Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55
सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!
मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?
आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतील सर्व राजे ,महाराजे
भारतील सर्व राजे ,महाराजे,बादशहा एकत्र आले असते तर ब्रिटिश कधीच जिंकले नसते.
आमच्या राजांना जास्त आयुष्य लाभले नाही ,नाही तर त्यांनी ते महान कार्य पण नक्कीच केले असतें.
आयटी सेल चे मंद भक्त कसे
आयटी सेल चे मंद भक्त कसे ओळखायचे ह्याचे एक उदाहरण.
युक्रेन ,रशिया युद्ध ल भारतातील महागाई लं कारण समजणारे .
अंध भक्त.
युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम कोणत्या देशांवर होईल जे देश ह्या दोन देशावर अवलंबून आहेत त्या देशांवर.
भारत अन्न धान्यात स्वयं पूर्ण आहे.
काँग्रेस सरकार नी हरित क्रांती केली आहे.
भारत technology मध्ये युक्रेन किंवा रशिया वर depend नाहीं.
खनिज तेल आणि नैसर्गिक वायू इराण देत होता .अल्प बुध्दी bjp सरकार नी स्व फायद्या साठी आणि धार्मिक रंग देवून ते होवू दिले नाही
अंबानी कृष्णा गोदावरी मध्ये नोटा छापत आहे.
रशिया भारताला खनिज तेल आज पण देण्यास तयार आहे स्वस्त किमतीत.
हत्यार देणार आहे
मग ह्या युद्धाचा भारतावर कसा परिणाम होईल.
प्रतेक देशाची स्वतःची सामर्थ स्थळ असतात
हेच अंध भक्तांना,मंद भक्तना माहीत नाही.
त्या मुळे युक्रेन रशिया युद्ध मुळे जगात महागाई वाढली म्हणून भारतात पण वाढली असे बुध्दी हिन युक्तिवाद ते करत असतात.
हो
हो
तुम्ही समजावा
स्वतःचे राज्य च नाही एक संघ आणि ब्रिटिश नी देश एकत्र केला नसता तर फाळणी कशी आणि कोणत्या देशाची झाली असती
ह्या वर सविस्तर लिहा
Bjp फालतू पना सोडून
Bjp फालतू पना सोडून
धार्मिक रंग देण्याचे सोडून .
सुशासन,रोजगार, सामाजिक न्याय, समाजातील सर्व आर्थिक स्तर मधील लोकांचे कल्याण.
सर्वांना priamary आणि उच्च शिक्षण .
शेतकऱ्यांना पूर्ण संरक्षण त्यांच्या जमिनी मित्रांना मिळाव्या म्हणून प्रयत्न न करणे
असे जनतेच्या हिताचे राज्य करणार असेल तर bjp विषयी द्वेष नाही
पण धर्म पुढे करून सत्ता.
मित्रांना देश लुटण्यासाठी पूर्ण मदत.
शेतकरी सामान्य लोक ह्यांची संपत्ती काढून घेवून ती मित्रांना वाटणे.
देशात सर्व घटनात्मक संस्था कमजोर करणे.
अर्णव सारखे महामूर्ख खुलेआम देशात .मूर्ख पना करणे.
हे सर्व bjp ni बंद केले पाहिजे
तिकडे रूनमेश आणि इकडे हेमंत !
तिकडे रूनमेश आणि इकडे हेमंत !
धागाच हायजॅक करतात....
सविस्तर उत्तर देवून समाधान
सविस्तर उत्तर देवून समाधान करा..
. .i
तुमच्या कडे एका पण
तुमच्या कडे एका पण प्रश्नांचे उत्तर नाही
देश ब्रिटिश राज्यात च एकसंघ झाला आणि नंतर फाळणी झाली .
ते हिंदू हितासाठी च.
ब्रिटिश पूर्ण काळात ना देश एकसंघ होता.
ब्रिटिश नसते आले तर किती तुकडे झाले असते देव जाणे
फाळणी झाली,ब्रिटिश आले हे सर्व आज जो भारत आहे त्याच्या हिताचेच होते.
सावरकरांना वीर ही उपाधी
सावरकरांना वीर ही उपाधी त्यांनी स्वतः:च् चित्रगुप्त या टोपणनावाने लिहिलेल्या स्वतः:च्याच चरित्रात दिली. पुढे त्यांच्या बंधूने चित्रगुप्त म्हणजे वि.दा.च असं सांगितलं - असं वाचनात आलं
खरंय का हे?
