Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि पब्लिक ला हे गिमिक समजणार
आणि पब्लिक ला हे गिमिक समजणार नाही असे डीटरजंट वाल्यांना वाटते कि काय
भारतात ९०% लोकं मायबोली वाचत
भारतात ९०% लोकं मायबोली वाचत नाही त्यामुळेच अश्या प्रोडक्ट्स आणि जाहिरातवाल्यांचं फावतं. नाहीतर त्यांची गिमिक्सवाली डाळ बिलकुल शिजु शकली नसती.
(No subject)
(No subject)
मायबोलीनेच डिटर्जंट बनवावं.
मायबोलीनेच डिटर्जंट बनवावं.
किंवा अलिबाबा सारख्या ऑनलाईन स्टोअर ची सुरूवात करावी.
आईबाबा डॉट कॉम.
ढेकून घालवण्यासाठी गुड
ढेकून घालवण्यासाठी गुड मॉर्निंग नावाच सोलूशन मिळतं ते पाण्यात घालून फवारा...आयुष्यात कधी घरात ढेकूण दीसणार नाहीत.
खूप अंडररेटेड औषध आहे...वास तर अजिबात येत नाही घरात.
Good Morning >> आम्ही
Good Morning >> आम्ही त्याच्या इतक्या बाटल्या घेतल्या आहेत की त्या आधी त्या कंपनीचे शेअर्स घेतले असते तर भरपूर dividend मिळाला असता.
(No subject)
आपल्या पुढे स्कूल बस लाल दिवे
आपल्या पुढे स्कूल बस लाल दिवे लावून आणि स्टॉप साइन लावून उभी आहे, आणि मागे अँब्युलन्स सायरन वाजवत आहे, अशा अवस्थेत असताना थांबून राहावे की पुढे जावे?

इथे निळी गाडी म्हणजे आपण आहोत.
मिडियनवर जाता येत असेल तर
मिडिअनवर जाता येत असेल तर तिथे जावे, नाही तर पुढे.
Good Morning >> आम्ही
Good Morning >> आम्ही त्याच्या इतक्या बाटल्या घेतल्या आहेत की त्या आधी त्या कंपनीचे शेअर्स घेतले असते तर भरपूर dividend मिळाला असता.>> पियू म्हणजे तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही झाला का... मी जवळपास सहा लोकांना सांगीतलंय हे औषध आणी त्या सगळ्यांच्या गरातली ढेकणं पळून गेलीत...
ज्यांच्या घरातील ढेकुण पळाले
ज्यांच्या घरातील ढेकुण पळाले नाहीत ते मोडेन पण वाकणार नाही बाण्याचे समर्थक असल्याने गुडमॉर्निंग पिउन मरेन पण घर सोडणार नाही अश्या वृत्तीची असावीत.
डिटर्जंटमुळे पाणी काळे होणे>
डिटर्जंटमुळे पाणी काळे होणे> +१
'मुळात ती एक प्रकारची माती असते डिटर्जंट बनवताना बेस म्हणून वापरलेली' असे कुठेतरी वाचले होते. खखोदेजा!
कोणी आपल्या washing machine मधील खालचे चाक काढून पाहिले आहे का तिथे किती डिटर्जंटची घाण साचलेली असते ती!!!
चाक परात बसवता येईल की नाही
चाक परात बसवता येईल की नाही या धास्तीने काढले नाही.पण मशीन साफ करायचे क्यूब्ज 2 वेळा टाकले.
पण तोही विषय नसावा.कारण पहिल्या 5 मिनिटात पाण्याचा रंग वेगळा व्हायचा.
आपल्या पुढे स्कूल बस लाल दिवे
आपल्या पुढे स्कूल बस लाल दिवे लावून आ….>> थांबलेल्या स्कूलबसपासून २०-२५ फूट अंतर ठेऊन थांबावे असा नियम आहे. जर तूम्ही बाजूच्या लेन मधे आहात आणि मागून रुग्णवाहिणी येत असेल तर तूम्ही हळूच तुमची गाडी त्या गॅप मधे घ्यायला हरकत नसावी. पण थांबलेल्या बस पुढे जाताना मधेच मूले आडवी येऊ शकतात.
तसेच विरूद्ध लेन मधे आपण जाऊ शकत नाही पण जागा असेल तर रुग्णवाहिणी तिथून रस्ता काढत जाते.
अशा परिस्थितीत साधारण स्कूल
अशा परिस्थितीत साधारण स्कूल बस फ्लॅशिंग लाईट्स, स्टॉप साईन चा दांडा इ. आत घेऊन बस ड्रायव्हर स्कूल बसचा स्टॉप बंद करतो/ते. मग नेहेमी प्रमाणे करावे.
तोवर स्कूल बसला पहिला राईट ऑफ वे आहे. मागे अँब्युलन्स/ पोलिस/ फायरट्रक असला आणि तो/ ती हॉर्न वाजवत असली तरी बसच्या मधल्या जागेत थोडं घुसता आलं तर बघावं. कारण तो भाग तुम्हाला दिसतोय. ते करुनही अँब्युलन्स स्टॉप लाईट असताना बसला ओलांडेल असं वाटत नाही. आपण बसला _कदापि_ओलांडू नये. मिडिअनवर गाडी घालणं शक्य असेल तर पोलिस ती घालेलच. आपण ते प्रकार करू नयेत.
