भारत तोडो, मरोडो...अर्थात सध्याचे बौद्धिक दिवाळ्खोर राजकारण!

Submitted by यक्ष on 17 November, 2022 - 08:55

सध्याची भारत जोडो यात्रा एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलीय ह्या विशिष्ट पक्षाच्या बौद्धिक दिवाळखोर राजकारण्यांन्नी!

मला एक कळत नाही की जर तुम्हाला 'नफरत छोडो - भारत जोडो ' ही टॅगलाईन वापरायची आहे (जी की मला आवडली ...) तर उगाच आपल्याला ज्यास्त जाण नसलेल्या किंवा गती नसलेल्या विषयाला जाणुनबुजून छेडुन व नफरतीचे मोहोळ उठवून आपणच आपल्या मोहिमेचे तीन तेरा वाजवण्याचा व मोहिमेवर जाउन कमाई करण्यापेक्षा राज्यावर कर्जाचा भार वाढवण्यार्‍या राघोबा सारखा बौद्धिक दिवाळखोर उपद्व्याप कां करतात हे लोकं?

आकाशातील देव ह्यांन्ना सत्बुद्धी देवो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुत्सद्देगिरी post facto rationalization आहे.
गांधीजींचे प्रयोग हे त्यांचे पर्सनल फेलिंग होते असे म्हणता येइल. त्यांच्या चरित्रातली एक तळटीप. आज कुणीही गांधीवादी असले प्रयोग करणार नाही, केलेच तर सर्वजण ( गांधीवादीही) विरोधच करतील. बलात्काराचे समर्थन किंवा trivialization करणारे सावरकर समर्थक आजही आहेत. हा मुख्य फरक आहे.
Submitted by vijaykulkarni on 22 November,

आजही इथे आपले सहप्रचारक त्या प्रयोगांचं समर्थन, rationalization करत आहेत. आपण ते न केल्याबद्दल धन्यवाद.
सावरकरांच्या सहा सोनेरी पाने चं इथे कोणी समर्थन केलेलं दिसलं नाही. कोणत्याही Reverse discrimination चं समर्थन कधीच होऊ शकत नाही- सोयीस्करपणे तर नाहीच नाही.
सावरकरांनी ते विचार लिहिले- गांधींनी नुसते सेक्स प्रयोगांचे विचार मांडले नाहीत तर प्रत्यक्ष कृती केली. तरीही या दोघांनी देश स्वतंत्र करण्यासाठी जे योगदान दिले त्याबद्दल आदर आहे.

इथे जे गांधी जी विषयी मत मांडत आहेत तीच मत जाहीर पने मांडण्याची हिम्मत मोदी मध्ये पण नाही.
भारताशी असणारे संबंध अनेक देश तोडून टाकतील.
गांधी जी हेच भारताची ओळख आहेत.

Bjp कडे त्यांचा एक पण व्यक्ती जसा नाही ज्याला जग पण आदर देते

संघात सामील व्हा म्हणजे संघ समजेल हे ऐकल्यासारखे वाटत नाही का ?
नाही, हे वेगळे आहे. तुमचा गोंधळ होतोय. पत्रकार परिषद वेगळी आणि भारत जोडो यात्रा वेगळी.

इथे जे गांधी जी विषयी मत मांडत आहेत तीच मत जाहीर पने मांडण्याची हिम्मत मोदी मध्ये पण नाही.
गांधी अमर असल्याने अशी हिम्मत ते करू शकणार नाहीत.

सावरकरांच्या सहा सोनेरी पानेचं इथे समर्थन होत नसलं तरी भाजप सरकारं, भाजप त्यात मांडलेल्या विचारावर चालताना दिसताहेत. त्याबद्दल कुठे बोलणार?

भावाबहिणीच्या , मामा भाचीच्या फोटोंमध्ये विकृत अर्थ शोधणार्‍या जमातीतले लोकच celibacy च्या प्रयोगांना सेक्सचे प्रयोग म्हणतात.