हे खरेच असेल
हे खरेच असेल
सावरकर हे महान च आहेत
सावरकर हे महान च आहेत त्यांच्या विषयी वाईट का बोलावे.
ब्रिटिश सोडून जाताना हिंदू लोकांचे हीत जपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
अहिंसा पेक्षा लढून स्वतंत्र मिळवावे असे त्यांचे विचार होते.
पण जगात राज्य असणाऱ्या अती शक्ती शाली ब्रिटिश लोकांशी सशस्त्र लढा उभारला तर तो आपण जिंकणे अशक्य च उलट अनेक अत्याचार ते भारतीय लोकांवर करतील.
ही भीती गांधी जी ना असावी .
म्हणून अहिंसा .
त्यांच्या विषयी काही आक्षेप नाही.
पण bjp ची नियत हिंदू हीत वादी पण नाही.
म्हणून bjp ल विरोध आहे.
हेमंत , सडेतोड उत्तर दिल्या
हेमंत , सडेतोड उत्तर दिल्या बद्दल लाखमोलाचा सलाम / \

राहुलजी च्या साथीने काही लोकं भाजप वरील राग सावरकरांवर काढत आहे , पण तुम्ही मात्र निष्पक्षपणे विचार मांडता !!!!!!
हिंदू च bjp chya राज्यात
हिंदू च bjp chya राज्यात भीती च्या छाये खाली आहेत.
१) जमीन सुधारणा कायदा.
कॉन्ट्रॅक्ट शेती आणि त्यासाठी मदत ठरू शकतील अशी अनेक कलमे त्या कायद्यात होती.
तो कायदा टिकला असता तर शेतकरी च भूमिहीन झाला असता.
मोठ मोठे धनाढ्य उद्योगपती आणि सामान्य शेतकरी ह्यांची स्पर्धा लावली तर कोण जिंकणार हे सांगायला नको.
बहुसंख्य शेतकरी हे हिंदू च आहेत.म्हणजे हिंदू च बरबाद झाले असते
आणि त्या वर bjp आयटी सेल ची मत खूप भयानक ..
शेतकरी देशद्रोही आहेत, शेतकरी आयात घावू आहेत. . नालायक आहेत इत्यादी . ..हिंदू ना बरबाद करायला हे तयार च होते.
खरे तर bjp नी सावरकर चे पण नाव वापरू नये
विरोधी पक्ष ल सरकारी यंत्रणा वापरून संपवणे हे कोणताच भारतीय सहन करणार नाही.
आज पर्यंत ed,cbi, आणि बाकी सरकारी यंत्रणांनी फक्त विरोधी पक्षावर च कारवाई केली आहे एका पण सत्ताधारी bjp नेता किंवा त्यांचे मित्र ह्यांच्यावर कारवाई केली नाही.
असे देशात आताच घडतं आहे आणि ते देशासाठी खूप धोकादायक आहे
Bjp नी सामान्य लोकांची मत काय आहेत हे एकदा समजून घ्यावे नाही तर जनता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार च आहे
आपल्याला देशाचे सरकार श्रीमंत
आपल्याला देशाचे सरकार श्रीमंत नको आहे.
देशातील शेवटचा माणूस पण सुखी हवा आहे.
पाया च मजबूत हवा आहे.
पेट्रोल डिझेल ल bio इंधन हा पर्याय आहे भारताला bio इंधन उत्पादित करणे बिलकुल कठीण नाही.
निसर्गाने खूप काही भारताला दिले आहे.
Elon mask ची मुजोरी जगा नी आता बघितली आहे
दहा श्रीमंत व्यक्ती आपल्याला नकोत त्या पेक्षा १००. लोक आरामात पोट भरतील अशी धोरण हवी आहेत
<< आज पर्यंत ed,cbi, आणि बाकी
<< आज पर्यंत ed,cbi, आणि बाकी सरकारी यंत्रणांनी फक्त विरोधी पक्षावर च कारवाई केली आहे एका पण सत्ताधारी bjp नेता किंवा त्यांचे मित्र ह्यांच्यावर कारवाई केली नाही. >>
----- भ्रष्टाचाराचे आरोप असणार्या अनेकांना ( नारायण राणे , हेमंत बिस्वा सर्मा... यादी मोठी आहे) भाजपा हे सुरक्षित स्थान वाटते (safe heaven).