आपण स्कूल बसचा नियम मोडला आणि बसला ओलांडून जात असताना पोरगं रस्ता क्रॉस करत असेल आपल्या समोर आलं तर होत्याचं न्हवतं व्हायचं. स्कूल बस स्टॉपला असताना राईट ऑफ वे स्कूल बसचा आहे आणि इमर्जंसी गाड्यांनाही स्टॉप बंद झाल्याशिवाय पुढे जात येत नाही. आठवा : ट्रॅफिल लाईट लाल असताना सायरनवाली गाडी लाईटला स्टॉप अँड गो करते. धाडकन ओलांडून जात नाही.
अशा परिस्थितीत पोलिस हॉर्नला इंटिमिडेट न होता शांत राहुन वागावे. सोपं नाही पण (इतरांच्या)अनुभवातुन आलेलं शहाणपण आहे.
अर्थात हे स्कूल बसचे नियम कॅलिफोर्निआत (बे-एरियात) अस्तित्वातच नाहीत असं तिकडे रहाताना वाटायचं. तिकडे एकतर स्कूल बस नाहीतच फक्त स्पेशल नीडच्या मुलांना मिळतात. त्या फ्लॅश करत असताना मिडिअन नसलेल्या रस्त्यावर दुसर्या बाजुच्या गाड्या भरधाव जायच्या. मला अचंबा वाटायचा तिकडे. तर ते असो.
थांबून रहावे मोरोबा. दोघांचा
थांबून रहावे मोरोबा. दोघांचा राईट ऑफ वे आहे. त्यात एमर्जन्सी वेहिकलचा जास्त आहे. चित्रात तुम्हाला हलायला वाव नाही, थांबलो नाही तर टिकिट मिळू शकेल.
अज्ञानी
राज्यानुसार nusaar नियम इथे
राज्यानुसार नियम इथे दिले आहेत.
तिकीट मिळू शकेल आणि दंड होईल/लायसन्स रद्द होईल ही शक्यता आहेच. पण मिडीअनवर जायचे की मुले नाहीत हे बघून पुढे जायचे की अँब्युलन्सला प्राधान्य द्यायचे की शाळेच्या बसला प्राधान्य द्यायचे की तिकीट मिळेल म्हणून वाट न देता, ठोंब्यासारखे तिथेच थांबायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. व्यक्तिशः मी आयुष्याला सर्वात जास्त महत्त्व देतो, मला दंड होईल आणि लायसन्स रद्द होईल ही भीती असली तरीही. ( वरील प्रसंगात इतर कुणा मुलाचा अपघात होणार नाही याची काळजी मी घेणार, हे ओघाने आलेच.)
उपाशी बोका, कायदा काय सांगतो
उपाशी बोका, कायदा काय सांगतो असा प्रश्न होता. प्रत्यक्षात थांबायचं की कायदेभंग करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या जजमेंटवर आणि त्या त्या सिचुएशनवर अवलंबून राहील. तिकिट मिळेल म्हणून थांबून राहावे असं कोणाला म्हणायचं आहे असं वाटत नाही.
मला आधी सावधपणे पुढे निघून जाणं योग्य वाटलं होतं पण वरचे प्रतिसाद आणि ऑनलाईन रिसर्चवरून बाजूला होण्याएवढी गॅप नसेल तर कायद्याने थांबून राहणं अपेक्षित आहे असं वाटतंय.
<< कायद्याने थांबून राहणं
<< कायद्याने थांबून राहणं अपेक्षित आहे >>
तुमच्या प्रश्नावरून वाटले होते की तुम्ही काय कराल? असे विचारले आहे. असो, कायदाच जाणून घ्यायचा असेल तर आंतरजालावरील उत्तरांवर अवलंबून राहण्यापेक्षा, जवळच्या DMV ला किंवा वकिलाला विचारून सल्ला घेणे योग्य.
तिथे किती डिटर्जंटची घाण
तिथे किती डिटर्जंटची घाण साचलेली असते ती!!!
>> ती डिटर्जंट ची घाण असते हे आज पहिल्यांदा वाचतेय. आजपावेतो ती तुमच्याच कपड्यातील मळ साठून साठून झालेली असते असे ऐकले / वाचले आहे.
पियू म्हणजे तुम्हाला त्याचा
पियू म्हणजे तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही झाला का
>> पूर्ण नाही. सेपरेट पेस्ट कंट्रोल करावेच लागले.
आज एका रॉ वेगन (म्हणजे फक्त
आज एका रशियन रॉ वेगन (म्हणजे फक्त कच्चे पदार्थ खाणारे) फलाहार वर जगणारे इन्फ्लुएन्सर चा कुपोषणाने मृत्यु झाल्याचे वाचले. फार वाईट वाटले.
