क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर
मच मध्ये काय टाईमपास करताहात. आज शाहरुखचा बर्थ डे आहे तिकडे रानभूलीने छान लिंक दिली आहे. ती वाचा.

आपला सामना शेवटी आहे. रन रेट कवर करूही..
पण पाकिस्तान जिंकेल का बांग्लादेशशी?
कि मुद्दाम हरेल?
जर पाकिस्तान आफ्रिकेशी जिंकली तर त्यांनाही संधी राहील. त्या केसमध्ये ते जिंकायला खेळतील बांग्लादेशशी

जिंकलो !!!

च्यायला काय धमाल वर्ल्डकप चालू आहे... फक्त एका सुपरओवरची कमी आहे

राहुलच्या डायरेक्ट थ्रो ने सुरू केला गेम.. आणि मस्त टपाटप कॅचेस पकडल्या.. आज फिल्डींगने लाज राखली.

आज मला भारताचा निसटता विजय होता. संथ होणारी सुरुवात, एका बॉलेरची कमी, lower मिडल ऑर्डर ची पडझड , सामान्य कीपिंग या गोष्टी सेमी मध्ये संघाला उघडं पाडतील.

*आजही दोघे ओपनर घाबरत सुरुवात..* - चेंडू सुरवातीला जरा लहरीपणा दाखवतच होता असं जाणवलं. हें कारण असावं. >> हो पण आज कोहली नि सूर्या चालून गेले म्हणून एव्हढा स्कोअर झाला (राहुल ची आजची इनिंग रोहित च्या आधीच्या मॅचेस मधल्या इनिंग ची सब धरतोय). म्हणाजे दोघांपैकी एकच चालतोय हा मेन प्रॉब्लेम होतोय. बांग्लादेश हार्ड लेंग्थ हा आफ्रिकन अ‍ॅप्रोअच घेऊन आज खेळले नि आपण अजून त्यावर परीणामकारक उत्तर शोधलेले दिसत नाहिये. बांग्ला बॉलर्स चा पेस कमी होता म्हणून आपले अधिक फावले. स्विंग नि हार्ड लेंग्थ हा काँबो किवीज बॉलिंग आपल्याविरुद्ध वापरतेय असा विचार नकोसा वाटतो Sad बुमरा नाहि म्हटल्यावर आपल्या बॉलिंग ची धार नि व्हरायटी कमी होणार हे धरून बॅटींग ला अधिक काम करावे लागणार हे उघड आहे .

*राहुलच्या डायरेक्ट थ्रो ने सुरू केला गेम * *...धरून बॅटींग ला अधिक काम करावे लागणार हे उघड आहे .* +1. अर्थात, कोहली, राहुल याना वेळीच लय गवसणं, सुर्या फॉर्ममधे असणं इ. लक्षणं फलंदाजीसाठी खुपच चांगली आहेत.

मजा आली आज. चुरशीची झाली तशी आणि त्यामुळेच थोडी भिती वाटत आहे. खरं तर पावसामुळे डकवर्थ लागला आणि त्यामुळे जरा पुंग्या टाईट झाल्या. त्यात दास टोटली फायर झाला. काही समजेना मला. थोडा झोपेत होतो म्हणून असेन पण बॉल इतके वाईट होते का? चांगलेच हाणले भौनी! नशिब के एल राहूल चा हँड ऑफ गॉड सदृश थ्रो अचूक बसला. तिथून सूर बदलला म्हणता येइल पण मला वाटतं पुढच्या विकेट पडू घातल्याच होत्या.
एकंदरितच पीचमुळे २०० वगैरे मोठा पल्ला वाटतोय आणि १८० म्हणजे चांगला स्कोअर ठरेल.
कोणीच डॉमिनेट असं करत नाहीये त्यामुळे त्या दिवशी आपल्या सगळ्या लोकांना सूर गवसला तरच काही खरं आहे. नुसत्या बॅट्समनानवर मदार आजिबातच नाहीये हे निश्चित. एस ए विरुद्ध छान केली बॉलिंग आणि त्या मानानी आज खुप पडले फटके सुरवातीला. झिंबाबवे तरुन जाऊ अशी आशा आहे पण सेमीज ला परत एस ए आहे त्यामुळे गेम एकदम टाईट ठेवावा लागेल. स्पिनर लोकांचे काही चालत नाहीये फारसे त्यामुळे दुसरी बॉलिंग असताना त्यांच्या ओवर कशा स्प्लिट करणार तेही बघावं लागेल रोहित ला.

झिंबाबवे तरुन जाऊ अशी आशा आहे Lol फार वाईट दिवस आलेत
पण सेमीज ला परत एस ए आहे >> सेमी नाही, भेटले तर आता फायनलला .. सेमीजला आता ऑस्ट्रेलिया ईंग्लंड न्यूझीलंड कोण भेटतेय बघूया.. थोडक्यात सेना देशांसोबत सेमी आणि फायनलला दोन हात करायचे आहेत. ईथे आशियाई देशच पुंगी टाईट करत आहेत. काहीतरी उथलपुथल होत सेमीला लंका समोर आली तर बरे होईल. अर्थात ते ही झुंजवतीलच. पण ईतर आशियाई देशांप्रमाणे लास्ट बॉल विन होऊ आपण तिथे Happy

मी अजुनही झोपेत आहे. Lol बरोबर. परत एस ए कुठे?
एकंदरित मॅच बघायला मजा येतेय पण आपली असली की भिती वाटते. न्यु झिलंड जोरात आहेत म्हणावं तर हाणलं त्यांना काल.

