भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएण्ड -
तुम्ही दिलेली हिंदी भाषणाची लिंक त्याच वेळी बघितली होती. तो D Litt चा समारंभ होता.

फेब्रुबारी २०२२ घटना आहे, जुनी नाही.
रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे राज्यपालांनी म्हटलेले तुम्हाला योग्य वाटते का? खटकले का?

या दोन्ही घटनां कडे एकत्रित पाहिल्यावर राज्यपालांचा हेतू अशुद्ध आहे. एका ठरवून दिलेल्या अजेंड्यावर ते काम करत आहेत हे स्पष्ट दिसते.

राज्यपाल नी शिवाजी महाराज ह्यांची तुलना गडकरी आणि पवार ह्यांच्या शी केली .
म्हणजे राजांचा अपमान च केला.
पण". राज्यपाल न चा राजांचा अपमान करायचा हेतू नव्हता"
कोणाच्या मनात काय आहे आणि कोणाचा काय हेतू आहे हे कसे समजते बुवा.?
काही नवीन तंत्र ज्ञान विकसित झाले
आहे का.

गोडसे नी गांधी जी ची हत्या केली हे चूक पण त्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला म्हणून त्यांचा आदर आहे
असे नसते.
बैल किती ही कामाला चांगला असला आणि मालकाला च मारायला लागला की त्याला कसायला च विकतात.
लय कामाचा आहे म्हणून पाळत नाहीत

रागा नी फक्त पत्र वाचून दाखवली आहेत आणि तो खरीच आहेत.
त्यांनी काही चुकीचे केले नाही.

काँग्रेस चे नुकसान होईल त्या मुळे ही काळजी नको.
खरे तेच राहुल जी बोलले आहेत

राज्यपाल पदी बसलेल्या राजकारणी लोकांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेवून हळूहळू वन्य प्रस्थनाकडे वाटचाल चालू केलेली असते .
त्यांनी जास्त खटाटोप करायचा नसतो , पक्षाला अडचणीत तर बिलकुल आणायचे नसते .
कोषारी एखाद्या चळ लागलेल्या म्हाताऱ्या सारखा वाहत सुटला आहे .
त्याने कित्येकवेळा असंबद्ध बडबड करून भाजप ला अडचणीत आणले आहे .
गडकरी किंवा इतर कोणीही कितीही कामे करू द्या त्याची तुलना शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी घेतलेल्या कष्टा बरोबर होऊच शकत नाही .
भाजप ने बिलकुल वेळ न दवडता त्या त्याला बोलवून घेणे किंवा त्याने मीडिया समोर महाराजांच्या मूर्ती समोर डोके टेकवून माफी मागणे हा एकच पर्याय आहे .
भिडेंच्या संस्थेच्या कार्यापुढे भिडेंच्या बोलण्यामुळे निर्माण झालेला वाद गौण ठरतो , तसे कोषारींचे नाही !
भाजप च्या कृपेने सरकारी तामझाम मध्ये ऐश करत असताना येथील महापुरुषांच्या कार्याची तुलना सटर फटर नेत्यांशी करण्याचा संबंधच काय ?

रावण प्रकांडपंडित होता, शिवभक्त होता, त्याने शिवतांडव स्तोत्र रचले म्हणून त्याचे सीता पळवण्याचे कृत्य आवडले नसले तरी त्याच्याविषयी प्रचंड आदर आहे आणि म्हणून त्याचा विरोधक राम अजिबात पटत नाही. कसं वाटतंय वाचायला?

तसंच ते सावरकर यावत्याव महान होते व त्यांच्याविषयी आदर वाटतो वाक्य वाटतं.

सरळ सांगा की सावरकर विचार पटतात आणि गांधीनेहरू पटत नाहीत. लोकशाही आहे अजुनतरी. कशाला वैचारिक कसरती करायच्या..

