क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी नेदरलँड किंगमेकर ठरला आहे. पाकिस्तान मध्ये board लागतील, विश्वविजतेपद नेदरलँड यांच्या सौजन्याने.

पहिलं त्या के एल राहूलला बाहेर काढायला हवं होतं. तो T20 च्या लायकीचा नव्हताच. महत्वाच्या सामन्यांमधे बऱ्याचदा खेळत नाही मेला. खरं तर आयपीएलमधेही खेळू शकत नाही. तीथेही प्रेशरमधेच येतो. त्याच्या सोबत रोहित, अश्विन आणि भुवीही पुढच्या T20 मधे नकोच. नवीन टॅलेंट येऊ दे आता.

पंतला चक्क बळी दिला, पांड्याने!
भारताबद्दल वाईट वाटले. पण माझ्या हृदयाला आता कमी धोका.
राजकीय कारणांमुळे मला इंग्लंड व पाकीस्तान हे दोन्ही देश आवडत नाहीत. पण त्यातल्या त्यात, मागे एकदा स्टोकची काहीतरी गडबड होउन इंग्लंड जिंकले तसे झाले तर चालेल.

आता पुनः काय? कुणी भारतात येणार का भारत कुठेतरी जाणार?

शादाब, नवाझ, आदिल रशिद, रझा वगैरे स्पीनर्स लोक मॅच फिरवणारे ब्रेक थ्रू मिळवून देत असतांना आयपीएल धुरंधर अश्विन आणि अक्सर एकूण एक मॅचमध्ये अगदीच परिणामशून्य आणि ओवर्सचा कोटा भरण्यापुरतेच दिसले.
आदिल रशिद समोर कोहली सुद्धा नेहमीच नर्वस वाटत आला आहे.

गेल्या काही वर्षात बऱ्याच मेजर टूर्नामेंट मधे आपण असेच खेळलो आहोत. प्रत्येक सामन्यात एखाद दुसऱ्या दमदार खेळीच्या जोरावर ग्रूप स्टेजला वरचढ राहायचं. मिळालेल्या सिग्नल्स कडे दुर्लक्ष करायचं, अन नॉक आऊट स्टेजला, बहुत करून सेमी फायनल मधे (चॅम्पयंस ट्रॉफी अन वर्ल्ड टेस्ट सिरीज मधली फायनल वगळता) सगळे कच्चे दुवे उघड झाल्यानी आणि एखाद दुसऱ्या खेळाडूचा दमदार वाटणारा परफॉर्मन्स शेवटी अपुरा पडल्यानी काचकून हरायचं...

यातून वर यायला मला तरी यातले काही / सर्व उपाय उपयोगी पडतील असं वाटतं:
फॉर्म नसलेला प्लेअर कितीही ग्रेट असला तरी या स्पर्धा ह्या फॉर्म मिळवण्याची जागा नाही. त्यासाठी इतर बाय लॅटरल सिरीज किंवा डोमेस्टिक खेळावं.
थ्री फॉरमॅट प्लेअर बद्दलचं वृथा ग्लॅमर हटवून खेळाडूंवरचा दबाव कमी व्हायला हवा. त्यासाठी तीन फॉरमॅट तीन कॅप्टन तीन कोच पॉलिसी लावावी. टी २० मधे यंग टीमच खेळवावी.
मोठ्या टूर्नामेंट पूर्वी सिलेक्ट झालेल्या टीमला as a team unit खेळायला अन् प्रॅक्टीस करायला कॅम्प / सिरीज असावी. नाहीतर प्रयोग करण्याच्या नादात टीम डिसजॉइंट रहाते.

भरत
तो तिकडे कुठेतरी राशी भविष्याचा धागा आहे तिकडे द्या पाठवून.

...आज बॉलिंगचं इतकं कलेक्टीव्ह फेल्युअर बघितलं >> +१

फॉर्म नसलेला प्लेअर कितीही ग्रेट असला तरी या स्पर्धा ह्या फॉर्म मिळवण्याची जागा नाही. >>+१ ... राहुल ! राहुल च्या फॉर्म्स च्या नादात रोहित पण गंडला पार. It's high time we move away from at least one of these 3 - KL, Rohit and Kohli. मधल्या ओव्हर्स मधे स्पिनर्स ना अवास्तव रिस्पेक्ट देणॅ माझ्या समजेबाहेर आहे. आदिल रशिद नि लिव्हिंग्स्टन गुप्ते नि वॉर्न असल्यासारखे खेळणे हा नक्की काय गेम प्लॅन होता देव जाणे. बुमरा शिवाय असलेल्या बॉलिंग ला अधिक धावां चे कोंदण हवे होते हे उघड असतानाही हे लॉजिक कळले नाही.

शमी नि भुवी पण मोक्याच्या सामन्यांमधे घोळ घालतात. सुरूवातीला अश्विन टॅक्टिकली नि चहल चा फॉर्म बघता वाईट चॉइस नव्हता असं म्हणू शकतो पण हळू हळू त्याच्या मर्यादा उघड होत गेल्या तेंव्हा चहल ला प्रयोगापुरता तरी आणून बघायला हवा होता असे वाटले.

