खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व ताटे खूप छान...!

तळलेले मोदक यम्मी..
मी चिन्मयी ताटात दोन मुदी कशा काय?

मोदक नेहमीच फेव्हरेट
पण या फोटोत नजर त्या भाताच्या जुळ्या मूदींवर अडकून राहतेय Happy

मी चिन्मयी ताटात दोन मुदी कशा काय?>>> नैवेद्याच्या पानात एका ऐवजी दोन मुदी वाढाव्यात असं म्हणतात. म्हणून ते.

कालचा नवीन प्रयोग - लाल भोपळ्याचे इंस्टंट डोसे
057FDDBF-06ED-4D45-813E-371E3FBDAAC3.jpeg

लेकीला आवडले म्हणून आज डब्यातही तेच चिकटवले
7E990C39-FDC8-413E-B4AB-E97985AFB646.jpeg

आणि हा कालचा डबा - किशमिश वेज पुलाव, गाजराचे आप्पे आणि शेवयाची खीर
E985680C-8168-4B66-9B89-4D79650C2E57.jpeg

आणि हे आत्ताच तव्यावरून ताटात काढलेलं आलू चिली चीज सॅंडविच आणि चहा
5915E80A-9196-4556-99E9-D3652F4E2EEE.jpeg

म्हाळसा, सगळेच डबे लाजवाब दिसताहेत. आणि सँडविचेस खायला लगेच तिकडे यावंसं वाटतंय Happy
लाल भोपळ्याचे इंस्टंट डोसे कसे केलेस? रेसिपी दे ना.

rmd , फार मस्त दिसतेय दोन्ही Happy किती वेळ बघितले.
म्हाळसा व मी चिन्मयी , खूप आवडले नैवद्याचे ताट आणि डबा.
ट्यूलिप व बन्डु , आभार Happy

थँक्यू म्हाळसा! इंटरेस्टिंग दिसतेय रेस्पी. याचा शॉर्ट्कट म्हणून तांदूळ पीठात पम्पकिन प्युरी टाकून घावने टाकता येतील का ( आणि चवीला चांगली लागतील का ) हे पहायला हवं.

थँक्यू अस्मिता Happy

पहिला फोटो पहाता क्षणी ओळखलं कोणाची पोस्ट आहे ते. >>>>> मी डब्याचा फोटो पाहीला कि ओळखलं Proud

आणि हे आत्ताच तव्यावरून ताटात काढलेलं आलू चिली चीज सॅंडविच आणि चहा >>>>> चहा कसा करतात ते माहीतेय, आलू चिली चीज सॅंडविच कस बनवलसं ते सांग !

पोषणमूल्यांचाही विचार केलेला दिसतो >> जमेल तितकं हिरव्या आणि लाल रंगाचे पदार्थ द्यायचा प्रयत्न करते.. पोषणमूल्यही मिळतात आणि डब्यांचे फोटोही छान येतात
हा आजचा डबा - लाल भोपळ्याचे गूळ घालून बनवलेले पराठे,बीटरूट चे अप्पे, शिरा आणि आंबे
854A8D20-2CDC-4B07-850B-3E59D8FFC373.jpeg

चहा कसा करतात ते माहीतेय, आलू चिली चीज सॅंडविच कस बनवलसं ते सांग >> ये मामूली चाय नही है.. ये विगन चाय है.. विगन चहाची रेसिपि नका विचारू.. मी फक्त फोटो पुरता कप उसना घेतलाय ..
आलू चीज चिलीमधे उकडलेले बटाटे, अमूल चीज, बारीक चिरलेली थोडी शिमला मिरची आणि मिरची कोथिंबीरीची चटणी एकत्र करून ब्रेडला लावून आतलं चीज वितळेपर्यंत मंद गॅसवर खरपूस भाजलेत.

Mazeman, माझी रेसिपी बरीच अवलच्या रेसिपी सारखी आहे.
फरक आहेत ते असे -
१. टोटल कांद्यापैकी २/३ कांदा फोडणीत आहे आणि १/३ वाटणात.
२. वाटण = कांदा + सुकं खोबरं + लसूण. हे वाटण खिचडी ऑलमोस्ट शिजत आल्यावर घातलं. म्हणजे गॅस बंद करायच्या आधी ५ मिनिटं
३. तेलावर आधी खडा मसाला (तमालपत्र + दालचिनी + लवंग + मिरी) घातला. त्यावर थोडी आलं लसूण पेस्ट घालून परतलं आणि त्यावर तो २/३ कांदा घातला

बाकी कृती सेम.
पण तरी अगदीच डिटेल्ड रेसिपी हवी असेल तर १-२ दिवसांत वेगळा धागा काढते.

ये मामूली चाय नही है.. ये विगन चाय है.. >>>> पहिल्यांदा च ऐकतोय

सँडविच रेसिपी साठी धन्यवाद Happy

पहिला फोटो पहाता क्षणी ओळखलं कोणाची पोस्ट आहे ते. >> मी पण.>>> मी खालून पहिला सॅंडवीच चहा फोटो पहाता क्षणी ओळखलं..

Pages