बाकी कुंपणावरचे दूर जातीलची चिंताच नको. मराठी उच्चजातीय सोडले तर देशात कोणालाही 2014 पुर्वी या माणसाच्या खर्या खोट्या करामती माहीत नवत्या. एक स्वातंत्र्यसेनानी एवढी ओळख काॅन्ग्रेसी सरकारने करून दिली होती. तोही काॅन्ग्रैसचा मोठेपणा. पण संघभाजपाची कृतघ्नता प्रचंड की त्यांनी सावरकर महान दाखवायला सर्व स्वातंत्रलढ्यावरतीच प्रश्नचिन्ह लावले. आता सर्वांना खर्या करामती माहीत करून द्यायलाच हव्या. कुंपणावरच्याना तसंही काही ममत्व नवतंच कधी या मनुष्याविषयी. ममत्व फक्त उच्चजातीय ममव लोकांना. ते तसंही भाजपाने बट्ट्याबोळ केला तरी भाजपालाच चिकटून रहाणार.. तो मतदार नाहीच काॅग्रेसचा.

. पण संघभाजपाची कृतघ्नता प्रचंड की त्यांनी सावरकर महान दाखवायला सर्व स्वातंत्रलढ्यावरतीच प्रश्नचिन्ह लाव

हे खूप महत्त्वाचे आहे.
सावरकर शाळेत काँग्रेस नी शिकवले आणि त्यांच्या कार्याचा गौरव वाढेल असेच शिकवले.
इंदिराजी,असतील किंवा कोणी काँग्रेस नेता त्यांनी सावरकर वर कधीच टीका केली नाही.
निदान मला तरी माहीत नाही.
सावरकर न वर टीका कधी होवू लागली .
तर जेव्हा bjp स्वतंत्र लढा च नाकारू लागली,गांधी , नाच व्हीलन बनवायला लागली तेव्हा.
सावरकर च अपमान bjp नीच दुसऱ्यांना करायला चान्स दिला .

हो ! काँग्रेस फक्त एडविना ला गेलेली पत्रे दाबू शकली नाही .
अन्यथा महात्मा गांधी पेक्षा महान नेहरूंना करायला कमी पडली नसती.
त्याच काँग्रेस ने शाळांमधील इतिहासात मोगलांना देखील शुचिर्भूत करून वरचे स्थान दिले .
काँग्रेसचेच नेहरू शिवाजी महाराजांना लुटारू म्हणायचे आणि मोगलांना महान सम्राट !
काँग्रेसला glorification ची सवयच होती ....

मला इथे जे लिहायचं होतं, ते लिहून झालंय. काल संध्याकाळपासून आलेले प्रतिसाद वाचले नाहीत. तूर्तास या धाग्यावरून ब्रेक घेतोय.

राहुल गांधी यांनी याकरता हा मुद्दा घ्यायला नको.
बदला म्हणून हा मुद्दा उपस्थित केला असेल तर यात्रेच्या उद्देशाला सुरूंग लागतो. >>> शा.पि. हे परफेक्ट आहे. मी पन्नास वाक्यांत लिहीले ते दोन वाक्यांत चपखल आले आहे. हेच मला म्हणायचे होते.

सरळ सांगा की सावरकर विचार पटतात आणि गांधीनेहरू पटत नाहीत. लोकशाही आहे अजुनतरी. कशाला वैचारिक कसरती करायच्या.. >>> तुमचा चष्मा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट आहे म्हणून मी घातलेले कपडे रंगीतच नाहीत असे सांगू? सावरकरांच्या काही गोष्टी आवडत असतील, गांधींच्या काही आणि नेहरूंच्याही, तर हे कोणालातरी ढोंग वाटते म्हणून बदलणे हेच ढोंग आहे. मला जे वाटते ते रोखठोक लिहीले आहे.

कोणतीही एक बाजू घेउन मोकळे होणे सर्वात सोपे असते. आपले जे मत आहे ते का म्हणून डम्ब डाउन करायचे. ज्यांना न्युआन्सेस कळतील त्यांना कळतील. बाकीच्यांनी विचारले तर प्रश्नाचा टोन आणि आपला वेळ याप्रमाणे उत्तर द्यायचे, नाहीतर सोडून द्यायचे.

गांधी ब्रिटिश साम्राज्यचे actual सैनिक- सार्जंट मेजर होते ना. मेडल्स पण भेटली होती त्यांना. मग नंतर १९२० मध्ये त्यांनी ती मेडल्स परत केली. नाही नाही- भारतीय पारतंत्र्यबद्दल प्रोटेस्ट करण्यासाठी नाही - खिलाफत चळवळीला पाठिंबा म्हणून.