गांधी आमचे आदर्श नाहीत तर सावरकर आहेत असे फक्त खूप मोठी हिम्मत करून जागतिक व्यास पिठावर bjp नी बोलून दाखवले तर.
सर्व जागतिक संस्था न मधून जग भारताची हकालपट्टी करतील.
अनेक देश राजनैतिक संबंध पण ठेवणार नाहीत.
हवं तर एकदा प्रयोग करून बघा.
आणि जगातील विविध देशांची reaction बघा

उगाच स्वतःची इज्जत का काढून घेत आहात.
कोणी ओळख त नाही सावरकर ना..
त्यांनी नक्की काय योगदान दिले ते अजून तरी मला समजले नाही .
तरी असू ध्या काही तरी किरकोळ योगदान दिले असेल .
म्हणून लोक इज्जत काढत नाहीत.
पण bjp लोकांना मजबूर करत आहे.

त्यावरून झोडा की. नाही कोण म्हणत ? पण बदलाच घ्यायचा असेल तर मग द्वेषाच्या विरोधात, नफरत छोडो या टॅगलाईनचं काय ?
इतकाच सिंपल प्रश्न होता.

>>>>सहमत आहे.

भाजपला नफरत छोडो हे ठणकावून सांगण्यासाठी.
वाचणारे पाहणारे, संदर्भ सोडून फक्त सावरकरांबद्दलच्या खर्‍या माहितीमुळे नफरत पसरते असं मानणार असतील तर त्यांनाही वाचन वाढवायची गरज आहे. तुम्ही एका पक्षाच्या नफरत पसरव णार्‍या हजार गोष्टींकडे दुर्लक्ष कराल आणि दुसर्‍या पार्टीने त्यांना त्या भाषेत उत्तर दिलं की मात्र लगेच नफरत पसरवली असं म्हणत असाल तर तुम्हांलाही आत्मपरीक्षण करायची गरज आहे. देशात जे चाललंय ते बदलायची गरज तुम्हांला वाटत असेल तर तुम्हांलाही चार पावलं चालायची गरज आहे.

> I beg to remain, Your Royal Highness's faithful servant, (Sd.) M.K. GANDHI. February, 1921

How is it even relevant ?

Bjp च एक वैशिष्ट आहे.
ते वर्तमान काळातील स्थितीवर कधीच बोलत नाहीत .
एक तर भविष्य काळात काय घडेल ह्या वर बोलतात ते पण एकच विषयात.
मुस्लिम लोकांची संख्या वाढेल आणि हिंदी वर मग ते अत्याचार करतील .हिंदू धोक्यात येईल.
भविष्यकाळ विषयी इतकीच त्यांची दूर दृष्टी असते.
नाही तर भूतकाळ विषयी बोलतील.
काँगेस कशी नालायक होती.
नेहरू गांधी कसे नालायक होते .
बस इतकेच.

आणि मध्ये मध्ये भारत कसा सोने का चिडिया था.
असा डायलॉग मारणार.
भारत कधी सोने की चिडिया होती असे विचारले की ह्यांच्या कडे काहीच उत्तर नसते.
कारण ज्या काळात भारत समृध्द होता त्या काळातील राजे ह्यांच्या सोयीचे नसतात.
म्हणून त्या विषयावर बोलणार च नाहीत.
वर्तमान काळात भारताची काय स्थिती आहे ह्या वर तर स्वप्नात पण बोलणार नाहीत.
खूप भीती वाटते त्यांना.

भाजपवाले ७० वर्षांची घाण साफ करायला वेळ लागेल असं म्हणतात तेव्हा ७० वर्षांपूर्वी म्हणजे ब्रिटिश अमदानीत सगळं छान होतं असंच म्हणायचं
असतं. उगाच नाही स्वातंत्र्यलढ्यापासून लांब राहिले.

१) लंडनमध्ये सावरकरांवर कोणता गुन्हा शाबीत झाला होता ? प्लीज कोडे सोडवा.
२) ओबीडियंट सर्वंटबद्दल ऑब्जेक्शन आणि चर्चा नाहीच आहे. मुख्य मजकुराबद्दल आहे. मी इथे अवतरणे देणार नाही. ज्यांना खात्री करून घ्यायची असेल त्यांनी ती पत्रे मिळवून वाचावी. म्हणजे मुत्सद्देगिरी की सुटकेची याचना ते कळेल. मुत्सद्दी कोण आणि याचक कोण असतो तेही कळेल.