मला वाटतं , आतां कोणत्याही मोठ्या स्पर्धेत एकाच संघाची दादागिरी चालणं दुर्मीळच. गुड फॉर क्रिकेट !!!

चेंडू सुरवातीला जरा लहरीपणा दाखवतच होता असं जाणवलं. हें कारण असावं. >>>> तो तर सर्वच संघांना दाखवतोय. पण आपली सलामी वर्ल्डक्लास वगैरे आहे असे उगाच वाटत होते. मात्र कॉन्फिडन्स शून्य दिसतोय. हात पाय हलत नाहीयेत. अ‍ॅप्रोच गंडलेला वाटतोय. प्रेशर ओढवून घेतलेय असे वाटते. राहुल आज खेळल्याने हे निघाले तर बरे. एकाचे निघताच दोघांचे निघेल असे वाटतेय.

कॉन्फिडन्स मला वाटतं मैदानावर गेल्यावर बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग मनासारखी झाली की आपोआप वाढतो. जवळ जवळ सगळ्याच मॅचेस मध्ये खुप जणं नसून तर एखाद दोन जणं फायर होत आहेत बॅटिंग मध्ये. बाकीच्यांचा जम बसायच्या आत विकेट पडत आहेत. खेळपट्टी हा खुप मोठा मुद्दा होऊन बसलाय जे गेम करता खरच चांगलं आहे. प्लेयिंग युनिट म्हणून कामगिरी चांगली झाली मौक्याच्या मॅचेस मध्ये तर जिंकू शकतो आपण. आज चांगला होता परफॉरमन्स त्यातल्या त्यात. राहुल, कोहली, सुर्यकुमार आणि पुढे अश्विन नीट खेळले. नंतर राहुलच्या अफलातून रन आउट थ्रो नंतर दनादन विकेट काढल्या पेसरांनी. स्पिन वाल्यांनी रन नाही दिले खुप ह्यातच गोड मानावं लागेल. एकंदरितच अवघड आहे स्पिनर लोकांचे ह्या टुर्नामेंट मध्ये.
पावर प्ले नंतर काढुन घ्याव्यात काय स्पिनरांच्या ओवर? शेवटी स्पिनरला देणे म्हणजे हार्ट अटॅकची कामं आहेत Sad

थोडा झोपेत होतो म्हणून असेन पण बॉल इतके वाईट होते का? चांगलेच हाणले भौनी! >> पहिल्या दोन ओव्हर्स नंतर बॉल फारसा स्विंग होत नव्हता नि दास जयसूर्यासारखा खेळला असे म्हणू शकतोस Happy

राहुल - रोहित जोडीचा प्रॉब्लेम हा आहे कि दोघांनाही सेट व्हायला वेळ लागतो पण दोघेही हुकूमी स्ट्राईक रोटेट करू शकत नाहित (*किंवा करायला बघत नाहीत) रोहित ला जरुरीपेक्षा अधिक अ‍ॅग्रेसीव्ह अ‍ॅप्रोच घ्यावा लागतो राहुल चे बॉल्स भरून काढायला नि त्यात त्याची विकेट जायचे चान्सेस वाढतात. दोघेही सेट होऊन टिकले तर प्रश्नच नाही पण पटकन तसे झाल्याचे आठवत नाहीये गेल्या काही महिन्यांमधे. कोहलीला दण्का लागलाय म्हणून ठिक आहे नाहितर मागच्या वर्ल्ड कपचा प्रॉब्लेम परत जाणवला असता. कोहलीने अजूनतरी चांगल गीयर बदलले आहेत .

क्रेक्टय असामी. दोघंही फ्लो मध्ये आले तर तौबा मारतील पण तसं होत नाहीये. मला तर ह्या खेळपट्ट्यांची सवय नाही हेच वाटतय. येवढ्या मॅच खेळून आता बहुतेक मंडळीला अंदाज आला असेल एव्हाना. आता नीट खेळा म्हणा.
बॉलिंग पण एकदम टाईट हवी. आज अर्शदिपनी यॉर्कर सोडून मध्येच शॉर्ट ऑफ लेंत द्यायची काहीच गरज नव्हती. टास्किननी हाणली जबरी सिक्स!फुकट प्रेशर आलं!
एस ए विरुद्ध सुद्धा एक शॉर्ट बॉल कार्थिकच्या डोक्याबरुन जाऊन ४ गेली. अनप्लेयेबल बॉलच्या नादात हे असे प्रयोग करणे चांगले नाही.