ZERO Tolerance on corruption असे निवडणूक जाहिरनाम्यात सांगितल्यावर आज राणे यांना केंद्रात मंत्रीपदी विराजमान केले आहे.
मनमोहन - धन्यवाद!
मनमोहन - धन्यवाद!
नंतर आलेल्या आणखी पोस्ट्स वाचल्या. पुन्हा एकदा - ज्या लोकांना भाजपनेत्यांची गलिच्छ वक्तव्ये खटकत नाहीत तो वर्ग रागाकरता नाहीच. पण जो कुंपणावरचा वर्ग आहे त्याला ते खटकते. उदाहरण म्हणून बिल्किस बानो खटल्यातील गुन्हेगारांचा उल्लेख केला होता. पॉइण्ट समजायला तितके पुरेसे असावे. भाजपचे अनकंडिशनल समर्थन करणारा एक वर्ग, भाजपला अनकंडिशनल विरोध करणारा दुसरा, यापेक्षा या दोन्हीच्या मधे असलेला एक बराच मोठा वर्ग आहे. हा असा वर्ग आस्तित्त्वात नसता, तर २००९ आणि २०१४ च्या निकालांमधे इतका फरक पडला नसता.
या वर्गाला कोणाचेही असंस्कृत वागणे आवडत नाही. त्याला मुस्लिमद्वेष नको आहे. भ्रष्टाचार, मनमानी निर्णय पसंत नसतात. आपापल्या दैनंदिन कामात व्यग्र असलेले व पूर्वी जेमतेम रोजचा पेपर वाचणारे हे लोक आता फक्त व्हॉट्सअॅप वाचतात व टीव्हीवर हॅमर होणार्या बातम्या बघतात. त्यांची राजकीय समज फार सखोल नसते पण निकाल कोठे झुकणार हे हाच वर्ग ठरवतो. या लोकांना भाजप आज खटकले तरी त्यांच्यापुढे पर्याय काय आहे? सेनेचा भरवसा नाही. काल शिंद्यांवर तुटून पडणारे आज त्यांच्याच गटात सामील होताना दिसतात. राष्ट्रवादी ब्राह्मणविरोधी आहेच पण इतरांनाही तो पक्ष तितका आपला वाटत नाही - आणि मुळात त्यांची झेप पश्चिम महाराष्ट्राबाहेर कधीच नव्हती. आप अजून पूर्ण देशात पर्याय देण्याइतकी मोठी नाही. वंचित आघाडी वगैरेंना तर बहुतेक पक्ष फक्त तेवढे आमची मते खाऊ नका म्हणण्यापुरते वापरतात. राहिली कॉंग्रेस. त्यातही फक्त रागा. बाकी सगळे ६०-७० च्या दशकांमधे नावापुरते संस्थानिक होते तेवढेच फक्त नावाचा बडेजाव असलेले.
तेव्हा रागाने असल्या धंद्यात न पडता सध्याच्या प्रश्नांवर फोकस करून द्वेषरहित राजकारण करणे हाच एक प्रॅक्टिकल उपाय आहे. ते जयराम रमेश वगैरे म्हणतात तसे केल्याने फक्त सोशल नेटवर्क गँगवॉर होईल. बाकी काही नाही. आणि त्यात भाजप फार पुढे आहे.
मी आधी लिहीले आहे त्याचा सारांश हा आहे.
आणि होय. सावरकरांनी शत्रूंच्या स्त्रियांबद्दल लिहीलेले मला पसंत नाही. आणि तरीही मला सावरकरांबद्दल आदर आहे. भारताच्या स्वातंत्र्याकरता कधी ना कधी काहीतरी केलेल्या प्रत्येकाबद्दल तो आहे. त्यातून ढोंग वगैरे दिसत असेल तर असू दे. त्याबद्दल खुलासे करण्यात मला इंटरेस्ट नाही.
बाकी निर्बुद्ध प्रतिक्रिया? मी कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या बोलण्याबद्दल लिहीले आहे. त्याची लिन्कही दिली आहे. ती बघा. त्यांनी कसला अपप्रचार केलाय?