काँग्रेस च्या काळात भारताची अधोगती होत आहे ह्या प्रचाराचा भाग आणि बावरी मशीद पाडून हिंदू ना वेगळे पाडून.
त्यांच्या मतावर bjp सत्तेत आली पण.
आठ वर्षात एक पण पत्रकार परिषद मोदी नी घेतली नाही.
आणि आज भारत ह्या स्थिती मध्ये आहे आणि काँग्रेस काळात ह्या स्थितीमध्ये होता.

ह्या वर बोलले नाहीत.
काँगेस सरकार chya काळात जो भारत होता त्या पेक्षा आज चा भारत प्रगत आहे .
हे त्यांनी जनतेला सांगितले नाही.
.फक्त मन की बात च चालू आहे

काँग्रेस च्या काळात भारताची अधोगती होत आहे ह्या प्रचाराचा भाग आणि बावरी मशीद पाडून हिंदू ना वेगळे पाडून.
त्यांच्या मतावर bjp सत्तेत आली पण.
आठ वर्षात एक पण पत्रकार परिषद मोदी नी घेतली नाही.
आणि आज भारत ह्या स्थिती मध्ये आहे आणि काँग्रेस काळात ह्या स्थितीमध्ये होता.

ह्या वर बोलले नाहीत.
काँगेस सरकार chya काळात जो भारत होता त्या पेक्षा आज चा भारत प्रगत आहे .
हे त्यांनी जनतेला सांगितले नाही.
.फक्त मन की बात च चालू आहे

त्याकाळी पत्राच्या शेवटी असे लिहिणे कॉमन असावे. मुद्दा तो नाहिच आहे.
व्हिडिओ पहाणे मी शक्यतो टाळतो कारण त्यात अनेकदा पाल्हाळच जास्त असते.

पाहिला तो पाल्हाळीक व्हिडिओ ! आयुष्यातली ३० मिनिटे विनाकारण कुरतडली.
अशोक पांडेय यांचे पुस्तक वाचावे !

सुटकेची याचना करण्यात काहीही चूक नाही. याचनेचा दाखला देऊन कोणाचे देशप्रेम किंवा भोगलेले कष्ट कमी आहेत असे दाखवायचा प्रयत्न होत असेल तर चुकीचे आहे.

व्हिडिओ बघण्यात वेळ व्यर्थ जातो
आयटी सेल लं पगार त्याचाच मिळतो.
गांधी,नेहरू, ह्यांची बदनामी करण्याचा.

तोरसकर चे व्हिडिओ पुरावे म्हणून कोणी दिले तर कोण त्या व्हिडिओ मधील मतांवर विश्वास ठेवेल.
व्हिडिओ टाकणारा हा विश्वासू व्यक्ती हवा.
कोणी ही ऐरा गैरा नाही.

महात्मा गांधींचं इंग्रज सरकारला अहिंसक असहकराबद्दल पत्र होते आणि सावरकरांचे माफीची मागणी करणारे माफीपत्र होते. महात्मा गांधीच्या पत्रात सरकारला अहिंसक इशारा होता, सरकारने व्यवहारात सुधारणा करावी अशी मागणी होती, माफीची मागणी नव्हती . नसेल फरक कळत तर सोडून द्या विषय. उगाच दोन्हींची तुलना करू नका

असतं. उगाच नाही स्वातंत्र्यलढ्यापासून लांब राहिले.
पॉइंट आहे..
70 वर्षाची घाण साफ करावी लागेल म्हणजे त्या अगोदर सर्व कसे व्यवस्थित होते.
हाच अर्थ आहे.
देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची अवस्था काय होती आणि 2014 मध्ये bjp सत्तेत येई पर्यंत देशांनी किती प्रगती केली होती
ह्या वर एकदा नजर तरी मारा.
उगाचच टीका करण्यात दुसऱ्यांना कमी समजण्यात काही शहाणपण नाही.

कालपासून मधे ७०-८० पोस्टी आल्या आहेत. थोडे मागे जाउन उत्तर देतोय, मुख्य भरत व उदय यांच्या पोस्टींना.

