क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१३ ओवर ८०.
लो स्कोअर होणार असं दिसतय.

कोहली आहेच पण पंड्या शेवटच्या ३ षटकात ५० मारू शकतो! अजुनी १७० धावा केल्यास संधी आहे भारताला. अजुनी लाडका खेळायला यायचा बाकी आहे. Wink

राहुल आणि रोहित यांनी पुन्हा मिडल ऑर्डरला संधी दिली आहे. भारताचा कमकुवत दुवा म्हणजे ओपनिंग जोडी आहे.

मी १७० अंदाज धरला होता शेवटच्या चेंडूवर धाव न निघाल्याने १६९ चे आव्हान ईंग्रजांना!
बघुयात काय होते ते.

पहिल्या 3 ओवर्स मध्येच इंग्लंडने निकाल सांगून टाकला. पाकिस्तान आणि इंग्लंड Sunday la बघुया.

ह्या स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी व्यक्तीगत विक्रम केले कप मात्र दुसरेच घेऊन गेले असे होणार!

मागच्या वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानच्या मॅच नंतर आज बॉलिंगचं इतकं कलेक्टीव्ह फेल्युअर बघितलं. Sad

बरे झाले शिल्लक फटाके तुळशीच्या लग्नाला संपवले..
बाकी हा संघ विश्वचषक जिंकायच्या पात्रत्रेचा वाटत नव्हता हे ही खरेय. त्यामुळे तितके वाईट वाटले नाही.

अहो स्कोर थोडा कसला, सपशेल कमी पडला Happy १० विकेट आणि ४ फुल ओवर बाकी ठेवून जिंकले ते. म्हणजे अजून ४०-५० पण होऊ शकत होते सहज.
इन्ग्लंड ची इनिंग्ज सुरु झाल्यापासून १ मिनिट, १ बॉल सुद्ध असे वाटले नाही की वी हॅड एनी चान्स इन धिस गेम Sad

एकीकडे ब्रिटीश ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले
एकीकडे पाकिस्तान जे आपले पारंपारीक शत्रू आहेत
सपोर्ट करावा तर कोणाला हे टू बी ऑर नॉट टू बी झालेय..

*आज भारतीय संघाला हरण्याची शेवटची संधी आहे.* - त्यानी संधीचं सोनं केलं म्हणुया व इंग्लंडचं अभिनंदन करुया .
*...आज बॉलिंगचं इतकं कलेक्टीव्ह फेल्युअर बघितलं * +1

मला आपल्या टीमचा भयंकर राग आला आहे.
हरा. हरकत नाही. क्रिकेटचा गेम आहे. पण इंग्लंड सारख्या थर्ड ग्रेड टीमशी हरताय!
एक वेळ नामिबियाशी हरला असता तरी ...

ईंग्लंड आयर्लंडशी हरलेली तेव्हा मजा आलेली
पाकिस्तानला झिम्ब्वाब्वेने हरवलेले तेव्हाही मजा आलेली
आता दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी मजा करतील संडेला..
आणि आपली पब्लिक मटण खाऊन आता निदान पाकिस्तान तरी हरावी, त्याच समाधान म्हणून मॅच बघतील...

रविवारीच्या दिवशी समस्त देशवासियांना कसलेही टेंशन न ठेवल्याबद्दल भारतीय क्रिकेट टिमचे खूप खूप धन्यवाद..!!

बर झाल. इंग्लंड जिंकले. कोहली, पांड्या सारख्या उद्दाम लोकांना अद्दल घडली. पंतला ज्या तर्हेने पांड्याने वागवले. जणू काय तो सामना जिंकणार होता.

हे आपल्याकडून ऋषी सुनकला गिफ्ट आहे. विश्वचषक जिंकून दिला म्हणून त्याचं पंतप्रधानपद टिकेल आणि इंग्लंडमध्ये राजकीय स्थैर्य येईल.

भुवनेश्वर, कार्थिक, अश्विन , शमी, राहुल, चहल हे मॉडर्न T20 खेळा साठी अत्यंत मिसफिट आहेत, त्यामुळे आपण हरणारच होतो

Pages