This was how his letter to the Viceroy ran, quoted from Young India dated 4th August, 1920:

It is not without a pang that 1 return the Kaisar-i-Hind gold medal granted to me by your predecessor for my humanitarian work in South Africa, the Zulu War medal granted in South Africa for my services as officer in charge of the Indian volunteer ambulance corps in 1906 and the Boer War medal for my services as assistant superintendent of the Indian volunteer stretcher-bearer corps during the Boer War of 1899-1900. I venture to return these medals in pursuance of the scheme of non-cooperation inaugurated today in connection with the Khilafat movement. Valuable as these honours have been to me, I cannot wear them with an easy conscience so long as my Mussalman countrymen have to labour under a wrong done to their religious sentiment.

लाज वाटली पाहिजे पप्पू व काँग्रेसीना सावरकरांना abuse करताना.

महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू ह्यांना बऱ्याचदा कुठलाही गुन्हा केला नसताना कारावास झाला होता. सावरकरांच्या बाबतीत तसे नव्हते, त्यामुळे त्यांना शिक्षाही त्याच प्रकारची झाली होती. खरे वीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगरू, त्यांनाही स्वातंत्र्याचा लढा पूर्ण करायचा होता, ब्रिटिश सरकारची माफी मागून तसे करता आले असते,परंतु ब्रिटिश सरकारपुढे दयेची भीक मागण्याचा दरिद्रीपणा त्यांनी केला नाही. ज्यांनी हा दरिद्रीपणा केला त्यांचे समर्थन कशासाठी करायचे?

बऱ्याच लोकांना १८१८ मध्ये ब्रिटिशांना साथ देऊन ईस्ट इंडिया डोक्यावर घेतल्याचा अभिमान असतो .
दर वर्षी १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या सैनिकांच्या स्मृतिस्तंभास अभिवादन करतील आणि काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या सावरकरांची पत्रे योग्य की अयोग्य वर हिरहिरीने वाद घालतील .....
शाही थाटात तुरुंगवास भोगणाऱ्या नेहरूंचे वारसदार राहुलजी सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आल्या मुळे त्याला स्वतःच्या घरण्या व्यतिरिक्त इतरांचे कार्य छोटे वाटणे साहजिकच आहे .
स्वातंत्र्यासाठी भगतसिंग , सावरकर , राजगुरू प्रमाणे घरादाराची राखरांगोळी करणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीर सैनिकांच्या यादीत गांधी घराणे ही असते तर आम्हीही गांधी घराण्याचा जयजयकार केलाच असता की .

भगतसिंग यांच्या फाशी संदर्भात महात्मा गांधी यांनी केलेले प्रयत्न
https://www.mkgandhi.org/articles/bhagat_singh.htm

" Bhagat Singh and his comrades' refusal to seek mercy and on the contrary demand execution in military style made the task very tough for Mahatma Gandhi. "

व्हॉईसरॉयला लिहीलेले २३ मार्च चे पत्रही प्रसिद्ध आहे. भगतसिंग यांची फाशी टाळण्यासाठी उपलब्द वेळांत प्रयत्न केले, यश आले नाही.

राहुल गांधी सावरकर ह्यांच्या माफिनाम्यावर बोलल्या नंतर अवस्थी नी व्हिडिओ टाकला आहे.
सावरकर न ची बाजू सावरणे हा एकमेव हेतू त्या व्हिडिओ चा आहे.
अवस्थी चे अनेक व्हिडिओ चेक केले.
Bjp चे समर्थन करण्या साठी च त्यांचे सर्व उपत्याप चालू आहेत.
आयटी सेल चाच ते एक हिस्सा आहेत.
.व्हिडिओ मध्ये कॉमेंट करणारे पण paid commenter आहेत.
एकसुरी सर्व कॉमेंट आहेत व्हिडिओ खाली.
स्क्रिप्ट लिहल्या सारख्या

अवस्थी नाव वाचून च त्या मध्ये काय असेल ह्या अंदाज होता.
आता व्हिडिओ बघितल.
आणि अंदाज खराच ठरला.
सर्व राजकीय पक्ष .
अभ्यासू लोक पदरी बाळगतात.
लेखक,स्तंभ लेखक,पत्रकार ,आता youtubers,fb वर पोस्ट करणारे .जे अभ्यासू असतात.
त्यांचे काम असते लोकांचा बुध्दी भेद करणे.
पण आव असतो निःपक्ष पणाचा.

