क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहीन शाह आफ्रिदी .. पहिल्या बॉलला चौक्का खाल्ला .. तिसर्‍या बॉलला अ‍ॅल्लेनची विकेट
न्यूझीलंड काऊंटर अ‍ॅटेक करायच्या मूडमध्ये..
वर्ल्डकप सेमी फायनल राड्याला सिडनीमध्ये सुरुवात...

न्यूझीलंडने आपल्या गेमप्लाननुसार ज्यादा हुशारी न करता १५२-४ असा फायटींग स्कोअर टाकला.
आता पाकिस्तानच्या विकेट खोलायला बघतील
बघूया काय होते. सामना रोचक होणार अशी अपेक्षा..

९ ओवर ७५-०
बाबरची पहिल्याच बॉलला कॅच सुटली. तेव्हापासून त्याने वा पाकिस्तानने मागे वळून पाहिले नाही.
न्यूझीलंडची ज्यादा हुशारी न करायची ज्यादा हुशारी अंगाशी येतेय वाटते. विकेट असताना रिस्क घेऊन १७०+ जायला हवे होते असे वाटेल आता त्यांना.

आता वर्ल्डकप पाकिस्तानच जिंकेल.
आफ्रिका नेदरलँड सामन्याआधी घरी जायच्या तयारीत असतील.
आता वर्ल्डकप घेऊन जातील तर काय कमाल स्टोरी बनेल

पाकिस्ताननी विकेट खोलली, न्यु झिलंडनी खुप कॅचेस सुटली त्यामुळे आता पाकिस्ताननी फायनल मध्ये सीट बूक केली! Lol
आता भारत काय काय खोलणार अन किती किती कॅचेस धर्नार हे उद्या कळेलच.
एकंदरित इंग्रजित म्हणतात तसं टेपिड परफॉर्मन्स वाटला न्यु झ्लिंडचा. मी शेवटचे ३५ बॉल राहिले होते तेव्हा पासून पाहिली. थोडी टाईट झाली होती सिच्वेशन शेवटी शेवटी पण विकेट खुप उरलेल्या होत्या त्यामुळे प्रश्न नाही आला. सेन्सिबली खेळले पाकिस्तान. खुप वरुन फटके न मारता सुद्धा पेस चांगला ठेवला इनिंग्सचा. आपल्या कडे मला वाटतं राहुल, पंत, सुर्यकुमार आणि पंड्या असे मोठे हिटर आहेत आणि रोहित, कोहलीनी साथ दिली तर अगदी डॉमिनेट करु शकतो मॅच. भिती आहे सध्या ती पहिल्या बॉलिंगची आणि १६०+ स्कोअर होण्याची. ते ही मारु शकतो, मारली आहे पण तरी प्रेशर हे येतेच. असो... घोडा मैदान लांब नाही.

*...आफ्रिका नेदरलँड सामन्याआधी घरी जायच्या तयारीत असतील....* - त्यावेळीं, '.. घरीं जायच्या भितीत असतील..' हें अधिक योग्य वाटतं ! Wink

ते एस ए चे कर टायटल सुद्धा काही बरोबर नाही वाटत. दोन वर्ल्ड कप मध्ये खुप फरक असतो. फार कमी प्लेयर रिपिटेड असतात, कोच ही वेगळा असतो बर्‍याच वेळा त्यामुळे एन वेळेस हारले तरी कॉमन फॅक्टर असा काही नसतोच. शेवटी मॅटर ऑफ चान्स येवढच म्हणू शकतो. प्रेक्षक काय, जिंकले की उचलून धरतील अन हारले की पिसं काढायला बसतात.

असामी, वैद्य, भाउ नमस्कर, ऋन्मेऽऽष कुणितरी ताबडतोब ऑस्ट्रेलियाला जा. >> हे रत्न राहिलेच काल . झक्कि विमानांच्या तिकिटांची नि राहाण्या खाण्याची व्यवस्था करा आमच्या, लगेच निघतो Wink

पाकिस्ताननी विकेट खोलली, न्यु झिलंडनी खुप कॅचेस सुटली त्यामुळे आता पाकिस्ताननी फायनल मध्ये सीट बूक केली >> Lol

आज किवीज पाकिस्तान सारखे नि पाकिस्तान किवीज सारखी फिल्डींग करत होते Wink

बुवा, चोकर अशासाठी की भरवशाच्या म्हशीला टोणगा हा प्रकार नेहमीच आफ्रिकेबाबत होते. आफ्रिका देश हा कॉमन फॅक्टर आहे.