आजची मॅच बांग्लादेशची मॅच होती, त्यांनी ती घालवली. भारतीय टीमने प्रेशर चांगलं हँडल केलं, बांग्लादेश प्रेशरखाली कोसळले. आज भारतीय टीमची फिल्डींग चांगली झाली.

असामी, तू मागे म्हटल्याप्रमाने इंडियाच्या टॅक्टिक्स प्रेडिक्टेबल व्हायला लागल्या आहेत. एलेमेंट ऑफ सरप्राईज फारसा नसतो. बर्यापैकी आखीव-रेखीव (डेटा ड्रिव्हन?) खेळ होतो.

सेमीजला आता ऑस्ट्रेलिया ईंग्लंड न्यूझीलंड कोण भेटतेय बघूया.. >> बरोबर.
आज चांगला होता परफॉरमन्स त्यातल्या त्यात. >> १००%

उद्या/आज बेस्ट मॅच आहे. पाकिस्तान जरा इज्जत वाचवायला एस ए ला टफ देतील. Plus they have nothing more to lose!
एस ए हारलं तर खरं भारताची जागा पक्की होईल ना? एस ए, ३ मॅच खेळून ५ पॉईंट आणि +२.७७ की काहीतरी रनरेट वर आहेत. खालोखाल आपण.
फार लवकर आहे पण यु एस टाईममध्ये.

एस ए हारलं तर खरं भारताची जागा पक्की होईल ना?
>>>>>>>

नाही उलट धोक्यात येऊ Happy

आफ्रिका तसेही नेदरलँडला हरवून ७ पॉईंटसह जाईल सेमीला
पण पाकिस्तान आज जिंकली तर ते ही बांग्लादेशला हरवत ६ पॉईंंटवर जातील. रनरेटही त्यांचा वर राहील.
त्यामुळे आपल्यासाठी झिम्बाब्वे मस्ट विन मॅच होईल.

आफ्रिका हरले तर आपण झिम्बाब्वेला हरवून पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो.
पण नको तो पहिला नंबर च्यायला.
त्यापेक्षा आज आफ्रिका जिंकली तर पाकिस्तान बाहेर आणि आपण निश्चिंत होऊ.

नवाझचा पोपट रन आऊट झाला.

बॅटला एज असूनही चुकीचा एलबी डब्ल्यू आऊट दिला. त्यावर हा धावून रन आऊट झाला. येड्याला एलबी दिलाय कळलेच नाही. आपण रन आऊट झालोय समजून रिव्यू न घेता गेला परत Lol

पाक
७ ओवर ४३-४
ते
१८५ फायनल स्कोअर
पाक फलंदाजी बाबर रिझवान वर अवलंबून आहे या ईमेजने त्यांची वाट लावली. मागच्यांनी मारायचे ठरवल्यास सगळे सिक्स हिटर आहेत.

पाकिस्तान जिंकायला हवे!
आशियातले दोन देश म्हणजे सेफा खेळतील!
आणि पुन्हा भारत पाकिस्तान अंतिम सामना व्हावा!

Meanwhile, Nawaz is having a chat with de Kock at the non-striker's end>>
काही खर नाही. पटवा पटवा.
de Kock c Mohammad Haris b Shaheen Afridi 0(5)
Rossouw c Naseem Shah b Shaheen Afridi 7(6) [6s-1]
हमको सब मालूम है!

नाही उलट धोक्यात येऊ Happy >>>>> मुद्दा आला लक्षात पण. आज एस ए जिंकली आणि पुढे नेदरलंड्सला हरवलं तर जस्ट पॉईंट्सनीच सगळ्यात वर पोहोचतील.
ते जर आज हरले आणि आपण पुढची मॅच जिंकूच असं गृहित धरत होतो मी. पण काय सांगता येत नाही आजकाल. पाक ला धक्का दिलाच की झिंबाबवेनी.
डि एल नी वर आहेत एस ए सध्या पण विकेट जास्त गेल्यात. परत आले खेळायला तरी जमेल कि नाही माहित नाही.

पावसाने टूर्ना्मेंटची वाट लावली आहे.
Okay so the word is that it's been reduced to 14 overs. The target for South Africa is 142, effectively leaving them with 73 to get off 5 overs.

73 to get off 5 overs. >>> विकेट एकच असती तर टारगेट १० ने कमी असते.

आपण पुढची मॅच जिंकूच असं गृहित धरत होतो मी. >>>> काही गृहीत धरायची सोय नाही या वर्ल्डकपला Happy

आफ्रिका हरली. म्हणजे आपण झिम्बाब्वेला हरवून पहिले येऊ ग्रूपमध्ये. त्याचा फायदा होईल की नुकसान देवास ठाऊक. समोरच्या ग्रूपवरून कोण दुसरे येईल त्यावर नजर ठेवावी लागेल.
न्यूझीलंडने आयर्लंडला हरवले तर ते तिथून पहिले येतील. ईंग्लंडने लंकेला हरवल्यास ते दुसरा क्रमांक पटकावत आपल्याशी सेमीला अन्यथा अफगाणला हरवत ऑस्ट्रेलिया....

Pages