क्रिकेट विश्वचषक ट्वेंटी २० - वर्ष २०२२

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23

काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संघ जवळपास फिक्स आहे आपला.
उत्सुकता आहे की आपले ओपनर वा टॉप ऑर्डर - शर्मा राहुल कोहली हे पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचा स्पेशली दुखापतीतून सावरून फिट होऊन आलेल्या शाहीन आफ्रिदीचा सामना कसा करतात.

पंत नसेल आज. पण त्याला जबाबदार त्याचाच बेजबाबदारपणा आहे. अन्यथा ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप आणि पाकिस्तान वेगवान गोलंदाजांचा सामना करताना बघायला त्याला आवडले असते.

क्वालिफाईंग राऊंडला लंका आणि विंडीज दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात नवख्या संघांकडून धक्का बसला.

लंका त्यातून सावरली. जसे आशियाकपमध्येही पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभवाचा धक्का पचवत पुढे जाऊन ते आशिया चॅम्पियन बनले. ईथेही ते त्याच मूडमध्ये दिसत आहेत.

विंडीज मात्र सावरलीच नाही. आणि बाहेर पडली. दोन टाईम २०-२० चॅम्पियन विंडीज संघ यदा वर्ल्डकपमध्येच नसणार.
मजेशीर संघ आहे विंडीज, त्यांचे फॅन्स धमाल असतात, त्यांच्या मॅचेस बघायला मजा येते. म्हणून असायला हवा होता. मिस करणार विंडीजला यंदा आपण Sad

काल पहिल्या सामन्यातही खळबळ उडाली. ऑस्ट्रेलिया फेव्हरेट वाटत होती. केवळ कालचा सामना जिंकायलाच नाही तर वर्ल्डकप जिंकायला सुद्धा. या उलट न्यूझीलंड पाकिस्तानकडून हरून आलेली. पण मोठ्या स्पर्धेत येताच त्यांनी सालाबादाप्रमाणे आपला खेळ उंचावला. ४ ओवर ५६-० अशी सुरुवात करत २०० मारले आणि प्रत्त्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला १११ ला गुंडाळले.

दुसर्‍या सामन्यात अफगाणिस्तान फलंदाजांना मात्र ईंग्लंड गोलंदाजांचा पेस झेपला नाही. ११२ लाच थांबले.
पण गोलंदाजीत मात्र त्यांनी चांगली कामगिरी करत ईंग्लंडला झुंजवले. कॅचेस सोडल्या नसत्या तर सामना अजून रोचक झाला असता.

पण एकूणातच जशी सुरुवात झाली आहे ते पाहता वर्ल्डकप रोचक होणार हा असे वाटते.

सर्वात महत्वाचे म्हणजे मागच्या युएई वर्ल्डकपला जो टॉसला एक्स्ट्रा अ‍ॅडवांटेज मॅचची आणि एकूणच स्पर्धेची मजा घालवत होता ते ईथे दिसणार नाही. ऑस्ट्रेलियाचा स्पोर्टींग विकेटवर आणि मोठ्या मैदानावर सामने बघायला मजा येणार. कारण ईथे चौक्के छक्केच नाही तर सिंगल डबलचेही महत्व खूप वाढणार आहे.

सरांनी प्रतिसादांचे ओझे आपल्या खांद्यावर घेतलेले दिसतेय. चारही प्रतिसाद त्यांचेच. हे बर दिसत का?
सरांनी गाडी सुरु केली आहे. आता इतरांनी येऊन धक्का मारायला पाहिजे.

१६० टारगेट
राहुल गेला घाबरत घाबरत .. पाठोपाठ शर्मा..
३ ओवर १०-२
स्ट्रोकच खेळत नाहीयेत
वर्षभर न्यू ॲप्रोच करत होते. ऐन मोक्याला थंड

ज ब्ब र्र द स्त मॅच !
धन्य झालो बघून..