ह्याच्या उलट दुसरे पण पदरी बाळगलेले असतात.
त्यांचे काम फक्त trol करणे ,शीवराल भाषा वापरणे.
पहिल्या प्रकारच्या लोकात
communist आघाडीवर होते त्यांच्या कडे अशी लोक खूप होती.जी लोकांचा बुध्दी भेद चातुर्य नी करू शकत
काँग्रेस नी पण अशी लोक पाळली होती,काही संस्था पण उभ्या केल्या होत्या.
Ngo होते.

Bjp पण तेच करते काही चूक नाही.
फक्त सामान्य लोक म्हणून आपण स्वतःची मत स्वतचं बनवायची असतात.
डोळे,कान,बुध्दी उघडी ठेवून.

कोळसे पाटील नी पण YouTube वर व्हिडिओ टाकला आहे.
सावरकर ना ब्रिटन मध्ये बलात्कार च्या केस मध्ये कशी अटक झाली.
ते कसे ब्राह्मण आहेत
बहुजन विरोधी होते.
इत्यादी इत्यादी.
जसे अवस्थी कडे दुर्लक्ष केले तसे कोळसे पाटील कडे पण दुर्लक्ष केले

आप आपला अजेंडा चालवणारे अवस्थी आणि कोळसे पाटील दोघांचे पण व्हिडिओ बघून माझ्या सावरकर विषयी मतात काडी चा ही फरक पडला नाही.
हे मी स्पष्ट च lihale आहे.
माझा बुद्धिभेद करणं इतके सोप नाही.
कोणत्याही प्रसंगाचा मी दहा बाजूंनी विचार करतो.
असो.
सावरकर हे स्वतंत्र सेनानी च होते. ब्रिटिश पासून देश मुक्त झाला पाहिजे ह्याच विचाराचे होते.
पण त्यांचा मार्ग वेगळा होता.
सशस्त्र लढा च स्वतंत्र मिळवून देईल असे त्यांना वाटायचे.
पण त्यांनी कोणत्याच सशस्त्र संघर्ष मध्ये भाग घेतला नाही .
शस्त्र पुरवली आहेत किंवा युवकांना लिखाण मधून त्या साठी प्रोत्साहित केले आहे.
पण स्वतः मात्र लांब
लढ्याचे दोन भाग मी तरी करतो .
स्वतंत्र आता मिळणार जे जेव्हा कन्फर्म झाले तेव्हा सर्व स्वतंत्र सेनानी ची नेत्यांची भूमिका पूर्ण बदलून गेली.
अगोदर ब्रिटिश न पासून मुक्ती हेच एक च ध्येय सर्वांचे होते.
मग ते गांधी जी असोत,जिना असोत किंवा सावरकर असोत.
पण आता स्वतंत्र मिळणार हे दिसायला लागले तेव्हा .
जिना मुस्लिम झाले ,सावरकर हिंदू झाले ,गांधी बहुजन हिताचे झाले .
पण गांधी जी का जास्त आदर्श आहेत.
कारण त्यांनी टोकाची भूमिका न घेता लवचिक भूमिका घेतली.ह्या देशात अनेक जाती धर्माचे लोक आहेत ह्याची जाणीव त्यांनी ठेवली आणि सर्वांना सोबत घेवून स्वतंत्र भारतात समान अधिकार देण्याची भूमिका घेतली.
म्हणून गांधी जी आदर्श च आहेत
आणि गांधी जी च्या हट्ट मुळे काँग्रेस नी योग्य भूमिका घेतली आणि अनेक तुकडे देशाचे न उडता आज चा भारत निर्माण झाला.
सर्व समावेशक.

काँग्रेस नी घटना समिती स्थापन केली आणि dr Babasaheb Ambedkar ह्यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तम राज्य घटना देशाला मिळाली म्हणून dr aambedkar हे देशासाठी आदर्श आहेत.
पंडित नेहरू नी योग्य धोरण आखून देशाला योग्य दिशा दिली .
भारताला प्रगती च्या मार्गाने घेवून गेले म्हणून ते आदर्श .
ह्या मध्ये हिंदुत्व वादी कुठेच नव्हते.
असो
जिना कट्टर धार्मिक झाले आणि पाकिस्तान निर्माण झाला.
त्या मुळे स्वतंत्र लढ्यात जिना होते तरी ते भारताला आदर्श वाटत नाहीत .
पण स्वतंत्र लढ्यात त्यांचे पण योगदान होतेच.

