Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28
'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सातवीत असताना माझ्या
मी सातवीत असताना माझ्या मावशीच्या लग्नात चोरून माझ्या मामेआजोबांची तंबाखू खाल्ली होती.
भुकेल्या पोटी खाल्ल्याने चक्कर येऊन झोपी गेले.मग मावस भावाला खरंखरं सगळ सांगितलं पण नशीबाने त्यातलं आई बाबांना नाही कळलं नाहीतर काही खैर नव्हती.
स्वप्ना...टू मच!
स्वप्ना...टू मच!
स्वप्ना, मी पण एकदा चुकून
स्वप्ना,
मी पण एकदा चुकून तंबाखुवालं पान खाल्लं होतं, अर्धच..पण नंतर कसला थयथयाट केला होता..lol
इतर सर्व लहान मुलांप्रमाणे
इतर सर्व लहान मुलांप्रमाणे मलाही वडील जेव्हा दाढी करायचे तेव्हा तो सर्व सोहोळा बघायला फार आवडायचे. दाढी करण्याच्या क्रीमचा वास, तो ब्रश, रेझर, गालाला आणि हनुवटीला पांढरा फेस फासल्यावर कॉमेडी दिसणारे बाबा, त्यांचे ते दाढी करताना आरशात कॉमेडी चेहरे करत बघणे आणि त्या शुभ्र शुभ्र फेसातून कोरून कोरून वाटा काढणारे रेझर.... ज्जाम खुश असायचे मी त्या दाढी सोहोळ्यावर!
एकदा बाबांनी दाढीसाठी लागणारे ब्लेडचे पाकिट घाईघाईत माझा हात पोचणार नाही अशा रीतीने पुस्तकांच्या शेल्फवर ठेवले आणि ते काहीतरी काम करायला गेले. अस्मादिक (वय वर्षे साधारण तीन ते चार) मोठ्ठे चाणाक्ष!
लगेच मी एक छोटे स्टूल ओढत ओढत पुस्तकांच्या शेल्फपाशी आणले...त्यावर चढून ते ब्लेड हस्तगत केले. पण पुढे काय करायचे ह्याची अक्कल नव्हती ना! ते कोरे ब्लेड हातात धरून उत्सुकतेपोटी मूठ बंद केली. ब्लेडच्या धारदार कडेने तळहाताला चीर पडली आणि त्यातून रक्त येऊ लागले. ते लालभडक रक्त पाहिल्यावर मात्र मी जोरात भोकाड पसरला! आई, बाबा, आजी धावत आले.... घरच्यांना मला शांत करायला बरेच कष्ट पडले! त्यानंतर मात्र मी असा ब्लेडला हात लाव, त्याची धार बघ वगैरे उद्योगांपासून जरा दूरच राहिले! 
अजून एक किस्सा : मला लहानपणी
अजून एक किस्सा : मला लहानपणी लिप्स्टिक काय असते ते ठाऊक नव्हते. घरात आई-आजी कोणीच लिप्स्टिक वापरणार्या नव्हत्या व नात्यातही कोणाला मी लिप्स्टिक लावलेले अगर लावताना पाहिलेले नव्हते!
एकदा वडीलांच्या एका स्नेह्यांच्या गावी त्यांनी आम्हाला बोलावले. आम्ही सायंकाळी पोचलो व त्यांच्या भल्या मोठ्या बंगल्यावर जाऊन थडकलो. स्नेह्यांनी आमच्या परिवाराचे स्वागत केले. तेव्हा त्यांच्या पत्नीला सायंकाळच्या वेळेस लालचुटुक ओठांचा चंबू करून, तोंडाने वेगवेगळे आवाज काढत त्यांच्या कुत्र्यांना खेळवताना पाहिले आणि मी त्या काकूंच्या ओठांच्या लालचुटुक रंगाने हरखूनच गेले!
त्या काकूंचे जरा वर्णन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्या काकू गुबगुबीत म्हणजेच ''खात्या पित्या घरच्या'' होत्या, पण गोर्यापान, गुलाबी सौंदर्य.... काळेकुरळे केस, अंगावर सोन्याचे आधुनिक घाटाचे भरपूर दागिने, अंगावर झुळझुळीत फुलाफुलांची तलम साडी आणि तसलाच मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज....उंची पर्फ्युमचा दरवळ.... मी त्यांच्या अश्या ''पर्सनॅलिटी''ने जाम भारून गेले होते. आणि सर्वात उत्सुकता त्यांच्या लालचुट्टुक ओठांविषयी! कारण आत्तापर्यंत मी कोणाचेच ओठ एवढे लालभडक पाहिले नव्हते. हां, तसे विडा खाल्ल्यावर माझेही ओठ लाल व्हायचे... पण ती छटा वेगळी आणि ही लालचुटुक छटा वेगळी! मला ह्या छटेने भलतेच मोहात पाडले होते! मनाशी त्या लाल रंगाचा विचार करतच मी त्या रात्री त्यांच्या घरी झोपले.