पटत नसणार्या मुद्द्यांनाही लेबले न लावता उत्तर देता येते. बघा जमले तर.
सावरकरांनी शत्रूंच्या
सावरकरांनी शत्रूंच्या स्त्रियांबद्दल लिहीलेले मला पसंत नाही. आणि तरीही मला सावरकरांबद्दल आदर आहे.>>>
म्हणून मलाही बिल्किस बानो रेपिस्टांं बद्दल अत्यंत आदर आहे.
भारताच्या स्वातंत्र्याकरता कधी ना कधी काहीतरी केलेल्या प्रत्येकाबद्दल तो आहे.>>>त्यांनी स्वातंत्र्याकरता कधी ना कधी काहीतरी काय केले ते मला माहित नाही.
नाहीतर आमचे छत्रपति शिवाजी महाराज. त्यांनी सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करून तिला घरी परत पाठवले.
फारेंड, तुझ्या सगळ्याच पोस्टी
फारेंड, तुझ्या सगळ्याच पोस्टी आवडल्या आणि पटल्या!!
गांधीनीच स्वतः 'My
गांधीनीच स्वतः 'My experiments with truth ' मध्ये सर्व काही उघड लिहिले आहे. ते साऱ्या जगाला माहीत आहे. त्यात आता टवाळकीशिवाय दुसरी कोणतीच भर घालता येण्याजोगी नाही.
सावरकरांविषयी काही गंभीर प्रवाद आहेत. एक आरोप कोर्टात सिद्ध झालेला आहे. अनेक खाजगी पत्रांमधून उल्लेख आहेत. इथे लिहीत नाही. लिहिण्याजोगे नाही. चिखल चिवडू नये, त्यात फुललेली कमळे पाहावीत, म्हणून.
जसे मतदार कुंपणावर असतात तसे
जसे मतदार कुंपणावर असतात तसे राजकिय नेते पण कुंपणावर असतात
कोणत्याही पक्षाच्या ideakogy शी त्यांना काही देणेघेणे नसते.
सत्ता आणि पद मिळवणे हेच ध्येय असते
.जनमत बदलत आहे असे त्यांना वाटले की ते पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जातात.
जशी ह्या आठ वर्षात bjp ची सत्ता आली की लगेच काँग्रेस मधील किंवा बाकी पक्षातील नेते bjp मध्ये गेले.
Bjp congres नेत्यांनीच आता भरली आहे.
आता जनमत बदलत आहे असे वाटले की bjp सोडणारे पण असंख्य नेते असतील.
आता bjp ल पर्याय नाही हा पॉइंट फक्त प्रतिवाद करण्या साठी ठीक आहे.
काहीच वर्षांपूर्वी काँग्रेस ला तरी कुठे पर्याय होता.
Bjp हिशोबात पण नव्हती.
आज काय स्थिती आहे काँग्रेस दुबळी झाली आहे आणि bjp सशक्त.
केंद्रात सत्ता मिळेल इतके संख्याबळ bjp कडे येवू नये.
असाच प्रयत्न आता केला जाणार.
स्थानिक पक्ष हे काम उत्तम करतील .राहिलेली कसर काँग्रेस पुरी करेल.
एकच पक्षाची सत्ता केंद्रात नकोच आहे.
आणि पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाची तर बिलकुल नको.
आघाडी सरकार च लोकशाही साठी आणि देशासाठी फायद्याची आहेत.
गांधीनीच स्वतः 'My
गांधीनीच स्वतः 'My experiments with truth ' मध्ये सर्व काही उघड लिहिले आहे. ते साऱ्या जगाला माहीत आहे. त्यात आता टवाळकीशिवाय दुसरी कोणतीच भर घालता येण्याजोगी नाही.//
वावा रोचक मतं आहेत तुमची. तुम्हाला गांधी करायचे तो प्रकार योग्य वाटतो का? समर्थनीय वाटतं का? तुम्ही स्वतः महिला असाल तर- राजीखुषीने अशा प्रकारात आनंदाने सहभागी व्हाल का? पुरुष असाल तर- आपल्या घरातील टीनेज मुलीने अशा प्रकारात सहभागी व्हावं असं वाटतं का? आज याबद्दल चर्चा करणं म्हणजे टवाळी करणं असं तुम्हाला वाटतं का?