फारेण्ड, मी वर लिहिलेल्या बर्‍याच गोष्टी स्पेसिफिकली तुम्हांला उद्देशून नव्हत्या. >>> ओके. माझ्या पोस्टचा संदर्भ होता म्हणून मला तसे वाटले. पण तसे नसेल तर मला काही वाद नाही.

सावरकरांनी माफीनामे लिहिले , हे सांगण्यात असंस्कृत काय आहे? >>> तो संदर्भ जनरल आहे. तुम्ही भाजपसमर्थकांना काय काय खटकत नाही याची उदाहरणे दिली आहे त्याबद्दल. माफीनाम्याबद्दल नाही.

जयराम रमेश यांचं उत्तर तुम्हांला गँग वॉर वाटतं. मग भाजप च्या अपप्रचाराला उत्तर कसं द्यायचं? भाजपने फक्त म.गांधी आणि नेहरू घराण्याबद्दल केलेल्या अपप्रचारा साठी वेगळा धागा काढतो. की इतकी वर्षे केलं तसं मुकाट ऐकून घ्यायचं? >>> इथेच माझा मुख्य पॉइंट मिस होतोय. रागाने ते करू नये हेच सांगतोय. काँग्रेसच्या बाकी लोकांना करू दे कोणत्याही पद्धतीने प्रतिवाद. यातून काही फायदा होईल असे मला वाटत नाही पण जयराम रमेश किंंवा इतर कोणा काँग्रेस नेत्याला हे करून पाहायचे असेल तर करू दे. भारत जोडो यात्रेशी संबंधित लोकांनी यात पडू नये. आणि हे वेगळ्या सभेत सांगितले असेल तरी रागा सध्या महाराष्ट्रात आला आहे तो या यात्रेकरता. त्याच्या आजूबाजूने त्याने केलेल्या सगळ्या चर्चा "भारत जोडो" शीच जोडल्या जाणार. सध्याची त्याची ओळख या यात्रेने डिफाइन केली आहे.

बाकी कोश्यारींचे वक्तव्य कोणाला खटकत असेल तर त्याबद्दल मी कधी ऑब्जेक्शन घेतले आहे? पण त्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वाक्याबद्दल - नक्की काय "अपप्रचार" आहे त्यात? तो प्रश्न खरे म्हणजे उदय यांना होता.

बाय द वे उदय यांच्या या वाक्याचा संबंध माझ्या सावरकरांबद्दल आदर असण्याशी आहे हे उघड आहे. पण त्यातले लॉजिक रानोमाळ हरवले आहे. सावरकरांनी एखादा खून केलाय आणि त्याचे समर्थन मी करत आहे असा "अपप्रचार" तेच करत आहेत.

" नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना मारलेले मला आवडले नाही आणि तरी मला गोडसें बद्दल आदर आहे. एक लक्षात घ्यायला हवे, गोडसे हे महान देशभक्त होते, स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला होता.... त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका नाही. माझे मत एका कृत्यामुळे बनवत/ बदलत नाही . "

रागा सध्या महाराष्ट्रात आला आहे तो या यात्रेकरता. //
महाराष्ट्र राज्यातील यात्रा 'तेरे नाम से शूरु तेरे नाम से खतम' अशी सावरकरांनाच डेडिकेटेड होती. पार इंग्रजी हिंदीपासून साऊथ इंडियन चॅनल्सवर सावरकर कव्हरेज. एकूण सावरकराना राष्ट्रीय लेव्हलला नेण्याचं पवित्र कार्य करून राहुलजी गेलेपण महाराष्ट्राबाहेर.

बाय द वे फारएन्ड, तुम्हाला जे क्लिन, लिबरल राजकारण हवंय ते करणारा एक लंबी रेस का घोडा महाराष्ट्रात आहे. ८-१० वर्ष पुढचा विचार केला तर- 'तो' वयाने रागाहून लहान आहे. उच्चशिक्षित, प्रशासनाचा दांडगा अनुभव. झिरो करप्शन. प्रो-बिझनेस अँड डेव्हलपमेंट. बिलकिस बानो प्रकरणात 'no justification' असं उत्तर देऊन स्वतःला distance करणं.
फेमिनिस्ट आयडीयल्स नुसती बोलण्यासाठी नाहीत तर स्वतःच्या पर्सनल आयुष्यात त्याचा वस्तुपाठ घालून देणं. स्वतःवर, पत्नीवर कितीही खालच्या भाषेत ट्रोलिंग झालं तरी दुर्लक्ष करणं. स्वतःची भाषा घसरू न देणे. विरोधकांसोबत कम्युनिकेशन कायम ओपन असणं, इत्यादी.

