क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मजा तेव्हा येईल जेव्हा आयर्लंड न्यूझीलंडला हरवून बाद करेल
आणि लंका ईंग्लंडला हरवत दुसरा क्रमांक पटकावेल.
ऑस्ट्रेलिया अफगाणला हरवत पहिली येईल.
मग लंका आपल्याला सेमीला भेटेल.

मग आपण सेमी जिंकलो की अंतिम सामन्यात जो पुढे येईल त्याचा धुव्वा! विराटचे दोनशे, अक्षर पटेल ५ धावात १० गडी बाद!!!

मग मला १० मिलियन डॉलर्स मिळतील. मग तर मज्जाच मज्जा!

मग पलंगावरून खाली पडल्यावर सगळीच स्वप्ने भस्मसात!!!!

फायनलला हरले तर चालते.
पण आधीच हरून बाहेर पडलो तर वर्ल्डकप बघायचा ईंटरेस्ट मरतो.

सेमीही आपली दुसरी असावी असे वाटते. आपली पहिली असेल आणि आपण सेमीला हरलो तर दुसरी सेमी बघायला तितकी मजा येत नाही.

लोल ऋन्मेऽऽष. खुपच तर्क वितर्क झाले. कळेलच आता. हाय प्रॉबबिलिटी म्हणलं तर एस ए नेदरलंड्स विरुद्ध जिंकेल. म्हणजे त्यांचे ७ पॉईंट.
पाकिस्तान बांग्लादेश विरुद्ध जिंकेल (टफ होऊ शकते कदाचित) म्हणजे त्यांचे ६ पॉईंट.
आता जर आपण हरलो झिंबाबवे विरुद्ध तर आपण आणि पाकिस्तान टाय सहा पॉईंट वर आणि मग रन रेट बघावा लागेल.
थोडक्यात आपण हरलो जरी झिंबाबवेशी तरी रन रेट हाय ठेवावा लागेल.

दुसर्‍या गृपच्या मॅचेस फार नाही बघितल्या त्यामुळे काही कळत नाहीये मला. तिन्ही टॉप संघ एक एक मॅच हारलेत अन न्यु झिलंड टॉप वर दिसतय रन रेट मध्ये. लाईक यु सेड, लफडं असं आहे की इंग्लंडची श्री लंकेशी मॅच उरलीये. त्यात काहीही होऊ शकतं. ती मारली इंग्लंडनी तर हो गया काम.

आता जर आपण हरलो झिंबाबवे विरुद्ध तर आपण आणि पाकिस्तान टाय सहा पॉईंट वर आणि मग रन रेट बघावा लागेल.
>>>>

पाकिस्तानचा रनरेट आधीच जास्त आहे.
आपल्याला झिम्बाब्वे मस्ट विन आहे.

त्या गटातले पहिले तीन संघ आपल्याला भारी पडणारे आहेत सेमीज मधे. किवीज आपल्या मार्गातले मोठा काटा आहेत - टेस्ट पासून गेल्या वर्ल्ड कप पर्यंत नेहमी नडत आलेले आहेत. आपली मॅच पेस नि स्विंग ला मदत होणार नाही अशा मैदानात असावी मग मजा येईल Wink

म्हणजे पर्थ नि ब्रिस्बेन ला नको. मेल्बोर्न चालेल , सिडने धावेल.

टी २० मधे डकवर्थ अगदीच फडतूस प्रकार आहे. त्यात नक्कीच बदल हवाय, नुसत्या हातात विकेट्स असल्या म्हणून वाट्टेल ते टारगेट चेस करता येऊ शकते का ? उगाच काही तरी. किमान एव्हढ्या ओव्हर्स (रीझनेबल - पाच हा आकडा रीझनेबल नाही - एक पूर्ण पॉवर प्ले पण नाहीये तो. ) होत नसतील तर सरळ विभागून द्या ना.