पावर प्ले मधे अर्शदिपला फक्त एकच ओव्हर का दिली हे ही नाही कळालं. तेव्हा एखाद दुसरी विकेट पडली असती तर इतक्या वाईट प्रकारे हरलो नसतो.

बॉल स्विंग होत नव्हता म्हणून असेल का ? तसाही तो डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट आहे चांगला. इथे त्याधीच कारभार आटोपला सगळा तो भाग अलहिदा पण किमान योग्य बॉलर्सच्या ओव्हर्स बाकी ठेवलेल्या हाताशी असे म्हणू शकतो Wink

टॉस जिंकलो असतो तर बॅटींग घेतली असते हे पण का कळाले नाही . मला वाटले ह्या विकेट्स वर नंतर बॉल स्किड होतो नि चांगला बॅटवर येतो म्हणजे दुसरी बॅटींग धार्जिणी होती .

१) के एल राहुल हा बिग मॅच प्लेअर नाही. राहुल द्रविडने त्याला उगाच बॅक केले.
त्याचा फॉर्म गंडलेला तेव्हाच बाहेरचा रस्ता दाखवून पंत वगैरे ओपनिंगला ट्राय करायचा होता. कारण राहुलने फॉर्म मिळवला तरी तो नॉकआऊटला पाट्या टाकणारच होता.

२) आश्विनला या फॉर्मेटला खेळवायचेच नव्हते.
चहलला गेल्या वर्ल्डकपला सिलेक्टच केले नव्हते. यावेळी तर अजून क्रूर थट्टा केली त्याची.
स्वबळावर सामना फिरवू शकेल अशी क्षमता असलेला गोलंदाज पुर्ण वर्ल्डकप पाणी द्यायचे काम करत राहिला. शर्मा आणि द्रविडचा लाडका नसणार तो.

३) डावखुरा पंत जर संघात आहे तर फलंदाजीत डावखुरा अक्षर नसता तरी चालले असते. पण गोलंदाजात कोणाला फलंदाजी येत नसल्याने घेतला त्यालाही. ऑलराऊंडर प्लेअरचा शोध घ्यायला सुरुवात करा आता.

४) गेल्यावेळी कोण तो वरून धवन की मिथुन चक्रवर्तीला ट्रंप कार्ड समजून वर्ल्डकपला नेलेले. यावेळी हर्षल पटेलमध्ये ट्रंप कार्ड शोधत होते. पण त्याला आधीच ईतका मार पडला की वर्ल्डकप खेळवलाच नाही. मग नेलाच कश्याला. एक जागा फुकट घालवली.

५) दिनेश कार्तिक हा भारतीय उपखंडातील फिनिशर होता. तो ऑस्ट्रेलियात चालेल का हा विचार फारसा केला गेला नाही. पंतसोबत सॅमसनला न्यायला हवे होते.

६) वर्षभर काय डोंबल्याचा नवीन ॲप्रोच नवीन ॲप्रोच करत होते समजलेच नाही. पहिल्या सामन्यालाच हे मी म्हणालेलो की गंडलेला ॲप्रोच घेऊनच खेळत आहेत हे. शेवटपर्यंत तेच केले. टुच्चे सामने जिंकल्याने लपून जातेय असे त्यांना वाटत होते.

क्रमश:
उद्या येऊन पुन्हा काही लिहितो...

हो. इंगलंडचे क्रेडिट नाही कमी करु शकत पण मला वाटतं जे काय थोडं फार ऑफर करत होतं पीच, ते नाही राहिलं नंतर. अर्थात बॉलर लोकांचा पण कस लागला नाही पण कैच्या कै सोपं वाटलं बटलर आणि हेल्स करता. खुपच गॅप्स एक्स्पोज झाल्या आपल्या. बॉलिंग मध्ये तर खुपच. असो....
जस्ट अ गेम... Happy

It's high time we move away from at least one of these 3 - KL, Rohit and Kohli.
>>>कोहली?? नक्की कोणत्या मॅचेस बघून असले कमेंट्स करता?

माझ्या मते रोहित, विराट, डिके, अश्विन, शमी आणि भुवनेश्वर ला T20 संघातून मधून कायमचा टाटा बायबाय करायची वेळ आहे.

आणि राहुल ला एका रिऍलिटी चेक ची गरज आहे कि स्वतःचा अँप्रोच बदल नाहीतर संघ बाहेर राहायला टायर राहा.

नीजर्क रिऍक्शन वाटेल पण आपण वर्ल्ड कप जिंकलो असतो तरी माझे हेच मत असते.