अरे वा व्हाईटहॅट तुम्ही म्हणता तशी व्यत्क्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर खरेच महाराष्ट्राचे भवितव्य ऊज्ज्वल असू शकते.
महाराष्ट्राचे गृहमंत्री फडवीसांनी तात्त्काळ केंद्राची मदत घेत सीबीआय, सीआयडी, ईडी, नार्कॉटिक्स वगैरे एजन्सीज ह्या ऊपरोक्त व्यक्तीच्या पाठी लाऊन त्याच्या मनात सत्तेची महत्वाकांक्षा निर्माण होण्यापूर्वीच त्याचे चारित्र्यहनन केले पाहिजे. म्हणजे भाजप आणि सत्तेच्या आड ती व्यक्ती येणार नाही आणि बाकीच्यांनाही सबक मिळेल.

फा च्या पोस्ट पटल्या.
थोडं स्टॅटेजिक आतल्या गाठीचं वागलं पाहिजे. गांधीजींनी ही स्टॅटेजी अनेकदा वापरली आहेच.

<< बाकी कोश्यारींचे वक्तव्य कोणाला खटकत असेल तर त्याबद्दल मी कधी ऑब्जेक्शन घेतले आहे? पण त्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वाक्याबद्दल - नक्की काय "अपप्रचार" आहे त्यात? तो प्रश्न खरे म्हणजे उदय यांना होता. >>

------ कोश्यारी काय म्हणाले ? गुरु शिष्य विषयावर आपले अभ्यासू आणि मौलिक विचार मांडत होते (औरंगाबाद येथील कार्यक्रमांत - फेब- मार्च २०२२).
" ..... who would have asked about Chhatrapati Shivaji Maharaj has there not been Samartha Ramadas... Samartha Ramdas was religious guru of Shivaji.... " - भ. कोश्यारी

https://indianexpress.com/article/cities/mumbai/governor-faces-flak-over...

हे धादांत खोटे आहे. सोम्या गोम्याने म्हटले असते तर दुर्लक्ष करता येण्यासारखे आहे. पण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल असे म्हणत आहे. मला हे वाक्य राज्यपालसारख्या व्यक्तीने म्हटलेले खटकले, जाम खटकले. मला खटकले म्हणून प्रत्येकालाच खटकायला हवे हा अट्टाहास नाही.

रामदास स्वामी हे शिवाजी महारांजांचे गुरु होते याला कुठलाही पुरावा नसतांना शिवाजी महाराजां बद्दल असा अपप्रचार का करावा लागत आहे ?

हे जुने झाले. मी याबद्दल विचारत नाही. परवा त्यांनी एक वक्तव्य केले. कोणत्याही मराठी पेपर मधे त्याबद्दल आजही आले असेल. परवा आंदोलन वगैरे झाले. मी त्याबद्दल विचारतोय. मी लिन्कही दिली होती. आहे तेथे अजून.

ही ती पोस्ट. पान ३ वर आहे. वास्तविक मी ही त्यांच्यावर टीकाच केली आहे.

महाराष्ट्रात सतत कोणीतरी "अपमान टीआरपी" खेचत असते. आता कोश्यारी आज खेचत आहेत. त्या भाषणाची क्लिप पाहिली तर त्यात अपमान करायचा उद्देश दिसत नाही. पण शिवाजी महाराज नावाभोवती महाराष्ट्रात किती सेन्सिटिव्हिटी आहे याचा अजिबात गंध कोश्यारींना नाही असे त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसते. त्याचे इंग्रजी/मराठी भाषांतर ठरवून केल्यासारखे केले आहे अपमान दाखवायला.

Pages