लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

pd1688277.jpgPeep01.jpg

ही बुचाची फुलम आणि सप्टे-ऑक्टो मधे याला फुल येतात. सुगंधानी परिसर भरुन जातो आणि झाडाखाली शुभ्र पाढरा सडाच पडतो फुलाम्चा. Happy

माझ्या लहानपणी आमचे घर म्हणजे पक्ष्यान्चे हॉस्पिटलच होते...... दोन टोपल्या आणि त्यात घातलेली गोधडी हा त्यान्चा बेड्.....मग अगदी विहिरित पडलेल्या चिमण्यान्पासुन ते कावळ्यानी टोचलेल्या पोपट, ताम्बट, बुल्बुल अश्या पक्ष्यान्पर्यन्त कोनि जखमी असले कि त्याची रवानगी थेट माझ्या घरात असायची.... आणि मग दोन चार दिवस पाहुण्चार झोडुन झाला की पक्षी आरेच्या वनराईत नेऊन सोडायचे हे उद्योग....
अगदी कोकिळा, बगळा यानी पण हजेरी लावलेली होती.....

माष्यान्चे पण तेच्.....मुद्दाम घरी आणताना लोडेड फिमेल आणायची (ब्लॅक मॉली, टेन्जेलिन वगैरे पिल्ले घालणारे मासे) आणि मग पिल्लान्साठी मित्रान्च्या जोडिने बनवलेल्या छॉट्या टॅन्क्मधे तिला सोडायचे, पिल्ले झाली कि सगळे बाल्गोपाळ मन्डळ घरात धुदगुस्.....धमाल असायची...... Happy

गावाला गेले कि हेच उद्योग असायचे......... तिथे शेजार्‍यान्कडे एका खोलित २६ ससे पाळले होते.... खोलिभर बिळे करुन ठेवली होती त्यानी.....पण ते पाहुन आपली ट्युब पेटली...... एक ससा मुम्बईला न्यायचाच असा निर्धार झाला.... आणि तशी फुल फिल्डिन्गच लावली मी......बर्‍याच मिनतवार्‍या करुन अखेर होकार मिळाला........ त्यावेळी गावाहुन फक्त एस्टी चीच सोय होती.....आणि सश्याचे वेगळे तिकिट लागेल हे कळल्यावर पुन्हा नकारघन्टा वाजली.....मग लहान बहिणीला जोडिला घेउन आम्ही शक्कल काढली... एका कापडी पिशवित सश्याला भरला...त्यात कोबिची पाने आणि गाजर घातले.....आणि सम्पुर्ण प्रवास ती पिशवी मान्डीवर घेऊन कन्डक्टर्ला थान्ग्पत्त लागु न देता अखेर तो ससा घरात आणलाच.....

खुपच रुळला होता तो महिन्याभरात...... सगळे मित्र्-मैत्रिणी आम्ही शळेतुन येताना भाजिवाल्यान्कडुन पाला घेऊन यायचो त्याला...पण त्याच्या लघविने घरात इतके डाग पडले की ते काहि केल्या जाइनात्...सगळ्या टाईल खराब आणि वर वास यायचा तो वेगळाच...मग अखेर फतवा निघाला आणि जड मनाने त्या सश्याला दुसरिकडे द्यावा लागला........ Sad

असेच एकदा घरात टॅन्क नव्हता म्हणुन बाटलीत मासे ठेवले होते.........सकाळपासुन एक मासा उलटा होऊन तरन्गत होता......आईने सान्गितले अरे बहुतेक मासा मेलाय्....मी म्हणतोय अग नाही ग, मादी आहे ती...ती आता पिल्ले घालणार आहे म्हणुन पोट फुगलय एवढच.....त्यावेळी गावाहुन आजि आलि होती....त्याना काय ते कळले होते पण डायरेक्ट सान्गणार कोण मला...दोघी आपल्या एकमेकिन्कडे बघतायत........ शाळेत जाताना सुद्धा अग बघ मि शाळेतुन येईपर्यन्त पिल्ले झाली असतील असे सान्गुन मी बाहेर पडलो....मासा आपला जैसे थे च होता.
सन्ध्याकाळी शाळेतुन आल्यावर दप्तर टाकुन पहिला बाटलीकडे धावलो आणि अवस्था बघुन आपला पोपट झाल्याची जाणीव झाली......... मागे वळलो तर आजी विचारतेय, काय झाली का पिल्ले बघु तरी......
मी हिरमुसलेला आणि त्या दोघी मात्र खोखो हसतायत... आजही आठवतो तो किस्सा आणि खुप पिडतात दोघी...... Lol