दुसर्या दिवशी सकाळी आई मला दूध प्यायला म्हणून त्यांच्या किचनमध्ये घेऊन गेली. त्या काकू डायनिंग टेबलपाशी बसून त्यांच्या पॉमेरियन कुत्रीशी खेळत होत्या. त्यांचा आचारी गॅसपाशी काय काय कामे करत होता. टेबलावरील सेंटरपीस सारख्या ठेवलेल्या भाज्यांच्या परडीत काही हिरवीगार कारली ठेवली होती. त्यातीलच एक कारले हातात घेऊन त्या काकू ते कारले आपल्या ओठांवरून (चाळा म्हणून) फिरवत होत्या. झाले!!!!! मला त्या लाल ओठांमागचे रहस्य उमगले! ''कारले ओठांवरून फिरवले की ओठ त्या काकूंच्या ओठांसारखेच्च लाल लाल होतात'' हे रहस्य होते ते!
घरी परत आल्यावर मी हौसेने आईबरोबर भाजीखरेदीला गेले आणि आग्रह, हट्ट करकरून आईला कारली आणि दोडके खरेदी करायला लावले! (कारली ''फेल'' गेली तर दोडकी आहेतच हे लॉजिक!) घरी आल्यावर आरशासमोर उभी राहून मी मोठ्या तन्मयतेने माझ्या ओठांवरून कारले फिरवून ओठ लाल होतात का ते पाहू लागले. ओठ काही ''त्या'' छटेसारखे लाल होईनात, हुळहुळे मात्र झाले. मग रडारडी! आईला कळेचना काय झाले ते....हुंदके देत, कसेबसे मी माझ्या भंगलेल्या स्वप्नाविषयी, ओठांना लालचुटुक करण्याविषयी तिला सांगितले.... तिला तर हसू आवरेना. नंतर वडील, आजी यांना कळाल्यावर तेही हसू लागले! पण आईनेही मोठ्या समयसूचकतेने तो रंग लिप्स्टिकमधून कसा येतो ते सांगितले.... शिवाय लिप्स्टिक लहान मुलांच्या त्वचेला, आरोग्याला कशी घातक आहे ते समजावून सांगितले. मी ''मोठ्ठी'' झाले की मला लिप्स्टिक घेऊन द्यायचे प्रॉमिस केले. तेव्हा आणि तेव्हाच माझे रडे निवले. अर्थात त्यानंतरही माझे ओठ लाल करायचे प्रयत्न संपले नाहीत. फक्त मी ते विडा, बीटच्या चकत्या, टोमॅटोचा रस, जॅम इत्यादी माध्यमांतून करत असे! खरोखरीची लिप्स्टिक हातात यायला मला कॉलेजच्या फर्स्ट इयरपर्यंत वाट पाहावयास लागली!
अकु, खासच आहेस गं... नशीब तू
अकु,
खासच आहेस गं...
नशीब तू आतून लाल असणारी कारली फिरवली नाहीस ओठांवरून.. हेहे..
एक फूल, नशीबच म्हणायचं!
एक फूल, नशीबच म्हणायचं!

आम्च्या घरी दिवाळीला
आम्च्या घरी दिवाळीला पानसुपारीला गावातील लोक यायचे. पानाच्या तबकात तम्बाखु,विडी याचाही समावेश असायचा. काही लोक गप्पा मारता मारता २-४ विडया हळूच खिशात टाकाय्चे. आम्हि भावानी मग एक गम्मत केली. विडया मोक्ळ्या करुन त्यात लहान लवन्गी फटाके भरुन टाकले. ज्यानि विड्या नेल्या होत्या त्यनि बाहेर गेल्यानन्तर पेटव्ल्यावर त्या हातात वाजल्या. वडिलाना हे कळाल्यावर मग फटके बसले.