सावरकर न चे स्वतंत्र लढ्यात योगदान होते ते कोण नाकरेल.
पण नंतर ते हिंदुत्व वादी झाले

Bjp ल savarkar का प्रिय होते तर ते स्वतंत्र सेनानी होते म्हणून. नाही.
ते हिंदुत्व वादी होते म्हणून
हिंदुत्व वादी म्हणजे हिंदू चे हीत जपणारे हा अर्थ कोणी घेवू नका.
हिंदू हीत वेगळे.
हिंदुत्व वादी म्हणजे भावनिक प्रश्न उभे करून सत्ता मिळवणे.
हिंदू हीत करणे हा अर्थ नाही.
जिना हे मुस्लिम वादी होते पण मुस्लिम हीत व्हावे ही त्यांची भूमिका नव्हती.
मुस्लिम चे नाव घेवून सत्ता मिळवणे हाच हेतू होता .
जसा आपल्या कडे हिंदुत्व वादी नेत्यांचा होता.
म्हणून मुस्लिम लोकांसाठी पाकिस्तान निर्माण तर झाला .
पण मुस्लिम हीत कुठे साधले गेले.
पाकिस्तान मध्ये राहणाऱ्या मुस्लिम लोकांपेक्षा भारतातील मुस्लिम सुखात आहेतं
खूप मोठी यशाची भरारी पाकिस्तानने कुठे मारली.

वाद इथेच आहे

नेहरूंचे कसे अनैतिक संबंध होते,गांधी जी च्या बरोबर मुली कशा असायच्या .
अशी टीका करणारे उथळ विचाराचे अडाणी लोक आहेत.
भले डिग्री नाव समोर असली तरी.

गोयल म्हणून कोणी तरी मुख्य निवडणूक आयुक्त मोदी सरकार नी गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नियुक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालय मध्ये त्याला आव्हान दिले आहे
पण भारतीय गुलाम मीडिया इतका महत्वाचा विषय सोडून श्रद्धा भोवती च फिरत आहे.
आणि नवीन च पिल्लू bjp नी सोडले आहे आणि गोदी मीडिया तेच तून तूने वाजवत आहे.
Pok ताब्यात घेणार.
लोकांनी अतिशय सावध राहून पूर्ण विचार करून .
निवडणुकी मध्ये मतदान करणे गरजेचे आहे.
सावरकर सोडा .
काही कामाचा विषय नाही.

अगदी बरोबर.
सावरकर सोडा नि भारत जोडा!

त्यांनी टोकाची भूमिका न घेता लवचिक भूमिका घेतली.ह्या देशात अनेक जाती धर्माचे लोक आहेत ह्याची जाणीव त्यांनी ठेवली आणि सर्वांना सोबत घेवून स्वतंत्र भारतात समान अधिकार देण्याची भूमिका घेतली.
म्हणून गांधी जी आदर्श च आहेत
आणि गांधी जी च्या हट्ट मुळे काँग्रेस नी योग्य भूमिका घेतली आणि अनेक तुकडे देशाचे न उडता आज चा भारत निर्माण झाला.
सर्व समावेशक.

Ok.
म्हणजे आंबेडकर गांधी वाद उगाचच झाला म्हणायचा.

गांधींच्या विचारसरणीची समीक्षा करण्यात आता काही अर्थ नाही.
सावरकरांवर तरी राहूल कशाला बोलले? त्यामुळे काय कॉंग्रेसला वजन येणारे? पक्ष सोडून जाणारे थांबणार आहेत?
उद्या म्हणजे यात्रा राजस्थानात जाईल तेव्हा पायलट काहीतरी पलटवार करतील अचानक असं वाटतंय.

मला वाटतं टीका करावी असे भारत जोडो मध्ये काही ही घडतं नाही.
एक सावरकर न वरील वीस तीस सेकंद चे वक्तव्य सोडले तर राहुलजी नी कोणतेच चुकीचे आरोप केलेले नाहीत..