बरोबर असामी पण तेच लॉजिक नाही जमत. फक्त अफ्रिका हा कॉमन डिनॉमिनेटर ह्यात काहीच सिद्ध होत नाही. हे म्हणजे अफ्रिकेचे कोच आणि प्लेयरांमध्ये चोकिंगचा स्पेशल जीन आहे असं म्हणण्यासारखं आहे. Lol
It's only a matter of chance they have lost in key games. Can't attribute that to being from South Africa. Happy

बुवा असे बघा, आपण पाकिस्तान बेभरवशाची टीम आहे किंवा विंडीज टॅलेंटेड पण डीसिप्लीन नसलेली टीम आहे असे म्हणतो ना तसा प्रकार तो. एकाच टीम बाबत वारंवार होतो जिथे चांगली टीम विनिंग पोझीशन मधून हरते / टूर्नामेंट मधून क्रॅश होते. म्हणजे कुठे तरी मेंटल ब्लॉक असू शकतो किंवा एकंडर क्रिकेट सिस्टीमच्या कोचिंग च्या त्रुटीचा भाग असू शकतो.

हि यादी बघा
1996 - लारा नि turning wicket
1999 - डोनाल्ड नि क्लुसनर - एक धाव - ४ चेंडू
2003 - डकवर्थ लूईस न समजणे
2007 - गिलख्रिस्ट
2011 - स्पिनिंग विकेट्स
2015 - गलथान फिल्डींग

एव्हढी पॅनिक होणारी दुसरी टीम कुठली आहे ?

अरे बरोबर आहे. पण टीम पॅनिक होते this cannot be something that carries over from team to team or from one point in time (one world cup) to another point in time (another world cup). There are different reasons every time why that's happening but it's happening to the same team and that makes us feel it's a trend. It may feel being from South Africa is a good enough reason that is driving these choking loses but that's not true. Like I said before, there are different team members, coaches, and different countries involved in those separate world cup events. If you consider all of those, the probability of the team losing in key matches won't be that high as it feels like when you apply the South Africa label to the team. The set (team) is different every time along with a lot of variables.

बुवा अशी पॅनिक होणारी अजून एखादी टीम दाखवा. चोकर्स ह्याच साठी ना कि एकाच देशाच्या संघाबाबत हा प्रकार वारंवार होतोय. प्लेयर्स नि कोच वेगळे आहेत पण एंड रिझल्ट शेवटी तोच असतोय. ऐन मोक्याच्या वेळी कच खातातच त्यामूळे चोकर्स नाही म्हणणार तर काय अजून वेगळे म्हणणार हो. किवीज चे उदाहरण घ्या. सातत्याने दहा पंधरा वर्षे सेमी किंवा अंतिम फेरीत जातात नि हरतातपण त्यांना हा टॅग लावला जात नाही कारण त्यांच्याकडून जिंकण्याच्या अपेक्षा नसतात नि त्यांचे हरणे बहुतांशी साधे सरळ असते. आफ्रिकेकडून सामने नाही तर टूर्नामेंट जिंकण्याची अपेक्षा असते पण ते अनपेक्षित सामन्यामधे मोक्याच्या वेळी कच खातात. हा मला तरी मेंटल अ‍ॅस्पेक्ट वाटतो.

तुम्हाला आठवते का गॅरी कर्स्टन ने भारतीय संघासाठी पॅडी अप्टन ला आणाले होते मेंटल कंडीशनींग व्हावे म्हणून २०११ च्या वेळी वर्ल्ड्कप जिंकण्यामागे त्याचा मोठा वाटा होता असे सचिन नि धोनी ने नमूड केले होते.

सातत्याने दहा पंधरा वर्षे सेमी किंवा अंतिम फेरीत जातात नि हरतातपण त्यांना हा टॅग लावला जात नाही कारण त्यांच्याकडून जिंकण्याच्या अपेक्षा नसतात नि त्यांचे हरणे बहुतांशी साधे सरळ असते. >>>>> exactly my point.
साधे सरळ हरणे किंवा अफ्रिकेसारखे हरणे ह्यात फार मोठा फरक नाहीये.
I too agree it’s all about the mental aspect but mental blocks that make you make mistakes in pressure situations can happen to individuals but not a team whose constituents are hardly the same.

चोकर्स का म्हणतात ते आलं लक्षात पण त्याचे अंडरलाईंग फॅक्टर्स सांगत होतो. This may look like a trend with that team but it’s only coincidence and simple probability. आता खुप वर्ष असं झाल्यामुळे नवीन प्लेयरांच्या डोक्यात आपण चोकर आहोत हा विचार रुजत असेल आणि त्यामुळे चुका होत असतील तर एकदम बरोबर आहे. It will be remarkable if for the last few world cups, the players were actually getting affected by this choker tag. I think it’s unlikely but to be safe, I’d agree a mental conditioning coach would help.
I was only commenting on the actual reality behind the losses.

साधे सरळ हरणे किंवा अफ्रिकेसारखे हरणे ह्यात फार मोठा फरक नाहीये. >> तुमचे म्हणणे लक्षात आले तरी मला वाटते हा खरा मतभेदाचा मुद्दा आहे. किवीज सरळसोट हरतात तर आफ्रिके च्या मॅचेस मधे जिंकू शकतात अशा पोझीशन मधून क्रंच मॅचेस घालवल्या जातात. असो.

