आहेत,कपटी,कारस्थानी नाहीत.
चरित्र हिन नाहीत.
हे सामान्य लोकांना पटलेले आहे .लोकांचा विश्वास आहे.

रागाने सावरकरप्रेमींची फिकीर करू नये. त्याने सावरकरांवर स्तुतीसुमने उधळली तर हे लोक त्यात रागाच्या मनाचा मोठेपणा समजून रागामागे थोडेच गेले असते. "बघा बघा पप्पूदेखील सावरकराना मानतो म्हणजे सावरकर किती महान" हेच पसरवले असते.

भारतीय स्वतंत्र लढ्यात किंवा स्वतंत्र झाल्या नंतर देश घडविण्यात काँग्रेस चा मोठा सहभाग होता.
हिंदू स्वतंत्र लढ्यात पण होते आणि देश घडविण्यात पण त्यांचा सहभाग होता.
पण भारताच्या स्वतंत्र लढ्यात किंवा देश स्वतंत्र झाल्यानंतर देश घडविण्यात bjp च्या parent संघटनेचा पण काहीच सहभाग नव्हता.
आणि स्वतंत्र लढ्यात पण ह्यांचा काहीच सहभाग नव्हता.
त्या मुळे आता काही दिवसापासून .
Bjp IT सेल अनेक videos youtube वर् टाकतं आहे.
अनेक खोट्या डॉक्युमेंट्री बनत आहेत.
सर्वांचा उद्देश एकच.
नेहरू पासून गांधी जी पर्यंत सर्व ब्रिटिश चे हस्तक होते.
साहेब गेलेच नाहीत.
स्वतंत्र लढा झालाच नाही.
इत्यादी इत्यादी इत्यादी.

डॉ आंबेडकरांनी घटना कॉपी पेस्ट करून बनवली असं म्हणतात.

Bjp ची नीतिमत्ता बघून काही दिवसांनी हे राज्य घटना ही ब्रिटिश लोकांनीच लिहली. आणि आंबेडकर नी फक्त सही केली असे म्हणायला पण लाजनार नाहीत.
कारण खोटे बोलताना,खोटे दावे करताना ह्यांना काहीच लाज वाटत नाही.
भारताचे राजकारण ह्या आठ वर्षात इतक्या नीच पातळीवर गेले की देशाच्या ७५ वर्षाच्या काळात पण इतके खालच्या पातळीचे राजकारण भारतात झाले नाही.
थोडी तर लाज असायची नेत्यांना. नीतिमत्ता थोडी तरी पाळायचे.
आता सरळ **** सोडुन डोक्याला गुंडाळले आहे

हिंदू नी bjp ल त्यांची प्रातिनिधिक संघटना म्हणून नेमणूक केली नाही.
त्यांनी हिंदू हिंदू करून आणि आम्हीच हिंदू चे प्रतिनिधी आहोत असे चुकीचे दावे करून .
स्वतःचा स्वार्थ साधून घेवू नये.

भारत हा लोकशाही वादी च देश राहिला पाहिजे.
ना भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे .
ना मुस्लिम राष्ट्र झाला पाहिजे
ना बोध्द राष्ट्र झाला पाहिजे.
धार्मिक राष्ट्र सर्वात जास्त लोकांचे शोषण करतात.
पाकिस्तान बघा

काय अवस्था आहे लोकांची.

अत्यंत कठीण .
बंगला देश पाकिस्तान इतका धार्मिक नाही.
काही क्षेत्रात भारताच्या पुढे आहे.
Gulf देश धार्मिक कट्टर पना रस्त्यावर येवू देत नाहीत.
प्रगत आहेत.
माझा भारत पण धार्मिक राजसत्ता असणारा देश नको.
नाही तर सामान्य लोकांवर अनंत अत्याचार होतील

कट्टर धर्मवाद आणि कट्टर राष्ट्रवाद हा हुकूम शाही वृत्ती असणाऱ्या लोकांचे टॉनिक आहे.
ते जनतेला दिले की ती गुलामी सुरुवातीला मना ने करते .
नंतर स्थिर झाले राज्यकर्ते की बंदुकी ची गोळी त्यांना गुलामी करायला लावते.
जगाचा इतिहास आहे.
कट्टर राष्ट्रवाद आणि कट्टर धर्मवाद ह्या पासून सामान्य लोकांनी दूर राहावे

फाळणी हा विषय घेवूच नका.
नाही तर खूप अवघड होईल.
ब्रिटिश येण्या अगोदर हा देश एकच राज्य सत्तेचा भाग नव्हता.
मुस्लिम राज्यकर्ते च सर्वात मोठ्या भू भागावर राज्य करत होते.
आमचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी दूरदृष्टी ठेवून भारतातला एक करण्याचा प्रयत्न केला .
त्यांनी धार्मिक द्वेष ठेवला नाही.
त्या मुळे हिंदू असू की मुस्लिम जनता स्वराज्य साठी लढली.
पानिपत मध्ये एका पण हिंदू राजाने मराठी फौजेला मदत केली नाही उलट विरुद्ध गेले .
हा इतिहास आहे.
नंतर ब्रिटिश आले त्यांनी पूर्ण देश एकच सत्तेच्या अधिकारात आणला.
ते श्रेय त्यांचे.
त्यांनी देश एक केला तर फाळणी कोणत्या देशाची झाली?
फाळणी होण्यासाठी एकसंघ देश कुठे होता.
ब्रिटिश पूर्व काळात.
आणि फाळणी झाली हे हिंदू हिताचेच झाले.
ती झाली नसती तर आता भारतात लोकशाही नसती.
आणि मोदी पंतप्रधान पण नसते.
हिंदुत्व वर राजकारण करताच आले नसते.
फाळणी झाली हे योग्य च झाले.
नसते झाली तर आज ६० लाख पेक्षा जास्त मुस्लिम भारतात असते आणि त्यांनी पक्के मुस्लिम राज्य भारतात आणले असते.

Pages