माझ्या मित्राच्या चुलत भावाचा किस्सा !
तो लहान असताना त्याने घरात आईस्क्रीम का कशासाठी तरी पैसे मागितले ...
मग त्याला "पैसे काय झाडावर लागतात काय?? ते कमवावे लागतात." इत्यादी मुक्ताफळे मिळाली. Sad
आता पैसे कमवायचे म्हणजे पठ्याने काय करावे ?
हा गेला किचन मध्ये ... शेंगदाणे घेतले .. मस्त तिखट मीठ लाऊन तळुन घेतले...
आणि बसला चक्क देशी दारूच्या दुकानासमोर ... 'चकना' विकायला... Biggrin

त्याच्या वडिलांनी त्याला तिथे पाहिल्यावर त्याची मस्त चंपी केली आणि घरापर्यंत वरात काढली ती वेगळीच !

अरे बापरे ! Lol

हा गेला किचन मध्ये ... शेंगदाणे घेतले .. मस्त तिखट मीठ लाऊन तळुन घेतले...
आणि बसला चक्क देशी दारूच्या दुकानासमोर ... 'चकना' विकायला... >>>> एवढ्या लहान मुलाला हे सगळं माहिती?

त्याच्या वडिलांनी त्याला तिथे पाहिल्यावर >>> ते तिथे कशाला गेलेले?

अहो ते रस्ताने घरी चाले होते ...
आणि मुलाला हे एवढे कसे माहिती ... ?? तीच तर मजा आहे ना !!
सगळ्यांचीच बोटे तोंडात गेली होती हा प्रकार ऐकून .

हे दारू आणि तळलेले शेंगदाणे...! बाप्रे! पण पोरांचं काय सांगता येत नाही.
पण एकदा माझ्या लेकाने लहानपणी घरातलं भंगार साठवून ठेवलं होतं. बरंच काही साठवायचा तो. मी आणि त्याची मोठी बहीण ...आम्हा दोघींच्या जुन्या कानातल्याचे पडलेले खडे साठवून त्याने स्वता:ची एक डायमंड बॉक्स केली होती. तो ती खूप जपायचा. ( गंमत म्हणजे ती छोटीशी डबी मी अजूनही टाकलेली नाही.) तर एके दिवशी बाहेर भंगारवाला ओरडायला लागल्याबरोबर हा आपला खजिना घेऊन बाहेर पळत सुटला ...त्या भंगारवाल्याला आपलं सगळं भंगार.....जुने खिळे, पत्र्याचे तुकडे, लोखंडी सळ्या असलं काही काही विकून आला आणि काहीतरी दहा पंधरा रुपये घेऊन विजयी मुद्रेने घरात आला. म्हणाला " आई उद्या तुझा बड्डे आहे ना तुला काही तरी घेऊया....साडी किंवा ड्रेस येईल का गं याच्यात?"

आमच्या समोर एक मुलगी रहायची. तिला बाहुला बाहुलीच लग्न करायची जाम हौस. आम्हा सगळ्या मुलांना गोळा करुन ती हा घाट घालयची. एकदा तिच्या मनात आल की लग्नाला जेवायला श्रीखंड करायच. ती मला म्हणाली की कस करायच ? मी म्हणल सोप्प आहे. श्रीखंडाच्या गोळ्या आणायच्या आणि भांडभर पाण्यात पाण्यात टाकायच्या. लगेच श्रीखंड तयार. लगबगीने तिने आईला मागे लागुन ५-१० पैसे घेऊन त्या गोळ्या आणल्या. साधारण तासभर तरी मी आणि ती पाण्यात गोळ्या विरघळवुन घट्ट श्रीखंड होण्याची वाट पहात होतो. मग आमचा आचरट्पणा पाहुन तिचे वडील आले आणि म्हणाले ते पाणी पिऊन टाका दोघेजण. अस कधी होत का ?