द. अफ्रिकेच्या टीमचं ऑफिशियल ड्रिंक कुठलं? - चोक! Happy

भारत वि. इंग्लंड सेमी!! काहिही प्रेडिक्शन करायचा धीर होत नाहीये. चांगले खेळा, जिंका आणी फायनलपर्यंत पोहोचा!!

*I too agree it’s all about the mental aspect but mental blocks that make you make mistakes in pressure situations can happen to individuals but not a team whose constituents are hardly the same.* - अशीही शक्यता आहे की, एखाद्या देशाच्या संघाबाबत वेगवेगळ्या कारणानीं पण सातत्याने जर असं होत असेल व तशी त्या संघाची प्रतिमा घडली असेल, तर त्याचा दबाव ( negative vibes ) ऐन मोक्याच्या वेळी त्या देशाच्या संघाचं मानसिक खच्चीकरण होण्यात मोठा हातभार लावत असेल. But this is just a guess as to why this happens so consistently with a particular national team . बाकी, वैद्यबुवांशी बव्हंशी सहमत.

तू मला 'जोकर' म्हटलंस म्हणजे तुझा होकारच आहे !! मीं क्षणभर घाबरलोच होतो, तूं मला 'चोकर' म्हणतेस कीं काय !!varndvesh.JPG

भाऊ Proud

अशीही शक्यता आहे की, एखाद्या देशाच्या संघाबाबत वेगवेगळ्या कारणानीं पण सातत्याने जर असं होत असेल व तशी त्या संघाची प्रतिमा घडली असेल, तर त्याचा दबाव ( negative vibes ) ऐन मोक्याच्या वेळी ..................
>>>>

हो, हे होत असणारच.
प्रेशर बडी कुत्ती चीज होती है. नॉर्मल सिचुएशनला खेळणे आणि निर्णायक क्षणी अंडर प्रेशर खेळणे यात फरक असतोच. जसे की आफ्रिका जिंकली असती तर आपला झिम्बाब्वेशी खेळ वेगळा झाला असता.

राहिला प्रश्न प्लेअर बदलत असूनही हे असे का होते. तर मुळातच जगात मोजकेच प्लेअर आहेत जे प्रेशर झुगारून खेळू शकतात किंबहुना खेळ ऊंचावतात. बहुतांश प्लेअरबाबत प्रेशरखाली खेळ बदलतोच. त्यामुळे संघ बदलला तरी त्यांच्यावर दरवेळी आपण वर्षानुवर्षे निर्णायक क्षणी चोक करतो या ईमेजचे प्रेशर असणारच. स्वतःच्याच वैयक्तिक अपयशाचे प्रेशर असणे गरजेचे नाही. प्रेशर संघाच्या / राष्ट्राच्या अपयशाचेही असू शकतेच. त्यामुळे जेव्हा काही वेगळे घडायला सुरुवात होते तसे ते पसरतात.

आज भारतीय संघाला हरण्याची शेवटची संधी आहे. आज संधी वाया घालवली तर फायनल मध्ये "चुकीला माफी नाही"

Early stats from Deepu
>> Captains winning the toss have lost all the 11 previous T20 Internationals at the Adelaide Oval
>> India win % batting first in T20Is this year: 70.83 (17 wins in 24 games)
>> England win % chasing in T20Is this year: 30.77 (4 wins in 13 games)
England planning to lose

राहूल तो गियो… ! कोहली आयो.
जौ द्या. रोहित, आज तो खेलियो!

पर्थची आठवण येतेय थोडी. It’s game on! We survive this and mass a good total, we have a fighting chance.

भाऊ, बरोबर, त्या बद्दल मी शक्यता गृहित धरली आहे.

कोहली!!! आज मॅटर बडा है!
वक्त तुम्हारा है! Happy

१० ओवर ६२-२
टिपिकल भारतीय सुरुवात..
अवघड आहे मोठा स्कोअर नाही पडला तर..
सुर्या कोहलीवर अवलंबून

रोहित ... !!! छान लय गवसत होती आणि गेला!! त्याने ब्याट बदलायला आळस केला असं मला वाटलं. ( आधिच्या दोन चेंडूवर मारलेले फटके केवळ त्यामुळे फसले होते व ती नाराजी रोहितच्या नजरेत स्पष्ट दिसत होती).

गेला सुर्या...
रोहीत राहुल यांना लय गवसायच्या नादात वर्ल्डकप गेला..
कोहलीही स्लो स्टार्ट करतो.. आता हार्दिकसोबत पुन्हा पार्टनरशिप.. कधी येणार मारायची वेळ... काय होणार फायनल स्कोअर..

Pages