दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी कुणी प्रतिसाद दिला असेल त्याच्याशी सहमती दर्शविताना अधिक चिन्हापुढे कुठला आकडा लिहायचा हे कसे ठरवतात?

तात्विक दृष्ट्या +१ लिहिणे पुरते.
पण काही जण जोरदार सहमती दर्शवायला +१११११, +१००००. +१२३४५ असा एखादा भरगच्च आकडा लिहितात आणि भावना पोहोचवतात..

+७८६ हा आकडा
ऑर्कुट कम्युनिटीवर असताना मी वापरायला सुरुवात केली. कारण तिथे माझी अमन की आशा, सर्वधर्म समभाव जपणारा अशी इमेज होती, तसेच माझे विचारही आहेत.
काही लोकांना हे पटल्याने, आवडल्याने त्यांनीही +७८६ लिहायला सुरू केले होते.
तर काहींना न पटल्याने व मजेत चिडवायला म्हणा त्यांनी +६७८, +७९८ असे +७८६ शी साधर्म्य दर्शवणारे भलतेसलते आकडे लिहायला सुरुवात केली Happy

+१ इज अ गूगल'स व्हर्जन ऑफ द लाईक बटन. गूगल प्लस बंद पडलं आणि +१चा उगमही विस्मृतीत गेला. ज्याप्रमाणे 'सेव्ह'साठी अजूनही फ्लॉपीचं चित्र असतं तसंच हे आहे.

आधी कुणी प्रतिसाद दिला असेल त्याच्याशी सहमती दर्शविताना अधिक चिन्हापुढे कुठला आकडा लिहायचा हे कसे ठरवतात?

आपल्या आधी अजून किती जणांनी त्या प्रतिसादाला सहमती दर्शवली आहे ते प्रतिसादाची सर्व पाने नीट वाचून मोजायचे आणि मग त्यापुढील आकडा लिहायचा! उदा. एखाद्या प्रतिसादाला आपल्या आधी 5 जणांनी सहमती दर्शवली असेल तर आपण +6 असे लिहायचे!!!
.
.
.
हलकेच घ्या!!!

<< +७८६ हा आकडा
ऑर्कुट कम्युनिटीवर असताना मी वापरायला सुरुवात केली. कारण तिथे माझी अमन की आशा, सर्वधर्म समभाव जपणारा अशी इमेज होती, तसेच माझे विचारही आहेत.
काही लोकांना हे पटल्याने, आवडल्याने त्यांनीही +७८६ लिहायला सुरू केले होते.
तर काहींना न पटल्याने व मजेत चिडवायला म्हणा त्यांनी +६७८, +७९८ असे +७८६ शी साधर्म्य दर्शवणारे भलतेसलते आकडे लिहायला सुरुवात केली Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 27 July, 2023 - 00:41>>

------- ऋन्मेऽऽष ने ऑर्कुट वर फेमस केलेला ७८६ हा आकडा पुढे शाहरुख खानाने " मै कैदी नं ७८६ " (रेफरंस - वीर जारा ) मधे वापरला. https://www.youtube.com/watch?v=_b_OG9I5hcU

भलते सलते आकडे आले तसे गेले.... पण ऋन्मेऽऽष / शाहरुख चा ७८६ आजही लोक आवडीने वापरतात. Happy

बिल्ला नंबर म्हणून अमिताभ
कैदी नंबर म्हणून शाहरूख
आणि अनुमोदन द्यायला म्हणून ऋन्मेऽऽष
यांनी हा ७८६ आकडा सर्वप्रथम वापरला याची नोंद तर करायलाच हवी.

किती सहमती आहे हे दर्शवायला असे रँडम आकडे वापरून काय उपयोग? त्याला काही ताळतंत्र असायला हवे.
पूर्णपणे सहमत असेल तर १ किंवा १००%. (प्रत्येक वेळी % चिन्ह द्यायची गरज नाही असे आपण ठरवु शकतो) त्यापेक्षा कमी असेल तर त्यानुसार उदा ०.२ किंवा २० (%).
पूर्णपणे सहमतसाठी १ की १०० हे आपण ठरवु शकतो.
म्हणजे कोण किती सहमती दर्शवते आहे याचा ढोबळपणे अंदाज येईल लेखकाला तसेच चर्चेत भाग घेणाऱ्या सर्वांना.

सहमतीचे प्रमाण स्पष्ट सांगितले पाहीजे. उदाहरणार्थ ६३.७९ % सहमत.
किती जण सहमत आहेत हे सांगण्यासाठी आधी +१ असेल तर पुढच्याने +२ लिहीले पाहीजे. या पद्धतीन +३,+४. + ५ ...... +१२.५, ++६८.७५ .
एकाच वेळी एखाद्या समूहातर्फे कमेण्ट केली असेल तर त्या समूहात जितके लोक तेव्हढी अधिकची चिन्हे देऊन तेव्हढे आकडे पुढे लिहीले पाहीजेत.