फटाके तुमच्या अंगाखांद्यावरही
फटाके तुमच्या अंगाखांद्यावरही वाजले म्हणा की! लई भारी कैलास!
हा किस्सा खरे तर
हा किस्सा खरे तर ''उद्योगां''मध्ये तसा येणार नाही.... पण लहानपणीच्या निरागसतेची खूण म्हणून त्याच्याकडे नक्कीच बघता येईल!
मी तिसरी-चौथीत असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! उंचनिंच, गोरेपान, सडसडीत अंगयष्टी, डोक्याला अर्धटक्कल, डोळ्यांना चष्मा... वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. इतके, की त्यांच्यासमोर के.ई.एम. मधील सर्व डॉक्टर कधीच बसायचे नाहीत.... ते एखाद्या वॉर्डमध्ये, रूममध्ये आले की वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरपर्यंत सगळेजण अटेन्शनमध्ये!
पण ते माझ्याशी बोलताना कसलाही अभिनिवेश न बाळगता अतिशय खट्याळपणे, मला चिडवत - माझी मजा करत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. एका सुप्रसिध्द थिएटरच्या शेजारी होता हा दवाखाना. चढून जायला जुन्या स्टाईलचा लाकडी जिना होता.
डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत तिच्याकडून गोड गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर???
ते माझ्या पायाच्या नडगीवर जोरात चापट्या मारायचे.... माझे रिफ्लेक्सेस कसे आहेत हे चेक करायला.... आणि आईला म्हणायचे, ''तुझी डॉटर फार डिटरमाईन्ड आहे! तिला दुखत असले तरी दाखवत नाय हां चेहर्यावर तसा!''
त्यांनीच एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा म्हणजेच पिगी बँक!] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले. त्यांनी ती नाणी माझ्या भावनेचा आदर करायचा म्हणून नर्सला जमा करून घ्यायला सांगितली आणि प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, ''गॉड ब्लेस यू माय चाईल्ड!'' म्हणत.....
अकु ओठांवरून तू भाज्या तरी
अकु ओठांवरून तू भाज्या तरी घासल्यास मी तर लहानपणी आजीच्या फणेरपेटीतून कुंकु आणि मेण घेऊन ओठाला लावले होते ...ते निघता निघेना शिवाय त्याचा इतका घाण वास सुटला...आईचा जो मार खाल्ला म्हणून सांगू ...!!
स्वप्ना..... अशक्य!
स्वप्ना..... अशक्य!
अकु ओठांवरून तू भाज्या तरी
अकु ओठांवरून तू भाज्या तरी घासल्यास मी तर लहानपणी आजीच्या फणेरपेटीतून कुंकु आणि मेण घेऊन ओठाला लावले होते
>> आम्ही बहिणी बहिणींनी गंध लावलेला..
आणि एका मैत्रिणीच्या ३-४ वर्षाच्या मुलीनं नेलपेंट (मैत्रिणीनं मार्किंग साठी म्हणून वगैरे फालतू नेलपेंट आणलेलं ..)
मैत्रिण आणि तिच्या नवर्याची जाम तंतरलेली.. ओठांना रिमूव्हर पण लावू शकत नाही!
आणखीन एक, आमच्या लहानपणी आईनं एक लिपस्टिक विकत घेतलं (त्यावेळी आईकरताही लिपस्टिक म्हणजे अप्रूप असण्याचे दिवस होते).. आई ऑफिसला गेल्यावर माझ्या कझिन्स, ताई आणि मी म्हणून कपाटात हुसकापासक करून ते बाहेर काढलं.. आणि सगळ्या जमिनीवर त्याच्या रेघोट्या मारून ठेवल्या..
दागिने गुंडाळायचा कागद असतो
दागिने गुंडाळायचा कागद असतो ना राणी कलरचा तो भिजवून ओठावर रंग लावला होता मी. लिपस्टिक म्हणून..
खूप लहानपणी नाही पण ११ वी मधे
खूप लहानपणी नाही पण ११ वी मधे फ्लिक्सची फॅशन आली होती. अगदी राहुल रॉय सारखे हिरो पण फ्लिक्स कापायचे. तर स्वत:च्या हाताने स्वत:च्या फ्लिक्स कापल्या होत्या. पण त्या दोन्ही बाजूला लेव्हल करता करता कानाच्या वरचं एखादं इंच अक्षरश: नुकताच वाढलेला क्रू कट झाला होता..
आणि मी तशीच कालेजात जात होते..