आणखी एक पहिलीतला किस्सा असा. माझ्या वर्गात एक अतुल नावाचा मुलगा होता. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर एक प्लॅन झाला मी डोळे मिटायचे आणि अतुलने मला ग्राउंड्भर हाताला धरुन फिरवायचे. अतुलने ते बरोबर केल. मग अतुलने डोळे मिटले. मी त्याला फिरवताना १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला झेंडा लावायचा पोल रोवलेल्या कट्याकडे नेले. तोही इमानदारीत डोळे पुर्ण बंद ठेऊन येत होता. पोल च्या कट्याल्या तीन पायर्‍या होत्या. अस वाटल त्याला समजेल. झाल भलतच. कठड्याच्या पहिल्या पायरीला अडखळुन तो पडल्या दुसर्‍या पायरीवर. त्याला शहाबादी फरशीचा टोकदार किनारा होता. अतुलला डोळ्याच्यावर खोच पडली. भळाभळा रक्त आल. बाई धावल्या.लगेच त्याला डॉक्टरांकडे नेल. टाके घातले. त्याने माझी मैत्री तोडली ती अद्याप. मला त्यावेळी का कोणी रागावल नाही हे माहित नाही. माझ्या घरी सुध्दा तक्रार केली गेली नाही. पण तो सल अद्याप आहे.

लहानपणी सुट्टीत आजीकडे आमचा मामेभावंडांबरोबर मुक्काम असायचा. एकदा खालच्या बागेत खेळत असताना अचानक मला 'मयूरनृत्य' बसवण्याची हुक्की आली. बागेत असलेल्या झाडांची मोठी पाने आमच्या फ्रॉक्समध्ये, शर्टात खुपसून नाचाला सुरुवात झाली अणि पाच मिनिटांत सगळे बोंबाबोंब करायला लागले. कारण ती पाने होती शोभेच्या अळूची! ती मोठीमोठी पाने पिसारा म्हणून छान दिसली तरी भयंकर खाजरी होती.... रडारड करत घरी गेलो. मग, तेल, औषध, बर्फ, गार वारा वगैरे असंख्य उपचार आमच्यावर करण्यात आले. तेव्हापासून ती अळूची पानं दिसली की अंगावर शहारे येतात.

चांगली आठवीत होते पण अर्थात स्वयंपाकाचा कधी संबंध आला नव्हता. चहा आणि फारतर भात करू शकायचे. तो पण करायची कधी वेळ आली नव्हती. पण साधारण माहित होते. एकदा वर्गातील एका मुलीने डब्यात मालपुवा आणला होता. मला तो खुपच आवडला. मी हा पदार्थ पहिल्यांदाच बघितला होता. मी तिला कसा काय करायचा वगैरे विचारुन घेतले आणि घरी करायचे ठरवले. आईला सांगितले असते तर तिने खरंतर हौशीने केला असता पण मलाच करण्याची सुरसुरी आली.

मग एका सुदिनी, आई घरात नसताना लहान बहिणीला समिल करुन घेतले आणि दोघी कणिक भिजवायला बसलो. एका आठवीतल्या सुगरणीनी दुसर्या सुपर-सुगरणीला संगितलेली रेसिपी! सगळाच आनंदीआनंद!! आणि अशावेळी जे होणार होतं तेच झालं. कधी कणिक घट्ट, तर कधी फारच पातळ! एक्झॅक्टली काय कन्सिस्टन्सी अपेक्षीत होती देव जाणे!