८ बॉल २८ ला जे त्या रौफ लाला दोन सिक्स मारले... अ प्र ति म ! किंग कोहली ईज बॅक !!

मजा आली आज! पहाटे उठल्यासरशी दिवाळी गिफ्ट मिळालं!!
४ विकेट नंतर अवघड वाटत होते. सूर्या आउट झाल्यावर कोहली आणि पंड्याने सॉलिड कमबॅक केलाय! व्वा!
तरी शेवटच्या ओवर पर्यन्त इट वॉज एनीबडीज गेम!! लास्ट ओवर ला जरा स्टाइल मधे जिंकावे असे वाटत होते पण वाइड , नोबॉल, फ्री हिट इतके करून १ विकेट आणि मग सिंगल्स घेऊन जिंकले!! Happy अर्थात जिंकलो हे महत्त्वाचे!! येय!!

कोहली माणूस आहे कि कोण. पांड्या सारखा फिट मनुष्य शेवटी थकलेला वाटत होता . कोहली ने त्या तीन धावा काढल्या तेंव्हा त्याने आधी स्टंपकडे नि मग जाणार्‍या बॉल कडे वळून पाहिले नि मग तीन धावा काढल्या - त्याचा टेम्पो , अ‍ॅक्सलरेशन, जजमेंट काहीच्या काही होते. फीटनेसची परमावधी आहे. रऔफ ला मारलेला पहिला स्ट्रेट सिक्स कसा काय मामरला देव जाणे. बॉल वर पेस नाही, हाईट ऑकवर्ड होती, ग्राऊंड मोठे, कोहली काही पॉवर प्लेयर पण नाही - अमेझिंग !!!

पाकिस्तान ने शेवटच्या तीन ओव्हर्स मधे चाळीस रन्स काढले नि राहुल-रोहित आफ्रिदीच्या आजच्या बॉलिंङ पेक्षा त्याच्या लौकिकाला धरून खेळले हे दोन्ही मुद्दे ओउढच्या सामन्यामधे हाताळले जातील अशी आशा करूया.

मजेशीर संघ आहे विंडीज, त्यांचे फॅन्स धमाल असतात, त्यांच्या मॅचेस बघायला मजा येते. म्हणून असायला हवा होता. मिस करणार विंडीजला यंदा आपण >> १००%

राहुल,रोहित आणि पाकिस्तान संघ यांचे संयुक्त प्रयत्न पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात असमर्थ. विराट, हार्दिक, अर्शादीप यांची दिवाळी बोनस कामगिरी.

मला कौतुक अश्विन चे वाटते... डिके ने त्याला बेकार वेळ दाखवली.. आणि किती कूल आहे अश्विन.. तो वाईड सोडला शांतपणे... अमेझिंग...

“ अश्विन हा स्मार्ट क्रिकेटर आहे ”. - नक्कीच. किंबहूना काल्/आज च्या मॅचमधे ‘अनुभवाला पर्याय नाही‘ हे खूप वेळा जाणवलं. उदा. शमी-पंड्याने मिडल ओव्हर्समधे घडवलेला मिनि-कोलॅप्स, टायमिंग ने शॉट्स बसत नसतानासुद्धा शेवटपर्यंत एका बाजूने टिच्चून उभा राहिलेला हार्दिक, शेवटच्या बॉलवर वाईड बॉल सोडणारा आणि नंतर इन्फिल्डर्सच्य डोक्यावरून स्कूप करणारा अश्विन आणि १८+ ओव्हर्स प्रेशर शोषून घेत शेवटी किलर पंचेस ठोकणारा कोहली.

शेवटच्या बॉलवर वाईड बॉल सोडणारा अश्विन महान प्रकार होता. आईस कोल्ड ब्लड !

आज आफ्रिकेचा विजय जस्ट हुकला - पाऊस, आफ्रिका ह्यांछे काय्नाते आहे कोणास ठाऊक Happy

Pages