नानबा, नी
नानबा, नी
अरुंधती,स्वप्ना_तुषार्,एक फुल
अरुंधती,स्वप्ना_तुषार्,एक फुल तुमचे उद्योग भन्नाट बरं का !
तुमचे एव्हढे खास उद्योग्,किस्से वाचुन मला पण राहावल नाही ....म्हणुन
मी आठवीत असताना माझ्या एका धाडशी/वेड्या मित्राने त्याच्या घरातुन (त्यांचे काकांच्या स्टोकमधुन असेल) एक व्हिस्की/ब्रंडीची (ब्रंड नक्की आठवत नाही पण या दोन्हीपैकी होतं) एक बाटली शाळेत आणली ,पीटीच्या तासाला आम्ही मैदानावर गेलो, एका टोकाला ऊसाची शेती होती, तिथे त्यांन सगळ्यांना (५-६ जणांना) एकत्र केल आणि बाटली पेश केली, सुरुवातीला बुच भरुन सर्वानी आस्वाद घेतला, त्यातील दोघांनी माघार घेत पळ काढला, मग आम्ही चोघांनी ती संपवली,त्यात त्या मित्राचा वाटा नक्कीच ज्यास्त होता,त्याला मी चांगला पाठींबा दिला, मग आम्ही उशीरा वर्गात आलो, मागे बसलो, ४५ मिनिटे डोक गुंग झाल होत तिथुन सरळ घर गाठल ...त्यानंतर मात्र १०-१२ वर्षे असा मित्र भेटलाच नाही ..
मी लहानपणी परिक्षेत गणपतीला
मी लहानपणी परिक्षेत गणपतीला काय आवडते ? या प्रश्नाचे उत्तर पंचखाद्य असे लिहिले होते कारण मोदक सगळेच लिहितात ना ! बाईनी मार्क नाही दिले.
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://www.maayboli.com/node/16976
अनिल७६ >> लै भारी.
अनिल७६ >> लै भारी.
लै भारी मंडळी
लै भारी मंडळी
TV मधे ५०० बार ची AD
TV मधे ५०० बार ची AD बघीतलेली..

त्यात त्या ५०० बार चे छोटे छोटे तुकडे करतात...
ते बघुन मि पन चाकु घेउन छोटे छोटे तुकडे केलेले
Mummy म्हणाली ..आता तुच याचे कपडे धूउन दखाव
आम्ही शाळेत असताना मुली
आम्ही शाळेत असताना मुली मुलींनी एक अभिनव उपक्रम चालू केला होता. सप्तसुरांकीत या नावाने एक संस्था स्थापन केली होती.
७ जणी होतो म्हणून सप्तसुरांकीत. त्या संस्थेअंतर्गत वर्गात फिरते वाचनालय चालवायचो. फक्त १० का असे कहीतरी रुपये भरून वर्गातल्या मुला/मुलींना सभासद होता येत असे. आणि प्रत्येक पुस्तकासाठी फक्त २५ पैसे! 
) होता.
शिवरायांना मावळे जमवून स्वराज्य स्थापन करताना जितका अभिमान वाटला असेल तितकाच त्यावेळी आम्हा मैत्रिणींच्याही मनात दाटून आला होता.
आता आठवलं की आम्ही सगळ्याजणी इतक्या हसतो ना त्या वयातल्या वेडगळपणाला 
आम्हा सातही जणींकडे चंपक, ठकठक, चांदोबा ही आणि chidren's knoledge bank, इसापनीती, पंचतंत्र वै. खूप पुस्तके होती. ती सर्व माफक दरात वर्गात इतरांनाही वाचायला मिळावी हा उदात्त हेतू(
आणि गंमत म्हणजे आमच्या पैकीच एकीच्या आईने या संस्थेसाठी एक प्रतिज्ञा ही लिहून दिली होती. ज्यात आम्ही एका चांगल्या हेतूने हे करत आहोत. यातून मिळालेला नफा आम्ही न भांडता वातून घेऊ. वै. वै. लीगल गोष्टींचा पाढा वाचला होता. आणि सगळ्यात हाईट म्हणजे घराजवळील एका शंकराच्या मंदीरात गाभार्यात वै. जाऊन पिंडीसमोर सर्वांनी ही प्रतिज्ञा म्हटलीही होती
शिवाय अधून मधून कसले कसले डेज साजरे करायचो. उदा. अमुक दिवशी "लोंबते कानातले डे"! मग त्या दिवशी क्लास ला येताना सर्व जणींनी लोंबतेच कानातले घालायचे. एखाद थंडीच्या दिवशी स्वेटर डे. किंवा मग एखादा कलर ठरवायचा. मग सर्व जणी सेम पिंच मोड मध्ये
"लोंबते कानातले डे"!