महागाई,Gst, बे रोजगारी , धार्मिक द्वेष ,नोट बंदी इतक्याच मर्यादित विषयात ते सरकार लं प्रश्न विचारत आहेत.
नागरिकत्व कायदा, 370 कलम, सीआरपीएफ जवानाचे अतिरेकी हल्यात मृत्यू,शेतकरी कायदे ह्या सारख्या स्फोटक विषयात त्यांनी एक शब्द पण बोलला नाही.
खरे तर हे पण प्रचाराचे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत.
राहुलजी सारख्या सू संस्कृत नेत्या व्यतिरिक्त दुसरा कोण नेता असता तर त्याने हे विषय काढले असते.
आणि bjp ल salo ki Palo karun सोडले असते .

जे साधे प्रश्न राहुल जी विचारात आहेत त्याची उत्तर पण अजून तरी एका पण bjp नेत्यांनी दिली नाहीत.

" राहुल सावरकरांवर चिखलफेक करणार म्हणून भाजप गांधींवर टीका करीत राहाणार "
इतकं भोंगळ आणि कार्यकारणभाव उलटा पालटा करून टाकणारं विधान उत्तम समीक्षेत गणलं जावं ह्याचं खरोखर आश्चर्य वाटलं.
इतिहास उकरला जाऊ नये असं भाजपला आत्ता वाटू लागलं का, सौ चूहे खाल्ल्यानंतर? आणि फेक, morfed संदेशाचे डोंगर रचल्यानंतर?
निदान राहुलची विधाने खोटी तरी नव्हती.आणि स्वतः:हून केलेली नव्हती. प्रश्न विचारला गेला त्यावर उत्तरे दिली गेली होती.

खुद्द सावरकरांवर विधान आवडले नसले तरी हिरा ह्यांनी जे लिहिले आहे ते खरच आहे. भाजपने कित्येक प्रकारे गलिच्छ अपप्रचार केला आहे, करतेच आहे.

बरेच वर्षं सत्तेपासून दूर राहिल्याने जनतेला आम्ही आहोत ही सतत जाणीव करून देण्याचा एक प्रयत्न आहे.
पण राहूलला कॉन्ग्रेस जोडता येत नाही . तरुण नेत्यांना दूर ठेवायचे आहे. तसेच गांधी घराण्याला (राहुलला) भाव न देणारे नेतेही नको आहेत. गांधी घराण्याची कॉन्ग्रेस खरं म्हणजे कुणालाच नको आहे. पायलट ने वेगळा गट काढला तर काय? केरळात शशी थरूरच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या उत्तर केरळात जे काही अराजकीय भाषण सत्र थरूरने सुरू केलंय त्याच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. थरूर त्यांच्या चोपन्न पुस्तकांतून लोकांपर्यत अधिक पोहोचलेले आहेत.

चिलखत चढवून उभे राहिल्यावर आत मुंग्या असल्यासारखी अवस्था आहे.

काँग्रेस ची सत्ता खूप वर्ष भारतात होती आता आठ नवं वर्ष नाही आहे
पण गावागावात अजून काँग्रेस च अस्तित्व आहे .
राहुल गांधी कोण हे देशातील प्रतेक व्यक्ती ल माहीत आहे...
Bjp मध्ये च बरेच काँग्रेसी आहेत.सत्ता मिळावी म्हणून आलेले..पण त्यांचा पिंड काँग्रेस चच आहे.
ते bjp ची आयडिया लॉजी वर निवडणुका जिंकत नाहीत त्यांचे स्वतःचे एक वलय आहे.
काँग्रेस चे अस्तित्व संपले आहे असा निष्कर्ष काढणे च अयोग्य आहे.
सेने चे चाळीस आमदार पक्ष सोडून गेले म्हणजे सेना संपली हा अर्थ निघत नाही
कार्यकर्ते सेनेत आणि नेते फुटीर गटात अशी अवस्था आहे..
निवडणूक होईल तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
आताच बोलणे योग्य नाही . घाई घाई मध्ये निवडणूक आयुक्त नवीन नियुक्त केला ह्याच अर्थ च bjp ल जनमत त्यांच्या विरोधात आहे ह्याची जाणीव झालेली आहे

Pages