*आज बॉलिंगचं इतकं कलेक्टीव्ह फेल्युअर बघितलं*- फार पूर्वी आपल्या इंग्लंडच्या दौर्याच्या वेळी माझ्या एका कार्टूनचं शिर्षक साधारण असं होत- "How come Gandhiji could bundle out the English by his ' fast' & ' spinning' !" Wink

“ How come Gandhiji could bundle out the English by his ' fast' & ' spinning' !" - Happy

भारतीय संघाच्या मर्यादा SA आणि बांगलादेश विरुद्ध स्पष्ट झालेल्या. असा संघ तर सेमी मध्ये पण यायला नको होता. पण पाकिस्तान, कोहली आणि पाऊस हे संकट मोचक म्हणून धावून आले.

पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमधे कोहली आणि इतर मॅचेसमधे सूर्या सोडला तर बाकी सगळे डिफेंसिव्ह खेळत होते. T20 संघासाठी अटॅकिंग प्लेअरची गरज आहे. पुढच्या वेळेस ओपनिंगमधे पंत आणि शुबमन गिलला खेळवायला हवं.

आणि राहुल ला एका रिऍलिटी चेक ची गरज आहे कि स्वतःचा अँप्रोच बदल नाहीतर संघ बाहेर राहायला टायर राहा.
नीजर्क रिऍक्शन वाटेल पण आपण वर्ल्ड कप जिंकलो असतो तरी माझे हेच मत असते. >> +१ गेले संपूर्ण वर्ष आपण राहुल नसाताना पंत, हूडा, अगदी सूर्याला रोहित चा पार्टनर बनवून अ‍ॅग्रेसीव्ह अ‍ॅप्रोच ट्राय केला होता. रोहित टेंपो वाढवून मॅनेज करत होता. हे सगळे सुरळित सुरू होते असे वाटलेले. राहुल येताच हे सगळे एकदम बदलले गेले. त्याला दिलेले बॅकिंग व्हाईट ग्लव्ह लेव्हलचे होते . तो टॅलेंटेड आहे पण त्याची फळे टी २० मधे आयपील वगळता फारशी मिळत नसतील तर काय उपयोग ! त्याला सूर गवसण्याच्या नादात रोहितचा सूर पण जातोय. पाठी येनारा कोहली अँकर रोल मधे असणार हे उघड आहे. त्यामूळे जो प्रॉब्लेम राहुल पासून सुरू होतोय त्याचा उपाय राहूल पासूनच सुरू झाला पाहिजे. आणि हे होत/ होणार नसेल तर ह्या तिघांमधले दोघेच पुढे असू शकतात.

“तो टॅलेंटेड आहे पण त्याची फळे टी २० मधे आपील वगळता फारशी मिळत नसतील तर काय उपयोग !” - सहमत! राहूल-रोहित जोडी टी-२० साठी परिणामकारक नाही. ‘तेथे पाहिजे जातीचे‘. पंतला सुद्धा टी-२० चा सूर सापडला नाहीये. किशन, संजू चा तिथे विचार व्हावा. स्पिनर्सची वेगळी ब्रीड (बिश्णोई?) हवी.

भारतानी आधुनिक T20 नुसार खेळायला हवे,
1 गील
2 संजू/ पंत
3 पाटीदार/ तिलक
4 सूर्या
5 हार्दिक
6 जडेजा
7 शाहरुख/ सुंदर
8 दीपक चहर
9 S साई किशोर
10 विषनोई
11 अर्षदीप
कुलदीप, शिवम मावी असे खेळाडू try केले पाहिजे

फेरफटका

पुढचा T20 वर्ल्ड कप विंडीज मध्ये आहे तिथे स्पिनर्स हे फारच महत्वाचे ठरणार आहेत.

CPL चे रेकॉर्ड पहिले तर कॉर्नवाल, ऍलन, संतोकी सारखे सुमार फिरकी गोलंदाज हि तिथल्या स्लो आणि लो बाउन्स च्या पिचेस मुले मॅच विनर ठरतात.

त्यामुळे चहल आणि कुलदीप ला फॉर्म परत गवसने फार महत्वाचे आहे.

शुभमनला ओपनर म्हणून घ्यावं असा बर्याच जणांचा सूर आहे आणी शुभमन हा जबरदस्त टॅलेंटेड प्लेयर आहे. पण त्याचा खेळ हा कोहली पठडीतला आहे. सद्ध्या रडारवरून लांब असलेल्या पृथ्वी शॉचा खेळ खरं तर टी-२० च्या ओपनरसाठी खूप अनुकूल आहे. त्याने फॉर्म आणी फिटनेस टिकवून पुनरागमन केलं तर ते आयडियल ठरेल. त्याच्या बरोबर गिल / जैस्वाल ही जोडी परिणामकारक ठरू शकेल.

“त्यामुळे चहल आणि कुलदीप ला फॉर्म परत गवसने फार महत्वाचे आहे” - तरी अजून दोन वर्षानी होणार्या वर्ल्डकपसाठी बिश्णोई, सुंदर, साई किशोर सारख्यांना ग्रूम करावं असं मला वाटतं.

Pages