हायलाईट्स नीट बघितले आपण वर्सेस बांग्लाचे. खुपच टेम आहे पिच अ‍ॅडलेडचे पर्थ च्या तुलनेत. पर्थ मध्ये तर बॉल टप्पा पडल्यानंतर सुद्धा प्रचंड फास्ट येत होता. सुर्यकुमारला मानला पाहिजे येवढ्या डेंजरस पिच वर खेळा नीट ते!
असलं काही पिच आलं तर बॉस टोटली कॉईन टॉस आहे आणि त्या दिवशी परत परिक्षा असेल आपली. पहिली बॉलिंग घ्यावी आपण पिच असलं डेंजर आहे ह्याचा सुगावा लागला तर.

“टी २० मधे डकवर्थ अगदीच फडतूस प्रकार आहे.” - ट३०२० मधे ओव्हर्स कमी झाल्या (मॅचच्या आधीच पाऊस पडल्यावर ८-१० ओव्हर्स च्या मॅचेस होतात तशा), की बॉलर्सच्या ओव्हर्सचा कोटा कमी होतो तसं बॅट्समेनची संख्या सुद्धा कमी व्हायला हवी. ८-१० ओव्हर्सच्या मॅचमधे पूर्ण १० विकेट्स घेऊन खेळण्यात काहीच अर्थ नाहीये. जसं सुपरओव्हरमधे ३ च बॅट्समेन बॅटींग करू शकतात तसं काहीतरी.

*...बॅट्समेनची संख्या सुद्धा कमी व्हायला हवी. ...* +1. खरं तर मुख्यत: कसोटी व 50षटकांच्या सामन्यांसाठी तयार केलेला डकवर्थ फ़ॉरम्युला टी 20 ला तसाच्या तसा लावणंच चूकीचं वाटतं.

भारत १८४ विरुद्ध बांग्ला
पाक १८५ विरुद्ध आफ्रिका
न्यूझीलंड १८५ विरुद्ध आयर्लंड

तीन सलग सामन्यातले स्कोअर Happy

डकवर्थ लुईस मला तरी मॅथेमॅटीकली आणि क्रिकेटचे बेसिक लावता चांगला नियम वाटतो.
क्रिकेटमधील अनिश्चितता आणि बदलत्या खेळपट्टीचा फॅक्टर यात जोडणे कठीण आहे.
पण एखाद्या संघाला विजयाची जी संधी पावसाच्या ब्रेकच्याआधी होती साधारण तेवढीच सामना पुन्हा सुरू झाल्यावर राहते असे वाटते.

बर्याच वेळा त्रासदायकच ठरतो डि एल पण मला वाटतं दुसरा मार्ग नाही कुठला. खेळ पुन्हा चालू करायला आणि त्यातल्या त्यात closest approximation of continued play आणण्याकरता हाच मार्ग उपलब्ध आहे.
रनरेट extrapolate करता येतो पण विकेट्सचे तसेच करणे जरा खुप जास्तच होईल आणि त्याहीपुढे ते राबवता कसं येइल?

*अफगाण पेटलीय.. ते बघा रे आधी* - बघितलं. क्रिकेटचं सगळंच अनिश्चित व त्यातही टी 20 त तर कोण कोणाला कधी तोंडघशी पाडेल, सांगणं कठीणच !! भारत, सावधान -- झिंम्बाब्वे !! Wink

हे सगळे D/L वगैरे करण्यापेक्षा बेसबॉलसारख्या ३-३ फलंदाजांच्या ९ इनिंग्स ठेवा. म्हणजे दोन्ही संघांना पिच, हवामान इ. चा समान फायदा/तोटा होइल.

हे सगळे D/L वगैरे करण्यापेक्षा बेसबॉलसारख्या ३-३ फलंदाजांच्या ९ इनिंग्स ठेवा. म्हणजे दोन्ही संघांना पिच, हवामान इ. चा समान फायदा/तोटा होइल.>>>>> ठीक आहे पण मग प्रेक्षक कुठून आणायचे?
Proud

थोडक्यात गेली मॅच! हार्ड लक! रशिद जबरदस्त!

