क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<आफ्रिका जर आज हरली तर भारत-पाक फायनल बघायला मिळू शकते>>
पण पाकीस्तान न्यू झिलंडला हरवू शकेल काय?

अजकाल क्रिकेट खेळण्यासाठी दाढी मिश्या वाढवणे जरुरिचे आहे. ज्यांच्या दाढी मिश्या मोठ्या त्यांच्या रन्स अधिक, त्यांना जास्त विकेट्स.
जर आर्शदीप सिंघ ने नकली दाढी मिश्या लावल्या तर ते चीटींग होइल का? नाहीतर दुसरे सरदारजी शोधा.

शेवटी जिंकणार आपणच. पण त्या आधी सेमी नंतर फायनल ही सगळी नाटक करावी लागतात.
त्या शिवाय पैसा कसा खेचणार?
शेवटी इंडिया पाकिस्तान केल्याशिवाय क्रिकेटचा उद्धार कसा होणार?
कप तो हमही लेके जायेंगे!

फायनल पाकिस्तान आणि ईंग्लंड होईल
पाकिस्तान सेमीला न्यूझीलंडला मारेल
आठवा १९९२ ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप

फायनल इंग्लंड न्युझिलंड. सामना टाय. एक ओव्हर थ्रो ह्यात स्टोक्सच्या बॅटला लागून जाईल. सुपर ओव्हर टाय. चौकार षटकारांच्या संख्येवर इंग्लंड विजयी. ही देखिल शक्यता आहे मागील वर्ल्डकप प्रमाणे. Wink

हो असेही होऊ शकते Happy

पण,
प्राथमिक फेरीत भारत पाकिस्तान अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना आणि भारताचा विजय
पुन्हा अंतिम सामन्यात भारत पाक आमनेसामने आणि पुन्हा भारताचा विजय ...
असे २००७ प्रमाणे व्हावे या आशेवार सारी भारतीय क्रिकेटप्रेमी जनता आहे Happy

बाई दवे, त्या चौकार षटकारांच्या नियमाला आता हाकलले आहे ना..
सध्या काय नियम आहे सुपरओव्हर टाय झाल्यास?
पुन्हा खेळवणार का अजून एक सुपरओव्हर? आणि त्यातही टाय झाले तर विभागून का?

काल सकाळी आफ्रिकेने मज्जा घालविली पुढील सामन्यांमधील.
आपल्या सामन्यात सुकुयाची फलंदाजी अफलातून. असाच जर अफलातून खेळला तर भारताचे विजेतेपद निश्चित.

न्यूझीलंड खरंच जेतेपद साठी पात्र आहे. कोणीही मोठा खेळाडू नाही, तरीही संघ संकटात असताना कोणीतरी संघाला तारून जिंकावतो. कधीही मैदानावर असभ्य वर्तन नाही. कोणतेही विरोधभास नाही. अतीशय संतुलित संघ.

न्यू झीलंड म्हणजे अगदीच मागासलेली जमात आहे.
विराट कोहली, पंड्या सारखे अतिमानव नाहीत का तिथे?

मी न्यु झिलंडची एकही मॅच नाही बघितली त्यामुळे अंदाज नाही. पण मला वाटतं पाकिस्तान एन वेळी फायर होईल. त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग आता जरा फॉर्म होऊ पहातेय. आपलंही तेच आहे. काय माहित का पण मला वाटतं आपण इंग्लंडला सहज हरवू. पंत आल्यामुळे खरं बॅटिंग साईड काहीच्या काही स्ट्राँग आहे आपली. कोहली, रोहितनी एक बाजू लावून धरली पाहिजे आणि ह्या इतर फटकेबाजांनी २०० पर्यंत स्कोअर नेऊन ठेवला पाहिजे पहिली बॅटिंग आली तर. आपण बांगला देशशी खेळलो अ‍ॅडलेडला. फार फास्ट नाही वाटलं पिच. टॉस जिंकला तर बॅटिंग घ्यायला पाहिजे. हारलो टॉस तर अवघड जाऊ शकतं. चेस म्हणली की प्रेशर असतच.

अ‍ॅडलेडला शॉर्ट बांडरीज आहेत स्केअर साईडला. इंग्लंड च्या पॉवर हिटींगसाठी उपयुक्त गोष्त आहे ती. आपल्या बॉलिंगचा कस लागेल. आपल्या बॉलिंगच्या वेळी स्विंग झाला तर मॅच इव्हन साईड होईल.

न्यूझीलंड खरंच जेतेपद साठी पात्र आहे. कोणीही मोठा खेळाडू नाही, तरीही संघ संकटात असताना कोणीतरी संघाला तारून जिंकावतो. कधीही मैदानावर असभ्य वर्तन नाही. कोणतेही विरोधभास नाही. अतीशय संतुलित संघ. >> सभ्यता या निकषावर विजेतेपद मिळत असते तर आतापर्यंत किवीज एकही सामना कधीच हरले नसते.

असामी, भौ आपल्याकडे पण आहेत ना पावर हिटर! पाहिलिस ना कालची मॅच? Wink जियो सुर्यकुमार! कोणाला वाटेल भौ ला ऑफ ला खेळता येत नाही कारण ऑफचे बॉल लेगला सिक्स मारतो. तर तो ऑफ ला ही बॅटचा वंदनिय, पुजनिय असा फॉलो थ्रु दाखवत सिक्सं ठोकू शकतो. टोटल दिवाना माणूस आहे!