"लोंबते कानातले डे"!

निंबुडा, आम्ही हे पुस्तक
निंबुडा, आम्ही हे पुस्तक लायब्ररी उद्योग इयत्ता तिसरी-चौथीत केले होते. पण आमची पुस्तक वर्गणी म्हणजे चॉकलेटच्या सोनेरी चांद्या, रंगीत पिसे, पेन्सिलीची बुटुके वगैरे असायची!
आमच्या शाळेत फिरती लायब्ररीसुध्दा होती. आठवड्यातला एक वार त्या लायब्ररीवाल्या बाई त्यांची पुस्तकांची पेटी घेऊन वर्गावर यायच्या. तो तास आम्ही गोष्टीची पुस्तके वाचायचो, शिवाय घरी न्यायलाही पुस्तक मिळायचे. त्या पुस्तकांमध्ये (वर्षानुवर्षे अनेकदा तीच तीच पुस्तके फिरत असल्यामुळे) कोणती पुस्तके घ्यायची, कोणती नाहीत हेही माहीत होते पक्के. एखाद्या मुलीला माहीत नसले की तिला एक लांडगे व कोल्ह्यांच्या गोष्टींचे ज्जाम बोअर पुस्तक होते तेच ''कित्ती छान आहे हे पुस्तक.... तू हे वाचच!'' करत घ्यायला लावायचो. ती मुलगी ते पुस्तक हौसेने घरी घेऊन जायची आणि दोनच दिवसांत दात-ओठ खाऊन ज्या मुलीने बकरा बनवला तिच्याकडे खुन्नस देऊन पहायची! आठवडाभर ते पुस्तक तिच्याकडे ''सेफ'' रहायचे मग!
ह्म्म.. आम्ही पण लायब्ररी
ह्म्म.. आम्ही पण लायब्ररी उघडण्याचा 'प्रयत्न' केलेला अचानक आठवला..
एकदा बुचाच्या फुलांच्या वेण्या केलेल्या आणि एक तरट टाकून रस्त्याच्या कडेला विकत बसलेलो
(आता बुचाच्या वेण्या कोण कशाला विकत घेईल!)
मारुतीच्या देवळात 'गणपती' बसवलेला.. सगळी ६वी ते ८ वी वयोगटातली मंडळी.. पुस्तक वगैरे छापून वर्गणी जमा केलेली..
त्या देवळात कधीही कुणी फिरकायचं नाही ..
पहिल्याच वर्षी - ५ व्या दिवशी गणपती मंडळाच्या सभासदांचे मतभेद होऊन (भांडण!) मंडळ फुटलं आणि गणपतीचं विसर्जन झालं..
एकदा बुचाच्या फुलांच्या
एकदा बुचाच्या फुलांच्या वेण्या केलेल्या आणि एक तरट टाकून रस्त्याच्या कडेला विकत बसलेलो >>> आम्ही आजोळी कोकणात गेलो की सायाची पानं पाण्यात चुरडून लाल पाणी शाई म्हणून औषधाच्या छोटुशा बाटल्यांमधे भरुन विकायला बसायचो. १५ मिनिटांनी मामा ओरडायचा आणि अंगणातून घरात घेऊन जायचा.
बुचाची फुलं?? ते काय असतं?
बुचाची फुलं??
ते काय असतं? 
अगं, बुचाची फुलं, त्याच्या
अगं, बुचाची फुलं, त्याच्या पिपाण्या पण करता येतात ती. शाळेत जाताना बुचाची फुले आणि टण्णू गोळा करणे हा एक मस्त उद्योग होता. आणि कुणी त्रास दिला की तिच्या/त्याच्या डोक्यात तो टण्णू मारणे
वास चांगला असतो.. लांब
वास चांगला असतो.. लांब दांड्याची फूलं असतात.. (किंवा लहानपणी तरी लांब वाटायची ;))
१५ मिनिटांनी मामा ओरडायचा आणि अंगणातून घरात घेऊन जायचा. >> बहुतेक सगळ्या उद्योगांची परिणीती ह्यातच होते ना!
बादवे, सायाची पानं म्हणजे काय असतं?
Pages