रनरेट extrapolate करता येतो पण विकेट्सचे तसेच करणे जरा खुप जास्तच होईल आणि त्याहीपुढे ते राबवता कसं येइल? >> मी इथेही मागे लिहिले होते. जयदेवन नावाच्या एका मॅथेमॅटिशियन ने डक वर्थ च्या त्रुटी विशेषतः एकांगी होणार्‍या सामन्यांसाठी अ‍ॅडजस्ट मेंट करून दिली होती. बिसीसीआय ने इंटर्नल पॉलीटिक्स पाई नीट बॅकिंग न दिल्याने ते बारगळले.

हे सगळे D/L वगैरे करण्यापेक्षा बेसबॉलसारख्या ३-३ फलंदाजांच्या ९ इनिंग्स ठेवा. >> नऊ नसल्या तरी दोन दोन ठेवल्या तरपिच नि हवामान दोन्हींचा इंपॅक्ट कमी होईल हे पटते. प्रेक्षकांचा मुद्दा समजला नाही बुवा.

अफगान ला परत एक बॅट्समन कमी पडतो असे वाटत राहिले. शेवटची ओव्हर स्टोनिस ला ठेवणे हे नवाज ला शेवटच्या ओव्हर ला ठेवण्यासारखाच प्रकार होता राव. रशिद खान ते व्हिप शॉट्स मारून मिड्विकेट ते लाँङ ऑन पर्यंत धुमाकूळ घालतो हे कळूनही लेंग्थ स्लो बॉल चा अट्टाहास का होता देव जाणे.

रशिद खान ते व्हिप शॉट्स चा स्लो मोशन मधला व्हिडियो बघा. मुरली च्या अ‍ॅबनॉर्मल व्रिस्ट चे बॅटींग व्हर्जन वाटते. कसला जबरदस्त रीकॉईल आहे ? फॉलो थ्रू न करता कसली पॉवर जनरेट होतेय त्या शॉट मधे. अबब !!! उगाच कोब्रा शॉट्स नाही म्हणत. मी एकदा प्रयत्न केला फक्त नि दोन दिवस मनगटे शब्दशः चोळत बसायला लागली होती Lol

जयदेवन नावाच्या एका मॅथेमॅटिशियन ने डक वर्थ च्या त्रुटी विशेषतः एकांगी... >>>> ओके.

प्रेक्षकांचा मुद्दा समजला नाही बुवा.>>>> अरे आहे तो फॉरमॅट चेंज केला तर प्रेक्षक येणार नाहीत बघायला बोअर होतं म्हणून, असं म्हणत होतो. वॉज किडिंग पण जसं फास्ट पेस्ड फॉरमॅट आला, आधी ५० ओवर मग आता २०. टेस्टची लोकप्रियता तितकी नाही राहिली. सहाजिक आहे. तसं म्हणत होतो. बेसबॉल अत्यंत रटाळ गेम वाटतो मला.

शिद खान ते व्हिप शॉट्स चा स्लो मोशन मधला व्हिडियो बघा.>>>> Lol सिरियसली! कैच्या कै पद्धत आहे. गंमत म्हणजे बर्‍याच शॉट मध्ये बॅटचा फॉलो थ्रुच नसतो. म्हणजे बॅकलिफ्ट संपली की ठप्प! असा जोरात फटका बसतो बॉलला आणि तो तिथेच थांबतो. खुपच विचित्र आहे स्टाईल! पण बॉस, मान गये उस्ताद को!