पाणी, मिठ, नॉरमल शिजवलेले अन्न सर्व सोडून बसली होती ती. तिला २१ हजार फॉलोवर ही होते. आई गेली अनेक वर्ष तिला ह्या निर्णयापासून परावृत्त करायच्या प्रयत्नात होती पण उपयोग झाला नाही.
कोविड झाला तेव्हा मी १० दिवस अन्न पाणी सोडून ड्राय फास्टिंग केले अशी दिमाखात पोस्ट टाकली होती तिने.
वेगन लोकांना शरिराला लागणारी उपयुक्त घटके मिळत नाहीत हे कळत नसेल का? प्रोटिन चे इतर सोर्स हजर नसतिल तर ते काय करतात? त्यांना जे हवय ते करायला ते मोकळे आहेतच पण इतरांना ते वेगन नाहित ह्याचा गिल्ट का देत बसतात?
https://www.mirror.co.uk/news
https://www.mirror.co.uk/news/world-news/vegan-influencer-bragged-weighi...
हो.ती बरेच दिवस फणस आणि
हो.ती बरेच दिवस फणस आणि ड्युरिओन खाऊन जगत होती.त्याने अजून जास्त नुकसान झालं असेल.
चक्रमपणा!
चक्रमपणा!
नॅचरल सिलेक्शन, दुसरं काय!
माझा एक रशियन सहकारी देखील हे
माझा एक रशियन सहकारी देखील हे Raw vegan डायट करायचा त्याची आठवण झाली. अगदी व्यवस्थित निरोगी दिसणारा तो मुलगा हे डायट करून रोगट दिसायला लागलेला. सारखे चरणे चालू असायचे (pun intended) गाजर, संत्री खाऊन खाऊन की काय कुणास ठाऊक, त्याचा रंग actually ऑरेंज झालेला. होप नीट असेल त्याची तब्येत आता.
तुम्ही कुणा फॅनाटिकचे उदाहरण
तुम्ही कुणा फॅनाटिकचे उदाहरण देऊन व्हेगन लोकांना शरिराला लागणारी उपयुक्त घटके मिळत नाहीत हे कळत नसेल का असे विचारत आहात.
<<त्यांना जे हवय ते करायला ते मोकळे आहेतच पण इतरांना ते वेगन नाहित ह्याचा गिल्ट का देत बसतात?>> असे जे करतात ते नक्कीच चुकीचे व निषेधार्हही आहे.
न जाणता व न समजून घेता व्हेगन पद्धती अवलंबणे / इतरांना अवलंबण्यास सांगणे चुकीचे आहे असे खरंच करू नये.
मी व्हेगन पद्धतीवर तिन दिवस सेमिनार केला होता. हे चायना स्टडी प्रोमोटर होते. त्यात इतर माहिती सोबत प्रथिने, ब१२ व ड जीवनसत्व, कॅल्शियम, ओमेगा-३/ओमेगा-६ आणि त्यांचा रेशो, आयोडीन अशी अनेक मुद्द्यांबद्दल इत्यादि बद्दल विस्तृत माहिती व त्यांची सोय कशी करता येईल हे सांगितले होते. त्यात जे शक्य नाही त्याबद्दल - विशेष करून ब१२, ड आणि आयोडीन यांचे सप्लिमेंट्स/फोर्टिफाईड पदार्थ घेण्यास सांगितले होते. (एवढं सगळं करूनही कसल्या घटकांची उणीव रहात असेल का? शक्य आहे. )
तेव्हा कुणाला व्हेगन व्हायचय, का व्हायचय, ज्याने त्याने ठरवावं पण स्वतःच्याच भल्यासाठी ते नीट समजून उमजून करावं. त्यात कुणाला कमी लेखणे अथवा इतरांच्या भल्यासाठी आपण त्याग करत असल्याची भावना वगैरे गोष्टी करू नयेत.
शरीर अशक्तपणा किंवा अजून कसले इशारे देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता, 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है' किंवा 'असे होते आहे म्हणजेच आपले डिटॉक्स काम करत आहे' अशा वल्गना न करता वेळेत डॉक्टर/आहारज्ज्ञांचा सल्ला घेणे एवढे तारतम्य बाळगायला हवे.
>> आज एका रशियन रॉ वेगन
>> आज एका रशियन रॉ वेगन (म्हणजे फक्त कच्चे पदार्थ खाणारे) फलाहार वर जगणारे इन्फ्लुएन्सर चा कुपोषणाने मृत्यु झाल्याचे वाचले.
ओह्ह! फक्त फलाहार करून जगणाऱ्या एका तरुण जोडप्याला माध्यमांतून काही महिन्यांपूर्वी बरीच प्रसिद्धी मिळाली होती. मला तेच आठवले.
(((गाजर, संत्री खाऊन खाऊन की
(((गाजर, संत्री खाऊन खाऊन की काय कुणास ठाऊक, त्याचा रंग actually ऑरेंज झालेला.)))
बापरे
((फक्त फणस खाऊन राहायची))
एवढा जीव जाईपर्यंत वेळ आली तरी शरीरात होणारे बदल, अशक्तपणा, याकडे कसे दुर्लक्ष करतात ?
Pages