खरा सामना हा bjp आणि स्थानिक
खरा सामना हा bjp आणि स्थानिक पक्ष ह्यांच्यात च होणार आहे.
कर्नाटक सोडले तसे पूर्ण दक्षिण भारतात स्थानिक पक्ष च सत्तेत आहेत.
बंगाल,नी कधीच राष्ट्रीय पक्षाला सत्ता दिली नाही.
महाराष्ट्र मध्ये पण तेच घडणार आहे.
सेना आणि राष्ट्रवादी च bjp ल इथे टक्कर देईल .
आणि पराभव पण करेल.
Up मध्ये समाजवादी पक्ष उत्तम रीत्या bjp शी लढत देईल मोकळे रान यूपी मध्ये पण bjp ल मिळणार नाही
त्या महिला त्यात राजीखुशीने
त्या महिला त्यात राजीखुशीने त्यात सहभागी झाल्या नव्हत्या हे कोणत्या आधारावर ठरलं?
हेमंत यांच्या लेखन फटकेबाजी
हेमंत यांच्या लेखन फटकेबाजी मध्ये भाजप वर विशेष राग दिसतो पण त्याच प्रमाणे त्यांची सावरकरांवर अतोनात श्रद्धा दिसते . त्यामुळे येथील भरत सारख्या पुरोगाम्यांना हेमंत या आयडीला भाजप विरोधी कंपू मध्ये घ्यावे की नाही हा मोठा यक्ष प्रश्न पडला असेल.

फारेण्ड, मी वर लिहिलेल्या
फारेण्ड, मी वर लिहिलेल्या बर्याच गोष्टी स्पेसिफिकली तुम्हांला उद्देशून नव्हत्या.
रादर त्या भाजप समर्थकांना उद्देशून होत्या. भाजप समर्थक इतके कोडगे आहेत. इतकी वर्षे त्यांनी राहुलला पप्पू म्हणून हिणवलं. पण मोदीच्या पप्पूगिरीचे एवढे दाखले देऊनही त्यांचा खोटारडेपणा चालूच राहतो.
शिवाय तुम्हांला कोशियारींचं वक्तव्य खटकलं नाही, म्हणून मला ते खटकू नये असं नाही. महाराष्ट्राने याआधी अनेक खरोखरची आदरणीय व्यक्तिमत्त्वे असणारे राज्यपाल पाहिले आहेत. तिथे असा थिल्लर माणूस बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी पक्षपातीपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या ते वेगळं.
<या वर्गाला कोणाचेही असंस्कृत वागणे आवडत नाही.>
सावरकरांनी माफीनामे लिहिले , हे सांगण्यात असंस्कृत काय आहे? १९१० पर्यंतच्या सावरकरांबद्दल मलाही आदर आहे. काँग्रेसनेही त्यांचे ते श्रेय कधीही नाकारले नाही.
तुम्ही कुंपणावरचा एक वर्ग म्हणताय त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न भाजप सतत करत आला आहे. नेहरू गांधींबद्दलच्या अपप्रचाराला बळी पडलेले लोक यांतही आहेत. एकच गोष्ट हजार वेळा सांगितली, हजार लोकांनी सांगितली, मोठ्या पदावरच्या - लेखक म्हणवणार्यांनी सांगितली की ती खरी वाटू लागते. त्यांच्यासाठी या अपप्रचाराला उत्तर देऊन तथ्य मांडण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
जयराम रमेश यांचं उत्तर तुम्हांला गँग वॉर वाटतं. मग भाजप च्या अपप्रचाराला उत्तर कसं द्यायचं? भाजपने फक्त म.गांधी आणि नेहरू घराण्याबद्दल केलेल्या अपप्रचारा साठी वेगळा धागा काढतो. की इतकी वर्षे केलं तसं मुकाट ऐकून घ्यायचं?
राहुल गांधी भारत जोडो यात्रेत जनसामान्यांशी संबंधित अनेक प्रश्नांवर बोलला. देशापुढच्या प्रश्नांबद्दल बोलला. ज्यांच्यावर अन्याय झाला अशा लोकांना त्याला जाऊन भेटावंसं वाटलं. त्याला मीडियाने कव्हरेज दिलं का? आता सावरकरांबर बोलल्यावर वावटळ उठली आणि काल अमोल पालेकर आणि संध्या गोखलेंना अर्बन नक्सल ठरवलं गेलं. माझ्या ओळखीचे, माझे माजी सहकर्मी असं बोलतात तेव्हा विष किती खोलवर भिनलं आहे ते दिसतं. त्याला शस्त्रक्रिया हाच उपाय आहे.