बुवा आपले हिटर समोर मारण्यात जास्त पटाईत आहेत - सूर्या नि कार्तिक वगळता. रोहित पुल्स मस्त खेळतो पण त्याच्या फॉर्म्स बद्दल खात्री देता येत नाहिये आता. इंग्लंड कडे बटलर, हेल्स, ब्रॉक्स, लिव्हिंग्स्टन सारखी साईड ला लिलया खेळणारी फौज आहे नि मोईन अली ,स्टोक्स सारखी आपल्यासारखी समोर खेळू शकणारी जनता पण आहे ना. निव्वळ पॉवर हिटींग मधे इंग्लंड ची पॉवर हिटींग कॅपॅसिती आपल्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. सॅम कुरन, वोक्स ला धरता ९ जण तोडफोड करतात.

बटलर भारी आहे खरच. तो सुटला तर अवघड आहे. लिविंग्स्टनचाही गेम पहिलेला आहे. त्याची जास्त भिती वाटते कधी कधी. जसा सुर्यकुमारनी धुमाकूळ घातला तसा तोही करु शकतो. क्रेक्ट आहे, सॅम करन, वोक्स पर्यंत बॅटिंग आहे त्यांची. आपले सगळे नीट फायर झाले तर काही खरं आहे, प्रेशर खाली मग चुका फार करतात बाकी मंडळी. अर्थात दॅट इज ट्रु फॉर एनि टीम. के एल राहुल पण मारतो बाकी दोन्हीकडे. पंड्या पण विचित्र असले तरी ऑफ ला तडकावतो वर पिच केलेले बॉल. स्ट्रेंत आपल्याकडेही आहे, एन वेळेस खेळले पाहिजेत. Happy

नंद्या, मला माहित असते तर मी इथे असतो का ?

राहुल खेळावा म्हणजे मोठा स्कोअर लागेल असे वाटवा, ते आयपील मधे बघितलेले एकदा तरी तगड्या संघासमोर भारताकडून खेळताना मटेरियलाईज होईल अशी आशा आहे.

<<टॉस जिंकला तर बॅटिंग घ्यायला पाहिजे. >>
तुम्ही इथे असे सांगण्यापेक्षा डायरेक्ट शर्माला किंवा द्रविडला का सांगत नाही? मला सांगून उपयोग नाही, मी गाढ झोपेत असतो.

आताच वासिम चा बीबीसी सोबतचा इंटरव्यू पहिला.

एखाद्या देशी सेलिब्रिटी क्रिकेटर ला आपण ड्रग ऍडिक्ट होतो आणि त्यामुळे फॅमिली ला फार सोसावे लागले हे प्रथमच स्वतःहून पब्लिकली ऍडमिट करताना पाहणे हा वेलकम चेंज वाटला.

<<पुन्हा अंतिम सामन्यात भारत पाक आमनेसामने आणि पुन्हा भारताचा विजय ...>>
नकोSSSSS.
आधीच माझे हृदय दुर्बल, त्यात मला रक्तदाबाचा रोग. सोसणार नाही मला. उगाच विराट कोहली बाद झाला तर काय होईल काय नाही सांगता येत नाही. भारत न्यू झीलंड बघायला चालेल.

आधीच माझे हृदय दुर्बल, त्यात मला रक्तदाबाचा रोग. सोसणार नाही मला. उगाच विराट कोहली बाद झाला तर काय होईल काय नाही सांगता येत नाही. भारत न्यू झीलंड बघायला चालेल.>>>>> Lol मनातलं बोललात.
तरी आम्ही थ्रिल सीकर कॅटेगरी. भारत पाकिस्तान पाहिजेच! Wink

अक, हो. खुपच कँडिडली बोलतो अक्रम आजकाल. मला फार आवडतं त्याची कॉमेंटरी एकायला. स्वतः दिग्गज असल्यामुळे तो सांगतो त्यात खुप क्रिकेटिंग सेन्स असतो. ए स्पोर्ट्स म्हणून चॅनल आहे युट्युब वर. त्यात तो फक्र ए आलम म्हणून पाकिस्तानी अ‍ॅक्टर/पर्सनॅलिटी आहे एक शो चालवतो. खुप मजा येते बघायला आणि त्यांचे किस्से एकायला. अक्रम, मिस्बाह उल हक, वकार युनुस आणि शोएब मलिक हे ४ कॅप्टन असतात पॅनल मध्ये. जमल्यास बघा.

अहो, रोहित शर्माच्या हाताला जखम! फलंदाजी करता येत नाही!!
असामी, वैद्य, भाउ नमस्कर, ऋन्मेऽऽष कुणितरी ताबडतोब ऑस्ट्रेलियाला जा.

*असामी.... ताबडतोब ऑस्ट्रेलियाला जा.* - इंग्लंडला बेसावध ठेवायला तसं सांगताहेत; शिवाय, आमच्यातला कोणी येणार म्हटलं तर घाबरुन रोहित खेळणार व दणक्यात खेळणार सेमी फायनल !! Wink

Pages