उदा आधी +३ असेल आणि त्यानंतर ११ जणांच्या ग्रुपने कमेण्ट केली तर..
++++++++ ४ ते १४ असे लिहावे.

हे नियम मायबोलीच्या गाईडलाईनमधे टाकावेत. जे पाळणार नाहीत त्यांचा आयडी ब्लॉक करावा.

टक्केवारी काढायला १०० ऐवजी ऐवजी ७८६ हा आकडा वापरावा.
जसे की ५०% सहमती असेल तर +३९३ लिहावे.
नियम बनवताना सर्वांच्या भावना जपणे, सर्वांच्या मताचा आदर करणे आवश्यक.

टक्केवारीसाठी आयडीद्वारे केल्या जाणाऱ्या कमेंट मोजायच्या की व्यक्तिद्वारे (ड्यूआयडी १ +ड्यूआयडी२+ ...) करण्यात आलेल्या

ओके, तर मग सर्वांच्या मताचा आदर करून पूर्ण सहमतीस १०० हा आकडा ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आकडे द्यावेत.

कुठे ठरला १०० हा आकडा?
पारदर्शकता हवी.
मी ७८६ सभासद ७८६ आकड्याच्या समर्थनार्थ आणू शकतो..

ओके, तर मग सर्वांच्या मताचा आदर करून पूर्ण सहमतीस १०० हा आकडा ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आकडे द्यावेत. >>> ३६.२३% सहमत.

<< कुठे ठरला १०० हा आकडा?
पारदर्शकता हवी.
मी ७८६ सभासद ७८६ आकड्याच्या समर्थनार्थ आणू शकतो..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 28 July, 2023 - 06:39 >>

------- मी पहिला
ऋन्मेष आता फक्त ७८५ हवेत .... Happy

मला पडणारा प्रश्न अगदी किरकोळ आहे पण तरीही..

एखाद्या डिटर्जंट मध्ये पाण्याला काळे करणारे घटक असू शकतात का?
मी कपडे धुवायला अगदी साधी लोकल पावडर वापरते. तर ती पाण्यात घालून जरा एकत्र केली कि पाणी लगेच काळे/घाण होते.
तर खरंच माझे कपडे इतके मळलेले असतात आणि पाचेक मिनिटात तो मळ पाण्यात मिसळतो आहे?
की पावडर मुद्दाम अशी बनवली आहे कि पाण्यात गेल्या बरोबर मळ काढत असल्याचा आभास तयार करेल?

ती पाण्यात घालून जरा एकत्र केली कि पाणी लगेच काळे
>
मला हे रिन बद्दल जाणवले होते, तेंव्हा मी नुसती रिन पावडर पाण्यात घालून पाहिले. हलका करडा रंग येतो. आपल्या कपड्यांना हा रंग लागत नाही. पण ते काळे पाणी पाहून आपल्याला कपडे फार स्वच्छ झाले आहेत असं वाटावे म्हणून ही मार्केटिंगची पद्धत असावी हा माझाही अंदाज आहे.

हो आठवलं, मलाही रीन साबणाचा (चुरा) हाच अनुभव आहे. पाणी करड्या रंगाचं दिसतं. तेव्हा म्हणावंसं वाटतं -

चुरा लिया है तुमने जो रिन का
कपडे नहीं बरबटणा सनम

हपा.. Lol
पाणी काळं होणे मी पण नोटीस केलयं.

डिटर्जंट चांगले असेल तर ते कपड्यात शिरल्यावर लागलेल्या मळाला म्हणते "चल निघ इथून, तोंड काळे कर आता." आणि मळ काळे तोंड करून कापड्यातून बाहेर पडून पाण्यात उतरतो.

हाच प्रश्न मलासुद्धा पडला होता. जड पाणी असेल आणि डिटर्जंट जास्त असेल तर पाण्यातील मिनरल्स सोबत रिएक्शन होऊन काळा residue तयार होतो, असे एक त्यामागचे कारण कुठेतरी मिळाले होते. खखोदेजा.

मानव, हरपा Lol

मला हे रिन बद्दल जाणवले होते,.... एकदम बरोबर.
मलाही एकदा पियूसारखं वाटले होते.आपल्या चादरी इतक्या मळल्या की काय करून.नंतर दुसरे कपडे घातले तरी तीच कथा होती.मग तो साबणाचा दोष असावा म्हणून गप्प बसले

मला हे रिन बद्दल जाणवले होते,.... एकदम बरोबर.
मलाही एकदा पियूसारखं वाटले होते.आपल्या चादरी इतक्या मळल्या की काय करून.नंतर दुसरे कपडे घातले तरी तीच कथा होती.मग तो साबणाचा दोष असावा म्हणून गप्प बसले.
कपड्यात सर्फ टाकल्यास पाण्याला करडेपणा येत नाही.

Pages