तर केवळ एक वाटी कणकेपासून सुरुवात करुन लवकरच आम्ही ती परातभर करुन ठेवली आणि मग डोक्याला हात लावून बसलो. आई घरी आल्यावर एवढी परातभर कणिक असतानाही तिने आणखी कणिक तिंबली, हे वेगळे सांगायला नको!!!

अगं हो सायली लहान मुलं असेच गोड गोड उद्योग करत असतात. आत्ता तो माझ्यासाठी त्याचं क्रेडिट वापरतो एवढाच फरक आहे.

स्वप्ना, एक फूल ,
मी पण एकदा चुकून तंबाखुवालं पान खाल्लं होतं, नंतर थयथयाटच केला होता.

माझ्या मामाच्या मुलानि तर cigarette ओढलि होति.
त्यच अस झाल की तो नीट जेवत नव्ह्ता म्हुन मामा त्यला म्हनाल की मी कस जेवतो बघ तस्च तु पन जेव ....
झाल तो जेवला पन नंतर मात्र मामा cigarette ओढतना तो पन त्यच्या खिशातुन cigarette अनुन ओढायला लगला , त्यला सह्जिकच ठसका लागला. मामानी विचारल्यावर म्हन्तो की "तुम्च्या सारख जेवलो न मग ......"
त्या दिवसापासुन मामानी cigarette सोडली.

मी पाचवित असेन कदचित त्यवेळी माझ्या मामाच लग्न ठरल होत.आमच्याकडेच सगळे पाहूणे असय्चे.त्यावेळी मी होनार्या मामीच्या पाहुण्यांना पाहुन माझ्या आजोबांना म्हानाले होते."बाबा तुमचे न्हावी आले बघा"..
त्यवेळी न्हावी अनि व्याही यातला फरक नव्ह्ता काळालेला..
पन तिकडे पाहुण्यांनचे चेहरे पाहण्या सारखे झाले होते.

आम्हि आधि भाडुंप ला रहायला होतो चाळिमधे
मी असेन २-३ वर्षानचि...
तिथे मोठा नाला होता त्यामुळे लोक उडिं मारुन नाला क्रॉस करायचे
हे अस्स सगळ आम्हि लहान चिल्लि पिल्लि नेहमि बघायचो
एकदा असच दुपारि
आई लोक्स झोपल्यावर आम्हि सर्वे गेलो त्या नाल्याजवळ
आणि ठरवल कि जो नाला निट क्रॉस करेल तो जि़कंला
मग काय लागले सगळे उड्या मारायला
गेले सगळे त्या तिथे नाल्यापलिकडे
माझा नबंर आला
मारलि उडि...........
उंचि कमि असल्याने नाल्यापलिकडे न जाता मि थेट नाल्यातच
Proud Proud Proud
मग काय बाकिचि मेंढ्र लागलि केकटायला
तोपर्यंत मला एका दादाने बाहेर काढ्ले नि घरि सोड्ले
समोर आल्यावर आईला काहि नीट कळ्ले नाहि
तिने ओळ्ख्ले नाहि मला
मग दादा बोलला "काकु काकु वैभु नाल्यात पडलि"
आईने मला त्यादिवशि कपडे धुतात तस धुतले होते Lol Lol Lol

लहान पणीची आठवण झाली. बुचाची फुल गोळा करण्यासाठी मी सकाळी ५ ला उठायचे नाहीतर गावातील इतर मुली गोळा करुन घेउन जायच्या. होते आमच्याच वाडीत झाड. मग ह्याची साधी आणि चटईची वेणि करायचे.