अरे आहे तो फॉरमॅट चेंज केला तर प्रेक्षक येणार नाहीत बघायला बोअर होतं म्हणून, असं म्हणत होतो. >> मला नाही वाटत तसे होईल. क्रिकेट सतत बदलत आलेले आहे. किती बदल एका वेळी ढकलला जातो नि गेम निकाली ठरतो का ह्यावर तो बदल कितपत रुचेल हे ठरत जाणार. परत तिकिट काढून आलेल्या प्रेक्षकाला किमान दोन ते तीन तास खेळ असावा असे वाटाले तर ते साहजिक वाटतेय. बेसबॉल रटाळ आहे ह्याबद्दल एकमत पण त्याचे बेसिक स्ट्रक्चरच वेगळे आहे क्रिकेट पेक्षा त्यामूळे तो संथ होत जातो.

म्हणजे बॅकलिफ्ट संपली की ठप्प! असा जोरात फटका बसतो बॉलला आणि तो तिथेच थांबतो. >> त्यावेली व्हिपलॅश मनगटावर येतो असे वाचलय. आयपील च्याच वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया च्या साईट वर होते त्या मेकॅनिक्स वर डिस्कशन होते. तो शॉट नि बटलर जो डिलस्कूप + सूर्या स्कूप मधले जे काही मारतो त्याबद्दल. तो शॉट तर भयंकर डेंजरस आहे राव. जजमेंट १००% अचूक हवी नाही तर थोबाडावर बॉल सरळ येणार.

ते बरोबर आहे असामी. मी म्हणत होतो की फॉरमॅट फास्टर किंवा जास्त एक्सायटिंग होत असेल प्रेक्षकांकरता तर अर्थातच बदल स्वागतार्ह (असा शब्द आहे ना? Proud ) होतील. एकंदरितच बेसाबॉल रटाळ असल्यामुळे तिथल्या कुठल्या गोष्टी क्रिकेटमध्ये चालतील असं वाटत नाही.

त्यावेली व्हिपलॅश मनगटावर येतो असे वाचलय.>>>> हो, त्यात टायमिंग चुकीचे असेल आणि बॉल मध्यावर नाही बसला बॅटच्या तर अजूनच जास्त.

स्कुप म्हणजे ते बॉल आला की वाकून नुसता बॅट वरुन रोल करुन मागे चौका किंवा छक्का मारतात तोच ना? वाटताना सोपा वाटतो पण अवघड असणार. खरय, चुकला तर तोंडावर पण येऊ शकतो. पण हे सगळे पठ्ठे, सुर्या, इशान किशन, पंत त्या बॉलच्या लाईन मधून बाजूला होतात अन मग बॅट घालतात.

इंग्लंडने फलंदाजीत नखरे करत सामना शेवटच्या षटका पर्यंत नेला व जिंकला !! त्या ग्रुपमधून न्यूझीलंड व इंग्लंड आतां सेमीमधे दाखल.

इंग्लंडने फलंदाजीत नखरे करत सामना शेवटच्या षटका पर्यंत नेला व जिंकला !>>>

हो ना!
६ षटकात बीन बाद ७० आणि नंतरच्या ७२ धावांसाठी १३ षटके!!

आता यजमान बाद फेरीत प्रेक्षक. उद्या भारत, पाक आणि आफ्रिका तिघानाही संधी आहे.
अर्थात पाकची संधी भारत किंवा आफ्रिका ह्यातील एक संघ हरण्यावर अवलंबून!
अर्थात तिघांनाही बाद फेरी गाठण्यासाठी जर तर उपयोगी नाहीस्वत:चा सामन जिंकायलाच हवा.
भारताचा सामना उद्या शेवटी असल्याने काय करायला हवे ते आधीच कळेल.

हे खुपच कॉमन होत चाललय. मिडल ऑर्डर गडगडतेय मोठ्या संघांची आणि कधी कधी हारतायत (पाकिस्तान)तर कधी कधी निसटता विजय. बटलर आणि हेन्ली नी छान सुरवात केली पण टिकले नाही. स्टोक्स होता शेवट पर्यंत म्हणून वाचले.

पाऊस मॅच फिरवतोय... टी 20 मध्ये टॉस जिंकला तर बॅटिंग घ्यावी ऑस्ट्रेलिया मध्ये... चेस नकोच...

Pages