मग त्या स्व खुशीने सामील
मग त्या स्व खुशीने सामील झाल्याची त्यांच्या हस्ताक्षर असलेली पत्रके जाहीर करा , नाही तरी सावरकर आणि गांधींनी लिहिलेल्या आज्ञाधारक सेवक चा सोईस्कररित्या वेगवेगळे अर्थ लावण्याची काँग्रेसी ना सवयच आहे .
कागाळू सर, मुळात सावरक रांवर
कागाळू सर, मुळात सावरक रांवर शिंतोडे उडताहेत ते तुम्हा भाजपवाल्यांमुळेच. तुम्ही त्यांच्यापासून दूर रहा. त्यांना कसलाही त्रास होणार नाही. आणि फालतू कमेंट करण्यापेक्षा हेमंत यांनी भाजपबद्दल मां डलेल्या मुद्द्यांना उत्तर द्या. भाजप मनोरंजन धाग्यावरही हल्ली तुम्ही फिरकला नाहीत. असं काय झालं?
कागाळू सरांचा आजार
कागाळू सरांचा आजार
कागाळू सर, who you?
देशात आता पर्यंत काँग्रेस चीच
देशात आता पर्यंत काँग्रेस चीच सत्ता होती.
पण आम्हला सावरकर माहीत आहेत..
शालेय शिक्षणात सावरकर मुलांना शिकवले आहेत.
त्यांचा पुस्तकात आदराने च उल्लेख आहे.
हे सर्व काँग्रेस सत्तेवर असताना झाले आहे.
मग सावरकर ची बदनामी काँग्रेस नी केली की bjp नी हाच खरा प्रश्न आहे
" नथुराम गोडसे यांनी महात्मा
" नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना मारलेले मला आवडले नाही आणि तरी मला गोडसें बद्दल आदर आहे. एक लक्षात घ्यायला हवे, गोडसे हे महान देशभक्त होते, स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला होता.... त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका नाही. माझे मत एका कृत्यामुळे बनवत/ बदलत नाही . "
सावरकरांच्या लेखणी मधून ( स्त्रियांबद्दल ) आधी विचार व्यक्त झाला, पुढे गुजरात दंगलीच्या निमीत्ताने अद्दल घडवण्यासाठी तो विचार अमलांत आणला गेला... कायद्यानुसार गुन्हेगारांना शिक्षा ( तो अजून वेगळा विषय आहे) झाली... आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे गोड निमीत्त साधून या "वीरांना" तुरुंगांत काय सडवायचे असा थोर विचार सावरकरांना आदर्श मानणार्या मोदी- शहा यांनी केला. (आम्ही भारत रत्न देण्यास असमर्थ आहोत, पण ) या कृत्याद्वारे त्यांनी आपल्या आदर्श व्यक्तीच्या लिखाणाबद्दल एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली. आता तुरुंगातून स्वातंत्र्य झाल्यावर - हार-तुरे, आरत्या , जंगी सार्वजनिक स्वागत हे हवेच...
" राजकीय हत्यार " म्हणून स्त्रियांवर अत्याचार/ बलात्कार झालेले आपल्याला मान्य आहे का? समर्थनीय आहे का? घरांतल्या नरवीरांनी ( मुलांनी/ भावांनी/ वडिलांनी/ ) अशा प्रकारच्या "अद्दल " घडविण्याच्या घटनांत सक्रिय सहभाग घ्यावा असे आपल्याला वाटते का? एका स्त्रीवर अत्याचार केला म्हणून तुम्ही त्यांच्या सत्कार/ आरती करणार का?
कशा प्रकारचा समाज आपल्याला अभिप्रेत आहे?
हेमंत राव , सध्याच्या घडीला
हेमंत राव , सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व देखील करायला लायक नसलेला सावरकरांची बदनामी करतो आणि त्याचे समर्थक इथे त्याची री ओढून सावरकरांवर टीका करतात !
हे तुमच्या लक्षात आले नाही का ?
Pages