नववीतली गोष्ट.......... एका रविवारी दुरदर्शनवर "आनंद" लागला होता. त्या आधीही ३ वेळा पाहिला होता. गाणी तुफान होती त्यातली. दुसर्‍या दिवशी शाळेत गेलो आणि मधेच जोरदार खोकला आला....बाजुला बसणारा मित्र म्हणाला काय झाले........आणि तिथेच आमचे उद्योगी मन "कार्यरत" झाले. मग पुर्ण दिवस मुद्दाम खोकत राहिलो........ असे सतत २ दिवस केले. आणि माझ्या प्लॅनमध्ये एका दुसर्‍या वर्गमित्राला (आमच्या दोघांचे वडीलसुध्धा मित्र आहेत) सहभागी करुन घेतला..... बुधवारच्या मधल्या सुट्टीत दुसर्‍या मित्राने बाजुला बसणार्‍या मित्राला सांगितले "अरे, मिलिंदला कॅन्सर झालाय्..मला माझे बाबा म्हणाले." तो मित्र हबकलाच. इकडे दर तासाला माझे खोकणे चालुच. बेमालुम अभिनय... Lol
निर्लज्जपणा म्हणजे त्या दिवसात एका ऑफ पिरियडला गाणे म्हणायला सांगितले तर मी मुद्दाम "कहीं दुर जब दिन ढल जाये" म्हटले होते..... Rofl
असेच २ दिवस गेले आणि त्या मित्रावर चान्गलाच परिणाम झाल्याचे जाणवु लागले....त्याने घरी जाऊन ही गोष्ट सान्गितली... आणि आम्हाला याचा थांगपत्ता नव्हता. दुसर्‍या दिवशी अनावर होऊन मधल्या सुट्टीत तो मित्र ढसाढसा रडायला लागला......... आता आली का पान्चाईत....... मग त्याला बाजुला घेऊन सगळा उद्योग विषद केला......आणि त्याचा यथेच्च मार खाल्ला..........:अरेरे:
मैदानभर पळत पळत मारले त्याने मला........

नंतर दहावीत असताना एकदा त्याच्या घरी गेलो होतो..तर आत गेल्यावर त्याची मोठी बहीण म्हणाली, "अरे तुझा कॅन्सरवाला मित्र आलाय रे"....... Lol
चांगलाच ओशाळलो होतो तेव्हा...........!

maajhya aajichya hanuvativar don lambudke kes hote me tila ladies aajoba mhanayche. ti zopali ki mi te kes odhaychi ti ashi kinchalat uthaychi ki sagale palat yayche. ashi vaitagaychi ti pan parat maya karaychi... donda mala papani marle pan... pan mala ti zopleli disli ki majhe hat shivshivayche...

निंबुडा अजून काही उद्योगः

६) building च्या आवारात मेलेले उंदीर किंवा मांजर वगैरे दिसल्यास त्याला मातीत खड्डा वगैरे खणून , त्याच्या प्रेतावर रुमाल वगैरे टाकून त्याला यथासांग पुरणे (या साठी एकदा मी बाबांचा चांगला नवा कोरा रुमाल आईकडून मागून आणला होता. अर्थातच आईला माहीत नव्ह्ते की मी त्या रुमालाचा उपयोग काय करणार आहे ते )
>>>> अशक्य हसले!!! Lol Lol Lol

८) रिक्षा किंवा ट्रक च्या नंबर plate वर MCT पासून start होणारा नंबर असेल तर त्याला हात लावल्यास २ तास चांगले जातात असे कुणीतरी सांगितल्यामुळे तशा नंबरच्या रिक्षा आणि ट्रक शोधत फिरणे >>>> Rofl

११) सोमण म्हणून एक सर शाळेत संस्कृत आणि मराठी शिकवीत. त्यांना जांभया भारी येत असत. त्यांनी प्रत्येक तासाला किती जांभया दिल्या ते तास चालू असताना मोजणे आणि तास संपला रे संपला की तो आकडा जोरजोरात ओरडत सुटणे.
>>>>> आमचे एक प्रोफेश्वर दर काही मिनिटांनी विशिष्ट जागी खाजवायचे. आम्ही त्याचा statistical record ठेवून graphs वगैरे काढले होते.

अजूनही बरंच आहे........आठवेल तसं सांगीन........... बादवे, मोदक आणि मी एकाच वर्गात होतो...त्यामुळे त्यालाही अजून काही गंमती आठवत असतील तर पोस्टायला सांगते.........
सोमण सरांच्या lecture ला आम्ही दोघेही एकेमेकांकडे बघून आंख मटक्का करत असू.
>>> आय हाय!!

Pages